जिद्द .. आई होण्याची .. भाग 2

 #जिद्द..आई होण्याची...भाग 2

©️ जया पाटील



भाग 1 वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

 जिद्द..आई होण्याची भाग 1


राहुलच्या मृत्युनंतर गौरीची आव्हाने आणखीच वाढू लागतात. राहुलने त्याच्या व्यवसायाकरिता  गौरीचे दागिने गहाण ठेऊन त्याने बरेच कर्ज उचललेले असते. राहुलच्या अवेळी मृत्यूमुळे त्याचा व्ययसाय ठप्प होतो आणि त्याच्या कर्जाचे हप्ते भरणे गौरीसाठी कठीण होऊन बसते.


त्यातच वेद गौरी आणि राहुलचा दत्तक मुलगा असल्यामुळे राहुलचे आईबाबा त्याला आपल्या घराचा वारसदार मानण्यास नकार देतात. आधीच राहुलची सुटलेली साथ आणि त्यातच ही सगळी संकटे गौरीला आणखीनच खचवून टाकतात.
वेदला स्वीकारायला नकार दिलेल्या राहुलचे आईबाबा गौरीचे रहाते घर देखील गौरी कडून परत घेतात.


ते गौरीचा सांभाळ करण्यासाठी तयार असतात , फक्त आपल्या मुलाच्या अंश नसल्यामुळे ते  वेदला स्वीकारायला तयार होत नाही , पण रक्ताचे नाते नसले म्हणुन एक आईचे नाते गौरी बदलु शकत नसते , वेदला स्वःतपासुन वेगळे करण्याचा विचार देखील ती सहन करु शकत नाही.


बायोलॉजिकली जरी वेद गौरीचा मुलगा नसतो तरी मनाने मात्र ती फक्त आणि फक्त वेदची आई असते. काही वेळा रक्तातपेक्षा मनाची  नाती जास्तच महत्वाची असतात. त्यामुळे एक आई म्हणुन मी माझ्या वेदला माझ्यापासून मी कधीच दूर करणार नाही, कितीही संकटे आली तरी देखील मी वेदला अंतर देणार नाही असे गौरी मनाशी ठरवूनच टाकते.


वेदच्या घरात येण्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी , त्याला पूर्णपणे वेळ देता यावा म्हणुन गौरीने आपले फर्म वरचे काम देखील  सोडलेले असते , तरीही अश्या प्रतिकुल परिस्थितीत गौरीचे आईबाबा मात्र तिच्या पाठीशी उभे असतात.


गौरीच्या हक्कासाठी ते कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवितात , पण गौरीला मात्र हे मान्य नसते. ज्या राहुलने आपण आई होऊ शकत नाही हे माहीत असुनही गौरीच्या आईपणाला , तिच्या भावनांना जपले होते आणि त्याच्यावरच्या प्रेमापोटी गौरीला त्याच्या आई बाबांचा आणि राहूलच्या प्रेमाचा देखील अपमान करायचा नसतो. राहुलच्या प्रेमामुळे गौरीला त्याच्या आईबाबांबाना कोर्टात खेचायचे नसते कारण पर्यायाने हा राहुलचाच अपमान असतो, त्याच्या विश्वासाचा अपमान असतो.


गौरी पुन्हा नव्याने काम करायचे ठरवते. पुन्हा या नव्या परीक्षेत पास होण्यासाठी ती झुंजू लागते. अनेक ठिकाणी प्रयत्न करुन देखील तिला यश मिळत नाही. ती हताश होते पण तिचे आई बाबा मात्र धीर सोडत नाही.


गौरीचे आईबाबा तिला धीर देण्याचे आणि तिला पुन्हा नव्याउमेदीने लढण्यासाठी तयार करत असतात .


जुनी माणसे म्हणतात ना..


"चांगले वागणे कधीतरी आपल्याला नक्की कामात येते.."  गौरीला देखील तसाच एक अनुभव येतो. एका फर्म वर मुलाखतीसाठी गेल्यावर कळते की तिची  मुलाखत घेणारा आकाश तिच्याच बाबांचा विद्यार्थी असतो.


गौरीच्या कागदपत्रांवरुन त्याला समजते की गौरी ही त्याच्या आयुष्यातील देव माणसाची मुलगी आहे. गौरीच्या बाबांनी आकाशला त्याच्या उतरत्या काळात खूप मदत केलेली असते. आकाश आज जे काही असतो ते गौरीच्या बाबांच्या मदतीमुळे असतो.


आकाश आपल्या गुरुंच्या लेकीला मदत करायची ठरवतो , पण स्वाभिमानी गौरीला मात्र हे नको असते. अखेरीस आकाश तिची एक परिक्षा  घेण्याचे ठरवतो आणि या परिक्षेत गौरीला यश येते. आकाशच्या फर्मवर गौरी उत्तम काम करते. . राहुलच्या व्ययसायाला ती आकाशच्या आणि तिच्या आईबाबाच्या मदतीने पुन्हा उभे करते.


वेदच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी ती एकटी पार पाडते. एक उत्तम माणुस म्हणून ती वेदला घडवते. तिच्यातले आईपण तिला लढण्याची जिद्द देते. शेवटी सगळया अडचणी पार करुन ती जिंकते.  एका आईची प्रेमाची ताकद तिला लढण्याचे बळ देते या सगळ्या संकटात मात्र एका आईची जिद्द जिंकते.


मला असे वाटते की असे बळ फक्त एका आई मधेच असु शकते. मग तुमच्या आमच्या मधे देखील असेलच ......हो की नाही..? नक्किच असणार.


एका आईच्या जिद्दीपेक्षा मोठी ताकद माझ्यामते या संपुर्ण विश्वात नसेल. तुम्हाला देखील असेच वाटत असणार , मग तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र अजिबात विसरु नका.


तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


असेच नवनवीन साहित्य वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कविशा " या फेसबुक पेजला फाॅलो करा.


आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

Velvetkavisha-वेलवेट कविशा


फोटो साभार - pixels


✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments