#का_रे_दुरावा ....?
✍©️जया पाटील
आजची आपली गोष्ट सुरु होते एका कॉलेज मधुन... कॉलेज लाइफ म्हणजे आयुष्य बिनधास्त होऊन जगणेच असते. तसा या कॉलेज मध्ये शिकणारा महेश देखील अतिशय बिनधास्त ...प्रत्येक मुलीला फक्त सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि मुलांसोबत पैज लावून त्या मुलीला पटवणे हा त्याच्यासाठी जणू खेळच झालेला होता.आपण चुकतो आहे किंवा हे सगळेच चुकीचे आहे हे महेशच्या लक्षातच येत नव्हते. आपल्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आपल्या प्रेमाच्या माणसांची गरज असते परंतु तश्याप्रकारे समजवणारे महेशच्या आयुष्यात मात्र कोणीही नव्हते. तश्यातच कॉलेज मध्ये एन्ट्री झाली सईची ...
सई .. लाजरी -बुजरी , गोड हसणारी , स्वतःच्या हास्यासारखीच स्वभावाने देखील गोड मधाळ असणारी एक साधीशी मुलगी. सईला महेशने कॉलेज मध्ये पहिल्यांदा पहिले. त्यावेळेस त्याच्या मनाला जाणवले ...कुछ कुछ होता है ...!
परंतु कॉलेजवयात महेशच्या मनापेक्षा त्याचा मेंदू त्याच्यावर भारी.. मग काय मित्रांमध्ये सईला कोण पटवणार ? या विषयावर पैज लावणे सुरु झाले. नेहमीसारखेच ही पैज जिंकण्यासाठी महेशरावांनी हा पैजेचा विडा उचलला आणि निघाले मोहिमेवर ... परंतु ही मोहीम त्याच्या आयुष्याला खूप अनपेक्षित वळण देणार आहे हे त्याला तरी कुठे माहित होते ?
सईसोबत मैत्री करण्यासाठी महेशचे प्रयत्न सुरु झाले. कॉलेजचे स्नेहसंमेलन जवळच आलेले होते. त्याच्यामध्ये नाटकाचा प्रयोग होता. सईने देखील त्यात भाग घेतला होता. महेश देखील त्याच प्रयोगात पार्टीसिपंट होता. त्यानिमित्ताने सई आणि महेशची मैत्री झाली. दोघेही बराच वेळ सोबत घालवत होते. महेशला हवे तसे सईला तो आवडू लागला होता. महेशला देखील सई मनापासून आवडत होती परंतु त्याचा मेंदू मात्र हे मान्य करत नव्हता.
सई आणि महेश बराच वेळ सोबत घालवत होते. शेवटी महेशने तिला प्रोपोज केले आणि सईने देखील हो म्हटले. अर्धी पैज तर महेश तिथेच जिंकला होता. त्यानंतर मात्र महेश जेव्हाही सईला भेटायला जायचा त्यावेळेस तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. सई मात्र कधीच महेशला जवळ येऊ देत नसे. या सगळ्या गोष्टींची ही योग्य वेळ नाहीये असे सांगून ती महेशला दुर सारायची.
महेश मात्र तिच्या नकाराने रागवायचा. तिला कसे पण करून जवळ आणायचे याच विचारात तो असायचा परंतु त्याला मात्र ते शक्य होत नव्हते.
शेवटी एक दिवस त्याच्या मित्रांनी एक प्लॅन केला. सगळे मित्रमैत्रिणी मिळून आपण कुठे तरी बाहेर फिरायला जाऊ या आणि त्यावेळेस मी सईला एकटे गाठेल असे महेशने ठरवले. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी बाहेर फिरायला जायचे ठरवले. महेशचे सगळे मित्रमैत्रिणी या प्लॅन मध्ये सामील होते. फक्त सई आणि तिची मैत्रीण रश्मीला मात्र या बाबतीत काहीच माहित नव्हते.
ठरल्याप्रमाणे ते ट्रिपच्या जागी पोहोचले. सगळे मित्रमैत्रिणी खूप मज्जा करत होते. गेम्स ,गाणी सगळे काही धम्माल चालू होते. त्यावेळेस सईला घेऊन महेश थोडा दुर गेला. पुन्हा तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. सईने पुन्हा त्याला नकार दिला आणि चिडून तिथून दुर निघुन गेली. महेश तिच्या मागे धावत आला आणि त्याने तिची माफी मागितली. थोडा वेळात त्याने तिच्या कोल्ड्रिंक मध्ये नशेच्या गोळ्या मिसळून तिला प्यायला दिले. सईने महेशवर विश्वास ठेवून ते ड्रिंक पिले. त्यामुळे तिचे भान हरपले. सईला उचलून महेश एका खोलीत घेऊन गेला. त्याचवेळेस रश्मी सईला शोधत होती. महेश सईचा गैरफायदा घेणार त्याचावेळेस रश्मी तिथे आली आणि तिने महेशला असे वागण्यापासून रोखले, त्याला चांगलेच धारेवर धरले. अर्धवट शुद्धीत असलेल्या सईला घेऊन ती निघुन गेली. सकाळी उठल्यावर रश्मीने महेशच्या वागण्याबाबतीत सगळे काही सईला सांगितले. सईचा विश्वास बसत नव्हता. ती धावतच महेशच्या खोलीकडे गेली आणि तिने महेशच्या कानात एक झापड लगावली...
महेश, तु इतका खालच्या थराला जाशील असे वाटले नव्हते रे ...माझी सगळी स्वप्न भंग केलीस तु .. तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहत होती मी ...पण मला कुठे माहित होते मी ज्या व्यक्ती वर इतके जीवापाड प्रेम करते .., इतका विश्वास ठेवते ती व्यक्ती मला इतका मोठा धोका देईल. असा विचार सुद्धा मी कधी केला नव्हता. माझीच निवड चुकली .. माझे प्रेम खोटं ठरवलं तु आज ...i hate u Mahesh ... i hate u ...असे म्हणुन सई तिथून निघुन गेली.
त्यानंतर मात्र सई कधीही महेश सोबत बोलली नाही. महेशला मात्र सईच्या सगळ्या गोष्टी आठवत असत. आपण चुकलो याची जाणीव त्याला झाली पण वेळ मात्र निघुन गेली होती. त्याने सईचा विश्वास गमवला होता.
दिवस पुढे जात होते. कॉलेज संपल्यावर महेश जॉब करू लागला. कॉलेजच्या शेवटच्या दिवसानंतर मात्र त्याला सई कधीच दिसली नाही.
ऑफिस मध्ये महेशला अनिकेत भेटला.ते दोघेही खूप चांगले मित्र झाले.
अनिकेत नेहमीच महेशला सांगत असे की मी जे काही आहे ते सगळे माझ्या बायकोच्या साथीमुळे आहे. तिचे प्रेम , तिचा विश्वास मला जगण्याचा हुरूप देतो. महेशला अनिकेतचे आणि त्याच्या बायकोच्या कौतुकाचे अप्रूप वाटायचे. त्यानंतर काही दिवसांनी ऑफिस मध्ये अनिकेतचे प्रोमोशन झाले. त्या समारंभात सगळेच एम्प्लॉयी कुटुंबासोबत उपस्थित होते. महेश देखील अनिकेतसाठी खुश होता.
प्रोमोशन लेटर घेण्यासाठी अनिकेतला स्टेज वर बोलावण्यात आले. त्यावेळेस तो बोलु लागला ..
माझ्या या यशाचे खरे श्रेय मी माझ्या पत्नीला देतो आणि माझे प्रोमोशन लेटर घेण्यासाठी तिलाच या स्टेजवर बोलवतो. Please ,come on the stage my beautiful and lovely wife Sai .....
सईला स्टेजवर पाहून महेश अगदी सुन्न झाला. त्यांचा प्रेमाचा प्रवास , त्याची चुकी सगळे काही त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले.
समारंभ झाल्यावर अनिकेत महेशला आणि इतर मित्रमैत्रिणींना भेटवण्यासाठी सईला घेऊन आला. महेशला पाहून सईचा पारा चढला परंतु अनिकेत समोर तिने काहीच दर्शवले नाही. त्याचवेळेस अनिकेतचा मित्र सईला उद्देशून म्हणाला,
सई ..अनिकेत तुझ्याबद्दल इतके भरभरून बोलतो ......तु पण सांग त्याच्याबद्दल काही तरी ...
सई बोलु लागली ...
अनिकेत बद्दल बोलायला खूप काही आहे पण खरे सांगायचे तर अनिकेतच्या रूपाने मला खरे प्रेम मिळाले. माझ्यावर विश्वास करणारा ,माझ्या भावनांचा आदर करणारा जोडीदार मिळाला. आमच्या नात्याला जपण्यासाठी त्याने पुरेसा वेळ दिलाय. माझ्या मतांचा आदर केला. एका मुलीला यापेक्षा जास्त काही नको असते आणि अनिकेतचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडून सई तिथून निघुन गेली.
सईने अनिकेतचा घट्ट पकडलेला हात पाहून महेशला समजले की आपण खरेच नेमके काय गमावले आहे ते .. क्षणिक सुखासाठी सई सारखी सोबत आपण गमावली ह्याचा त्याला पश्चाताप झाला. सई आणि अनिकेतचे प्रेम पाहून महेशला समजले की सई कडून आपण जी अपेक्षा करत होतो खरे तर ते सगळे तिलाही हवे होते पण योग्यवेळी ... पहिले प्रेम , हवाहवासा वाटणारा पहिला स्पर्श हे सगळे तिला अनुभवायचे होते पण मी ...मात्र ....नको ते वागायला पाहत होतो ते ही नको त्या वेळी . महेशच्या डोळ्यात पाणी होते. सईचा हा विरह महेशला कायमची शिकवण देऊन गेला होता. त्याचे मन त्याला एकच प्रश्न विचारत होते .. का रे दुरावा ...?
एकमेकांचा हात हातात पकडून जाणाऱ्या सई आणि अनिकेतला पाहून महेशचे मन एकच सांगत होते ...
सुखाचा किनारा मी का सोडला ..?
मला ना कळे कैसे सांगू तुला ?
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels/pixabay
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box