इंतहा हो गयी इंतजार की.....
© Velvet Kavisha
एकदा घरी कोणी नाही असं पाहून शंकरने मंजुला पाठीमागून मिठीत घेतलं.
म्हणाला, "मंजु, थोडे पैसे अजून कमवायला हवे होते. ते शेठ लोक नाही का लग्नानंतर हनिमूनला जातात. तसे गेलो असतो गं कुठेतरी फिरायला. आपल्याला परवडेल तिथे. "
"अहो, तुम्ही इतका का विचार करताय. असं समजा की आता आपण प्रेमात पडतोय. अफेअर सुरू आहे सध्या आपलं. आणि लग्नाला अजून वेळ आहे." मंजु हसत समजावत म्हणाली. तिच्या समजूतदारपणावर तो अधिकच भाळला.
"मंजु, प्रेमात पडणाऱ्या माणसांची अवस्था अशीच असेल का ग..??? म्हणजे मनाने जवळ पण शरीराने दूर." असं अगतिकतेने विचारत शंकरने तिच्या मानेवर ओठ टेकवले. ती लाजलेली त्याला कळली. त्याने मिठी घट्ट करत ओठांवर ओठ टेकवू पाहिले. तिने मान फिरवत ओठ लपवले. त्याने ओठांसमोर आलेल्या तिच्या गालावर हलकेच आपला गाल घासला. तिने लाडिक आवाजात "दाढी टोचतेय" म्हणताच, "हो का" म्हणत त्याने हनुवटी हलकेच पकडत तिच्या ओठांचा ताबा घेतला. लाजून तिने डोळे मिटून घेतलेले आणि मिठी घट्ट झालेली.
तेवढ्यात दाराचा आवाज आला. मंजू झटक्यात बाजुला होत, किचनच्या ओट्यापाशी गेली. शंकरही बाजूला जाऊन बसला. घट्ट लागलेल्या दाराला धक्का देऊन राणी घरात आली.
शंकर. वय - बावीस वर्षे. काम - सोसायटीतील शेठ लोकांच्या गाड्या पुसणे. पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत. संध्याकाळी व्यायामशाळा.
शंकर सोसायटीमागे असलेल्या झोपडपट्टीत राहतो. त्याचं नुकतच नात्यातील ओळखीच्या मुलीशी लग्न झालं. मंजु एकोणीस वर्षांची. बहिण राणी, भाऊ राजू , आईवडील, तो आणि मंजु असे सहा जण एका छोटासा पोटमाळा असलेल्या खोलीत राहतात. बापू watchman आणि आई सुनिता चार घरी धुणीभांडी करायची.
शंकरचं लग्न होऊन मंजू घरी आलेली. महिना झाला पण शंकर मंजुला एकांत मिळत नव्हता.
सगळं जुळून आलं तर कोणीतरी यायचं. माळ्यावर थोडं सामान ठेवलेलं. तिथे झोपलं म्हणजे गुदमरायला होतं असे. एक दोन वेळा झोपायचा प्रयत्न केला. पण मंजु सगळं आवरून यायच्या आतच खाली आला तो.
मंजु ओळखीत असली तरी कधी बोलणं नव्हतं झालेलं. खरी ओळख लग्नानंतरचीच. शंकर दिसायला बरा होता. हनुमान व्यायामशाळेत नियमित जायचा. व्यायामशाळेकडून होणाऱ्या बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. व्यायामाची शरीरयष्टी. एकदम भारदस्त वाटायचा. मंजु चारचौघींसारखी असली तरी रेखीव आणि सुरेख. ड्रेसमध्ये पाहिलेलं तिला लग्नाआधी. आता साडीत खुपच छान दिसते.
शंकर विचार करायचा. निदान झोपण्यासाठी तरी छोटीशी रुम पहायला हवी कुठेतरी. इथे रुम रिकाम्या होतंच नाहीत. झाल्याच तर भाडं परवडत नाही. अजून चार कामं बघायला हवीत म्हणजे भाडं परवडेलं. उद्याच सनसिटी सोसायटीत जाऊन बघतो. पण सगळ्या सोसायटीत काम करणारे ठरलेले आहेत. नवीन कामं मिळताना मुश्कीलच आहे. काय करावं कळतं नाही...
सुनिता ताईंना समजत होतं. पोराचं लग्न तर केलंय पण त्यांना हवी तशी मोकळीक मिळत नाही. दोन तीन ठिकाणी रुमसाठी चौकशी करुन आली. कुठे one plus one मधली वरची रुम मिळते का पाहून आली. पण नाहीच मिळाली कुठे रुम. दोन महिन्यांनी एक माळ्यावरची रुम खाली होणार आहे. त्या रुमसाठी हजार रुपये टोकन देऊन आल्या. असं असलं तरी विश्वास नको ठेवायला. कोणी दोनशे रुपये जास्त भाडं देतो म्हणाले तरी मालक देऊन टाकेल दुसऱ्याला. त्यामुळे चावी हातात येत नाही तोपर्यंत सांगायला नकोच कोणाला.
लग्नासाठी सुट्ट्या घेऊन झाल्या. नाहीतर सुट्टी घेऊन राणी-राजूला घेऊन चार दिवस गावी गेलो असतो. तेवढेच चार दिवस नवीन जोडप्याला एकांत. पण हे ही नाहीच.
मंजू तशी समजूतदार आहे. सुनिता ताई बोलल्या तिच्याशी. शंकरची आजी खुप आजारी होती. तिला नातवाचं लग्न पाहायचं होतं म्हणून घाईघाईत लग्न करावं लागलं. आणि आजी आता बरी आहे. 'पंतवंड पाहिल्याशिवाय मरणार नाही." म्हणते.🤦🤦😂😂
लग्नानंतर बऱ्याचदा मंजुला शंकरचे थोडेफार वरवरचे स्पर्श होताहेत. कधी सहेतूक तर कधी सहज. शंकरने तिच्याकडे पाहिलं तरी ती लाजायची. आजुबाजूचे तर किती चिडवतात दोघांना. दोघेही हसून वेळ मारून नेतात.
शंकरचे दोन दिवस विचार करण्यात गेले. आज मंगळवार. सगळी कामं उरकून शंकर सोसायटीच्या गणपती मंदिरात गेला. गार्डनमधून आणलेल्या ताज्या दुर्वा वाहिल्या. एक जास्वंदीचं फुल वाहिलं. हात जोडून बसला.
"देवा, असा कसा रे तू. तुला काही दया येत नाही का माझी..?? थोडंफार शिकणार होतो. नववीत असताना बापूचं accident झालं आणि चक्र फिरलं. शाळा सोडून गाड्या पुसायला लागलो. Hospital च्या वाऱ्या करून आई थकायची. पैसाही संपला. पतपढीतून कर्ज घ्यावं लागलं. महिन्याला दोन टक्के व्याजाने. अजूनही कर्ज फिटलेलं नाही. कर्जापेक्षा बापू वाचला त्याचा आनंद जास्त आहे.
गेल्या वर्षीपासून बापू watchman ची नोकरी करु लागलाय. एका जागी बसून. अपघातात एक पाय अधू झालाय. येणाऱ्या जाणाऱ्यांची एंन्ट्रीच करून घ्यायची असते. सोसायटीचे सेक्रेटरी चांगले आहेत. सहा हजार देतात पगार.
मी महिन्याला पंधरा हजार कमावतो. दहावीचा सतरा नंबरचा form भरलाय. व्यायामशाळेचे कोकाटे सर म्हणाले, थोडं शिकलास तर पोलिस भरतीत उतरता येईल तुला. जसा जमतो तसा अभ्यास करतोय. यंदा राणी दहावी आणि राजू बारावीला. दोघेही हुशार आहेत अभ्यासात. राणी तर खुपच हुशार.
मुख्याध्यापकांनी बोलावलं तेव्हा आई आणि मीच गेलेलो. सर म्हणाले, "मी मदत करतो लागेल ती. तुमच्या राणीला doctor व्हायचं आहे म्हणाली. तिला पाठिंबा द्या. मुलगी हुशार आहे तुमची." राणीला चांगला क्लास लावलाय. दर महिन्याला फीचे पैसै थोडे थोडे देऊ या बोलीवर. राजूला ही सीए व्हायचं म्हणतोयं. तो एका क्लासमध्ये शिकवायला जातो. त्यात थोडे पैसे घालून त्याची फी भरतोय.
बाप्पा, मला खुप मोठं व्हायचंयं. स्वतःच्या मेहनतीने. बापू आणि आईला आराम करु द्यायचाय. देवदर्शन किंवा कुठे फिरायचं तिथे फिरुन येऊ देत त्यांना.
लग्न एवढ्यात करणार नव्हतो.
आजीच्या हट्टापुढे काही करू नाही शकलो. पण जोपर्यंत मी नीट नोकरी करत नाही, तोपर्यंत मुल नाही होऊ देणार. शंकर हसला. बाप्पा, मी पण बघ कुठे पोचलोय विचारात...😂😂
लग्न झालं नव्हतं तर कधी काही वाटलं नाही. आता लग्न झालंय. समोर बायको म्हणून मंजू. मन, भावना आणि शरीरही उचंबळून येत आजकाल. महिनाभरात एकदाही मंजूसोबत तसे संबंध येऊ नयेत. दुर्दैवच ना बाप्पा..
मी तुलाच का सांगतोय बाप्पा हे सगळं. आईबापू म्हणतात तसं तुला तर सगळंच माहिती असेल. एकदातरी मंजूसोबबत एकांताचे क्षण मिळू देत ना बाप्पा...🙏 "
शंकरने हात जोडले आणि नमस्कार करुन निघाला. गेटपाशी पोचला. तेवढ्यात नायर सरांनी शंकरला आवाज दिला..
"अरे शंकर , Saturday - Sunday क्या कर रहा है तू..??" नायर सरांनी विचारलं.
"कुछ नहीं सर, काम था क्या कुछ..?? तो बताईये" शंकर म्हणाला.
" हुआ ऐसा शंकर की, हमारी madam की ट्रांन्सफर हो गयी है.. तो हर Saturday - Sunday मुझे छुट्टी रहती है मैं जाऊँगा वहाँ...।" नायर बोलले.
"हां सर..."
तसं नायर सरांची गाडी गेली चार वर्षे धुतोय शंकर. सर आणि madam दोघेही खुप चांगले आहेत. आपुलकीने वागतात, बोलतात. पगार, बोनस, दिवाळी, दसरा आणि अधेमधे काही ना काही देत असतात. Madam ची बदली झाली. पंधरा दिवस झाले. वर्षभराने पुन्हा इकडेच बदली करुन घेणार आहेत म्हणे. पण आता शंकरला कळेना नायर सर आपल्याला का सांगताहेत हे सगळं.
" शंकर, गये हप्ते में अग्रवाल के घर चोरी हो गयी। हमारे घर में जादा किमती कुछ रखा नही है। पर चोर पुरा वाट लगा के जाते है...। तु एक काम करेगा क्या..?? Saturday और Sunday के रात को हमारे घर में सोएगा क्या...? Monday शाम को मैं ऑफिस जा के ही घर आऊँगा..। हफ्तें में खाली दो दिन का ही सवाल है...। तु भरोसे का बंदा है..। इसिलिए पुछ रहा हुँ...।" नायर सरांनी सांगितलं.
शंकरला काही कळेना. नायर सर फार विश्वासाने सांगताहेत.
आपण तर कधी असे कोणा श्रीमंता घरी झोपलो नाही. दोन दिवस झोपायचं कसं. आईला विचारावं लागेलं.
" सर, आई को पुछता हुँ और बताता हुँ..।" शंकर म्हणाला.
"सुनिता ताई सें अभी बात की मैंनें..। फिर तुम्हें बता रहा हुँ..। तुम्हारी शादी हो गई है ना ?? तो औरत को लेके आना साथ में..। हफ्तें में दो दिन घर संभालो मेरा प्लीज..।" नायर सर बोलले आणि शंकरचे डोळे चमकले. आईकडून ही 'हो' आहे. म्हणूनच तर सर आपल्याशी बोलताहेत.
"ठीक है सर...। कोई बात नहीं..। मैं संभालूँगा आपका घर.. अभी चलता हुँ सर... मंदीर भी जाने का है।" शंकर ने सांगितलं.
" शनिवार को सुबह आ के चाबी ले के जाना शंकर.."
"हां सर.. पक्का..।" म्हणत शंकर पुन्हा मागे वळला. मंदिरात गेला.
'बाप्पा खरंच तुझी लीला अगाध आहे. तुझ्याकडे एकदातरी दे म्हणालो आणि तु आठवड्यातून दोन दिवस दिलेस... Love you बाप्पा..!!!" म्हणत शंकरने नमस्कार केला.
वाचा पुढच्या भागात...
पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇
या कथेचे फक्त दोनच भाग आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.
माझी मैत्रिण सौ. सरीता दातिर हिने या कथेचं नाव दिलं आणि मी त्यावर कथा लिहिली. वाचून सांगा आवडली का...??
आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, follow करा.

1 Comments
Chan... ek vegli love story
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box