माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय गणेशोत्सव 🙏🙏

 #माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय गणेशोत्सव

✍©️जया पाटील 


गणेशोत्सव म्हणजे आपल्या सगळ्याच लोकांच्या जिव्हाळयाचा उत्सव🙏🙏 .......!


सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.


हिंदू धर्मात गणपतीला अर्थातच गणेशाला फार महत्त्वाचे स्थान आहे. गणपती सगळ्याच भक्तांचे आस्थेचे स्थान आहे.


माझ्या मुलाच्या जन्मानंतर त्याचा पहिला गणेशोत्सव अवघ्या पाच महिन्यांवर होता. त्याच्या पहिल्या गणेशोत्सवाच्या वेळेस माझा मुलगा रिशित फक्त पाच महिन्यांचा होता.


आपल्या पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हणुन आम्ही त्यावर्षी इकोफ्रेंडली म्हणजेच शाडूच्या मातीचा गणपती बनवायचा असे मी ठरवले होते.


आता स्वतःच्या हाताने गणपती बनवायचा म्हणजे पूर्वतयारी तर करावीच लागते. मी आणि माझी बहीण शाडूची माती घेण्यासाठी रिशितला घेऊन चांगल्या शाडुच्या मातीचा शोध करण्यासाठी कुंभार वाड्यात गेलो.


एरवी बाहेर खळखळून हसणारा रिशितचा लाऊडस्पिकर मात्र बाहेर गेल्यावर जोरात सुरू झाला म्हणजे त्याने जोरात रडणे जोरात सुरु केले. कसेबसे त्याला शांत करत आम्ही सगळे सामान घेतले.


आता गणपतीची मुर्ती घडविताना आमची खरी परिक्षा  होती. त्यावेळेस मात्र रिशित अगदी गाढ झोपी गेला , जणु त्याच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आमच्याइतकी त्याला देखील होती त्यामुळेच आईला सगळे व्यवस्थित आवरु देण्यासाठी हा रिशीतचा शांत झोपण्याचा प्रपंच.... दुसरे काय ?


आमच्या गणरायाची मुर्ती बनवून तयार झाली. गणेशाची स्थापना करण्यासाठी केलेली आरास, मिरवणुकांची मजा, विविध प्रकारचे नैवेद्य , उकडीचे मोदक , गणेश मिरवणुक त्यात वाजणारे फटाके, गुलाल, ढोलताशे , देखावे , मखरं , फुलांच्या माळा , मंदिरातील भाविकांच्या रांगा .. या सगळ्याच गोष्टी माझ्या बरोबरीने माझा बालगणेश देखील आनंदाने जगत होता.


काय गंम्मत असते नाही .... ? लहान मुले देखील आपल्या उत्सवांना किती एन्जॉय करत असतात. रिशितला बोलता येत नव्हते , परंतु त्याची व्यक्त होण्याची पद्धत मात्र वेगळी होती.


बाप्पाच्या पूजेच्या वेळेस खळखळून हसणे , आरती करताना छोट्याश्या हातांनी टाळ्यांचा कडकडाट करणे हे मात्र माझ्या पिल्लूला समजत होते. या दहा दिवसात त्याने कसलाही त्रास दिला नाही.  या सगळ्याच आनंदात आणि भक्तीमय वातावरणात दहा दिवस कसे निघुन गेले समजले देखील नाही.


आता मात्र वेळ आली होती लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची ... !


मन भरून आले होते. विसर्जनाची आरती झाली आणि आम्ही बाप्पाला रिशितच्या मांडीवर बसवले तर रडवेल्या चेहऱ्याने रिशित बाप्पा कडे एकटक पहाटे होता.

जणू त्याच्या वागण्यातून तो बाप्पाला सांगू पाहत होता.


ऐ ... बाप्पा ... प्लीज नको जाऊस ना आम्हांला सगळ्यांना ... मला सोडून  ..!😥😥


बाप्पा ऐकत नाहीत म्हटल्यावर मग मात्र रिशितने बाप्पाचा कान घट्ट पकडला आणि शाडूची मूर्ती असल्यामुळे बाप्पाचा एक कान बाहेरच निघुन आला.


मला रडूच आले हे काय घडले म्हणुन मन खुप विचलित झाले. काही विपरीत तर घडणार नाही ना ...? अश्या शंका मनात डोकावु लागल्या .


पण नंतर रिशितच्या चेहऱ्याकडे पाहिले तर जणू त्याने आपल्याला सोडून जाण्याची शिक्षाच दिली होती त्याच्या  बाप्पाला ... !


आणि आपल्या या बाल भक्ताची शिक्षा बाप्पाने देखील हसत हसत कबूल केली होती. अशा पद्धतीने त्या वर्षीचा गणेशोत्सव खुप छान पद्धतीने साजरा झाला. सगळे काही निर्विघ्नपणे पार पडले .


त्यानंतर अनेक गणेशोत्सव आले परंतु हा गणेशोत्सव मात्र छोट्याश्या रिशितच्या भक्तीमुळे कायमच अविस्मरणीय राहिल .


वाचकहो , वरील लेख म्हणजे एका आईने तिच्या लाडक्या लेकासोबत जगलेल्या भावना आहेत त्यामुळे काही लेखनाच्या चुका असतील तर दुर्लक्ष करा.. कारण शेवटी भावना व्यक्त होऊन तुमच्यापर्यंत पोहोचणे महत्वाचे ...


तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels 



✍©️ जया पाटील








Post a Comment

0 Comments