#वाटणी ... भाग 2
✍©️जया पाटील
मागील भागात आपण पाहिले साक्षीने सगळ्या प्रॉपर्टीची वाटणी पाडावी अशी मागणी केली. नात्यांमध्ये अजूनच कटुता नको म्हणुन विनायकरावांनी साक्षी आणि नितेशची मागणी मान्य केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी वाटणीची बैठक आपण करूया आणि कायदेशीर रित्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से करूया असे विनायकरावांनी सांगितले.
त्या रात्री साक्षी नितेशला म्हणाली ....,
नितेश, तु म्हणतोस ना .. माझा भाऊ खूप चांगला आहे .. मला त्याच्या हिस्सातले अर्धे तो कायम देतो .. उद्या त्याच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हिस्सा मागुन पहा ..म्हणजे तुझ्या दादाचे खरे रूप तुझ्या समोर येईल ...
दुसऱ्या दिवशी वाटणीची बैठक सुरु झाली. विनायकरावांनी घर , शेती आणि इतर गोष्टींची दोघीही मुलांना सारखी वाटणी करून दिली.
मग नितेश बोलु लागला ...
विजू दादा .., तु नेहमी म्हणतोस ना ..
नितु .., माझे जे काही आहे सगळेच अर्धे तुझेच आहे.. माझा तुझ्यात खूप जीव आहे ..मग दे तुझ्या वाट्याला आलेल्या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा मला ....
मला देखील पहायचे आहे ..तुझा माझ्यात खरेच जीव आहे की हे सगळे नाटक होते ...
नितेशच्या बोलण्याचा सगळ्यांना खूप धक्का बसला.
विनायकराव त्याच्यावर ओरडले ...
प्रॉपर्टीची वाटणी मी केलीय ..तु असे कसे बोलु शकतोस ... नितेश.. ?
विजय मात्र खूप शांत उभा होता. त्याने विनायकरावांना शांत केले आणि तो नितेशला म्हणाला ...
नितु , एका प्रॉपर्टीच्या तुकड्यासाठी तु माझ्या प्रेमाची परीक्षा घेतोय .. माझ्या प्रॉपर्टीचा पण अर्धा हिस्सा मी तुझ्या नावे करतोय ..
विनायकराव विजयला मधेच थांबवत म्हणाले ..
अरे विजू , अनुराधा आणि यशचा तर विचार कर , अनुराधाचे मत विचार .
अनुने केव्हाच खुणेने होकार कळवला आहे मला बाबा , विजय म्हणाला.
नितेश पुढे बोलु लागला ...
प्रॉपर्टीचे तर झाले आता आईबाबांचा प्रश्न आहे ..
सहा महिने तु आणि सहा महिने मी ..असे त्यांना सांभाळू वाटणीच्या नियमाप्रमाणे ..आणि त्या काळातला खर्च ज्याच्याकडे आईबाबा असतील तो करेल.
अरे ..पण दादा .... यातला पण अर्धा भाग म्हणजे माझ्यातले पण तीन महिने आईबाबांना तु सांभाळायचे ..
विनायकराव आणि रमाताईच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा होत्या. आईवडिलांची देखील वाटणी झाली होती. त्यांना स्वत:चे घर सोडून जाण्याची वेळ आली होती. आता त्यांचे लक्ष विजयच्या बोलण्याकडे लागून होते.
विजय बोलु लागला ...
नितु माझे तुझ्यावर खूप जास्तच प्रेम आहे ... त्यामुळे आईबाबांची वर्षातील बाराही महिने सांभाळण्याची जबाबदारी मी घेतो .. त्यांचा सगळा खर्च देखील मीच उचलतो...
माझ्या इतकेच हे घर आजही तुझे देखील आहे ..त्यामुळे ज्यावेळेस तुला आईबाबांना भेटावे वाटेल त्यावेळेस तु इथे येऊन त्यांना भेटू शकतो , इथे हवे तितके दिवस राहू शकतो. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमच उघडे असतील.
झालेल्या वाटणीतील सगळे साहित्य घेऊन नितेश आणि साक्षी दुसरीकडे राहायला निघुन गेले. त्यांनी एक मोठे घर विकत घेतले. घरातील सगळ्याच वस्तु आलिशान होत्या. त्यांना एक गोड मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव ' अखिल ' असे ठेवले. नितेश अतिशय अलिशान जीवन जगत होता. पैशात मोजता येणारी सगळी सुखं होती त्याच्याकडे .
इकडे विजयवर इतक्या जबाबदाऱ्या असल्यामुळे तो साधारण आयुष्य जगत होता परंतु तरीदेखील अनुराधा, विजय दोघेही खूपच खुश आणि समाधानी होते.
समाधानी असणारच ....!
घरातील मोठयांचे प्रेम , आशीर्वाद सगळेच त्यांच्या पाठीशी होते. यश नंतर अनुने एका गोड मुलीला जन्म दिला. तिचे नाव त्यांनी ' ईशा ' असे ठेवले. मुले मोठी होत होती. सगळे काही छान चालू होते.
क्रमश:
विजय आणि नितेशच्या आयुष्याला पुढे काय वळण मिळेल जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.
उर्वरित भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇
तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ....!
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

1 Comments
Sad reality of life. Money many times make people blind.
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box