मला साथ देशील ना...भाग २

 


#मला_साथ_देशील_ना...भाग_२

©️जया पाटील 

भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_07.html

रागिणी अनुराज सोबत डान्स करतांना भूतकाळात हरवली.

भूतकाळातील सगळ्या घटना तिच्या डोळ्यासमोर तरळत होत्या.

ज्युनिअर कॉलेजचा पहिला दिवस.

माध्यमिक शाळेतून उच्चमाध्यमिक शाळेत म्हणजेच कॉलेज मध्ये गेलेले विद्यार्थी.

कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे गणवेश असावाच अशी सक्ती नाही. 

त्यामुळे रंगीबेरंगी ड्रेसेस घालून फिरणारे मुलं-मुली. 

कॉलेजचा पहिला दिवस त्यामुळे सगळेच खूप उत्साही.

कॉलेज लाईफ म्हटले म्हणजे एक्साइटमेन्ट आपसूकच आली. 

स्वतःचे राहणीमान , 

ड्रेस, 

केस सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं , 

ही प्रत्येक कॉलेजकुमार आणि कॉलेज कुमारीची भावना.

अनुराजच्या कॉलेजचा अनुभव तसाच काहीसा होता.

कॉलेजचा पहिला दिवस म्हणून त्याने त्याच्या बाबांकडून कडीचे घड्याळ हट्ट करून मागुन घेतले होते.

मस्त पैकी ब्लॅकचेक्सचा टीशर्ट , 

ब्लू कलरची डेनिम ,

हातात कडीचे घड्याळ , 

पायात नवीन स्पोर्ट्स शूज,

नवीन घेतलेली बॅगपॅक ,

अश्या अंदाजात अनुराज तयार झाला.

सगळ्यांसारखा त्याला देखील कॉलेजच्या पहिल्या दिवसाचा उत्साह होता.

कॉलेजच्या उंचच ऊंच इमारती ,

वेगवेगळ्या लॅब्स, 

वेगवेगळ्या कपड्यातील मुलं ,

त्यांच्या गाड्या ,

गॉगल्स 

ह्या सगळ्या गोष्टी अनुराजसाठी नवीन होत्या.

अगदी निरखून सगळ्या गोष्टी तो आपल्या डोळ्यात साठवून घेत होता.

कॉलेजच्या पहिल्या दिवसाचे पहिले लेक्चर सुरु झाले.

साने सरांचा पहिला क्लास होता.

साने सर वर्गात आले.

पहिला दिवस असल्यामुळे आज फक्त सगळ्यांचे इंट्रोडक्शन द्यायचे होते.

प्रत्येक विद्यार्थी एकामागून एक उठून स्वतःची ओळख करून देऊ लागला.

काही विद्यार्थी झाले.

मग अनुराजचा नंबर आला.

अनुराज उठून उभा राहिला.

तो बोलायला सुरुवात करणार तितक्यात ..

मागुन आवाज आला.

May i come in sir ...

सगळ्यांनी मागे वळून पाहिले.

एक सुंदर मुलगी सरांना आता येण्याविषयी विचारत होती.

मस्त नेव्ही ब्लू कलरचा कुर्ता ,

त्यावर त्याच रंगाची प्रिंटेड चुडीदार पॅन्ट ,

साईडने घेतलेली लालकलरची ओढणी , 

डाव्या हातात काळ्या बेल्टचे घड्याळ , 

उजव्या हातात नाजुकसे ब्रेसलेट ,

केस बनाना क्लिपने बांधलेले ,

खूप छान दिसत होती ती.

वर्गातील सगळेच विद्यार्थी एकटक तिच्याकडे पाहत होते.

"Why r u late ...? "

सरांनी विचारलं.

" I am sorry sir ..next time i will take care about it. " 

"Ok ,come in..

 but next time late comers are not allowed." 

" Thank you sir "

म्हणून ती मुलगी आत आली.

  👉 हे पण नक्की वाचा


ती आत येत असतानाही अनुराज तिच्याकडे एकटक पाहतच होता.

पहिल्यांदा पाहिल्यावरचं ती त्याच्या नजरेत भरली होती.

अचानक एक वाऱ्याची झुळूक आली.

आणि 

तिची ओढणी अनुराजच्या बेंचच्या फटीमध्ये अटकली.

पुढे जाताना ते तिच्या अचानक लक्षात आले.

कोणीतरी मुद्दामहून आपली ओढणी खेचली अशी शंका तिच्या मनात आली.

मागे वळून तिने जळता कटाक्ष मागे उभा असलेल्या अनुराजवर टाकला.

ती पुन्हा काही पावले मागे आली.

आणि ..

ती अनुराजला काही बोलणार ..

तितक्यात तिचे लक्ष बेंच मध्ये अडकलेल्या ओढणीकडे गेलं.

तिला तिची चूक लक्षात आली.

अगदी गोड हसून ती अनुराजला म्हणाली.

" Ohhh...I am sorry " 

असे बोलून तिने जीभ चावली.

बेंचच्या फटीतून तिने स्वतःची ओढणी हळूच सोडवली.

गोड हसली.

आणि 

पुढच्या बाकावर जाऊन बसली.


ती बसली तरीही अनुराज तिच्याचकडे पाहत होता.

" Next introduction please ..." सर म्हणाले.

अनुराज उभाच होता.

अजूनही तसाच तिच्याकडे पाहत.

त्याच्या बाजूच्या मुलाने त्याला हलवून इशारा केला.

आणि 

तो भानावर आला.

" My self Anuraj Bhosale.

I m from Pragati Vidyamandir.

I got 80% in 10th class. "

इतके बोलून तो खाली बसला.

तितक्यात सरांनी त्या उशिरा आलेल्या मुलीला स्वतःची ओळख करून देण्यास सांगितली.

ती उठून उभी राहिली.

अनुराजची नजर तिच्यावरून आताही हटत नव्हती.

ती बोलू लागली.

" Hello friends ,Myself Ragini Deshmukh.

I m from Sane Guruji vidyamandir.

I got 89% in 10th class. "

तिच्या बोलण्यात एक आत्मविश्वास होता.


" रागिणी ...किती सुंदर नाव आहे नाही ....!

अनुराजची रागिणी अर्थातच अनुरागीनी..."

अनुराज मनातल्या मनात बोलत होता.

दुसरे मन म्हणत होते...


" काय वेड्यासारखा विचार करतोय अनुराज ...?

पहिल्यांदा पाहून कुणी कुणाच्या प्रेमात पडते का..? 

आणि तिला आधीच कुणी आवडत असेल तर ....? 

नाही , पण ही काहीतरी खास आहे.

आणि सानेगुरुजी विद्यामंदिर म्हणजे आपल्याच घराजवळ आहे.

ही आपल्याच घराजवळ तर राहत नसेल ना ...

राहत असेल तर मला कशी दिसली नाही.

आजवर शाळेत पण किती मुली पहिल्या.

पण अश्या फीलिंग कोणाविषयीच नाही वाटल्या.

खरंच , ही खूप खास आहे.

अनुरागीनी .....! "

अनुराजच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.


कॉलेज नियमितपणे सुरु झाले.

रागिणीला पाहता यावं म्हणून अनुराज लवकर कॉलेजला जाऊ लागला.

सकाळीच लवकर उठून सगळं काम आवरणं.

स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतः करणे.

कोणत्याही गोष्टीत आईला न त्रास देणे.

ह्या गोष्टी आता सवयीच्या झाल्या होत्या.

सकाळी लवकर उठून कॉलेजला जाणाऱ्या अनुराजला आई म्हणाली ..


" कॉलेजला जाऊन मुले बिघडतात असे ऐकले होते.

पण माझा लाडाचा लेक तर कॉलेजला जाऊनच शिस्तीत वागू लागला आहे...

ही सगळी कोणत्या देवाची ....की ...देवीची कृपा म्हणायची अनुराज ...? " आई 


" तू पण ना ..आई....

कोणत्याच देवाची आणि देवीची कृपा नाही.

अकरावीचे वर्ष म्हणजे रेस्टइयर म्हणतात.

बाजूच्या निखिलचे हाल पाहिलेत ना मी ...

अकरावीचे संपूर्ण वर्ष वाया घालवले.

आणि 

अकरावीच्या दुर्लक्षामुळे बारावीत पण कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाही.

मला तसे नकोय आई...

म्हणूनच अकरावीपासून अभ्यासावर लक्ष देतोय मी ." अनुराज

 


" गुणाचे ग माझे बाळ ते ..." 

अनुराजच्या उत्तरावर आई त्याचे कौतुक करत म्हणाली.


पण आईला कुठे माहिती होते ..

त्याला रागिणीच्या मनाचा अभ्यास करायचा होता.

तिच्याविषयी खूप काही जाणून घ्यायचे होते.

मात्र अजूनतरी रागिणीला दुरूनच पाहण्याशिवाय दुसरे काहीही शक्य झाले नव्हते.

प्रेमाच्या या परीक्षेचा अनुराजला अजून खूप अभ्यास करायचा होता.

रोज लवकर निघून रागिणीला पाहणे हा अनुराजचा दिनक्रम झाला होता. 

हळूहळू कॉलेज सुटल्यावर देखील तो तिच्या मागे जाऊ लागला.

पण अर्थातच तिच्या नजरेत न येता.


एक दिवस मात्र रागिणीचे लक्ष अनुराजकडे गेले.

ती अनुराजसोबत बोलण्यासाठी मागे येऊ लागली.

तिला पाहून अनुराजच्या हृदयाची गती वाढली.

पोटात गोळा आला.


"हिला समजले तर आपण तिचा पाठलाग करतोय ते."

याचा विचार करून त्याला टेन्शन आले.

रागिणी अनुराजच्या समोर येऊन बोलू लागली.


"हे hii...आपण क्लासमेट्स ना ....?

तू इथे काय करतोय ...? 

तुला मागे पण एक दोनदा इकडे फिरताना पाहिले आहे मी. " रागिणी


" चला तर मग आपण हिचा पाठलाग करतोय हे हिच्या लक्षात आले नाही.

 हुश्श ..

देव पावला. " 

अनुराज मनातल्या मनात बोलत होता.


" Hello , मी तुझ्याशी बोलतेय ..

कुठल्या विचारात आहेस...? " रागिणी


"आं ऽऽ .... हा ऽऽ आ.... ऽऽ ...हा ऽऽ ...

नाही ..नाही ...

कुठल्याच विचारात नाही मी ..." अनुराज 


" मग असा स्वतः सोबतच काय बोलत बसला आहेस. 

आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं पण देत नाहीस ..

का..? 

कोणत्या मुलीसोबत बोलला नाहीस का यापूर्वी कधी ...? " 

असं बोलून रागिणी खळखळून हसली.


तिच्या त्या हसण्यावर अनुराज पूर्णपणे फिदा झाला.

अनुराजने देखील तिला छानशी स्माईल दिली आणि म्हणाला ..


" मी इथे पुढच्याच कॉलनीमध्ये राहतो ..लेन नंबर ३ ला ...

त्यामुळेच तू मला इकडे पाहिले असणार. " 

" अरे मग मी लेन नंबर २ ला राहते ..सेम कॉलनी ...

मग क्लासमेट्स सोबत आपण कॉलनीमेट्स पण आहोत की ....! " रागिणी 


" बाय द वे.. I am Ragini ....

तुझे नाव काय ..?

खरंतर कॉलेज मध्ये तू इंट्रो दिला होतास स्वतःचा....

पण तुझे नाव माझ्या मात्र लक्षात राहिले नाही. 

सॉरी फॉर दॅट... " रागिणी


" इट्स ओके ..

होते असं ...

मी अनुराज ...." 


" ओके ..नाईस नेम....

चल मी निघते आता ...

बाय ...

भेटूया कॉलेजला ..." 

असे बोलून रागिणी निघून गेली.


अनुराज तिची पाठमोरी आकृती धूसर होईपर्यंत एकटक तिकडेच पहात होता.

तिची आकृती धूसर झाली आणि ...

अनुराज आकाशाच्या दिशेने जोरात उडी मारून म्हणाला ...


" Yes......." 

आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष जाताच त्याने स्वतःला सावरले.


त्याला आवडणारी मुलगी स्वतःहून आज त्याच्या सोबत बोलली होती.

त्यामुळे ..


" आज मै उपर .आसमा नीचे ...

  आज मै आगे ..जमाना है पीछे "

अशी काहीशी अवस्था अनुराजची देखील झाली होती. 


निखळ आनंद देणारी फीलिंग होती ती ..

आज तो खूप खुश होता.

त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती.

रात्री घरी आल्यावर अनुराज , 

त्याचे आईबाबा ,

तन्वी सगळे एकत्र जेवायला बसले.

त्यावेळेस देखील रागिणी सोबतचे बोलणं आठवून अनुराज गालातल्या गालात हसत होता.


त्याचे हे हसणे तन्वीने अचूक हेरले.

" काय दादा .., कॉलेजमध्ये नवीन वहिनी शोधली वाटतं...? 

आज खूप गालातल्या गालात हसतोय ..? 

आम्हाला पण भेटावसं वाटतंय ना वहिनीला.." 

तन्वी 


" ऐ गप ग तनु ...

असे काही नाहीय .." अनुराजने तिला चूप केले.


अनुराजच्या बाबांना मात्र तन्वीचे बोलणे अजिबात आवडले नाही.


" हे पहा तन्वी ...अफेअर , प्रेमाची लफडी या विषयावर मला बोललेलं आवडणार नाही.

आज पहिल्यांदा झालं म्हणून तुला माफ केले पण ..

यापुढे अशी चूक खपवून घेतली जाणार नाही.

मला चीड आहे प्रेमविवाहाची ,

त्यामुळे तुमच्या दोघांकडूनही मला हे अपेक्षित नाही.

माझे सर्वस्व गमावले आहे मी त्यामुळे .." 

तेवढे बोलून अनुराजचे बाबा तिथून निघून गेले.

हसतेखेळते वातावरण मात्र क्षणात बदलले.


बाबांच्या बोलण्यामुळे अनुराज थोडा चिंतेत पडला.


" रागिणी वर आपले प्रेम आहे पण..

 हे सगळे बाबांना मान्य होईल का...? 

आणि नाही झाले तर ....? " 

असे अनेक प्रश्न अनुराजला व्यथित करत होते.


दुसऱ्या दिवशी तो कॉलेजला गेला.

रागिणीला पाहून बाबांचे बोलणे तो विसरून देखील गेला.

हे वयच तसे असते.

अल्लड ..

गाफील ...

कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगणारे ...! 

रागिणी कॉलेजची अतिशय स्कॉलर विद्यार्थिनी होती.

अभ्यास ,

एक्सट्रा करिक्यूलर ऍक्टिव्हिटी ..

सगळ्याच गोष्टीत ती अव्वल होती.

तिच्या नोट्स तर खूप छान असायच्या.

तिच्या नोट्स तर अगदी प्राध्यापकांना देखील खूप आवडायच्या. 

तिचा स्वभाव देखील अतिशय लाघवी होता.

त्यामुळे ती सगळ्यांना मदत करत असे.

अनुराजला देखील फिजिक्स विषय अतिशय अवघड जात होता. 

परीक्षा तोंडावर आली होती. 

फार काही अभ्यास करायला वेळ नव्हता ,

मग मात्र नापास होण्यापेक्षा अनुराजने रागिनी कडे नोट्स मागायच्या ठरवल्या. 

तितकाच तिच्यासोबत बोलण्याचा अनुराजला बहाणा मिळाला.

अनुराजने रागिणीकडून नोट्स मागितल्या.

तिने देखील खूप आनंदाने त्याला मदत केली.


हळूहळू नोट्सच्या निमित्ताने रागिणी आणि अनुराज दोघेही एकमेकांसोबत बोलू लागले.

त्यांची मैत्री वाढीस लागली.

कॉलेजची युनिट टेस्ट देखील झाली.

कॉलेजचे पुढचे सेशन सुरु झाले.

पण दोन दिवस झाले ..

रागिनी मात्र कॉलेजला दिसली नाही.


अनुराज खूप व्यथित झाला.

बघता बघता एक आठवडा लोटला.

रागिणी मात्र कॉलेजला आलीच नाही.

अनुराजची चिंता वाढीस लागली.

त्याने रागिणीच्या घरी जाऊन तपास करायचा असे ठरवले.

.

.

.

.

काय झालं आहे रागिणी सोबत ..? 

अनुराज तिच्या घरी गेला तर तिची आणि तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल ..?

रागिणीला हे सगळे आवडेल का..? 

नेमके काय वळण मिळेल रागिणी आणि अनुराजच्या नात्याला ....?

वाचू पुढच्या भागात ...

.

.

क्रमश:

✍©️ जया पाटील

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


फोटो साभार - Google

✍©️ जया पाटील
































Post a Comment

0 Comments