सख्या रे- रोमँटिक कथा

 


सख्या रे- रोमँटिक कथा

© Velvet Kavisha

सगळं जसं तुला हवं तसं खरेदी कर म्हणत त्याने तिला मुभा दिली. तिनेही मनसोक्त खरेदी केली. दुपारचं जेवण दोघांनी हॉटेलमध्ये घेतलं. बाईकच्या शोरूममध्ये पोचले दोघे. उपलब्ध असलेल्या बाईक्समधून मनासारखी बाईक खरेदी केली. कौपिनेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथेच  बाईकची पुजा केली. हार, पेढे घेतले. कौपिनेश्वराचं दर्शन घेतलं आणि निघाले. तलावपाळीला एक गोल रपेट मारली बाईकवरून...   

तीच त्याला बिलगून बसलेली.  टीशर्टची कॉलर हलकीच खाली ओढून तिने त्याच्या मानेवर ओठ टेकवले.  त्याने आपला हात तिच्या मांड्यावरुन फिरवला. अजून पाठीमागे हात नेत पोटाला गुदगुल्या केल्या. खुप दिवसांनी नव्हे खुप वर्षांनी अशी रपेट. नवीन शहरात, नवीन घरी, नवीन बाईकचं आगमन..  

PSI प्रणव मराठे. नुकतीच ठाण्याच्या हरिनिवास पोलिस स्टेशनला बदली झालेली. पोलिस क्वार्टरससाठी अर्ज केलेला. कधी मिळेल घर काही अंदाज नाही. महिन्याभरत मिळायला हवं. तोपर्यंत ठाण्याच्या बी केबिनमध्ये नातेवाईकांच्या जुन्या चाळीतील दोन रुमच्या घरात संसार मांडला. दोन चाळी होत्या. त्यातील एका चाळीच्या जागेवर बिल्डींग झालीय. प्रणव राहत असलेली ही दुसरी चाळसुध्दा तोडतील आता सहा महिन्यांनी....  

चारच दिवस झाले ठाण्यात येऊन.  प्रवासाचा ताण. सामानाची मांडामांड. प्रियाला सगळ्याचा क्षीण आला. पोलीस स्टेशनला वर्दी देऊन तीन दिवस भरल्यानंतर आज सुट्टी घेतलीय प्रणवने. पुर्ण दिवसाचं प्लॅनिंग करून...

प्रिया आज खुप खुश आहे. या घरात फक्त ते दोघंच राजाराणी. त्याने लग्नाच्या वाढदिवसाला घेतलेली साडी नेसून, पुरेशी तयारी करून, चार वेळा आरशात पाहत सुंदर दिसत असल्याची खात्री करून घेऊन ती आज प्रणवसोबत फिरतेयं. तो ही खुश...

बाईक चाळीच्या जुन्या गेटच्या लाकडी दरवाज्यापाशी पार्क केली. दोघे एकमेकांकडे पाहत, रमतगमत चालत हातात हात घेऊन घरी पोचले. 

घड्याळात संध्याकाळचे चार वाजलेले.  प्रिया फ्रेश होऊन आली. आळसावून सोफ्यावर बसली. प्रणव ही फ्रेश होऊन आला. कमरेला टॉवेल गुंडाळूनच. ओले केस झटकत आरशासमोर  उभा राहिला.   प्रिया पाठमोऱ्या प्रणवकडे पाहतच राहिली. उंचपुरा ५ फुट ७ इंच, रुंद पाठ, व्यायामाने कमावलेली पीळदार शरीरयष्टी, दंडांच्या भरीव बेंडकुळ्या. अंगावर फक्त टॉवेल. आजचा दिवसभराचा सहवास. मनात दाटलेलं प्रेम. असा एकांत आणि प्रियाच्या मनात लखलखलेली वीज. न राहवून तिने त्याला पाठीमागून मिठी मारली.

मघापासून आरशात प्रियाला न्याहाळणाऱ्या प्रणवने तिच्या हातावर आपले हात ठेवले. त्याच्या बगलेतून छातीवर दाब देणाऱ्या तिच्या हातांना त्याने मुठी गच्च करत पकडले.

" Madam जी , क्या खयाल है..!!" त्याने आरशातल्या तिला पाहत हसत विचारलं..

" बड़े ही नेक खयाल है , साहबजी..!!" म्हणत तिनेही पाठीमागून आरशात पाहत हसत हसत डोळा मारला.. 

"ऐसा लगता तो नहीं... !! " म्हणत त्याने तिच्या हाताला धरून पुढे ओढलं...

"छान दिसतेस की या साडीत.." म्हणत चेहरा हातात धरून कपाळावर ओठ टेकवले...

बाहेर निसर्गाचा आणि आत प्रेमाचा दोन्हीकडे अवकाळी पाऊस. तिनेही घट्ट मिठी मारत त्याच्या छातीवर आपला चेहरा लाडिकपणे घासला. दोघांच्या मनांनी कौल दिलेला. रंगंलेले क्षण... मिलनाची आतुरता पराकोटीला . 'कारभारी दमानं' गाणं मनात वाजलेलं... Precautions, position, permission All set with bed corner... & गडबड... गडबड आणि गडबड...

PSI साहेबांचा फोन जोरात रिंगलेला. तो चटकन बाजूला झाला. टॉवेल गुंडाळत फोन घेतला. तिच्या  पाठीची न मोडताच विसावलेली कमान. आssssणि घायाळ हरीणीचे भाव तिच्या डोळ्यांत...

प्रणवला अर्जंट पोलिस ठाण्यात बोलावलेलं. ड्युटी First म्हणत तो निघण्याच्या तयारीत. तिनेही स्वतःला आणि मनाला आवरायला घेतलेलं. बाय करून तो निघाला...

पहिल्यांदा असे  एकांताचे क्षण आले होते आयुष्यात, अगदीच नॅचरली. लग्न होऊन सासरी आली. एकत्र कुटुंब. सासुसासरे, दीर जाऊ, त्यांची दोन आणि यांची दोन मुलं.

प्रणवची अशी नोकरी. नवीन घरात जुळवून घेईपर्यंत arrange marriage मध्ये जसं पहिल्या वर्षात बाळाचं आगमन होतं तसंच "सिया" चं आगमन झालं. ती अडीच वर्षांची झाली आणि "वेद"चा जन्म झाला. चार वर्षांच्या वेद आणि सियाला आजीआजोबांसोबत घरी ठेवून ती प्रणवसोबत ठाण्यात आली. उद्या अरविंद म्हणजे प्रणवचा मोठा भाऊ मुलांना सोडायला येणार आहे.  

आजचे क्षण हातातून निसटलेच. तो ही नाराजीने गेला. काहीतरी करायला हवं खरतरं. मनाला समाजावून ही ते मानायला तयार नाहीय, बंड करून उठलंय. आसुसलंय अगदी. स्वतःच्या नवऱ्याच्या सहवासासाठी, काही हव्याहव्याशा क्षणांसाठी इतकं हवालदिल होण्याची वेळ कोणत्याच स्त्रीवर येऊ नये.

अर्थात त्याचीही परिस्थिती काही वेगळी नाही. समोर "ताट" भरलेलं असूनही न जेवता ते बाजूला सारून जाण्याचं दुःख बायकोवर जीवापाड प्रेम करणाराच जाणो.  

प्रियाच्या डोक्यात काहीतरी विचार आला. ती उठली. स्वतःच्या वडिलांना फोन लावला.  

" Hallo !! बाबा मी प्रिया बोलतेयं... "

" ------ "

"बघा ना, आज प्रणवला बरं नाहीयं. उन्हात फिरलोय त्याचा त्रास झाला. झोपलाच होता.. पण पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं आणि उठून गेलाय दुखऱ्या डोक्यांने.."  

" ------"

"बघा न बाबा जरा. काही ओळख काढून काही तरी करा. अगदीच त्याची गरज असेल तर ठीक आहे. पण त्याच्यामुळे काही अडणार नसेल तर थोडा आराम केला असता ना. फक्त प्रणवला माझं नाव नका सांगू प्लीज....."

" --------"

दोन, तीन, चार, पाच,,,,, दहा मिनिटे प्रिया होल्डवर.शी ssss किती खोटं बोललो आपण. प्रणव खुप कर्तव्यदक्ष आहे. त्याला हे पटणार नाही आपलं वागणं. माफ कर देवा..!!! 

"- - - - " बाबा.

" थँक्यु सो मच बाबा... लव यु..!" फोन कट्.

तिचे बाबाही नाशिकला PSI होते. बाबांनी जुगाड केलाच काहीतरी.

आता प्रणव घरीच येत असेल. प्रियाने धावतच लाकडी गेट गाठलं. घाईगडबडीत अर्धा पदर तसाच राहिला हातावर. ती गेटच्या आडोशाला उभी राहिली. हळूच बाहेर वाकून पाहिलं. प्रणव बाईकची चावी बोटात फिरवत शिट्टी वाजवत गेटकडे येत होता. ती तिरक्या नजरेने त्याला पाहत उभी होती.. तो जवळ येऊ लागला. तशी ती सावध झाली आणि तो पोचलाच..

गेटपाशी तो अगदीच बेसावधपणे आला आणि तिने त्याला " ~भॉ ~" केलं.. हा हा हा...  दचकलाच तो. "अग, काय हे..?? वेडी कुठली. घाबरलो ना... "   म्हणत त्याने हलकेच टपली मारली. तिनेही लाडिक हसून आपल्या दोन्ही हातांनी त्याचा उजवा हात कोपराकडे पकडून त्याच्यासोबत चालू लागली....

पावसाची सर जोरात आली. मोकळ्या मैदानात दोघे. घर काही पावलांवर. प्रियाने प्रणवचा हात हातात धरून थोड्या भिजलेल्या अंगाने पावसात एक गिरकी घेतली. तो धडपडला. एकदम जवळ आला आणि तेवढ्याच वेगाने बाजूला झाला. "तू घे भिजून. मी चाललो घरी" म्हणत पळाला. मागोमाग प्रिया ही.

"प्रिया, चहा ठेव ग. आलं आणि दालचिनी टाक त्यात. अख्ख्या पावसाळ्यात जाणवला नाही इतका गारवा जाणवतोयं. मी आलो चेंज करून.." प्रणवने सांगितले. 

" हो ना.." म्हणत प्रिया किचनमध्ये निघून गेली. पटकन चहा ठेवला. चांगलीच कुडकुडत होती. प्रणव बाहेर आला तशी प्रिया पळाली  बाथरूममध्ये. गाऊन घालून फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आली... तर प्रणव बाथरुमच्या दारातच उभा.
"अरे इथे का उभा आहेस. ?? करमत नाही का माझ्याशिवाय PSI साहेबांना" हसत म्हणत तिने त्याला चिडवलं. त्याने तिच्या दंडाला धरून खेचली.. 

" काय सांगितलंस बाबांना..??" त्याने विचारंल. 

"काही नाही.." प्रियाने उडवून लावला त्याचा प्रश्न..

"बाबांनी तब्बेतीची चौकशी करायला फोन केलेला आता...".तो

अरे देवा...!! हे बाबा पण ना..🤦🤦 त्यांना सांगितले कोणाला सांगू नका म्हणून तर बाबांनी यालाच फोन केला. आता याला काय सांगितलंय काय माहिती. हा म्हणजे एकदम कर्तव्यदक्ष...

"काय म्हणाले बाबा...?? " तिने अंदाज यावा म्हणून केस पुसतच विचारलं...

"आराम करा. जास्त दगदग होतेय तुमची. नक्की काय सांगितलंस त्यांना...???"  प्रणवने तिच्याकडे पाहत विचारलं...

अरे व्वा !!! आपला बाबा तर बापमाणूस आहे राव. याला काही ही कळलं नाही. 'Thank God'

" ते होय... अरे तु मघाशी फ्रेश होत होतास तेव्हा बाबांनी फोन केला . मी म्हटलं त्यांना दगदग होतेयं याची.. पण काय करणार नवीन पोस्टिंग आहे... पर्याय नाही... इतकंच म्हटलं होतं फक्त मी बाबांना.. पण तु लाडका जावई ना!!... इथे मुलीला कोण विचारेना झालंय. आणि जावयाचे लाड बघा किती..." म्हणत तिने डोळा मारला. 

" ओ हो!!  राणी सरकार. काहीतरी जळतंय बरं.  तुमचे लाड करायला आम्ही आहोत ना..!! आता तुमचे लाड खुद्द प्रणव राजे करतील  " म्हणत त्याने तिला उचलून घेतलं. दोन गिरक्या घेऊन खाली ठेवली. तिचं डोकं गरगरलं थोडं. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तो तिला सावरत असतानाच तिने आपले ओठ अलगद त्याच्या मानेवर टेकवले. शहारला तो आणि ती ही...

त्याची मिठी घट्ट झाली. तिच्या हातांनी प्रतिसाद दिला. कडेच बनलं त्याच्याभोवती हातांचं. त्याचा हात पाठीवर फिरताना तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाहताच वेडावला.

ओठांवर ओठांचे ठसे उमटले अन् पाठीवर बोटांची नक्षी. त्याच्या श्वासांना जाणवलेले तिचे श्वास. त्याचे लाल झालेले कान. कपाळावर घामाची हलकीशी झलक. विस्तारत कानापर्यंत गेलेले गाल. I Love You म्हणत त्याने तिच्या कानाच्या पाळीवर टेकवलेले ओठ.
एक लहर सणसणत गेली तिच्या अंगातून. मोहरली ती. विसरली स्वतःला. सामावली त्याच्यात.

तिच्या सर्वांगावर फिरत असलेला त्याचा हात अचानक थांबला  " वितळलीस की माझ्या प्रेमात.. " म्हणत तो कानात कुजबुजला...
"तुमची तर विकेट पडलीय राजे. माझ्या प्रेमात." तिने दिलेलं उत्तर.

दोघांनी एकमेकांसाठी जगलेले क्षण. धगधगलेली शरीरे. 'चेतवून टाक अंग अंग फील.'  एकरुपतेची परिसीमा.
पुन्हा तेच...All set.. Permission, precaution and finally position.  वाढलेल्या श्वासांची गती.. दोन्ही मने आणि शरीरे बेधुंद. तिच्यावरचा वाढत जाणारा दाब..
यावेळी पाठीची मोडलेली कमान आणि पायांचं विसावणं....

 

बाब्बो...!! काय तुम्हीं..!!
तुम्ही म्हणजे एक नंबरचे तुम्हीच आहात.
अजून इथंच..??
असं काय करता राव.
डोकावून बघता.
त्यांना राहू देत की एकमेकांच्या प्रेमात..
आपण चला  प्रियाने चहा ठेवलाय तो करपून जायच्या आधी पिऊन घेऊ. 
🤗🤗🤗
© Velvet Kavisha ✍️
दोन वर्षांपुर्वी एका स्पर्धेत फोटो दिलेला. त्यावरून कथा लिहायची होती. आता तो फोटो काही सापडत नाही पण कथा मात्र आहे.
वाचून नक्की अभिप्राय लिहा.


Post a Comment

2 Comments

  1. आवडलं…permission, precaution and position…❤️❤️

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box