#जिद्द.. आई होण्याची.. भाग 1
✍©️जया पाटील
गौरी , अतिशय सुंदर देखणी आणि हुशार मुलगी होती. ती अतिशय सुसंस्कृत घरात वाढलेली असल्यामुळे लहानपणापासूनच खूप गुणी आणि संस्कारी होती. तिच्या आईबाबांनी तिला खूप लाडात वाढवले होते. तिच्या संगोपनात त्यांनी कशाचीही कमी ठेवली नव्हती.
गौरी आता उपवर झाली होती. कॉलेजचे शिक्षण संपल्यावर तिच्या बाबांनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरु केले. आपल्या लाडक्या लेकीसाठी त्यांनी खूप समजदार राहुलची निवड केली. राहुल अतिशय कर्तबगार , देखणा आणि गुणी मुलगा होता.
गौरीच्या आईबाबांनी अगदीच थाटामाटात गौरीचा विवाह राहुलसोबत लावून दिला. लग्नाच्या दिवशी गौरी आणि राहुल दोघेही अगदीच साक्षात लक्ष्मीनारायण भासत होते. राहुलसारखा जावई मिळाल्यामुळे गौरीचे आईबाबा दोघेही खूप खुश होते.
राहुल अतिशय शांत आणि मेहनती मुलगा होता. त्याने त्याचा छोटासा व्यवसाय खुप पुढे नेला होता. त्याच्या कष्टाचे फळ देखील त्याला मिळत होते. तो खुप प्रगती करत होता .
गौरी देखील एका छोट्या फर्म वर काम करत होती. दोघांचा अगदी राजाराणीचा संसार सुरु होता. एकमेकांसोबत वेळ घालवणे , रुसणे आणि एकमेकांना मनवणे अश्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे दोघांचाही संसार बहरत चालला होता. एक छानसा जोडीदार जो फक्त आपल्यावर प्रेम करेल आणि आपल्याला समजून घेईल यापेक्षा जास्त काय हवे असते एका मुलीला ? राहूलच्या प्रेमळ वागणुकीमुळे गौरी खूपच खुश होती.
लग्नानंतर काहीकाळ गेल्यानंतर सगळ्याच जोडप्यांना वाटते तसे आता आपल्याही जीवनात एका छोट्याश्या पाहुण्याचे आगमन व्हावे असे राहुल आणि गौरी दोघांनाही वाटत होते परंतु पूर्वसंचित म्हणा किवा त्यांचे दुर्दैव म्हणा गौरीची आई होण्याची इच्छा मात्र काही केल्या पुर्ण होत नव्हती.
उपवास , डॉक्टर , दवाखाना , नवस काहीच फळाला येत नव्हतं आणि गौरी निराश होत होती. आई होणे सगळ्याच स्रियांच्या आयुष्यात महत्त्वाचं असते , त्याचप्रमाणे ते गौरीच्या आयुष्यात देखील महत्त्वाचं होते कारण मुल एका स्रीच्या आयुष्याला जगण्याचा खरा अर्थ देते. गौरीची ही अवस्था मात्र राहुलला पहावत नव्हती. तो तिला या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होता.
अखेर सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता राहुलने मुल दत्तक घेण्याचे ठरवले आणि गौरीला घेउन तो अनाथ आश्रमामधे गेला , सुरुवातीला दत्तक मुलासाठी नाही म्हणणारी गौरी मात्र बाळाला पाहुन त्यातच हरवली. दोन महिन्याच्या छोट्या वेदला घेउन ती घरी आली , दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
वेदच्या येण्यामुळे राहुलच्या आईबाबांचा राग देखील नाहीसा झाला होता. वेदच्या बाललीलांचे खुप कौतुक होते घरातील सगळ्यांनाच..... ! वेदच्या घरात येण्यामुळे सगळीकडेच आनंदी आनंद पसरलेला होता.
राहुलची देखील व्यवसायात खुप प्रगती होत होती. राहुलच्या आईबाबांच्या मदतीने राहुलने स्व:ताचे टूमदार घर घेतले होते.
वेद देखील वर्षाचा झाला होता , त्याचा पहिला वाढदिवस देखील राहुल आणि गौरीने मोठ्या धामधुमीत साजरा केला.
राहुलला आपला व्यवसाय अजून मोठा करायचा होता , परंतु पैसे थोडे कमी पडत होते , त्यामुळे राहुल पैशाची जुळवाजुळव करायचा प्रयत्न करत होता. राहुलची अडचण गौरीने ओळखली आणि तिने स्वःताचे सगळे दागिने राहुलला गहाण ठेउन पैश्यांची व्यवस्था करण्यास सांगितले परंतु गौरीचे दागिने गहाण ठेवण्यास राहुल तयार होत नाही , परंतु गौरी त्याची समजूत काढते की ...
" राहुल , तु जे काही करत आहेस ते आपल्या दोघांच्याही संसाराची काळजी करुन करत आहेस ना.. , मग थोडे दिवस मी माझे दागिने नाही देऊ शकत का तुला..? "
गौरीच्या या समजुतीच्या गोष्टी राहुलला पटतात त्यामुळे तो गौरीचे दागीने गहाण ठेवुन पैश्यांची व्यवस्था करतो.
दृष्ट लागण्यासारखा दोघांचा सुखी संसार सुरू असतो परंतु सुखालाही कधीतरी दृष्ट लागते , तसेच काही गौरी आणि राहुलच्या आयुष्यात घडते.
एक दिवस राहुल कामा निमित्त बाहेर गावी गेला असतानाच अचानक त्याचा ऐक्सीडेंट होऊन त्यातच त्याचा अपघाती मृत्यु होतो. गौरीवर तर दुखाःचे आभाळ कोसळतं. तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला एकटीला सोडून कायमचाच निघुन गेल्यामुळे गौरी खूप खचून जाते.
पण खरी लढाई तर नंतर सुरु होते. वेद गौरीचा दत्तक पुत्र असल्याने राहुलचे आईबाबा त्याला वारस म्हणुन स्विकार करायला नकार देतात आणि गौरीला त्याला अनाथ आश्रमामधे परत सोडायला सांगतात.
क्रमशः
एक आई असलेली गौरी वेदला परत अनाथ आश्रमामधे सोडेल का..? की तिच्या आईच्या हक्कासाठी, तिचे मातृत्व टिकवण्यासाठी ती कोणती लढाई लढेल हे जाणुन घेण्यासाथी पुढचा भाग वाचायला विसरु नका....
पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box