मला साथ देशील ना...भाग ५

 


#मला_साथ_देशील_ना...भाग_५

©️ जया पाटील 

भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_10.html

रागिणी आणि अनुराजच्या ऍडमिशन वेगवेगळ्या शहरात झाल्या.

त्यामुळे त्यांच्या भेटी कमी झाल्या.

कॉलेज , लेक्चर्स या सगळ्यांमुळे फोनवर बोलणं पण जास्त होत नसे.

रागिणी अनुराजला खूप मिस करत होती.

हळूहळू इंजिनीरिंगचे तिसरे वर्ष सुरु झाले.

तिच्या प्रत्येक कृतीत तिला अनुराज आठवत असे.

आई , रागिणी आणि धीरज असे तिघेच होते घरात.

आई एका स्मॉलस्केल कंपनीमध्ये कामाला होती.

बाबांच्या पॉलिसीचे काही पैसे मिळाले होते. 

त्यात फ्लॅटचे लोन क्लिअर केले होते.

त्यातले उरलेले पैसे बँकेत ठेवले होते.

आईचा पगार होता थोडा.

या सगळ्यात कसं बसं त्यांचं घर चालत होतं.

पण संकटं येतात तेव्हा एकदमच येतात.

देशमुख कुटुंबीयांची जणू परीक्षाच सुरु होती.

धीरजला वाईट मित्रांची संगत लागली.

तो जुगार खेळू लागला.

त्या मित्रांच्या संगतीने दारू देखील पिऊ लागला.

जुगार खेळायला पैसे कमी पडले की 

आईसोबत वाद करून तो पैसे नेत असे.

वडील गेल्यामुळे धीरजला कोणाचाच धाक उरला नव्हता.

आई आणि रागिणीचे तो ऐकत नव्हता.

या सगळ्या गोष्टींचा आईला आणि रागिणीला खूप त्रास होत होता.

घरात पैश्यांची कमी भासत होती.

आईला मदत करायची म्हणून रागिणी एका छोट्या फर्मवर पार्ट टाइम रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती.

त्यातून मिळणाऱ्या पैश्यातून तिच्या वह्या आणि पुस्तकांचा खर्च भागत होता.

परंतु यातली कुठलीच गोष्ट तिने अनुराजला सांगितलेली नव्हती.

तिला त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या वाटत.

पण पुन्हा मनात विचार येत.

"त्याने आजवर नेहमी माझी मदतच केली आहे.

पण याचा अर्थ असा नाही की..

नेहमीच मी माझ्या परिस्थितीचे रडगाणं गावं.

अनुराजला सारखा त्रास देणं बरं नाही.

त्याला देखील स्वतःचे प्रॉब्लेम आहे.

माझ्यासाठी तो एकटाच आधार असला.

तरीही त्याला स्वतःचे कुटुंब आहेत.

त्यामुळे हे सगळे त्याला नको सांगायला." 

हा सगळा विचार करून रागिणी गप्प बसत असे.

नेहमी प्रमाणे त्यादिवशी देखील अनुराजचा फोन आला.

" हाय , रागिणी..

कशी आहेस ..?

दोन तीन दिवस झाले. 

फोन करतोय तुला ..?

तुझा कॉलबॅक नाही.

सगळे ठीक आहे ना ...." अनुराज 

"हो रे ...

सध्या वेळ नसतो.

पार्ट टाइम जॉब सुरु केला आहे. 

त्यामुळे कॉलेज आणि जॉब दोघेही सांभाळत 

धावपळ होते जरा. " रागिणी

" का...? 

पैश्यांची अडचण आहे का..? 

तुला जॉब करावा लागतो आहे.

अग मला सांगायचं.

मी मदत केली असती. " अनुराज 

" तू किती दिवस मदत करणार.

कधीतरी मला स्वतःच्या पायावर उभे राहावेच लागणार आहे..

नेहमीच कोणाचा आधार घेण्याची सवय पडली 

तर कसं होईल माझे ...?"

रागिणीच्या अशा बोलण्याचे अनुराजला खूप वाईट वाटलं.

तरीही तिला वाईट वाटू नये म्हणून तो तिला काहीच बोलला नाही.

धीरजचे वागणं दिवसेंदिवस बिघडत चाललं होत. 

नशेत धूत होऊन घरी येणं.

दारू पिऊन पैश्यांसाठी धिंगाणा घालणं आता रोजचचं झालं होतं.

एक दिवस असाच दारू पिऊन धीरज सोसायटीत आला. 

त्याला पैसे हवे होते म्हणून त्याने आईसोबत खूप वाद केला.

सोसायटी मधील शेजारचे काका त्याला समजवण्यासाठी आले.

ते मध्ये पडले म्हणून धीरजने त्यांना शिवीगाळ केली.

रागिणी त्याला समजवायला गेली. 

त्याने रागिणीला सुद्धा दूर लोटले.

शेजाऱ्यांसोबत धीरजने हातापाई केली.

चिडलेल्या शेजाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट केली.

पोलिसांनी धीरजला अटक करुन तुरुंगात टाकले.

त्यावेळी मात्र रागिणी हतबल झाली.

तिने लगेच अनुराजला फोन करून सगळी हकीकत सांगितली.

अनुराज शिवाय दुसरा कोणी आधारच नव्हता तिला...

अनुराज त्याच दिवशी मुंबईला आला.

त्याने त्या शेजाऱ्यांची माफी मागितली.

तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे धीरजचे संपूर्ण आयुष्य खराब होईल.

त्याला नोकरी मिळण्यास देखील खूप अडचणी येतील.

रागिणी आणि तिच्या आईकडे पाहून तरी ही केस मागे घ्या.

अनुराजने समजूत काढल्यानंतर शेजाऱ्यांनी कंप्लेंट मागे केली.

पोलिसांनी देखील सज्जड दम देऊन धीरजची तुरूंगातून सुटका केली.

जाताना अनुराज रागिणीला म्हणाला ..

" इतकं परकं मानलं मला रागिणी ....

की इतकी संकटं होती तुझ्यावर ..

तरीही तू मला काहीच सांगितले नाहीस.

हीच किंमत केलीस आपल्या मैत्रीची ...? 

आता मात्र तू पुन्हा अशी वागलीस तर...

मी कायमचा दूर जाईन तुझ्यापासून..."

इतके बोलून तो तिथून निघून गेला.

दारूची नशा उतरल्यावर धीरजला स्वतःचीच लाज वाटू लागली. 

पण व्यसन ही गोष्टच अशी असते की ..

ती व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडायला भाग पाडते.

धीरजच्या बाबतीत देखील तेच झालं.

काही दिवस सुधारण्याचे नाटक केल्यावर पुन्हा त्याचे वागणे पूर्ववत झाले.

रागिणीने सगळ्या गोष्टी अनुराजला फोन करून सांगितल्या.

कारण आता अनुराजचा विश्वास तिला गमवायचा नव्हता.

आता मात्र अनुराजला धीरजच्या वागण्याचा खूप राग आला.

त्याने फोनकरून धीरजला समजावले.

तेवढयापुरते हो म्हणून धीरजचे वागणे जैसे थे होते.

काही दिवसांनी कॉलेजला सुट्टी मिळाली म्हणून अनुराज घरी आला.

दोन महिन्यात परीक्षा होती.

त्यामुळे अभ्यासासाठी प्रीपरेशन लिव्ह मिळाली होती.

नेहमीप्रमाणे तो रागिणीला भेटण्यासाठी घरी आला.

त्याला एका मित्राचा फोन आला.

त्याच क्षणी त्याला एक दुर्दैवी बातमी समजली.

त्यांच्याच एका मित्राने अर्थातच विनोदने आत्महत्या केली होती.

दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते.

आणि पैसे संपल्यावर सगळे त्याचेच मित्र त्याच्या विरोधात गेले होते.

हा सगळा ताण त्याला सहन झाला नाही म्हणून त्याने हे जीवनच संपवले होते.

रागिणी आणि अनुराजला ह्या बातमीने मोठा धक्का बसला.

त्याचवेळी धीरज दारूच्या नशेत घरी आला.

आता मात्र अनुराजचा संताप अनावर झाला.

त्याने नशेत धूत असलेल्या धीरजची कॉलर पकडली.

त्याला खेचून तो पुढे चालू लागला.

" अनुराज ..थांब ...

दादाला असा घेऊन कुठे जातोय ...

ऐक तरी माझे ...

सांग ना कुठे जातोय .." 

रागिणी घाबरत अनुराजच्या मागे जात होती.

पहिल्यांदाच रागिणीने अनुराजचा असा रौद्र अवतार पाहिला होता.

खेचत खेचत अनुराज त्याला बाहेर घेऊन जात होता. 

धीरजला देखील अनुराजच्या या वागण्याचे आश्चर्य वाटत होते.

पण तो अनुराजला प्रतिकार करू शकत नव्हता.

धीरज मध्ये ती हिम्मत तर नव्हतीच.

पण दारूमुळे त्याला शुद्धी देखील नव्हती.

धीरजला खेचत खेचत अनुराज विनोदच्या घरी आला.

तिथे आणून धीरजची कॉलर पकडून तो म्हणाला ...

"पहा धीरज ...

काय करतोय तू ...? 

पहा एकदा ....

किती दुर्दैवी अंत केला आहे विनोदने स्वतःचा ...

पहा एकदा ...

जवळून ..

त्याची उर बडवून रडणारी आई...,

त्याची हतबल बहीण ....

भान हरपलेले बाबा ....

दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये.

देव असे का वागतो ...? 

असे आपण म्हणतो...

पण देव कुठे आणतो अशी वेळ आपल्यावर ...

ती तर आपण स्वतःच आणतो स्वतःवर ...

आणि आयुष्य गमावून बसतो. "

" तुझे बाबा गेले ...

तर तू आधार होता रागिणी आणि आईचा ..

पण आधार होण्याच्या ऐवजी तू त्रास देऊ लागला त्यांना ....

जनाची नाही तर मनाची लाज असेल तर आता तरी सुधार ..." 

इतके बोलून अनुराज तिथून निघून गेला.

विनोदच्या घरच्यांचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

विनोदच्या कुटुंबीयांची अवस्था ,

त्यांची हतबलता पाहून,

धीरजला स्वतःच्या वागण्याचा पश्चताप झाला.

त्याने रात्रभर विचार केला.

दुसऱ्यादिवशी तो अनुराजला जाऊन भेटला.

" अनुराज , मला माफ कर.

मी आजपर्यंत जे वागलो त्याबद्दल मला खरंच माफ कर.

मला समजते आहे रे ...

ही नशा , 

ही दारू वाईट आहे.

मला मनापासून वाटतंय ..

या सगळ्यातून बाहेर पडावेसे.

पण माझा मेंदू नेहमीच मनावर हावी होतो.

आणि नकळत पुन्हा मी त्याच मार्गाकडे वळतो.

पण या वेळेस मला खरंच सुटायचं आहे या नशेतून ...

मला मदत कर.

मी संपूर्ण प्रयत्न करेन ...

अगदी मनापासून ..! "

" मलाही काळजी आहे रे रागिणीची आणि आईची ....

बाबा गेल्यावर मलाच आता बाबा व्हायचे आहे रागिणीचा ...

हे ही कळतंय मला ...

आता मात्र मी मागे हटणार नाही.

मी माझ्या या व्यसनावर मात करणार ...

नक्कीच ...

फक्त तुझी ,

रागिणी आणि आईची साथ हवी आहे मला ....

मला साथ देशील ना ....?

या लढाईत ...

करशील ना माझी मदत ...?" धीरज 

" धीरज , नक्कीच मदत करेल.

व्यसन हे एका राक्षसाप्रमाणे आहे.

हा राक्षस आपल्या शरीरसंपत्तीचा तर ह्रास करतोच.

पण आपली कुटुंबव्यवस्था देखील मोडकळीस आणतो.

त्यामुळे सगळ्या तरुणांनी दारू आणि इतरही व्यसनांपासून दूर रहायला हवं.

असो , झालं ते झालं.

देर आये पर दुरुस्त आये ।

तुला तुझी चूक उमगली.

याचाच मला जास्त आनंद आहे.

आपण एखाद्या समुपदेशकाचा सल्ला घेउया.

समुपदेशन तूला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.  

आपण उद्याच जाऊया ...

मी येईल तुझ्यासोबत.." 

अनुराज धीरजच्या पाठीवर हात थोपटून म्हणाला.

रागिणी दुरूनच दोघांचेही बोलणे ऐकत होती.

धीरजदादा हे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करतोय.

यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट काय असणार होती तिच्यासाठी...

अनुराज दुसऱ्यादिवशी धीरजसोबत कौन्सिलर कडे गेला.

अनुराज धीरजला संपूर्ण वेळ देत होता.

त्याच्यासोबत चांगल्या गोष्टी करत होता.

त्याला दारूची आठवण येऊ नये म्हणून त्याला वेगवेगळ्या छंदात गुंतवून ठेवत होता.

कॉऊन्सिलरचे योग्य मार्गदर्शन , 

आणि  

अनुराजची सोबत 

त्यामुळे धीरज या व्यसनातून अवघ्या दोन महिन्यात मुक्त झाला.

अनुराजने धीरजला नोकरी करण्यासाठी प्रवृत्त केले.

धीरजचे ग्रॅज्युएशन झाले होते.

त्याला लवकरच नोकरी मिळाली.

अनुराजने धीरजला डिस्टंन्स लर्निंगच्या माध्यमातून पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्यायला लावली.

रागिनी आणि तिच्या आईला खूप आनंद झाला.

रागिणीच्या आईने अनुराजचे खूप कौतुक केले.

त्या म्हणाल्या ...

" खरंच अनुराज ....

तू आमच्या आयुष्यात एक देवदूत म्हणून आला आहे. 

तू अगदी सहजच आमच्या अडचणी सोडवतो. 

जादूगार आहेस तू ...

तो जसा त्याच्या हातातल्या जादूने सगळे काही सुंदर करतो.

तसेच तू देखील तुझ्या जादूने आमची संकटे दूर पळवतो.

खूप उपकार केले आहेस तू आमच्यावर ..

थँक्यू बेटा ...

थँक्यू सो मच ... " 

" आहो काकू , 

थँक्यू काय त्यात ...

आणि उपकार कसले आले...?

तुम्ही मला मुलगा मानतात ना ..

मग आपल्या लोकांसाठी काही करणे म्हणजे उपकार नसतात कधीच ...

रागिणी माझी चांगली मैत्रीण आहे.

तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहात.

त्यामुळे उपकाराची भाषा पुन्हा करू नका." अनुराज 

रागिणीला अनुराजच्या स्वभावाचे , 

त्याच्या समजूतदार वागण्याचे खूप कौतुक वाटले.

अनुराज गेल्यावर रागिणी मनात फक्त त्याचाच विचार करत होती.

" किती समजूतदार आणि प्रेमळ आहे अनुराज ..

किती काळजी करतो माझी ..

धीरजदादाची आणि आईची सुद्धा ...

खरंच फक्त मित्र म्हणून करतो की ...

अजून काही आहे त्याच्या मनात ...

आणि माझ्याही मनात का सारखे त्याचेच विचार आहेत. 

खरंच मलाही आवडू लागला आहे का तो ...?

छे ..छे ...रागिणी काहीही काय विचार करतेस..?

नाही .

खरंच मला हवा आहे तो ..

आयुष्यभर फक्त माझा म्हणून ...

मी गुंतली आहे त्याच्यात..

ध्यानीमनी स्वप्नी फक्त तोच असतो माझ्या ...

तो नसेल तर आयुष्य अपूर्ण असेल माझे ...

पण हे सगळेच त्यालाही वाटत असेल का माझ्याबाबतीत ...

कसं कळेल मला...

मनाची घालमेल होतेय.

त्याला विचारू का..? 

पण त्याच्या मनात माझ्याबद्दल तसे काही नसेल तर ....

नाही ..नाही ..

नको विचारायला.

पण विचारलेच नाही तर हा गुंता सुटणारच नाही.

ते काही नाही.

माझ्या मनातल्या भावना अनुराजला सांगायला हव्या.

मग परिणाम काहीही असले तरी चालेल.

लवकरच बोलेन त्याच्यासोबत..." 

आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असे रागिणीने मनाशी ठरवलं.

.

.

.

.

रागिणी अनुराजला स्वतःच्या भावना सांगू शकेल का..? 

अनुराज रागिणीवरचे त्याचे प्रेम मान्य करेल का..? 

रागिणी आणि अनुराजचे नाते त्याचे बाबा मान्य करतील का..? 

वाचू पुढच्या भागात ...

.

.

.

.

क्रमश:

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

फोटो साभार - Google

✍©️ जया पाटील 

Post a Comment

0 Comments