#मला_साथ_देशील_ना...भाग_१
©️जया पाटील
ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग ...
फोनची बेल वाजत होती.
रागिणीने फोन उचलला.
"हॅलो , रागिनी ...,
अविनाश बोलतोय...."
"हा.. बोल अविनाश "
" अगं , अनुराजची तब्येत अचानक खराब झालीय.
त्याचे डोकं गरगरत होतं.
थोडा ताप पण होता.
थकवा जाणवत होता.
चक्कर येऊन पडणार तितक्यात...
बाजूच्या डेस्कवरच्या निखिलने सावरले त्याला...
त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेय.
तू लवकरात लवकर घरून निघ.
नक्षत्र बँक्वेट हॉलच्या बाजूला हॉस्पिटल आहे.
तू लवकर निघ.
तोवर मी थांबतो अनुराज जवळ. " अविनाश
"काय सांगतोय अविनाश ...
जास्त काही सिरीयस नाही ना ...
खरं सांग ..
आता ठीक आहे ना ,अनुराज ...
खूप जास्त त्रास नाही होत ना ...
मी लगेच निघते.
थँक्यू अविनाश.
प्लीज , मी हॉस्पिटलला पोहोचते तोवर अनुराज जवळ थांब.
मी निघते लगेचच. " रागिणी
अविनाशच्या फोनमुळे रागिणी चिंतेत पडली.
अनुराज आणि रागीणी मुंबईमध्ये स्तिथ मध्यमवर्गीय जोडपं.
खरंतर आज अनुराज आणि रागिनीच्या लग्नाचा सातवा वाढदिवस.
त्यामुळे रागिणीने अनुराजला सरप्राईज द्यायचे ठरवलं होतं.
अनुराजच्या आवडीचा सगळा स्वयंपाक तिने स्वतःच्या हाताने बनवला होता.
लग्नाचा वाढदिवस म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या आवडीचे पदार्थ तिने अनुराजसाठी बनवले होते...
अगदीच प्रेमाने ...
जसं की ..
पनीरची भाजी ,
भरलेली कुरकुरीत भेंडी ,
गरमागरम पुऱ्या,
कुरकुरीत बटाटा भजी ,
कांदा भजी ,
बिट आणि गाजराची कोशिंबीर,
थंडगार बूंदी रायता ,
हिरवी मिरचीची शेंगदाणे घालून केलेली चटणी,
मसालेभात त्यावर तुपाची धार ,
आणि
त्याच्या सगळ्यात आवडती बालुशाही
आणि
कलाकंद...!
हे सगळे बनवण्यासाठी रागिणीने ऑफिस मधून सुट्टी घेतली होती.
सायंकाळ होईपर्यंत तिचा सगळा स्वयंपाक तयार होता.
तिने डायनिंग टेबल स्वच्छ आवरून ठेवला होता.
नवीन टेबल रनर टाकून तिने त्याला डेकोरेट केला.
त्यावर सुवासिक फुलांचा एक गुच्छ ठेवला.
घरीच बनवलेल्या कॅण्डलहोल्डर मध्ये कॅण्डल सजवून ठेवल्या.
नवीन क्रोकरी आणि इतर वस्तूंची मांडामांड केली.
नॅपकिनच्या वेगवेगळ्या घड्या करून डायनिंग टेबल सजवला.
एक एनिवर्सरी केक तिने स्वतःच्या हाताने तयार केला होता.
हे सगळे तयार करून अनुराजला सरप्राईज द्यायचे म्हणून ती स्वतः तयार होण्यासाठी गेली.
तिने सुंदर मखमली लाल रंगाचे स्लिव्हलेस ब्लॉउज ,
आणि त्यावर थोडे कॉन्ट्रास्ट म्हणून
सुंदर पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसली.
गळ्यात सुंदर डायमंडचे मंगळसूत्र घातले.
त्याच्या जोडीला एक चंद्रमणी ठुशी ,
आणि
मराठी लूक पूर्ण करण्यासाठी एक नाजूक तन्मणी हार घातला.
नाकात मोत्याची नाजुकशी नथ ,
हातात मोत्यांचे तोडे ,
गुलाबीसर बोटात हिऱ्याची अंगठी ,
कपाळावरची नाजूक चंद्रकोरी टिकली ,
पुढचे थोडेसे केस बनाना क्लिप मध्ये अडकवून बाकीचे केस मोकळे सोडलेले.
चेहऱ्यावर हळूच उडणारी केसांची बट.
हा सगळाच पेहराव रागिणीवर खूप खुलून दिसत होता.
मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज.... !
विलक्षण सौंदर्य ते ...
नक्षत्रासारखे अनुपम ...
कोणालाही भुरळ पाडेल असे...!
खरंतर अनुराज आणि तिच्या प्रेमाच्या
आठवणींना ....
स्पेशल बनविण्यासाठी...
रागिणीने ही सगळी तयारी केली होती.
पण ....
अविनाशच्या फोनमुळे ती खूप नाराज झाली.
त्याहीपेक्षा जास्त तिला अनुराजची काळजी वाटू लागली.
अविनाशचा फोन ठेवला.
थोडेसे पैसे आणि कार्ड्स पर्स मध्ये घेऊन ती हॉस्पिटलला जायला निघाली.
अनुराजचे आईबाबा दोघेही त्यांच्या एका मित्राकडे गेले होते.
त्यांना तिने मुद्दामहूनच कळवले नाही.
नाहीतर उगाचच ते काळजी करतील.
धावपळ करून हॉस्पिटलला येतील.
या वयात झेपायचे नाही हे सगळे...
त्यामुळे हॉस्पिटलला जाऊन सगळी मेडिकल कंडिशनची खात्री करूनच आईबाबांना कळवू असे तिने मनाशी ठरवलं.
घाईघाईत गॅससिलेंडरचे बटण तिने बंद केले.
इतरही इलेक्ट्रिक वस्तूंचे स्विचेस बंद करून.
कुलूप लावून ती निघाली.
वाटेत तिने अमोघच्या डेकेयरच्या मावशींना फोन केला.
आज अमोघला न्यायला येण्यासाठी थोडा उशीर होईल.
फक्त मी किंवा आईबाबा आल्याशिवाय अमोघला कोणाकडे सोडू नका.
इतके सांगून ती रिक्षाची वाट पाहू लागली.
एक दोन रिक्षांना हात केला.
पण सगळ्याच रिक्षा फुल्ल..
तिच्या मनाची धडधड वाढत होती.
तितक्यात एक रिक्षा तिच्यासमोर येऊन थांबली.
" भाऊ , छत्रपती चौकातल्या नक्षत्र बँक्वेट हॉलच्या बाजूच्या हॉस्पिटलला घ्या.. अर्जन्ट.
"लवकर चला , प्लीज "
" मॅडम , नक्षत्र बँक्वेट हॉलच्या बाजूला कुठलेच हॉस्पिटल नाही. " रिक्षावाला
" असेल हो , तुम्हाला माहित नसेल.
मला तोच पत्ता सांगितला आहे.
प्लीज , लवकरात लवकर चला. "
" ठीक आहे ,मॅडम.." रिक्षावाला
मीटरचा खटका खाली करून रिक्षा सुरु झाली
आणि
ती स्वतःशीच बडबडू लागली.
"हा अनुराज पण ना ....
खूप हट्टी आहे.
किती वेळा सांगितलं आहे की ...
रात्री लवकर झोपत जा.
तो मात्र लॅपटॉप ,मोबाईल या त्याच्या गॅजेट वर्ल्ड मध्ये हरवतो.
आणि मग बाहेरच्या जगाचा विसरच पडतो त्याला.
रात्रीच्या दोन वाजेपर्यंत मोबाईल पाहायचा.
त्यामुळे पित्त झाले असणार.
त्यात जेवण , नाश्ता कश्याकडेच लक्ष नाही.
त्यामुळेच वीकनेस आला असेल.
थकवा इतका त्यामुळे चक्कर आली त्याला.
ते काही नाही ...
आता मात्र मी त्याचे काही एक ऐकणार नाही.
सकाळी लवकर उठून व्यायाम ,
नाश्ता ,
सगळे वेळेवर करायलाच लावणार त्याला.
तो हट्टी आहे ना ....
मग मी त्याच्यापेक्षा जास्त हट्टी होणार.
त्याशिवाय तो ऐकणार नाही.
शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे असे बाबा नेहमी म्हणतात.
पण या अनुराजच्या डोक्यात प्रकाश पडतच नाही.
नेहमी हेळसांड करतो स्वतःच्या तब्येतीची.
आता मात्र मी त्याचे काही एक ऐकणार नाही.
त्याच्या तब्येतीची काळजी आता मलाच घ्यावी लागणार आहे. "
मनातील बडबड सुरु असतानाच नक्षत्र हॉल आला..
" मॅडम , आला नक्षत्र हॉल..."रिक्षावाला
रिक्षावाल्याच्या बोलण्यामुळे रागिणीची तंद्री भंगली.
ती घाईघाईत रिक्षातून उतरली.
मीटरप्रमाणे रिक्षावाल्याला पैसे दिले.
" मॅडम , सुट्टे पैसे नाहीत परत द्यायला .." रिक्षावाला
" असू द्या ..वरचे पैसे तुम्हालाच.." रागिणी
इतके बोलून ती हॉस्पिटल शोधू लागली.
पण ..
तिथे कुठेच तिला हॉस्पिटलचा बोर्ड दिसला नाही.
तिने गडबडीत अविनाशला फोन लावला.
" हॅलो , अविनाश ..
अरे मी , हॉल जवळ पोहोचली आहे.
पण इथे कुठेच मला हॉस्पिटलचा बोर्ड दिसत नाही.
कुठे आहात तुम्ही..
मला खूप काळजी वाटते आहे रे ..." रागिणी
" अग , रागिणी , नवीन हॉस्पिटल आहे.
तू वरती ये.
मी तिथेच उभा आहे.
लाईट गेली आहे त्यामुळे जपून ये." अविनाश
रागिणी गडबडीत हॉलच्या साईडचा जिना चढून वरती गेली.
सगळीकडे खूप अंधार होता.
मोबाईल टॉर्चला हाताशी घेऊन रागिणी हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकू लागली.
असले कसले हॉस्पिटल आहे असा विचार तिच्या मनात येऊन गेला.
ती जपून एक एक पाऊल पुढे टाकत होती.
त्याचवेळेस तिला तिच्या पाठीमागून कोणाच्या तरी पाउलांची हालचाल जाणवली.
एक क्षण ती मनातून घाबरली.
पुन्हा मोठ्या हिम्मतीने पुढे चालू लागली.
तिच्या मागुन येणाऱ्या पाउलांची हालचाल अजूनच वेगवान झाली.
कोणीतरी तिचा पाठलाग करतोय याची तिला जाणीव झाली.
ती पाऊले तिच्या खूप जवळ आली.
मागुन तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला.
ती प्रतिकार करू लागली.
आणि
तितक्यातच
लाईट सुरु झाले.
तेव्हा पाहते तर समोर अनुराज उभा.
त्याच्या पाठीमागे
आईबाबा ,
अमोघ ,
अविनाश ,
त्याची बायको प्रतीक्षा
सगळे उभे होते.
त्या सगळयांना पाहून रागिणी खूप आश्चर्यचकित झाली.
अनुराजला ठीक ठाक पाहून तिला खूप आनंद झाला.
" अनुराज , तुम्ही ठीक आहात.
किती घाबरले होते मी..." रागिणी
" अग , आज आपली लग्नाची एनिवर्सरी ना ...
मग तुला सरप्राईज द्यायचे होते.
त्यामुळे अविनाशला असा फोन करून तुला इकडे बोलवायला सांगितले." अनुराज
"काय हे अनुराज ,
असे सरप्राईज देतात का कुणी ..?
किती घाबरली होती मी ...
मला खूप राग आलाय तुमचा ..!
याची शिक्षा तर तुम्हाला द्यायलाच हवी."
" दे की मग ...
मॅडम , जी शिक्षा देणार ती ...
मी शिक्षा भोगायला तयार आहे.
रानीसाहेबा ...आपका हुकूम सर आंखो पे ..।" अनुराज
त्याच वेळेस तिचे लक्ष आईबाबांकडे गेले.
" इश्श्य ..
काय हे अनुराज ...?
आईबाबा पण आहेत इथे ...
आणि तुमचे काय चालूय ..?"
अनुराजला गप्प बसवत ती आईबाबांना म्हणाली,
" आईबाबा , तुम्ही सुद्धा यांना साथ दिली ...? "
त्यावर हसत प्रतिउत्तर देत आई बोलू लागल्या.
" काय करणार ..बाळा ..?
मुलांचा आनंद तोच आमचा आनंद ..
अनुराजला तुला सरप्राईज द्यायचे होते.
त्यामुळे आम्ही पण या प्लॅन मध्ये सामील झालो.
ठरलेल्या वेळेवर अमोघला देखील डेकेयर मधून घेऊन आलो.
दरवेळेस तू अनुराजसाठी काही तरी स्पेशल करतेस.
यावेळी त्याला तुझ्यासाठी काहीतरी खास करायचे होते.
आणि ते बरोबर देखील आहे.
इतकी चांगली बायको आहेस तू ,
इतकी छान सून आहेस तू ,
,आणि
एक उत्तम आई आहेस तू ..
मग आम्ही देखील तुझ्यासाठी ...
काहीतरी करायला हवं ना ..." आई
आईचे बोलणे ऐकून रागिनीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत अनुराज म्हणाला ...
" रागिनी , please , dont cry ..."
" u deserve this love ,affection and care. "
रागीणीने हॉल पाहिला.
सगळेच सुंदर सजवले होते.
चहूकडे सुरु असलेली लायटिंग ,
सगळीकडे पसरलेले रंगीबेरंगी फुगे ,
मंद आवाजात सुरु असलेले संगीत ,
टेबलवर सजवून ठेवलेला केक ..
त्यावर लिहिलेली अक्षरे ..
Thank u Ragini 🎂 for being my lifepartner ❤❤.
हे सगळे मनमोहक वातावरण पाहून रागिणी खूपच आनंदी झाली.
तिला खूप गहिवरून आले होते.
अनुराज आणि रागिणीने मिळून केक कापला.
दोघांनाही एकमेकांना केक भरवला.
त्यानंतर अमोघ
आणि
आईबाबांना केक भरवला.
सगळ्यांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला.
अविनाश आणि प्रतीक्षाने अनुराज आणि रागिणीला डान्स करण्याचा आग्रह केला.
आईबाबा समोर होते.
त्यामुळे रागिणी थोडी लाजली.
" अग डान्स करा दोघेही ...
लाजायची गरज नाही.
Enjoy u r day .."
बाबा म्हणाले.
त्यानंतर अनुराज आणी रागिणी दोघेही स्टेजवर आले.
अनुराजनी रागिणीचा एक हात स्वतःच्या हातात घेतला.
दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवला.
रागीणीने देखील अनुराजचा एक हात हातात घेतला.
आणि
दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवला.
मंद आवाजात गाणं सुरु झाले.
पायांची लयबद्ध हालचाल होऊ लागली.
अनुराज आणि रागिणी दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले.
रागिणी अनुराजला सरप्राईज देण्यासाठी तयार झाली होती.
अविनाशच्या फोनमुळे ती तशीच घरातून निघाली होती.
अनुराज फक्त एकटक तिच्याकडे पाहत होता.
रागिणी अनुराजकडे पाहून लाजली.
अनुराज तिला म्हणाला ..
"रागिणी , किती सुंदर दिसतेय ग तू ...
आज माझीच नजर लागेल तुला...
आज मला आपली पहिली रात्र आठवते आहे.
किती सुंदर दिसतेस ग तू अजूनही ...
अगदी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री होती,
तितकीच प्रफुल्लित ,
तितकीच उल्हासित ...
अगदी मोगऱ्याचा फुलाप्रमाणे कायम सुगंध देणारी ...! "
आजही तशीच आहेस ..
तू पौर्णिमेच्या चंद्रासारखी ...
कायम लक्ख प्रकाश देणारी ..
आणि
माझा संसार फुलवणारी ...
आजही तसेच नाईटआऊट करूया ...?
चालेल ना ...? " अनुराज
" इश्य ...काहीही काय तुमचे ...?
हे असे बोलणे शोभते का इथे..
बायकोचे इतके कौतुक करणे बरे नाही ...
आईबाबा ,अविनाश ,प्रतीक्षा आहेत इथे.! रागिणी
" अग , शोभायचं काय त्यात ...
माझ्या एकुलत्या एक बायकोचे कौतुक करतो आहे मी ....
कुण्या परक्याचे तर नाही ना ....
आणि मी जे बोलतोय ..
ते अगदी खरं आहे...
लाजताना आजही अगदी नववधूप्रमाणे सुंदर दिसतेस तू रागिणी .."
"आपल्या दोघांचा तो प्रवास ,
एकत्र झालेले श्वास ,
ओठांचा ओठांना मिळालेला सहवास ,
एकरूप झालेली शरीरं ..
ह्या सगळ्या अमूल्य आठवणी ,
आनंद मला पुन्हा नव्याने आजच्या दिवशी जगायच्या आहेत.
मला साथ देशील ना ...
आजच्या दिवशी हेच गिफ्ट दे मला ..
देशील ना ...?" अनुराज
रागिणी ने डोळ्याच्या पापण्या हलवून होकार दिला.
ती पुन्हा एकदा गोड लाजली आणि हळूच म्हणाली..
" For u r kind information Mr. Anuraj ....
बायको प्रत्येकाची एकुलती एकच असते."
" तुम्ही नसतात तर ... रागीणीsp;
" अग ,आईबाबांना ऐकू जात नाहीये रागीणी.
गाण्याचा आवाज जोरात आहे.
त्यामुळे हे आहो..
मानपान अँड ऑल ...
नाही केले तरीही चालेल.
ते सगळे आईला हवं आहे.
मला आजही तुझी ...
अरे अनुराज ...
अशीच हाक मारलेली आवडते.
सो.. नो फॉर्मॅलिटीज प्लीज ..." अनुराज
अनुराजच्या बोलण्यामुळे रागिणी आनंदली.
आणि पुढे बोलू लागली.
" तू माझ्या आयुष्यात नसतास अनुराज तर कदाचित..
इतके सुंदर आयुष्य मला मिळाले असते की नाही हेच मला माहित नाही.
माझ्या प्रत्येक श्वासावर फक्त तुझा अधिकार आहे.
पण आजही आईबाबांना आपण फसवलं आहे या गोष्टीची खंत वाटते रे मला ....
गेली सात वर्ष आपण त्यांना फसवतो आहे..
सतत अपराधी वाटते.
तन्वीने जे काही सहन केले ते खरं तर आपल्याही वाट्याला यायला हवं होते.
कारण आपण पण तिच्यासारखेच गुन्हेगार आहोत.
पण तन्वी मात्र आईबाबांना दुरावली.
आणि आपण मात्र एक आनंदी आयुष्य जगतोय."
" आपण तन्वीसाठी काहीतरी करायला हवं.
नाहीतर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही.
प्लीज , आजच्या लग्नाच्या वाढदिवशी हीच भेट देशील ना मला ....
आपण दोघेही तन्वीला आपल्या परिवारात परत आणू ..
मला साथ देशील ना ...? "
रागिनीने अनुराजच्या समोर हात धरला.
अनुराजने देखील होकार देत तिच्या हातात हात मिळवला.
डान्स करता करता ते एकमेंकात हरवले.
गाण्याचे बोल ही दोघांना साजेसे होते.
" जब कोई बात बिघड जाये ..
जब कोई मुश्किल पड जाये ...
तुम देना साथ मेरा ...
ओह ....हमनवाब ...
ना कोई है ...
ना कोई था ..
जिंदगी मे तुम्हारे सिवा ..
तुम देना साथ मेरा ...
ओह ...हमनावाब ...."
दोघांचेही प्रेम देखील तसेच होते.
अगदी एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे ..
अनुराजच्या छातीवर डोके ठेवून रागिणीला तिचा भूतकाळ आठवला
आणि
ती त्या आठवणींमध्ये हरवली.
त्या सगळ्या घटना तिच्या डोळ्यांपुढे सरकत होत्या.
.
.
.
.
.
.
.
काय असेल रागिणीचा भूतकाळ ..?
अनुराज ने नेमके काय लपवले आहे आईबाबांपासून ...?
अनुराज आणि रागिनीचा भूतकाळ त्यांच्या भविष्यात तर अडचण निर्माण करणार नाही ना ..
वाचू पुढच्या भागात ..
.
.
.
.
क्रमश:
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box