आनंदी वास्तू 🏠 .... भाग 2

 आनंदी_वास्तू🏠 .. भाग 2

✍©️जया पाटील 


मागील भागात आपण पाहिलेच की घरातील भांडणात शेखरने शुभांगीची बाजू घेतली नाही त्यामुळे शुभांगी शेखर , रमाताई आणि विलासराव सगळ्यांवरच खूप नाराज होती. खरे पाहिलं तर या सगळ्या वादात चूक शुभांगीची होती पण आपला अहंकार बाजूला ठेवून आपली चूक स्वीकारेल तर ती शुभांगी कसली ...?


या वादानंतर शुभांगीने शेखरसह घरातील इतर सदस्यांसोबत बोलचाल बंद केली होती. विलासराव आणि रमाताईंना परिस्थितीत कशी सुधारणा करावी हेच कळतं नव्हते. शुभांगी खूप हट्टी होती त्यामुळे तिची समजूत काढणे अवघड होते. 


शुभांगीला रागावणे किंवा तिच्याशी भांडण करून तिला तिच्या चुकीची जाणीव होणार नाही आणि  कदाचित तिला याची जाणीव झाली तरी तरी कायमस्वरूपी नसणार हे विलासराव जाणून होते. त्यामुळे शुभांगीमध्ये बदल करण्यासाठी काहीतरी वेगळे सोलुशन शोधावे असा मनोमन विचार विलासराव करत होते.


दोन-तीन दिवस अबोल्यातच निघुन गेले. त्यानंतरच्या दिवशी शुभांगी ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. कोणासोबत न बोलता नाश्ता करत असताना तिला तिच्या आईचा फोन आला . तिची आई फोनवर खूप रडत होती. शुभांगीच्या बाबांना अर्धांगवायूचा झटका आला होता. शुभांगी हे ऐकून रडू लागली. 


शेखर , विलासराव आणि रमाताईंनी तिला सावरले. सगळेजण लगेचच तिच्या सोबत हॉस्पिटलला पोहोचले. रमाताईंनी शुभांगीच्या आईची समजूत काढली. शेखर आणि विलासरावांनी शुभांगीच्या बाबांच्या ट्रीटमेंटची पूर्णतः काळजी घेतली. 


शुभांगीच्या आईबाबांच्या नाश्ता , खाण्यापिण्याची सगळी सोय रमाताईं आणि विलासरावांनी केली. त्यांच्या प्रकृतीची सगळी योग्य ती काळजी विलासराव, रमाताई आणि शेखरने घेतली. शुभांगीच्या बाबांना आपल्याला मुलगा नाही याची यत्किंचितही जाणीव शेखरने होऊ दिली नाही.


शेखर आणि त्याच्या आईबाबांची आपुलकी पाहून शुभांगीला आपल्याच वागण्याची लाज वाटली. तिला जाणवले की आपण चुकीचे वागलो 

तरी देखील आपल्या संकटाच्या काळात आपल्या लोकांनी आपली साथ दिली. 


शुभांगीने सगळ्यांची मनोमन माफी मागितली पण त्यांच्या समोर जाऊन माफी मागायची हिम्मत मात्र शुभांगीमध्ये नव्हती. कदाचित या सगळ्यातही शुभांगीचा हट्टीपणा आणि अहंकार आडवा येतच होता. 


माणूस हा पृथ्वीतलावरचा एकमेव प्राणी आहे कि प्रत्येक गोष्टीत त्याचा अहम त्याला कधीच सोडत नाही पण असे म्हणण्यापेक्षा माणूसच अहंकाराला सोडत नाही असे म्हणणे जास्त योग्य ठरेल असे मला वाटते.


शुभांगी आता घरातील लोकांसोबत थोडेसे चांगले वागत होती. तिचे बाबा डिस्चार्ज मिळून घरी आलेले होते. त्यांची तब्येतही व्यवस्थित सुधारत होती. शुभांगीचे पार्टी प्रकरण पुन्हा सुरु झाले होते. आज पुन्हा बाहेर जाऊया म्हणुन तिने शेखरच्या मागे तगादा लावला. विलासराव आणि रमाताईंनी आता मात्र डोक्याला हात लावून घेतला .


नव्याचे नऊ दिवस चांगल्या वागण्याचा शुभारंभ केलेल्या शुभांगीचे वागणे पुन्हा पाहिल्यासारखेच झाले होते. या मात्र यात बदल करणे जरुरी होते. विलासरावांनी त्या दिवशी शेखरला शुभांगीसोबत बाहेर जायला सांगितले. घरातून परवानगी मिळाल्यामुळे शुभांगी खुश होती. 


शेखर आणि शुभांगी बाहेरून आल्यावर विलासरावांनी त्यांना बाहेर बोलावले. रमाताईंना पण बाहेर येण्यास सांगितले. विलासराव बोलु लागले...


शेखर आणि शुभांगी येत्या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस तुम्ही कामावरून सुट्टी घ्या , शनिवार आणि रविवार सुट्टी असतेच तुम्हाला ... चार दिवसांच्या ट्रीपला जायचे आहे आपल्या सगळ्यांना ...


शुभांगी मधेच बोलु लागली ...बाबा ..आम्हाला सांगायचे तरी आधी ....अशी मधेच सुट्टी कशी मिळेल ...? तिला हे ट्रिपचे प्रकरण टाळायचे होते.


विलासराव म्हणाले ...हे पहा शुभांगी आम्ही कोणीही तुला कधी अडवत नाही पण तुला यावेळेस माझे ऐकावेच लागेल .. त्यामुळे मी सांगितले त्याप्रमाणे सुट्टी घ्या तुम्ही दोघेही ...


नाईलाजाने शुभांगीने हो म्हटले आणि शेखर , शुभांगी आपल्या रूम मध्ये निघुन गेले. विलासराव आपल्याला कुठे घेऊन जाणार ह्याची मात्र सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती.


बुधवारी रात्री विलासरावानी सगळ्यांना बोलवून सांगितले.

सकाळी लवकर तयार होणार..... आपल्याला निघायचं आहे. ट्रिपला जाण्यासाठी...कुठे जातो आहे ते सकाळी समजेलच तुम्हाला ...


क्रमश:


विलासरावांच्या मनात नेमके काय चालू आहे ? ते  शुभांगी , शेखर आणि रमाताईंना घेऊन नेमके कुठे जाणार आहे ? या ट्रिपचा शुभांगीवर नेमका काय परिणाम होईल ? असेच अनेक प्रश्न येताय ना तुमच्याही मनात .... ? येणारच ना ......


ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतीलच ...पण त्यासाठी तुम्हाला पुढचा अंतिम भाग वाचावा लागेल. 

पुढील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा👇 

आनंदी वास्तू 🏠 .... भाग 1

आनंदी वास्तू 🏠 .... भाग अंतिम


काय मग वाचकहो ...अंतिम भाग वाचताय ना ?  आणि हो अजून एक सांगायचे तर राहिलेच ... माझी ही कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमचे अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका हं..

काय मग कळवता आहे ना अभिप्राय ..? मी वाट पाहतेय तुमच्या प्रतिसादाची ... 


धन्यवाद !


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 


Post a Comment

0 Comments