तराना 💞💞 .. !

#तराना 💞💞 .. !


✍©️जया पाटील 





सीने में सुलगते हैं अरमां

आँखों में उदासी छाई है

ये आज तेरी दुनिया से हमें

तक़दीर कहाँ ले आई है…


गानकोकिळा लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या आवाजातले हे गाणे प्रत्येक रसिकाला आजही घायाळ करते.


आजपासून तब्बल एकोणसाठ वर्षांपूर्वीचा म्हणजे 1951 मध्ये प्रदर्शित झालेला तराना हा चित्रपट पाहण्याचा योग 2020 मध्ये आला.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांची मनाला भावणारी दिलखेचक अदाकारी म्हणजे तराना..


के.एस.दरयानी लिखित हा चित्रपट राम दरयानी यांनी दिग्दर्शित केला होता. दिलीपकुमार ,मधुबाला आणि श्यामा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे तुमच्या माझ्या सारख्या रसिक प्रेक्षकांना लाभलेली पर्वणीच जणू .....!


चला तर जाऊया का मग या चित्रपटाच्या सफरीवर .....माझ्या लेखणीतुन , माझ्या शब्दांच्या रूपातून ...... 


आपली कथा सुरु होते एका छोट्याश्या गावातून.... विदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले  डॉ. मोतीलाल यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्या मुळे या छोट्याशा गावात उतरते. त्यावेळेस त्या  गावातील सूरदास नावाचा एक अंध जेष्ठ व्यक्ती  मोतीलालला आश्रय देतो.  


सूरदासची एक सुंदर,चंचल आणि चुलबुली मुलगी असते तराना....सुरुवातीला तराना आणि मोती मध्ये छोट्या छोट्याश्या कुरबुरी होतात. दोघांचेही एकमेकांसोबत पटत नाही परंतु एक पाहुणा म्हणून आलेला मोतीलाल नंतर मात्र  तरानाचा एक चांगला मित्र  'मोती'  होतो. रुसवे-फुगवे यातून त्यांच्या मैत्रीला एक वेगळेच वळण मिळते.


नैन मिले नैन हुये बावरे

चैन कहाँ मोहे सजन साँवरे

नैन हुये बावरे

प्यार की लेहेरों में दो दिल बेह गए

अब रुके ना प्रीत की ये नाँव रे

नैन हुये बावरे

नैन मिले नैन हुये बावरे

चैन कहाँ मोहे सजन साँवरे


अशी अवस्था मोती आणि तराना दोघांचीही असते , दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात.  


त्यादरम्यान मोतीचे वडील त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत म्हणजेच शिला सोबत मोतीचा विवाह करण्याचे ठरवतात परंतु या गोष्टीची मोतीला काहीही कल्पना नसते. शिला देखील मोती आणि  तिच्या लग्नाची स्वप्नं रंगवु लागते.


इकडे गावात मात्र खुप श्रीमंत असलेला तोताराम नावाचा व्यक्ति तरानाच्या एकतर्फी प्रेमात पडलेला असतो. मोती आणि तरानाची जवळीक त्याला सहन होत नसते, मोती आणि तरानाचे नाते तोडण्याचे अनेक प्रयत्न तो करत असतो.  


तरानाचे वडील सूरदास हे अंध असतात परंतु त्यांची दृष्टी ऑपेरेशन करून परत येऊ शकते हे मोतीच्या लक्षात येते आणि तो सूरदासची दृष्टी परत आणण्यासाठी प्रयत्न करतो, त्यात तो यशस्वी देखील होतो. वडिलांची दृष्टी परत आलेली पाहून तरानाचा आनंद गगनात मावेनासा होतो. अनेक वर्षांनी आपल्या डोळ्यांनी तरानाला पाहून सूरदास भावविभोर होतो. तो मनापासून मोतीचे आभार मानतो, त्याला अनेक धन्यवाद देतो.


तराना आणि मोती यांची प्रेमकहाणी अजूनच बहरू लागते.


बोल पपीहे बोल रे

है कौन मेरा चितचोर

कौन मेरा चितचोर

है कौन मेरा चितचोर 


कुछ आखियों से नादानी हुयी

मै लुट गयी रे दीवानी हुयी

आखियों ने कहा

आखियों ने कहा आखियों ने सुना

कुछ ऐसी प्रेम कहानी हुयी

मेरी काली काली रातों में

कोई लेके आया भोर 

बोल पपीहे बोल रे

तू बोल पपीहे बोल


अशी तरानाची अवस्था असते. मोती आपल्याला  सोडून कधीच कुठे जाऊ नये असे तिला वाटत असते. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मोतीने आपली सोबत करावी अशी स्वप्ने ती पाहत असते. मोती पुन्हा शहरात जाण्यासाठी निघतो त्यामुळे तराना खुप दुःखी होते, मोती शहरात गेल्यानंतर परत कधीच गावाकडे येणार नाही ,तो कायमचा आपल्या पासून दूर जाईल असे तिला वाटू लागते.



मोसे रूठ गयो मोरा सांवरिया

किसकी लागी है ये किसकी लागी

जुलमी नजरिया....


प्यार का राहे अनाडी का साथ है

लागी हमारी के लाज तेरे हाथ है 

तोरी कागज की नय्या है मोरे सावंरिया

किसकी लागी है.....


मोसे रूठ गयो मोरा सांवरिया

किसकी लागी है ये किसकी लागी

जुलमी नजरिया....


अशी तरानाची अवस्था असते , मोती जायला तर निघतो परंतु तरानाचे दुःख तो पाहू शकत नाही आणि शहरात न जाताच तो परत येतो. मोती आपल्याला कधीच धोका देणार नाही तो सदैव आपलाच राहिल याची तरानाला पक्की खात्री होते . तिची कळी अजूनच फुलते. दिवसामागून दिवस पुढे जात असतात , दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात.


तरानावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तोतारामला मात्र त्यांची जवळीक सहन होत नसते. एक दिवस मोती सोबत बाहेर फिरायला जायचा हट्ट तराना करू लागते. मोतीची तब्येत खराब असते परंतु तरानाचे मन राखण्यासाठी तो बाहेर जायला तयार होतो. 


यूं छुप छुप के

चुपके चुपके मेरा आना

याद रहे यूँ भुला न जाना

यूं छुप छुप के

चुपके चुपके मेरा आना


हमको सताओगे, बडा दुःख पाओगे

लग जायेगी मेरी हाय

हाय सताए हाय जलाये

कही भी जाओगे कल ना आये

हंसेगा सारा जमाना


याद रहे यूँ भुला न जाना

यूँ छुप छुप के

चुपके चुपके मेरा आना....


अशी सुंदर साद मोतीला तराना घालत असते. दोघेही खुप छान वेळ एकमेकांसोबत घालवत असतात.


तराना आणि मोतीला बाहेर जाताना तोताराम पाहतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडते. दोघांच्या प्रवासाच्या दरम्यान मोतीची तब्येत आणखीच जास्त खराब होते, त्यावेळेस खुप जोरात वादळ यायला सुरुवात होते. मोतीची तब्येत आणखीच खराब होत असते. तराना जवळच असलेल्या पडक्या इमारतीमध्ये मोतीला आराम करण्यासाठी नेते. 


इकडे तोताराम मात्र सूरदास गावकर्यांना तराना आणि मोती बद्दल वाईट साईट सांगून त्यांची बदनामी करतो आणि सूरदासला त्या पडक्या इमारतीकडे घेऊन जातो. तराना आणि मोतीला एकत्र पाहून सूरदास खुप चिडतो. तराना त्याला खुप समजवण्याचा प्रयत्न करते  परंतु तिचे काहीही न ऐकता सूरदास तरानाला तिथुन घेऊन निघुन जातो. इतर गावकर्यांना तोताराम उकसवतो आणि गावकरी आजारी मोतीला खुप मारहाण करतात.  


त्याचवेळेस मोती त्याच्या घरी शहरांत परत गेलेला नसतो त्यामुळे त्याच्या शोधात मोतीचे वडील आणि शिला गावाकडे येतात. 

मोतीला जखमी अवस्थेत पाहून ते हैराण होतात आणि त्याला उपचारासाठी ताबडतोब शहरांत हलवतात.


शहरांत गेल्यावर शिला मोतीची खुप काळजी घेते परंतु मोती मात्र तिची कोणतीच गोष्टी ऐकायला तयार नसतो. मोती तरानाला गावी एक चिट्ठी पाठवतो की तो लवकरच तिला नेण्यासाठी येईल पण तोताराम ते पत्र तरानाच्या हाती लागू देत नाही.  


तिचा बदला घ्यायचा म्हणून तोताराम तराना गर्भवती असल्याची अफवा गावात पसरवतो, या गोष्टीचा पुरावा देण्यासाठी तोताराम गावच्या सूईणीला लाच देतो. तरानाने आपल्याला कुठेही तोंड दाखवायला जागा उरवली नाही, ती चारित्र्यहिन आहे , तिने आपल्याला धोका दिला आहे असे समजून सूरदास तरानाला जाळून मारण्यासाठी ती घरात असताना घराला आग लावून टाकतो.  


तरानाची झालेली अवस्था पाहून तोतारामला पश्चाताप होतो आणि तो सूरदासला तराना निर्दोष आहे, तिच्याबद्दल खोटी अफवा पसरवण्याची मी  खुप मोठी चूक केल्याची गोष्ट तो मान्य करतो. सूरदासला सत्य समजल्यावर खुप पश्चाताप होतो आणि तो आपल्या मुलीला.. तरानाला वाचवण्यासाठी आगीत जातो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो.


त्याचवेळेस मोती आपल्या प्रिय तरानाला नेण्यासाठी गावात पोहोचतो आणि त्याला समोर मात्र तरानाच्या घराची राख मिळते. तरानाचा मृत्यू झाला आहे असे समजून मोती निराश होऊन  होऊन शहरात परत येतो. मोती तरानाचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट पचवू शकत नाही.


सीने में सुलगते हैं अरमां

आँखों में उदासी छाई है

ये आज तेरी दुनिया से हमें

तक़दीर कहाँ ले आई है

सीने में सुलगते हैं अरमां


कुछ आँख में आँसू बाकी हैं

जो मेरे ग़म के साथी हैं

अब दिल हैं ना दिल के अरमां हैं

बस मैं हूँ मेरी तन्हाई है

सीने में सुलगते हैं अरमां...


मोतीची अवस्था याहून वेगळी नसते. तरानाच्या अश्या अचानक जाण्यामुळे मोती पूर्णपणे हताश होतो. त्याची जगण्याची इच्छा पूर्णपणे संपते. अश्या वेळेस शिला त्याचा उत्तम आधार बनते.  


शिला त्याला समजावते ...,  


तु डॉक्टर आहेस मोती, तराना तर आज या जगात नाहीय पण तिच्या सारख्या इतर लोकांचे प्राण वाचविण्यासाठी तु जगलेच पाहिजे .. हजारो लोकांचे प्राण वाचविण्याची तु एक आस आहेस ....अशी  हार पत्करू नकोस .... कदाचित तरानाला देखील हेच हवे आहे ...!


शिलाच्या या प्रेमळ आधारामुळे मोती पुन्हा काम करू लागतो. मोती त्याच्या कामात खुप सफल होतो, परंतु तरानाची आठवण मात्र त्याला जगू देत नसते. तरानाचे अस्तित्व त्याला सतत जाणवत असते, तराना जिवंत आहे हेच त्याचे मन त्याला सतत सांगत असते.  


या दरम्यान मात्र त्याच्या वडिलांच्या इच्छेखातर मोती शिला सोबत लग्न करायला तयार होतो, परंतु त्याचे मन मात्र या लग्नाला मनापासून तयार  नसते. 


मोसे रूठ गयो मोरा सांवरिया

किसकी लागी है ये किसकी लागी

जुलमी नजरिया..


झूठ मूठ की प्रित जताये के 

सोये गये चुप से बलम घर जाये के

इन्हें दुजे के दिल की ना कोई खबरीया 

किसकी लागी हाय हाय किसकी

लागी जुलमी नजारिया


मोसे रूठ गयो मोरा सांवरिया

किसकी लागी है ये किसकी

लागी जुलमी नजारिया


याहुन वेगळी अवस्था शिलाच्या मनाची तरी काय असणार ..? 


शिलाला देखील माहित असते की मोतीचे तिच्यावर कधीच प्रेम नसते, तो तिला कधीही स्वीकारणार नाही मात्र तरी देखील शिला मोतीवर जीवापाड प्रेम करत असते त्यामुळे मोती साठी ती कुठल्याही अग्निदिव्यातून जाण्यासाठी तयार असते.


तरानाला आपण कधीच विसरू शकत नाही आणि शिलाला देखील आपण कधी स्वीकारू शकणार नाही, याची जाणीव होऊन मोती शिला आणि त्याच्या लग्नाच्या रात्री घरातून पळून जातो. 


पुन्हा त्याचा जागी जातो जिथे तरानाला जाळलेले असते आणि पाहतो तर काय तराना जिवंत असते....त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही... तरानाला पाहून तो भावविभोर होतो परंतु तरानाला वाटते मोतीचे लग्न झाले आहे त्यामुळे ती त्याच्यासोबत बोलायला नकार देते. मोती मात्र तरानाचे काहीही न ऐकता तिला सत्य परिस्थिती सांगतो , त्यावेळेस तरानाचा आनंद गगनात मावेनासा होतो.....दोघांनाही पुन्हा एकमेकांची साथ मिळते.


खरे प्रेम असेच असते ..कितीही अडथळे आले तरी खरे प्रेम कायम जिंकते. ते आलेले अडथळे म्हणजे खऱ्या प्रेमाची परीक्षाच असते...

मोती आणि तरानाचे प्रेम देखील जिंकते. अनेक अडथळे पार करून ते एकमेकांना भेटतात.


मोतीरामच्या रूपातील डॉ.मोतीलाल आणि रूपवती मधुबाला अर्थातच तराना मन जिंकून घेते परंतु मोतीलाल कधीच आपला होऊ शकणार नाही तरी त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी शिला म्हणजेच श्यामा मात्र मनाला जास्त भावून जाते.

मोती आणि तरानाची प्रेम कहाणी तर पूर्ण होते परंतु शिलाचा मात्र प्रेमभंग होतो.


तराना ही गोष्ट फक्त त्यांची गोष्ट न राहता , आपल्या प्रत्येकाच्या काळजाला हात घालते. आपल्या देखील पूर्ण - अपूर्ण प्रेमाची आठवणही करून देते.


काही प्रसंग हलक्या फुलक्या विनोदांनी मनमुराद हसवून जातात तर काही प्रसंग जसे तराना जळत असते तो प्रसंग बेसावधपणे टचकन डोळ्यात पाणी आणून जातो.


क्या खबर थी के मोहोब्बत मे ये दिन आते है...

जिसे हम अपना बनाते है , वो तडपाते है....


प्यार तुझे मंजूर जो होता 

ठेस ना लगती दिल ना रोता 

तुने कुछ तो सोचा होता

जिंदगानी देनेवाले 

वापस ले- ले ये जवानी 


तरानाच्या मनाचा ठाव घेणारी  

अशी काही सुंदर आणि श्रवणीय गाणी मनाला चटका लावून जातात...  


असा आहे तराना ...मनाला मनापासून भावणारा ......!


वाचकहो, माझ्या लेखणीतील तराना तुम्हाला कसा वाटला , त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरु नका. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या/लेखाचे लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा/लेख शेयर करायचा झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - google 



✍©️ जया पाटील 




   








   




   







Post a Comment

0 Comments