संशयाचे मळभ .. भाग 1
✍©️जया पाटील
"तेरी मेरी यारी सबसे न्यारी ..देखती रह जायेगी दुनिया सारी... चाहे कितना भी जोर लगालो नही तुटेगी ये दोस्ती हमारी ..... ! "
हे वाक्य आपल्याला कोणालाही नवीन नाही कारण खऱ्या मैत्रीची व्याख्या या एकाच वाक्यात आपल्या सगळ्यांना समजते.
तशीच काहीशी मैत्री होती अनिकेत , दिशा आणि पुनीतची ..... अगदीच निखळ मैत्री ..जीवाला जीव देणारी ...एकमेकांना समजून घेणारी ....! त्या तिघांपैकी कोणावरही संकट आले असेल तरी ते आपलेच संकट आहे असे समजून त्या अडचणीत लढण्यासाठी तिघेही तयार असायचे.
कदाचित अशी मैत्री खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते कारण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप मित्र असतात पण स्वार्थाची झालर मात्र या प्रत्येक नात्यावर पाहायला मिळते....अनिकेत , पुनीत आणि दिशा हे त्रिकुट मात्र या गोष्टीला अपवाद होते.
दोन मुले आणि एक मुलगी यांची इतकी घट्ट मैत्री असू शकते , याचे सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटायचे आणि तितकेच कौतुकही ....!
कॉलेज लाईफ संपले आणि तिघांनीही पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे ठरवले. तिघे एकमेकांसोबत असतील म्हणुन तिघांच्याही घरच्यांनी होकार दिला कारण अनिकेत , दिशा आणि पुनीत तिघांच्याही कुटुंबियांना त्यांच्यावर आणि त्यांचा खऱ्या मैत्रीवर पूर्ण विश्वास होता.
तिघांनीही एंट्रन्स एक्झामची जोरात तयारी सुरु केली. तिघेही त्या परीक्षेत यशस्वी झाले. मार्कस कमीअधिक होतेच पण देवाची कृपाच म्हणावी , त्यामुळे तिघांनाही एकाच युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन मिळाली.
मग विजा आणि बाकी सगळ्या प्रोसेस सुरु झाल्या. तिघांचे त्रिकुट परदेशी रवाना झाले. तिथेही एकमेकांची साथ होतीच मग काय .... अभ्यास , कॉलेज चे फंक्शन सगळीकडे हे तिघे पुढे ... एकमेकांना समजून घेण्याची आणि मदत करण्याची सवय आधीपासून असल्यामुळे सगळ्या अडचणी पार पाडत ते तिघेही यशस्वी होत होते. परदेश म्हटलं काय आणि स्वदेश म्हटले काय ....? चांगल्या लोकांवर जळणारे लोक सगळीकडेच असतात.
दुसऱ्या देशातून येऊन आपल्या सगळ्याच इव्हेंट्स मध्ये हे लोक विनर होत आहे हे तिथल्या विद्यार्थ्यांना मात्र काही सहन होत नव्हते. त्यामुळे अनिकेत , दिशा आणि पुनीतची मैत्री तोडण्याचे प्रयत्न सुरु झाले तिथल्या विद्यार्थ्यांमधुन ...परंतु हे तिघेही त्या सगळ्यांना पुरून उरले ...
कोणाच्याही मोहात न पडता त्यांनी आपलीच मैत्री आणि विश्वास ...आपल्या देशाचे संस्कार कसे श्रेष्ठ आहेत हे सगळे काही सिद्ध केले.
शेवटी थकून भागून त्या तिघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न तिथल्या विद्यार्थ्यांनी सोडून दिला. त्यानंतर त्या युनिव्हर्सिटी मध्ये एका मोठ्या स्पर्धेचे आयोजन झाले. देशविदेशातील खूप विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेत असत आणि ह्या स्पर्धेत यश मिळवणे खूप अवघड होते.
अनिकेत , पुनीत आणि दिशा तिघांनीही मिळून या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक प्रोजेक्ट बनवला. विविध देशातील विद्यार्थी स्पर्धक असलेल्या या स्पर्धेत अनिकेत , दिशा आणि पुनीत यांच्या प्रोजेक्टला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यावेळेस त्या तिघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आज मै उपर .. आसमा नीचे ...आज मै आगे ..जमाना है पीछे ....अशीच काहीशी अवस्था त्या तिघांचीही होती. हे यश आपल्या एकट्याचे नसून तिघांचे आहे हे ते जाणून होते. या त्यांच्या समाधानामुळे , त्यांच्या एकीतल्या बळामुळे ते तिघेही यशस्वी होते.
तिघांच्या या यशाची बातमी भारतातील सगळ्यां वृत्तपत्रांमध्ये छापून आली.....
"भारतीय विद्यार्थ्यांची यशस्वी परदेशवारी ....! " ,
या शीर्षकाखाली त्यांचे फोटो आणि त्यांचे कौतुक छापून आले. तिघांचेही आईवडील खूप खुश होते. आपल्या मुलांचे वृत्तपत्रातील कौतुक त्यांनी एका सुंदर फ्रेम मध्ये रूपांतरित करून तिघांच्याही घरात लावले.
या स्पर्धेतील यशामुळे अनिकेत , पुनीत आणि दिशा तिघांनाही चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. शिक्षण पूर्ण झाले म्हणुन घरचे आता सगळ्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले. या तिघांना मात्र इतक्यात लग्न नको होते.
क्रमश:
अनिकेत , दिशा आणि पुनीतच्या आयुष्याला पुढे काय वळण मिळते ते जाणून घेण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.
उर्वरित भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box