तुमसे मिलके 💞 .. भाग 2 अंतिम

 तुमसे मिलके 💞 .... भाग 2 अंतिम 

✍©️जया पाटील 



भाग 1 वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

तुमसे मिलके 💞 .. भाग 1


राजीव नंदिनीच्या आयुष्यातून निघुन गेल्यानंतर नंदिनी ने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण राजीव सोबत कुठलाच संपर्क होऊ शकला नाही.

आपला जिवलग मित्र असा अचानक दुरावल्या मुळे नंदिनी खूप उदास झाली. 


तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात अवनीश सोबत होणार असली तरी तिचा एक चांगला मित्र म्हणून राजीवची सोबत देखील तिला हवी होती.

थोड्या दिवसांनी नंदिनीचा अवनीश सोबत थाटामाटात विवाह पार पडला.


गुलाबाची कळी जणु हळदीने माखली ,

आली लाली गोर्या गाली उतू उतू चालली ,

नटून थटून लाजते जणु चांदणी ....!


वरच्या कवितेप्रमाणे अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे रूपवती नंदिनी अवनीशची अर्धांगिनी   झाली होती, त्यामुळे अवनीशला सारे आभाळ ठेंगणे झाले होते. अवनीश आणि नंदिनीचा सुखाचा संसार सुरु झाला. त्यांच्या संसारवेलीवर सुखाचा बहर आला. नंदिनीला एक गोड मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी अंश असे ठेवले.


अंश मोठा होत होता. नंदिनी तिच्या संसारात पूर्णपणे गुंतून गेली होती. अवनीश आणि तिचे देखील सगळेच छान चालले होते पण कधीतरी तिचे मन राजीवला शोधायचे, का राजीव असा अचानक मला काहीही न सांगता निघुन गेला ...? त्याला काहीच सांगावेसे नाही वाटले मला जाताना ..? इतकी परकी होते का मी त्याला ...?

असे प्रश्न वारंवार तिच्या मनात येत राहिले.


अवनीशचा व्यवसाय खूप मोठा होत होता पण व्यवसाय अजूनही मोठा करायचा आहे या अट्टाहासामुळे त्याचे समाधान होतंच नव्हते.

वारंवार मोठमोठे कर्ज घेऊन तो त्याच्या व्यवसायात गुंतवत होता.  


नंदिनी त्याला वारंवार सांगत होती ....


अवनीश , फार जास्त हाव बरी नव्हे....व्यवसाय वाढविण्यासाठी तु खूप जास्त कर्ज घेतोय. त्या कर्जाचा भार आपल्याला पेलायला हवा ... उगाच ... , नको त्या गोष्टींचा मोह नको ....आपण आपल्याकडे आहे त्यात देखील खूप खुश आहोत आणि या पुढे देखील खुश राहू शकतो. पैश्यांची इतकी गुंतवणूक आपल्याला पेलणार आहे का ? याचा विचार आधी कर आणि मग गुंतवणूकीचा विचार कर. आपल्याला शक्य नाही त्या गोष्टी करून आपण संकटाना आमंत्रण देऊ ..त्यामुळे हा अट्टाहास सोड ..प्लीज ..


परंतु पैशाचा मोह कधीच कोणाला आपली चूक समजु देत नाही. अवनीशने देखील तेच केले. स्वतःच्या व्यवसायासोबत आणखी पार्टनरशिप मधल्या व्यवसायात पैसे गुंतवले पण त्याचे पार्टनर मात्र बदलले आणि त्यामुळे अवनीशला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. तो खुप कर्जबाजारी झाला, खुप जास्त निराश झाला.


नंदिनी त्याला वारंवार समजावत असे की आपण  आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊया. या सगळ्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल पण अवनीशची निराशा मात्र संपत नव्हती. 


अवनीशच्या मित्रांनी दिलेला धोका त्याला सहन झाला नाही. उदासीनतेने घेरलेल्या अवनीशने नंदिनी, अंश, त्याचे आईबाबा कुणाचाही विचार न करता आत्महत्या केली. नंदिनी पूर्णपणे उध्वस्त झाली.


अवनीशच्या आत्महत्येला अवनीशच्या आईबाबांनी निरपराध नंदिनीला जबाबदार धरले. नंदिनीला माहेरी पाठवून दिले पण अंशला मात्र स्वतःजवळ ठेवून घेतले.


आपल्या काळजाच्या तुकड्यापासून दूर राहणे नंदिनीला सहन होत नव्हते. खुप प्रयत्न करून देखील अंशला तिला फक्त भेटता देखील येत नव्हते, मग तिने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला. त्यातून अंशचा ताबा स्वतःकडे मिळवला.


नंदिनीच्या आईबाबांना सतत नंदिनीची चिंता लागून राहिली होती. तिचे संपुर्ण आयुष्य ती एकटीने अंशचा सांभाळ कसा करेल ..........? ही एकच चिंता मनोमनी नंदिनीच्या आईबाबांना त्रस्त  करत होती.


अवनीशच्या मृत्यूनंतर नंदिनीने अंशचा  कायदेशीर पणे ताबा मिळवला पण आता अंशची जबाबदारी घेण्यासाठी तिला आत्मनिर्भर होणे आवश्यक होते. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तिने नोकरी करायची ठरवली. या सगळ्या संकटाना तोंड देताना मात्र तिला सतत राजीवची आठवण येत होती ......


राजीव आज असता तर ....माझा भक्कम आधार बनला असता. त्याच्या सोबतीने मला या संकटांसोबत लढण्याचे बळ मिळाले असते .... असा विचार सतत तिच्या मनात येत असे पण राजीवचा मात्र काहीच तपास नव्हता.


अशातच नंदिनीने एका कंपनीत नोकरीला सुरुवात केली. नोकरीत देखील तिचे मन रमत नव्हतं पण वेळ मात्र निघुन जात होता.एक दिवस त्यांच्या ऑफिस मध्ये एका उच्च पदावर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. सगळेच लोक नवीन सरांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक होते पण नंदिनी मात्र हिरमुसलेली एकटीच बाजूला उभी होती. नाखुशीनेच ती नवीन सरांना पुष्पगुच्छ  देण्यासाठी पुढे सरसावली तर समोर राजीव उभा ......!  आनंदाने त्याला मिठी मारू की दुखाःने त्याला धरून रडू ....? 8 वर्षे कुठे गेला होतास मला सोडून याचा जाब विचारू ....? किती बोलू आणि काय करू ...? अशा अनेक गोष्टींनी नंदिनीच्या मनात गर्दी केली.


दोघांनाही एकमेकांना पाहून गहिवरून आले पण दोघांनीही स्वतःला सावरले. जरा वेळाने राजीवने नंदिनीला केबिन मध्ये बोलावले मग मात्र तिचा संयम संपला आणि ती बोलू लागली..


कुठे होतास रे राजीव .....सगळ्या संकटांमध्ये मला एकटीला सोडून निघून गेलास ...माझा प्रिय मित्र ,वेलविशर नसताना माझे काय होईल याचा जरासुद्धा विचार केला नाहीस तु .......? अवनीशने देखील अर्ध्या वाटेवर साथ सोडली माझी आणि तु देखील .....!


अवनीशबाबतचे राजीवला सगळेच काही समजले. त्याला नंदिनीच्या दुःखांची जाणीव झाली. तिची सोबत करावी असे पुन्हा वाटू लागले पण नंदिनी त्याचा गैरसमज तर करणार नाही ना .....? तिच्या अडचणींचा मी गैरफायदा घेतोय असे तर तिला वाटणार नाही ना ...? त्याने पुन्हा एकदा त्याचे पाऊल मागे घेतले. एक मित्र म्हणूनच फक्त तिची सोबत करायची ठरवली.


राजीवच्या सोबतीने नंदिनीची कळी पुन्हा एकदा फुलली. ती ऑफिस मध्ये आणि घरी देखील खुश राहू लागली. राजीव आणि नंदिनी ऑफिस मध्ये बराच वेळ सोबत असत. त्यांची ही जवळीक ऑफिसच्या सगळ्या लोकांमध्ये कुजबुजीचा विषय होऊ लागली.  नंदिनीची एक सहकारी न राहवून तिला म्हणाली ...


काय मग नंदिनी ..... , अशी काय जादू केलीस नवीन सरांवर .....? आम्हाला पण सांग.... जादूटोणा वगैरे येतो की काय ..? बॉस अगदी तुझाच बनून राहतोय...?


नंदिनीला काय बोलू आणि काय नाही काहीच सुचले नाही, ती तडक घरी गेली. खुप रडली. राजीव आणि तिच्या बाबतीतले बोलणे तिला सहन झाले नाही. पुन्हा ऑफिसला कधीच जायचे नाही. सगळ्यांची नजर चांगली नसते. राजीवचा माझ्यामुळे झालेला अपमान मी कधीच सहन करू शकणार नाही. शेवटी राजीव आणि माझ्याबद्दल लोक कधीच चांगला विचार करणार नाहीत म्हणून राजीव पासून दूर राहिलेलेच बरे .....असे तिने ठरवले.


पण राजीव पासून दूर राहणे तिच्यासाठी खुप अवघड होते. तिला स्वतःलाच कधी न समजलेले राजीव तिचे पहिले प्रेम होते पण तिने ते कधीच जाणून किंवा उमगून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

राजीव हा माझा फक्त एक चांगला मित्र आहे अजून दुसरे काहीही नाही हेच पक्के तिने तिच्या मनाशी ठरवून टाकले होते.


नंदिनी आपल्या पासून समाजामुळे दूर जातेय हे राजीवला समजले...काय करावे....? समाज आपल्याला दुःखात मदतीला येत नसतो. या समाजासाठीच एकदा मी माझ्या नंदूला गमावले,आता मात्र हे शक्य नाही. आता जर मी तिला एकटीला सोडून गेलो तर ती आयुष्यभर दुःखी आणि एकटी असेल. कदाचित त्यावेळेस माझ्या मनातल्या भावना तिला सांगू शकलो असतो तर ......कदाचित आज परिस्थिती काही वेगळी असू शकली असती. आता मात्र नाही काहीही झाले तरी माझ्या भावना मी नंदिनी पासून लपवणार नाही असे राजीवने ठरवून टाकले.


नंदिनी ऑफिसला राजीनामा सुपूर्द करण्यासाठी आली पण राजीवला शेवटचे पाहून घ्यावे म्हणूनच राजीनामा देण्यासाठी ती स्वतःच आली होती. 

राजीनामा राजीवच्या समोर ठेवून नंदिनी केबिन बाहेर पडली आणि बाहेर येताच तिला राजीवचा आवाज आला.


थांब नंदू  ....,


ऑफिसमधले सगळेच कर्मचारी पाहत होते.


थांब नंदू..... , तुला पहिल्यांदा पाहिले त्याचवेळेस मी तुझ्या प्रेमात पडलो होतो पण आधी तुझा चांगला मित्र होईल मग माझ्या भावना तुला सांगेल या नादात मी माझ्या भावना कधीच बोलू शकलो नाही. ज्या दिवशी तुला सांगेल असे ठरवले त्याच दिवशी तु अवनीशला पसंद केलेस ...मग मात्र मी गप्प राहिलो ...तुझ्या सुखासाठी ....ह्या समाजासाठी .....,

पण आज मात्र मी गप्प राहणार नाही.....तुला आयुष्याच्या वाटेवर आता मात्र मी एकटा सोडून जाणार नाही.

माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे नंदू ....

माझ्या सोबत लग्न करशील.......नंदू .....?


नंदिनी राजीवच्या भावना ऐकून रडू लागली ....


राजीव तुला आणि तुझ्या भावनांना मी कधीच नाही समजुन  घेऊ शकली पण तुझी नंदू पूर्वी सारखी नाहीये राजीव आता ..... ती अवनिशची विधवा बायको आहे , अंशची आई आहे ..... त्यामुळे हे शक्य नाही .


राजीव बोलू लागला ...तु विधवा असली , एक आई असली तरी माझे तुझ्यावर पूर्वी इतकेच प्रेम आहे ...

मी तुला सोडून कधीच कोणाचा विचार करू शकलो नाही म्हणून गेली 8 वर्षे फक्त तुझ्याच आठवणीत घालवतोय ..आज तुझी सोबत करण्याची पुन्हा एकदा संधी मिळतेय ...असा नकार देऊ नकोस नंदू .....

मला तुझा आयुष्याचा साथीदार होण्याची , अंशचा बाबा होण्याची संधी देशील.....?


नंदिनीला गहिवरून आले होते. तिला तिच्या स्वतःच्या आणि राजीवच्या भावना कधीच समजल्या नव्हत्या. राजीवला ती सतत आपला चांगला मित्र मनात होती पण ही मैत्री नाहीतर खरे प्रेम होते. याचा स्वीकार तिने कधीच केला नव्हता.


आज खऱ्या अर्थाने तिला तिचे पहिले प्रेम उमगले होते आणि तिला तिच्या आयुष्याची साथ देणारा साथीदार मिळाला होता.

दोघांची मनं आज फक्त एकच गाणे गुणगुणत होते.......


तुम से मिल के...

ऐसा लगा तुम से मिल के...

अरमां हुये पुरे दिल के...

ऐ मेरी जान-ए-वफ़ा...

तेरी मेरी मेरी तेरी, एक जान है..

साथ तेरे रहेंगे सदा...

तुम से ना होंगे जुदा....


राजीव आणि नंदिनीची ही प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील

Post a Comment

1 Comments

  1. व्वा खुप सुंदर कथा सादर केली आहे. एक निरागस आणी स्वच्छ मनाने केलेलं प्रेम काय असते हे या कथेतुन समजते. ☺

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box