पुण्यात काव्यसंग्रहाचे प्रकाशन
प्रा. कवयित्री योगिता कदम लिखित *मनातलं पानावर* या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले. रविवार दिनांक ५ जुलै रोजी, भावेश प्युअर व्हेज नांदेड सिटी इथे पार पडलेल्या या सोहळ्याला *सुप्रसिद्ध लेखक, कवी देवा झिंजाड आणि वर्ल्ड रेकॉर्ड विजेत्या प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका लेखिका वर्षा ठुकरुल* यांची उपस्थिती लाभली. वेलवेट कविशा पब्लिकेशन टीमच्या सदस्या कवयित्री स्वाती सासवडकर कुंभार आणि मॅनेजर पवन देशमुख यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या उत्स्फूर्त सुत्रसंचालनाची धुरा लेखिका केतकी पांडे यांनी सांभाळली.
"एखादी व्यक्ती जर नोकरदार असेल तर ती रिटायर्ड होईल, माजी होईल पण जर ती साहित्यिक असेल तर ती कधीच माजी होत नाही, रिटायर्ड होत नाही. कोणाच्याही लिखाणाला कमी लेखू नका. साध्या लग्नपत्रिकेचा मजकूरही न लिहिता येणाऱ्या लोकांनी कोणत्याच कवी कवयित्रींना नावे ठेवू नयेत. ती त्यांची प्रतिभा आहे. त्याला नावं ठेवू नका." असं देवा झिंजाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले तर "मी प्राध्यापिका असले तरी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी घाबरत होते पण वेलवेट कविशा पब्लिकेशनमुळे हे शक्य झालं." असं कवयित्री प्रा. योगिता कदम यांनी सांगितले. प्रकाशिका वर्षा ठुकरुल यांनी, "हा लिहिता हात आता प्लेगृपला आहे, त्याची पीएचडीपर्यंत मजल जाऊ द्या" असे म्हणत प्रा. योगिता कदम यांना शुभेच्छा दिल्या.
मनातल्या साध्या सोप्या, आपल्याशा वाटणाऱ्या या कविता वाचकांना नक्कीच आवडतील असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात बऱ्याच नवोदित कवयित्रींनी हजेरी लावली होती. त्यांनी आपली पुस्तके आदानप्रदान केली.






0 Comments
Please do not enter any spam link in the comment box