मला साथ देशील ना भाग ६

 


मला साथ देशील ना...भाग ६

©️ जया पाटील 

अनुराजने आजवरच्या प्रत्येक संकटात रागिनीला साथ दिली होती.

पण मैत्रीच्या पुढे जाऊन तो कधीच तिच्यासोबतच बोलला नव्हता.

रागिनीला मात्र आता त्याच्याविषयी आपलेपणा वाटत होता.

तिच्या त्याच्याविषयीच्या भावना बदलल्या होत्या.

अनुराज सोबत कधी बोलणे झालं नाही तर तिच्या जीवाची घालमेल होत असे.

प्रिपरेशन लिव्ह संपून अनुराज पुण्याला परत गेला.

अनुराज आणि रागिनी दोघांच्याही परीक्षा सुरु झाल्या.

परीक्षेच्या या गडबडीत त्या दोघांचेही बोलणेच झाले नाही.

रागिनीला खूप अस्वस्थ वाटत होते.

आता दोघेही इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षात गेले होते. 

त्यामुळे सेमिनार , प्रोजेक्ट असा कामाचा लोड देखील वाढला होता दोघांवरही.

अभ्यासामुळे पुण्याहून अनुराजचे मुंबईला येणं पण कमी झालं होतं.

दोन दिवसात अनुराजचा फोन देखील नव्हता.

रागिनीने फोन केला तर उचलला नाही अनुराजने.

कॉलबॅक सुद्धा नाही.

रागिनीच्या जीवाची घालमेल वाढली.

जीव बैचेन झाला तिचा.

ती सतत फोन लावत होती.

रागिनीचे दहा मिस्ड कॉल झाले होते अनुराजच्या फोनवर ..

इतके मिस्डकॉल पाहून अनुराज चिंतेत पडला.

त्याने लगेच कॉलबॅक केला.

तिकडून रागिनी जोरात रडत होती.

रडवेल्या स्वरातच ती म्हणाली ...

" काय समजतोस अनुराज स्वतःला ...

एक फोन करता आला नाही तुला..

किती काळजीत होते मी ...

कितीतरी शंका येऊन गेल्या मनात ...

प्लीज ..

असे नको करत जाऊस.

जीव गेला असता माझा ..

तुझ्या काळजीने..." 

" अग शांत हो...रागिनी ..

माझे प्रोजेक्टचे काम सुरु आहे.

दोन दिवस मी प्रोजेक्टगाईड सोबत प्रॅक्टिकल वर्क करणार आहे...

हे मी सांगितलं होतं तुला आधीच..

म्हणून दोन दिवस कॉल केला नाही.

आणि वेडाबाई ...

इतके काय टेन्शन घ्यायचं त्यात ...

अश्याने आजारी पडशील ना ...

आणि सॉरी ...

मी तुझा कॉल पाहून तुला मेसेज तरी करायला हवा होता.

की मी बिझी आहे म्हणून ...

पण यापुढे असं होणार नाही.

मी कितीही गडबडीत असलो तरी तुला आधी कळवेल..

पक्कावाला प्रॉमिस ..

आता तरी रडणे बंद कर पाहू.

आणि एक छानशी स्माईल दे.

मला फोनवर दिसत नसली तरीही. " 

हसत हसत रागिनीने फोन ठेवला.

आणि 

तिचे विचारचक्र सुरु झाले.

खरंच माझे आयुष्य इंद्रधनुषी रंगानी रंगवून टाकणारा चित्रकार आहे अनुराज..

नाही जगू शकत मी त्याच्याशिवाय.

सहवासाने प्रेम वाढते असे म्हणतात.

अनुराजच्या सहवासानेच रागिनी प्रेमात पडली होती त्याच्या.

त्याची सोबत अशीच आयुष्यभर हवी होती तिला.

रागिनीच्या डोक्यातून अनुराजचे विचार थांबतच नव्हते.

खरं तर अकरावीच्या वर्षापासून माझ्या सोबत आहे अनुराज...

आणि 

आता इंजिनीरिंगचे शेवटचं वर्ष सुरु झालं.

गेल्या सहा वर्षात एकदाही त्याला माझ्या विषयी या भावना वाटल्या नाहीत.

ज्या आज मला त्याच्याविषयी वाटताय.

इतकी संयमी तर नसतात मुलं.

की अनुराजचे फक्त मैत्रीचे नातं आहे माझ्यासोबत.

पण तो ज्याप्रकारे वागतो त्यावरून तर तसे वाटत नाही.

पण माझे काय ..? 

मी पूर्णपणे गुंतलेय त्याच्यात..

सर्वस्व बनला आहे तो माझा.

ध्यानीमनी तोच असतो.

त्याच्याशिवाय माझे पानचं हालत नाही.

पण हे त्याला कधी कळेल..?

खरंच मला जसा तो हवा आहे आयुष्याचा जोडीदार म्हणून  ,

तशी मी देखील हवी आहे का त्याला ...? 

काहीच समजत नाहीये.

ह्या सगळ्या भावना त्याच्याकडून मला समजल्या तर किती छान होईल नाही..? 

खूप वाटत त्याच्यासोबत बोलावं.

अनुराज मित्र म्हणून आयुष्यात आलास तू माझ्या...

पण आजतर आयुष्यच बनून गेला आहेस तू माझ्या.

मला हवी आहे रे तुझी ही सोबत आयुष्यभर ...

तुलाही हवी आहे ना ...?  

या सगळ्या विचारांनी वेड लागेल मला.." 

रागिनी मनोमन म्हणाली.

"एखादी गोष्ट आपण जेव्हा समोरच्यासोबत बोलत नाही.

तोपर्यंत त्याच्याकडून कोणत्याही उत्तराची अपेक्षा करणे चुकीचं आहे.

जर मी माझ्या भावना सांगितल्या नाही तर

मला त्याच्या मनातील भावना समजणारच नाही.

अनुराजच्या आयुष्यात दुसरे कोणी असेल तर मी त्याच्या आयुष्यातून बाजूला होईल.

पण तसे नसेल तर काही न बोलून मला पश्चाताप करायचा नाही.

परीक्षा संपवून अनुराग मुंबईला परत आला की त्याच्यासोबत बोलायचं.  

असे रागिनीने मनाशी ठरवून टाकले.

आणि ती अनुराज मुंबईला येण्याची वाट पाहू लागली.

लेखी परीक्षा संपल्या. 

त्यानंतर प्रॅक्टिकल देखील आटोपले.

आता अनुराज घरी मुंबईला परत येणार.

यामुळे रागिनीला खूप आनंद झाला.

पणा तिलाही अनुराजची परीक्षा घ्यायची होती.

तिला ज्या फीलिंग्स त्याच्याविषयी आहेत.

त्याच त्यालाही आहेत का तिच्याविषयी ..

हे तिला पडताळून पाहायचे होते.

अनुराज परीक्षा संपवून मुंबईला आला.

तसे त्याने मेसेज करून रागिनीला कळवले देखील..

परंतु रागिनीने त्याला फारसा रिस्पॉन्स दिला नाही.

अनुराजचा फोन आला तरीही ..

"अनुराज ,  मी गडबडीत आहे. 

नंतर फोन करते. "

असे सांगून ती त्याला मुद्दामहून टाळत होती.

अनुराज एकदा दोनदा तिला भेटायला घरी देखील आला.

पणा तो येतोय असे समजले...

की रागिनी लगेच बाहेर निघून जात असे.

त्यामुळेच त्या दोघांचीही एकदाही भेट झाली.

तिची अशी टाळाटाळ अनुराजला सहन होत नव्हती.

त्याचे तिला फोन करणे , मेसेजेस करणे सुरूच होते. 

पण त्यावर रागिनीचा अपेक्षित असा रिप्लाय नव्हता.

अनुराज संभ्रमात पडला होता.

खरंतर रागिनीला वाईट वाटत होते.

अनुराजला असा त्रास देतांना ...

पण त्याशिवाय तिला अनुराजच्या मनातील भावना समजणार नव्हत्या.

अनुराजचं रागिनीसाठी असं कासावीस होण खूप काही सांगून जात होतं.

त्याची बैचैनीचं त्याच्या प्रेमाची कबुली होती.

पणा रागिनीला ते त्याच्या तोंडून ऐकायचं होतं.

" आग दोनो तरफ बराबर लगी थी ..! "

एक दिवस वैतागून अनुराजने रागिनीला मेसेज केला.

" रागिनी , किती दिवस पाहतोय.

तू मला टाळतेस.

काही प्रॉब्लेम आहे का ..? 

नक्की सांग.

माझ्यामुळे तुला काही त्रास झाला असेल.

तर आय एम सॉरी.

पण मला स्पष्ट सांग.

मी कायमचा दूर होईल तुझ्या आयुष्यातून.

माझ्यामुळे तुला कधीच कुठलाही त्रास व्हावा.

अशी माझी मुळीच इच्छा नाही. 

बाय.

आता मी स्वतःहून मेसेज करणार नाही. 

तुला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच मला मेसेज कर. " 

रागिनीने हा मेसेज वाचला.  

ती खूप दुःखी झाली.

कारण अनुराज तिच्या वागण्यामुळे दुखावला गेला होता.

याच गोष्टीचे तिला वाईट वाटत होते.

करायला गेलो काही..

आणि झालं वेगळेच....

अशीच गती रागिनीची ही झाली होती.

तिचा प्लॅन फेल झाला होता.

आता आणखीन काही नवीन नको ट्राय करायला.

नाहीतर सिच्युएशन आणखीन बिघडेल हे तिच्या लक्षात आले.

तिने अनुराजला प्रोपोज करायचं ठरवलं.

तिने आता कुठलाच पुढचा विचार करायचा नाही असे ठरवलं.

बस तीर चलाना है ..।

चाहे वो इस पर आये या उस पार जाये..।

आता जास्त विचार करण्यात अर्थ नाही.

म्हणून तिने अनुराजला मेसेज केला.

" मैत्रिणींसोबत रविवारी वसईच्या बीचवर जाणार आहे..

तू पण तिकडेच भेट मला...

माझ्या आयुष्यात कोणीतरी स्पेशल पर्सन आहे.

त्याला तुला भेटवायचे आहे.

इतके दिवस त्याच्याच आठवणीत रमत होती.

आता मात्र त्याला तुला भेटवायची वेळ आली आहे.

तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस...

त्यामुळे माझ्या आयुष्यातील सगळेच सीक्रेट तुला माहिती असावे.

म्हणून त्याची आणि तुझी भेट घालून द्यायची असे मनाशी ठरवलं.

ह्या सगळ्या गोष्टीचे प्लांनिंग करण्यात खूप वेळ गेला.

त्यालाही तुझ्या भेटीची कल्पना द्यावी लागली.

त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही बरेच दिवस...

आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट

त्यामुळे रविवारी भेटूया...

रागिनी ...." 

रागिनीचा मेसेज वाचला.

आणि अनुराजच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

पहिल्या नजरेत तो रागिनीच्या प्रेमात पडला होता.

त्याच रागिनीच्या आयुष्यात दुसरे कोणी आले आहे.

हा विचारच त्याला सहन होईना.

पण शेवटी रागिनीचा आनंद हाच माझा आनंद.

म्हणून त्याने पुढे चालायचं ठरवलं.

आपल्या भावना मनात ठेवून रागिनीला आनंदी कारायचं असे त्याने ठरवलं.

आणि 

तो रविवारची वाट पाहू लागला.

रागिनी देखील इकडे अनुराजला सरप्राईज देण्याच्या प्लांनिंग मध्ये गुंतली होती.

ठरल्याप्रमाणे तिने शनिवारी रात्री भेटीच्या जागेचे लोकेशन शेयर केले.

भेटीची वेळ देखील मेसेज केली.

ठरल्याप्रमाणे अनुराज ठरलेल्या जागेवर आला.

चहूकडे अथांग पसरलेल्या समुद्राशिवाय तिथे कोणीच नव्हते.

त्याची नजर चहूबाजूला रागिनीला शोधू लागली.

पणा तिचा तिथे पत्ताच नव्हता.

थोडं पुढं जाऊन पाहीलं तर एक सुंदर टेन्ट उभा होता. 

त्याला खूपच सुंदर सजवले होतं. 

रेडी मेड मिळणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड लायटिंगने त्याला रोशन केले होतं.

चहूकडे सुरु असलेली लायटिंग , 

चहूकडे पसरलेले रंगीबेरंगी फुगे , 

मंद आवाजात सुरु असलेले संगीत ,

टेबलवर सजवून ठेवलेला केक ..

त्यावर लिहिलेली अक्षरे ...

आय लव्ह यु... स्वीटहार्ट...

टेबलच्या बाजूला सजवून ठेवलेल्या दोन खुर्च्या.

टेन्टच्या एका कोपऱ्यात एक मोठा आरसा देखील लावलेला होता.

ज्यात संपूर्ण समुद्राचे प्रतिबिंब दिसत होते.

हे सगळे मनमोहक वातावरण पाहून .

अनुराज आश्यर्यचकित झाला.

त्याने रागिनीला फोन केला.

रागिनी तिथे आली.

रेड मरून कलरचा वनपीस ,

डाव्या हातात नाजुकसे ब्रेसलेट , 

केसांना मेस्सी बन मध्ये बांधून एक लट मोकळी सोडलेली,

डोळ्यामध्ये काजळ ,

ओठांवर हलकीशी मॅट पीच कलरची लिपस्टिक ,

कानात नाजूक डायमंड इअररिंग्स ,

पायात हील्स, 

खूप सुंदर दिसत होती रागिनी....

तिला पाहून नकळत अनुराज तोंडातल्या तोंडात पुटपुटला ...

Gorgeous ...! 

पण ..

तिची आवड कोणी दुसरी आहे.

असा विचार त्याच्या मनात डोकावला.

तिला पाहून अनुराजच्या डोळ्यात पाणी आले.

तरीही पाणावलेल्या डोळयांच्या कडा हलकेच पुसून तो रागिनीशी बोलू लागला.

त्याचे पाणावलेले डोळे रागिनीच्या नजरेतून सुटले नाही.

" हाय ...रागिनी ..

किती वेळ लावलास ग ...

तुझ्या सम-वन स्पेशलला भेटवण्यास ...

तुझा फ्रेंड होतो ना ..

मला तरी सांगायचं..

एनीवेज कुठे आहे तो ...

where is he ...? 

Lucky guy ...? " अनुराज

" सॉरी अनुराज ...

तुला भेटवण्यात जरा उशीर झाला.

पण मला तो आवडतो आहे की नाही.

हे समजून घेण्यातच माझा खूप वेळ वाया गेला.

माझा स्वतःचा निर्णय घेण्यास मला खूप वेळ लागला.

पण आता मात्र मला माझ्या सगळ्या भावना सांगायच्या आहेत त्याला ...

खूप प्रेम आहे रे माझे त्याच्यावर....

नाही जगू शकत मी त्याच्याशिवाय...

त्याला सोडून आयुष्य म्हणजे वाळवंट असेल माझ्यासाठी..

त्याच्या प्रत्येक सुखातली आणि दुखा:तली सोबत व्हायचे आहे मला...

त्याच्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य भरभरून जगायचं आहे मला..." रागिनी


" तुझा पार्टनर खरंच खूप स्पेशल आहे.

तुझ्या प्रत्येक हालचालीतून ,

कृतीतून व्यक्त होताना दिसतोय तो ..

आता जास्त वेट नाही करू शकत.

प्लीज , बोलव त्याला लवकर ..

I am eager to meet him ...

really excited ...! 

तुझ्या शब्दांतून ...

तुझ्या डोळ्यातून ..

त्याचेच प्रतिबिंब दिसतेय मला..!" अनुराज

"खरंच ...?


खरंच त्याचे प्रतिबिंब दिसतेय माझ्या डोळ्यात ...? " रागिनी 

" अग हो..खरंच ..." अनुराज 

" मग सांग पाहू ..


तो कोण आहे ते ..? " रागिनी 

" अग ते मी कसं सांगणार.

प्रतिबिंब दिसतेय म्हणजे तुझे त्याच्यावरचं प्रेम दिसतेय मला..

तुझ्या डोळ्यात..." 


" अच्छा ...

मग भेटवते मी तुला ..

तो पहा मागच्या साईडला उभा आहे तो.." रागिनी 

" अग , कुठे दिसतोय...?

इथे तर कोणीच नाही.

समोरच्या आरश्यात विशाल सागर , तू आणि मीच दिसतोय.." अनुराग 

" मग त्या आरश्याच्या प्रतिबिंबात जो रागिनी सोबत उभा आहे ....


तेच आहे माझं खरं प्रेम ....

त्या आरश्यात दिसणाऱ्या समुद्राच्या विशाल खोलीपेक्षा आणि लांबी पेक्षाही जास्त प्रेम आहे माझे त्याच्यावर ...

मघाशी माझ्या डोक्यात दिसणारे प्रतिबिंब म्हणजे तू ...

आणि माझे खरं प्रेम म्हणजेच तू ....

आयुष्यभर मला तुझीच सोबत हवी आहे.

आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मला तुझी साथ हवी आहे अनुराज..


मला आयुष्यभर तु फक्त माझा म्हणून हवा  आहेस ...

Be my happiness forever ...

will u marry me ..? 


माझ्याशी लग्न करशील ..? " 


असे म्हणून रागिनीने टेबलवरचे गुलाबाचे फुल उचलून अनुराजच्या समोर धरले.

.

.

काय असेल रागिनीच्या प्रश्नाला अनुराजचे उत्तर..?


अनुराजच्या बाबांना हे सगळे मान्य नाही. त्यामुळे अनुराज स्वतःच्या भावना व्यक्त करू शकला नाही.


पण आज रागिनीला स्वतःच अनुराजची सोबत अपेक्षित आहे.. 


अनुराज रागिनीला होकार देईल की नकार ..? 


वाचू पुढच्या भागात 

.

.

.

.


क्रमश:


प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞


सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - Google & Instagram 



✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments