आम्ही जेवताना फार त्रास द्यायचो. माझी आई म्हणायची, घरात पोटाभर जेवावं. गं.. त्यासाठी गोष्ट सांगायची. ती अशी--
एक माणूस रस्ता चुकतो.. जंगलात भरकटतो.. भूक लागते.. हैराण होतो.. मरेलच की काय आता.. इतक्यात एका खडकावर, झाडाच्या सावलीत, त्याला अळूचं फतफतं (फदफदं) सांडलेलं दिसतं... वरवरचं खायला हरकत नाही म्हणून खायला सुरुवात करतो... आई म्हणायची भूकेला डोळे नसतात... चांगलं-वाईट, खरं-खोटं, लहान-मोठं, नैतिक-अनैतिक असं काहीच दिसत नाही तिला...
हां. तर तो माणूस फतफतं(फदफदं)खातो.... पोट भरत येतं, भूक निवतं येते आणि त्याला चव लक्षात येते... आपण जे खातोय ते अळूचं फतंफतं नसून म्हैशीचं शेण आहे..
अरे देवा!!! भूकेपायी शेण खाल्लं?? फतंफत्याच्या चवीने..?? काय कर्म हे!!
गोष्टीवरून शहाणपण घेतलं.... तेव्हापासूनच ठरवलं घरी जेवून, थोडं घरचंच मनाच्या गाठोड्यात बांधून घराबाहेर पडावं... म्हणजे भूकेने इकडे तिकडे पाहावं लागणार नाही...
आता हल्ली मी लिहिते !!! तुम्हाला माहितीच आहे ना.. वाचकवर्ग बऱ्यापैकी आहे.... काही वाचक तर खुप दर्दी आणि अभ्यासू... साहित्यावर प्रेम असणारे... दिलखुलास दाद देत मनाला भावणारे...
पण काही मात्र खुपचं छान. लिखाण वाचल्यावर त्या पोस्टखाली कमेंट box आहे, हे विसरून मेसेंजरकडे धाव घेणारे.. खुप मनस्वी... भरभरून तारीफ करणारे... अर्थातच रिप्लायशिवाय ब्लॉकले जाणारे... हे झालं बंधूंचं..
भगिनी ही काही कमी नाहीत यात... हल्लीच मला एक म्हणाली....
" आपण girl friend म्हणून राहायचं का..?? "
" मी girl आहे हे माहिती आहे पण तुला रिक्वेस्टलेलं नाहीयं.. सो फ्रेंड होण्याचा प्रश्न नाही.." मी
" तसं नाही हो..!! तुम्ही मला आवडतां..!!" ती.
" कशामुळे..?? " मी
" ते तुम्ही रोमँटिक कसलं भारी लिहिता.. " ती.
" बरं..!" मी
" तुमचा फोटो पाहिला, छान दिसता तुम्ही..!!"
" माहिती आहे मला मी छान दिसते.... माझ्या घरी आरसा आणि नवरा दोन्ही आहे..." मी सांगून टाकलं.
दुसरी बाई मेसेंजरला टिकटिकली. कधी फ्रेंड लिस्टीत दिसली नाही. म्युच्युअल फ्रेंडात पण गुंतवणूक नाही. एका ग्रुपवर रोमँटिक कथा वाचून भारावून आलेली मेसेंजरला. मग हायहायलो.. छान लिहिता कथा बिथा.. वगैर वगैरे कौतुकाचा सोहळा झाला. थँक्स म्हणत बोलणं संपलं.
प्रोफाइल फोटो चेंज केला (माझे सगळे फोटो मोबाईलची कमाल आहे... नाहीतर तुम्ही मला बाजूने गेले तरी ओळखणार नाही...🙊🙊)
फोटो पाहून तिचाच पुन्हा मेसेज आला..."You are looking hottt.. 😍😍"
मी हॉट्ट्याचं नव्हतं करायच्या विचारात. ब्लॉक करणार पण म्हटलं ही आपली फ्रेंड नाही तरी वाचक आहे. त्यामुळे मेसेंजरला आली असेल...फक्त थँक्यु म्हटलं.
पुढे मेसेज..." I am 'that' type of mature girl..."
हिच्या That मधलं मला "thattt" काही कळलं नाही. आपण आपले "This type of mature" ना.
"नेमकं काय बाई...???" माझा प्रश्न.
"I am ×××××××" ती.
बाब्बो....😱 म्हणजे इथे मामला act 377 चा...भगवान ये कहाँ आ गये हमं.... .🙆🙆🙆
अर्थात mood आणि mode दोन्ही ब्लॉकच ना मग....
देवा...!!! आम्ही आपले निसर्गाचे नियम आणि स्त्री पुरुषांची शारीरिक रचना मान्य असलेले येडेचं की.....
साधारण प्रोफाइलमध्ये Married वगैरे स्टेटस् ठेवून नवऱ्याचं नाव टाकलेलं ही पाहू नये मेसेंजरवर बोलण्याआधी.... काय बोलावं रावं...
माझी पण कमाल आहे... शक्यतो मी लगेचच ब्लॉक करते. येडे हो गये की तिला प्रश्न विचारला....
एका महिलांच्या ग्रुपमधून आलेली आहे म्हणून ती स्त्री असेलच असंही नाही ना... कुछ तो गडबड है बाब्बो....🤦🤦🤦🙃🙃🙃
Option select and done successfully..... ब्लॉक. 👍
नवऱ्याला screen shot पाठवला.. " बघ बाबा!! ही बाई काय म्हणतेयं ती.."
"अग ती तुला प्रपोज करतेयं.. ब्लॉक केलं असशील ना.. आता screen shot मेलवर draft मध्ये save करून ठेवं... तुला अगदीच कधी वाटेलं आपण काहीच करु शकत नाही आयुष्यात. तेव्हा तो screenshot बघ... लिहायला सुरुवात कर... कारण तुझ्या लिखाणाने एक बाई तुला प्रपोज करायला मजबूर झालीयं... सो लिखते रहो..!!..( ती बाईच असेल हे कोण सांगणार ठामपणे..).."
आयला काय लोकं आहेत रावं..!! याआधी एका मैत्रिणीने तिचा सेम अनुभव शेअर केला होता. तेव्हा मी मनात हसले होते.. काय फेकते म्हणून... पण असे महाभाग आहेतच की अस्तित्वात...
लोकं पण काय काय कल्पना करून घेतात बघा ना... तुम्हांला सांगते रोमँटिक लिहिणारा रोमँटिक असेलच असं नाही, ... रोमँटिक वाचणारा रोमँटिक लिहिलं असं नाही.... जो रोमँटिक आहे तो तुम्हाला कळेलंच असं नाही.. कारण वो लोग चुपचाप पतली गली से निकल जाते है...। कधी कळणार... असो!!
एकदा प्रोफाइलला फोटो लावला... मेसेंजरमध्ये मेसेज...
"तुमचे डोळे मादक आहेत..." मोदक...??? च्यायला ह्यांच्या.... हे लोकं घरी जेवणात मोदक खातात की नाही..?? यांना दुसऱ्यांचे डोळे मोदक कसे बरं दिसतात ???
आपला प्रश्न राहिलाच की.. भूकेला काय खावं..?? मी म्हणेन " तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला काय आवडतं ते खा.. घरचं रुचकर, स्वादिष्ट आणि प्रेमाने केलेलं असतं.. शक्यतो तेच खावं.... बऱ्याचदा बाहेर जाणं होतं.. प्रत्येकवेळी घरचं नेलेलं पुरेलंच असं नाही.. अशावेळी शेट्टीचं hotel गाठावं... मस्त हात धुवावेत आणि शाकाहारी खावून घ्यावं.. डोसा, उत्तप्पा, व्हेज थाली काहीही..
स्त्रियांनी घरात बनवलेल्या कोणत्याही चार लाडूंचा डब्बा पर्समध्ये ठेवायला हरकत नाही.....
मला काय म्हणायचंय अशा लोकांना की.. तुम्हांला भूक लागली तर तुम्ही हवं ते खा.... लेस्बियन खा, गे खा, घरचं खा, बाहेरचं खा, हातचं खा, विकतचं खा, ओरल घ्या, मोरल घ्या. काय वाट्टेल ते करा....झक् मारा तिकडे...
पण तुम्हाला भूक लागलीय म्हणून आम्हांला नका विचारू "झालं का जेवणं, जेवलात का???"..."पोरं काय उगाच झाली का मग..??? न जेवता एवढी मोठी..."
काय बोलायचं आता अशांना रावं...
सरतेशेवटी एवढंच.... तुमचं तुम्ही बघून घ्या ना... तुम्ही उपाशी म्हणून आमचं डोकं नका न खाऊ बाब्बो...!!
© Velvet Kavisha
नावासहित शेअर करा. अन्यथा कारवाई कायदेशीर होईल. वरील लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
7 Comments
If you like my writting then please comment and share !!
ReplyDeleteNice writing, keep इथे up
ReplyDeleteThank you doctor
DeleteNice writing, keep it up
ReplyDeleteThanks dear
Deleteविचार करायला लावणारे अनुभव उत्तम सादर केले आहेस. अशा काही गोष्टी सोशल साईट वर आणखी जपायचं ही आठवण करुन देतात. छान....
ReplyDeleteThanks dear
DeletePlease do not enter any spam link in the comment box