स्वदेस है मेरा 🇮🇳

 स्वदेस है मेरा 🇮🇳 .... !


✍©️जया पाटील 





आरोही .... आई वडिलांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे अर्थातच तिच्या आईवडिलांनी तिला खूपच लाडात वाढवले होते. आरोहीच्या आईबाबांच्या दोघांच्याही जॉबच्या निम्मिताने ते बरेच वर्षे परदेशात वास्तव्यास होते. आरोहीचा जन्म आणि तिचे बालपण देखील परदेशातच गेले होते.


आपल्या मुलीला भारताची ओळख असावी, तिला आपल्या संस्कृती बद्दल आदर असावा म्हणून ते तिला बरेचदा भारतात घेऊन येत असत परंतु आरोहीला मात्र भारतात अजिबात आवडत नसे. तिच्या आईबाबांनी भारतात परत जाण्याचा विषय काढला की तिचे मात्र नेहमीप्रमाणे एकच म्हणणे असायचे....


mom, i dont like india , i cannot leave in india because i was not born in india , i was born and brought up here in America .... therefore my attitude , my thinking, my likings all are american. you know, india is so boring country ... that typical Indian traditions ...i cannot handle all that traditions, rituals and restrictions ....,


i hate that restrictions....😒😒😏


तिच्या आईबाबांना मात्र आरोहीचे असे बोलणे नेहमीप्रमाणे खटकायचे. ते सांगायचे बाळा आरोही , जगाच्या पाठीवर आपण कुठेही राहायला असलो तरी मनाने मात्र आपण भारतीयच आहोत, आपण आपल्या संस्कृतीचा, देशाचा आदर केलाच पाहिजे. मनाने आपण भारतीय असलोच पाहिजे परंतु आरोहीला मात्र या गोष्टींचा असर होत नसे.


आरोहीसाठी मात्र भारत ( तिच्यासाठी इंडिया ) तिला राहण्यासाठी योग्य देश नव्हता, कारण आपल्यालाकडे असणारे प्रेम , मोठ्यांची आदरयुक्त भीती, बंधनं हे सगळे म्हणजे आरोहीला मागासलेल्या पणाचे लक्षण वाटत असे.  


शेवटी आरोहीच्या वागण्याला कंटाळून तिच्या आई बाबांनी कायमचा भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. आपल्याला मुलीला भारतात राहूनच त्याचे महत्व समजेल असे त्यांना वाटत होते. आरोहीचा मात्र भारतात जाण्यासाठी पूर्ण विरोध होता, पण ह्या वेळेस मात्र तिच्या आईबाबांनी तिचे ऐकले नाही आणि तिला घेऊन ते कायमचे भारतात आले.

 

आरोहीच्या मनाविरुद्ध ती भारतात आली असल्यामुळे ती याबाबतीत सतत नाराज होती पण आई बाबांचे मन राखण्यासाठी ती ऍडजस्ट करत होती पण लग्नानंतर मात्र ती भारतात राहणार नाही असे तिने पक्के ठरवले होते. 


भारतात आल्यानंतर तिने कॉलेजला ऍडमिशन घेतली पण कॉलेज मध्ये देखील तिचे मन रमत नव्हते. त्यावेळी प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने तिची ओळख अभिनव सोबत झाली.  अभिनव एक अतिशय हुशार मुलगा होता.

 

अभिनव आणि आरोहीची चांगली मैत्री झाली परंतु भारत या विषयावर मात्र दोघांमध्ये वाद होत असत. अभिनवला आपल्या भारत देशाचा खुप अभिमान होता आणि आरोहीचे मात्र या विरुद्ध होते. अभिनवला आरोही खुप आवडायची पण तिचा भारताविषयीचा तिरस्कार त्याला माहित होता म्हणून तो त्याच्या भावना आरोहीला सांगू शकत नव्हता.


आरोहीला सोशल मीडियाचेही खुप वेड होते. ती सतत फेसबुक वर ऍक्टिव्ह असायची. त्यातच तिची ओळख रोनित सोबत झाली. रोनित अमेरिकेत राहणारा तरुण होता, त्याचे बाबा   भारतीय होते परंतु नोकरी निम्मिताने ते कायमचे अमेरिकेत स्थायिक झाले होते. रोनितची आई मात्र अमेरिकन होती. त्याचा जन्म देखील अमेरिकेत झालेला होता. रोनित कधीच भारतात आलेला नव्हता. अमेरिकेत राहणारा असल्यामुळे आरोहीला त्याच्या बाबतीत खुप अट्रॅक्शन वाटत होते.


हळूहळू आरोही आणि रोनितची मैत्री वाढीस लागली. फेसबुकच्या माध्यमातून आरोही आणि रोनितची वाढीस लागलेली मैत्री कधी प्रेमात बदलली आरोहीला समजलेच नाही. रोनित सोबत लग्न करून कायमचे अमेरिकेत सेटल होण्याची स्वप्न ती पाहून लागली होती. 


रोनितला फक्त फेसबुकच्या माध्यमातून ओळखत असून सुद्धा आरोहीने तिचे सगळे सीक्रेट , तिची सगळी खरी माहिती रोनितला सांगून टाकली होती.


रोनितला तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहित होत्या. श्रीमंत आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी आहे हे देखील त्याला समजले. मग एके दिवशी त्याने स्वतःच आरोहीला प्रपोज केले. रोनितने प्रपोज केलेले पाहून आरोहीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने तिच्या आई बाबांना देखील तिच्या आणि रोनितच्या नात्याबद्दल सांगितले.


फक्त फेसबुक वरच्या मैत्रीतुन लग्न करणे आरोहीच्या आई बाबांना मान्य नव्हते कारण रोनितची जबाबदारी घेणारे कोणीही मोठे माणूस त्याच्या घरात नव्हते. त्याचे वडील एका कार अपघातात पाच वर्षापूर्वी देवाघरी गेले होते. त्याच्या आईने दुसरा संसार थाटला होता त्यामुळे रोनितला मोठ्या माणसाचा आधार नव्हता.


आरोहीच्या भाषेत मात्र तो इंडिपेन्डन्ट होता. अमेरिकेत सगळेच इंडिपेंडंट असतात त्यात काही नवीन नाही असेच तिचे म्हणणे होते. ती तिच्या आईबाबांना सांगु लागली.. 


i am an adult. I will lead my life the way i want. its none of u r business mom..dad..


शेवटी एकुलत्या एक लेकीच्या हट्टापुढे ते नमले आणि त्यांनी रोनित सोबत आरोहीच्या लग्नाला होकार दिला. लग्नासाठी पहिल्यांदाच रोनित भारतात आला. आरोही खुप खुश होती परंतु घाई घाईत लग्न आटोपून रोनित तिला अमेरिकेत घेऊन आला. त्याला जाणून घेण्याची त्याने कोणालाच संधी दिली नाही .


अमेरिकेत आल्यावर मात्र आरोही सोबत त्याचे वागणे बदलले , माझ्या बिझिनेस मधे माझे नुकसान झालं आहे तु तुझ्या आई बाबांकडून पैसे उसने घे , आपण ते परत करू असे गोड बोलून तो नेहमीच आरोहीकडून पैसे उकळू लागला , पण नंतर नंतर मात्र आरोहीने तिच्या आईबाबांकडून पैसे मागणे बंद केले. त्यामुळे त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. मारहाण करण्यापर्यंत रोनितची मजल गेली. आरोही आई बाबांना देखील हे सगळे सांगू शकत नव्हती कारण रोनित सोबत लग्न करण्याचा हट्ट हा तिचाच होता.


एक दिवस मात्र रोनितने दारूच्या नशेत आरोहीला खुप मारहाण केली आणि तिला एका रूम मध्ये कोंडून ठेवले. तिचे पासपोर्ट आणि इतर महत्वाची कागदपत्रं सुदधा त्याने लपवून ठेवले त्यामुळे आरोहीला कुठेच जाता येत नव्हते. कशीबशी स्वतःचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे सापडवून तिने तिथून पळ काढला , परंतु विदेशात आरोही जाईल तरी कुठे ..?  


लपत छपत तिने उपाशी तापाशी स्टेशन वरच 1 रात्र काढली.


आता मात्र भुकेने ती व्याकुळ होऊन बेशुद्ध पडली. तिला शुद्ध आली तर ती कोणाच्या तरी घरी होती. हळूहळू तिने डोळे उघडले तर समोर तिला अभिनव दिसला. अभिनव त्याच्या कंपनीच्या कामानिमित्त अमेरिकेत आलेला होता.


अभिनवला तिथे पाहून ती खुप रडू लागली. रोनितला ओळखण्यात तिची स्वतःची खुप मोठी चुकी झाली ह्याची तिला जाणीव झाली. अभिनवने तिला स्वताःच्या घरात राहायला सांगून तो मित्राकडे जाऊन राहू लागला.

 

एका आठवड्यात आरोहीला घेऊन तो भारतात आला. आरोहीचे आईबाबा आरोहीला पाहून खुप खुश झाले. आरोहीला सुखरूप घरी परत आणल्याबद्दल त्यांनी अभिनवचे खुप आभार मानले. कायदेशीर लढाई लढून त्यांनी रोनितला शिक्षा मिळवून दिली.


आता मात्र आपल्या भावना अभिनवने आरोहीला सांगितल्या आणि आरोही तयार झाली. प्रेम , त्याग , आपली भारतीय संस्कृती या सगळ्यांचे महत्व तिला पटले होते.


वाचकहो , सगळेच विदेशात राहणारे भारतीय रोनितसारखे असतात असे दाखवण्याचा माझा उद्देश मुळीच नाही. विदेशात राहून पण आपल्या भारतीय परंपरा , आपली संस्कृती यांचा आदर करणारे हजारो भारतीय विदेशात आहेत.


माझ्या या कथेचा फक्त एकच उद्देश आहे की आपण जगाच्या पाठीवर कुठेही राहत असलो तरी आपल्या संस्कृतीचा , आपल्या परंपरांचा आदर आपण करायलाच हवा कारण शेवटी भारत हा आपला देश आहे , आपली जन्मभूमी , मातृभूमी आहे. आपल्या जन्मभूमीचे ऋण कधीही न फिटणारे आहे आणि हे बंधन कधीच न तुटणारे आहे.


ये जो देश है मेरा ...


स्वदेस है मेरा ...


ये जो बंधन है जो कभी तुट नही सकता .....


आरोही आणि अभिनवची ही कथा तुम्हाला कशी वाटली कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Pixels and Google 


✍©️ जया पाटील 




























Post a Comment

0 Comments