श्रीरंग भाग ३

 

 

श्रीरंग भाग ३

लेखिका © मनस्वी ✍️

भाग दोन  वाचा खाली दिलेल्या लिंकवर 

मी वळून येऊन बसले पलंगावर आणि पडद्याची हालचाल पुन्हा झाली...

तिथून एक मुलगी डोकावत होती.. मी तिला जवळ ये अशी खूण केली.. तशी ती पुढे आली... जेमतेम 7 वर्षांची असेल.. मग तिला नांव विचारलं... तर ती म्हणाली मीरा...

आणि तुझं? ओठांचा चंबू करून म्हणाली...

मी राधा... दोघी एकमेकींना न्याहाळत होतो...

थोडी भीड चेपली आणि ती पुढे आली... मग मला खेटून बसली.. मग शाळा, मैत्रिणी, खेळणी ह्यावर गप्पा इतक्या रंगल्या की बाईसाहेब आत्ता गट्टी बट्टी सखी झाल्या...

यात अर्धा एक तास गेला...

साने काकू तिला शोधत खोलीत आल्या... आणि बघतात तर काय हे पिल्लू माझ्या मांडीवर खांद्यावर मान ठेवून निवांत झोपलेलं अजी मी अंगाई गुणगुणत होते...

अगंबाई.. झोपली पण... sorry हं.. उगाच तुला त्रास..

नाही हो... त्रास काय... गोड़ आहे हे बाळ .

माझं त्या पिल्लू बरोबरच मेतकूट पाहून त्या सुखावल्या... स्वतःशीच काहीतरी बोलत निघून गेल्या...

मीरा ला बाजूला झोपवून मी अत्तु ला बघायला खोली बाहेर आले नीं समोर आत्तू आली...

काय मग? हे घर इतकं आवडलंय की आजचं अक्षता पाडून घ्यायच्या आहेत डोक्यावर?

तू ही अशी चकरा येऊन पड नीं तिकडे तुझा बाप तांडव करत असेल...

आता निघूया का??

काय तरी हे बोलणं? मी काय मुद्दाम पडले का चक्कर येऊन??

आत्तू स्पष्ट च सांगते मला तो आवडतो आणि म्हणालाय तो.. त्याच्या आई बाबांना पाठवेल मागणी घालायला...

वा गं वा .... आणि मी बरी हो म्हणेनं... ही व्हीलन झाली पुन्हा..

मग मी पळून जाईन... मी पण चिडले... आणि नंतर कळलं काय बचाबचा माती खाल्लीये ते... आणि हे कळून जीभ चावली .. एकीकडे सॉरी सॉरी म्हणत मी आत्तू च्या मागे आणि ती तरातरा पुढे....

चला...घरी... मग बोलते मी... ती चिडलीच होती...

मला तरी मेलं काय सुचलं?? हा बोलून जातो नीं मग डोक्यात फिरतात विचार भवरे...

जाऊदे आज घरी राडा होणारं... करा मानसिक तयारी

आम्ही आज्जी आणि मोठी माणसं यांचा रीतसर निरोप घेतला आणि सानेंनी पोचवायला गाडी ड्राइव्हर दिला...

घरी आलो... तर बाबा काळजीत होते...

बाळा काय झालं? अशी कशी चक्कर येऊन पडलीस? जेवली नव्हतीस का सकाळपासून??

मला तर काहीच आठवत नव्हतं...

बाबा सॉरी... तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळे ..

नाही गं... काळजी वाटली... बाबा माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले...

मग मी आणि आत्तू आवरून आलों.. आणि फोन वाजला ..

बाबा... आधी हॅलो म्हणल्यावर ...

एक्दम किंचाळले .. काय?

अं हो हो .. नक्की भेटूया ..

हो हो.. का नाही...?

हो ना भाग्यच आहे आमचं..

आणि हसत हसत फोन ठेवला...

माझ्या कडें पाहत म्हणाले....

मागणी घातलीये तुला...

काय??.?

कुणी?? का???

मी ठरवलं आहे... यंदाच कर्तव्य काढूयात आणि हेच स्थळ फायनल

बाबा... ऐका ना...

मला बोलायचंय...

पण आई बाबा आणि आत्तू इतकी तार स्वरात बडबड करत होते की माझा आवाज विरूनच गेला...

मी घाईन त्याला मेसेज केला...

पण मेसेज पोचला नाही,

कॉल करून पाहिला फोन बंद...

अरे देवा !

आता काय करू.? कसा कॉन्टॅक्ट करू याला...

मग मैत्रिणीला कॉल केला... तिला सांगितलं... तिने ही खटपट केली... पण हा काही संपर्कात येईना...

कशीबशी जेवले आणि झोपायला गेले...

साधारण 12 नंतर त्याला मेसेज पोचला..

इकडे मी जागीच...

त्याचा रिप्लाय... काळजी करू नको उद्या बोलू .

मी पुन्हा गॅस वर ..

आणि मग कधीतरी रात्री निजले..

सकाळी उशीरा जाग आली...

मला गॅस वर बसवून हा नक्की कुठं आहे याचा शोध घ्यायचाच या विचारानं सगळं आवरून बाहेर पडणार तोच हा दारात !! साधारण दातखीळ वगैरे बसली असती मला... आता सकाळी सकाळी थेट घरी???

बापरे ! मेले मी ... पूज्य पिताश्री मातोश्री आणि आत्याश्री

मिळून मला कुटतायत असा भास झाला क्षणभर !.

मला तर सुचेचना...

हा आला आणि माझ्याकडे न पाहता घरात गेला...

कानात आणि डोक्यात वारा शिरल्यासारखा...

मी कसली अपेक्षेने बघत होते.

आत गेला आणि बाबा समोरच पेपर वाचतं बसले होते...

त्यांना काही कळायच्या आत त्यांना वाकून नमस्कार केला ..

ते ही दचकून बघायला लागले..

मग म्हणाला...

नमस्कार... मी श्रीरंग..

मी एक वकील आहे, स्वतःचं घर नसलं तरी वडिलोपार्जित वाडा, एकत्र कुटुंब आणि एक पेढी आहे आमची.. मोठा भाऊ आणि वडील पेढी सांभाळतात मी ही मदत करतो...

एकूण काय... खाऊन पिऊन सुखी आहोत...

बरं मग ... बाबांच्या तोंडून निघालं..

तर माझं हे काम आहे तुमच्याकडे

की मला तुमच्या या मुलीशी लग्न करायचंय..

मी तिला मागणी घालायला आलोय..

आता हिरो साकी आमचं घर झालं...

आई कुणीतरी आलय हे पहायला स्वैपाकघरातून बाहेर आली होती.. हातात पिठाचा वाडगा होता... हो होता..

कारण हे ऐकून तो सटकला आणि पिठाची रांगोळी घातली गेली... भावी जावयासाठी ..

बाबा डोळे विस्फारून बघत होते... की हे आत्ता नक्की काय झालं??

आत्तू नुकतीच देवपूजा आटपून बाहेर येतं होती...

आणि हे ऐकून ती ही ब्रेक मारल्यासारखी थांबली...

आणि मी ..

मला नक्की हे ऐकून काय वाटलं असेल...

विचारूच नका...

एकीकडे होऊ घातलेल्या नवऱ्याचा शाहरुख दिसला आणि दुसरीकडे बाबांचा 'पोतराज ' झालाय असा सीन दिसला ..

एकूण काय... तर हे प्रकरण... डेंजर वाटेवर आलं...

आधी त्याला आणि मग मला आपादमस्तक न्याहाळलं...

ढमे... आत ये...

काय हे... माझ्या अहो समोर ढमे काय म्हणताय बाबा?? असं चिडून विचारावं असं वाटलं.. पण सध्या जीव वाचवा मोहिम महत्वाची होती ..

मी गुमान आत आले...

त्याच्या बाजूला उभी राहू की समोर हे न कळून गोंधळले..

काय म्हणतायत हे??

तु ओळखतेस ह्यांना??

मी त्याच्याकडे पाहिलं..

तो मात्र शांत... आणि नेमकं याच वेळी त्यानं माझ्या डोळ्यात पाहिलं..

आई गं... काळजात कळ उठते तो असा पहायला लागला की.


पण ही वेळ रोमान्स साठी नाही...

मी मान खाली घालून उभी राहिले...

ढमे..

मी काय विचारतोय?? बाबांचा अमरीश पूरी झालाय.. असा फील आला..

मी गप्प..

अगं बोल काहीतरी... आई डायरेक्ट फरीदा ऐवजी ललिता पवार बेअरिंग मधे...

मग मी मान वर करून दोघांकडे पाहत म्हणाले...

हो ओळखते... आणि आवडतात मला हे... आणि हे मी आत्तूला सांगितलंय..


आत्तू आता चिडेल असं वाटलं पण ती शांत होती...

तिने पुढे येत सांगितलं... हो.. म्हणाली ही मला, पण मुलाची माहिती काढल्याशिवाय मी तुम्हाला काहीही सांगायचं नाही असं ठरवलं होत... आता हे थेट इथे असे येतील हे मला काय माहित...?

आत्यानी बॉल पुन्हा माझ्याच कोर्टात टाकला...

एवढ्यात बाबांचा फोन वाजला...

पलीकडून पुन्हा एक आवाज...

आज आमच्या लेकाचा वाढदिवस आहे तेव्हा संध्याकाळी तुम्ही सगळे आमच्या घरी या...

बाबा.... हो हो म्हणत फोन बंद करून आमच्या कडें पाहू लागले..

हिला कालच मागणी घातलीये एकांनी... त्यांचाच फोन होता..

आज मुलाला सांगणार आहेत त्यांनी हिला पसंत केलीये ते... रीतसर कार्यक्रम आज होईल..

आणि मग पुढची बोलणी...

आता हे असं अचानक तुम्ही आलात....

खरंच भलताच पेच होता...

सगळेच गप्प...

मग पुन्हा शांतता...

आम्ही एकमेकांना चोरून पाहत होतो...

मी ही तो आवडतो हे ऐकल्यापासून स्वारी जास्तच खुष होती...

मग बाबा म्हणाले.... तुमच्या घरच्यांना माहीतीये?

त्यांचं काय म्हणणं आहे?

मी आज बोलणार त्यांच्याशी ..

ठीक आहे...

तुम्ही तुमच्या घरी बोला मग पाहूया पुढे काय होतंय...

पण मला एक वचन हवयं...

तोपर्यंत तुम्ही हिचं परस्पर कुठेही लग्न जुळवू नका..

बापरे केवढं डेरिंग केलं ह्यानी... असं आपलं मी मनातच म्हणाले...

बाबा ही त्याच्याकडे रोखून बघत म्हणाले... ठीक आहे देतो शब्द...

पण जर तुमच्या घरच्यांचा नकार असेल तर?

तर.... 2 मिनिटं पॉझ... मग माझ्याकडे बघत म्हणाला...

तर मी तुमचे आशीर्वाद घेऊन आमचा संसार थाटीन.... पण हिच्याशिवाय दुसरी कुणीच माझी बायको होणारं नाही...

आणि आमचा नकार असेल तर??

बापरे.... आता उत्तर मी द्यायच की काय?? या विचारानं मी घाबरले...

तर....

मग पुन्हा माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला...

तुमचा होकार मिळेपर्यंत वाट पाहीन... पण मग हिचं दुसरीकडे लग्न होणारं नाही याची ही काळजी घेईन..

बाई गं.. डायरेक्ट नडला हा माझ्या बापूसला

आता काय होणारं...

मुरलीधरा ये रे बाबा धावून..

मी मनातल्या मनात जप सुरु केला ..

वातावरण फारच तंग झालं होतं...

मग आई मधे पडली...

बरं... बोलू आपण...बसा तुम्ही...

ढमे.... आत चल... चहा घेऊन जा....

आणि मी चोरून त्याला बघत आत आले.

बाबा त्याला बाकीचं विचारू लागले...

आणि मी चहा करताना आई आणि अत्तु माझ्याकडेच पाहत होत्या...

चहा बनवला आणि बाहेर नेऊन दिला.. फराळाची बशी ही ठेवली .

बाबांनी चहा त्याच्या हातात दिला.... त्यानं एक सिप घेतला आणि माझ्याकडे बघत गालातल्या गालात हसत राहिला...

मग बाबांनी चहा घेतला... आणि चहा चा सिप घेऊन त्याच्याकडे पाहिलं...

त्यानं नजरेनं खुणावलं काहीतरी..

आणि मग म्हणाला..

उत्तम झालाय... धन्यवाद...

मी चटकन आत पळाले लाजून...

तसा आत्तूनी पाठीत धपाटा घातला ...

अगं लक्ष कुठाय? चहात साखर कुठाय?? किती कडू लागतोय...

बापरे.... म्हणजे त्यानं तसाच चहा प्यायला??

आई गं. बिच्चारा....

काय हा धांदरटपणा...काय म्हणत असेल तो...?

तो निघाला... मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणाला...लवकरचं येतो...

आणि निघून गेला...

बाबा आत आले..माझ्या डोक्यावर हात ठेवला काहीच बोलले नाहीत...

पुन्हा फोन वाजला..... आज संध्याकाळी नक्की या... मुलगी दाखवायला..

जसं जसा घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला तसं तशी टिक टिक माझ्याही डोक्यात वाजू लागली ..

आता काय...?

दुपारचे दोन वाजले .. आणि त्याचा मेसेज आला..

तो :काय ढमे? कशी आहेस

मी : ढमे..तु मला अज्जीबात ढमे म्हणायचं नाहीयेस

तो :बरं बाई...

मी : ई बाई काय

तो: बरं ऐक... आता आम्ही सगळे एकत्र जमतोय... आई बाबा माई.. wish me goodluck... सांगतोय त्यांना आज आपल्याबद्दल

मी :बापरे.. मला टेन्शन येतंय... काय म्हणतील?

तो :बघूया... बरं तुझा एखादा फोटो पाठव... तसें मी काढलेत तुझ्या नकळत पण ते जरा...u know..

मी : तु कधी काढलेस? बरं पाठवते... साडी नेसलेलाच पाठवते

तो :हो... त्यात तु खूपच गोड दिसतेस

मी :हो का??

तो : येस्स्स्सस... बायको... लव यू

मी : इश्श्य जा आता... नंतर कॉल कर मी इकडे गॅस वर आहे

तो : नको... गॅस फुटेल तु बॉम्ब आहेस

मी : चूप...

तो :चिडलीस की अजून गोड दिसते... माझी ढमी..

मी : bye..

तो :.. bye..

कसं असतं ना... आपलं हे वेडू आपल्याला काहीही म्हणाला तरी गोडच वाटतं... आणि आज तर एक खिंड लढवून झाली होती आता गड सर केला की झालं..

पण या स्वप्नभोपळ्याला चिरायला आत्तूी ी

ढमे... आज संध्याकाळी ही साडी नेस... ब्लाउज बघून ठेव...

अगं पण ही तुझी आहे ना..?

हो..

हे मला पहायला आले होते... तेव्हा नेसले होते...

मग आज ही मी का नेसू?

म्हणजे ते तुला ही पसंत करतील.. इति आत्तू

अगं पण... मला केलीये की पसंत.. आधीच.. श्रीरंग नी...

हो का... बरं मग त्याचं पूर्ण नांव सांग... पत्ता सांग..

अय्यो... मला पूर्ण नांव माहित नाही... सांगितलं होत का त्यानी ...छे पण मी अशी काही धप्पकन प्रेमात पडले की नांव विचारलंच नाही...

पत्ता तरी कुठून सांगू???

हे सगळं मनातच बरं का..

अत्तु नावाचं काय एवढं...

आणि माझं नवं नांव पत्ता कळेलचं... त्याच्या घरचे येतील तेव्हा..

मी आपली लंगडी बाजू सावरायचा प्रयत्न केला...

पण मला धोबी पछाड दिलाच तिने...

हे बघ... आंतर जातीय, धर्मीय प्रांतीय.. चालणार नाही...

मेले... मला उगाचच मी बॉम्बे वाली मनीषा वाटून गेले आणि हा माझा अरविंद ...कसला चिकणा दिसलाय ना तो..

ढमे...

कुठे गेलात?? या वातावरणात या... जरा स्वप्न ही झेपतील तेवढीच बघा... आत्तू नी reality चा चिमटा काढला..

बाबा आई काय विचार करतील पण??

खरंच याच नांव पत्ता काहीही विचारलं नाही... असे कसे प्रेमात पडलों मी आता फुल्ल टेन्शन मधे...

तेवढ्यात बाबा आले...

ढमा बाई... कसला विचार करताय??

बाबा... माझं चुकल...सॉरी... मी सांगायला हवं होत...

पण हे सगळं इतकं पटकन घडलं... खरंच सॉरी...

बरं असू दे.... तुला काय काय माहिती आहे त्याच्याबद्दल?

अं.... काहीच नाही...

काय?? अगं म्हणजे तो कुठं राहतो ते तरी??

मी प्रत्यक्ष जाऊन बघतो...

बाबा... आणि मला रडायलाच आलं...

नाही माहिती... मी गळा च काढला ..

बरं बरं शांत हो...

मी बघतो.... काय उद्योग करून ठेवशील देवच जाणे...बरं हा भेटला कुठे??

मुरलीधराच्या देवळात...

नशीब.. बरं त्याचा एखादा फोटो पाठव मला... मी चौकशी करतो...

पण बाळा असा पटकन विश्वास ठेवू नये.... हा वागायला बोलायला ठीक वाटला..

पण फसवणूक ही होऊ शकते... इतकं उतावळं होऊ नये...

हो बाबा... मी डोळे पुसतं पुसतं म्हणाले. मी त्यांना फोटो पाठवला...

तेवढ्यात त्याचा मेसेज..

बोललो घरी...

मग??

सगळे फोटो बघून एकदम गप्प आहेत...आई बाबा माई कुणीच काही बोलत नाहीये.

ओह्ह... बरं असू दे... जरा वेळ दे त्यांना...

बरं एक मला तुझं पूर्ण नांव पत्ता दे...

आणि पत्रिका ही पाठव...

ह्म्म्म.... पाठवतो....

मग त्यानं माहिती पाठवली...

श्रीरंग सुधाकर साने

स्वर्णीम पेढी

रत्नमाला बंगला विठ्ठल मंदिरा जवळ

बाजारपेठ रस्ता..

जन्म तारीख... 26ऑक्टोबर... मग पत्रिका आणि त्याचा ऑफिस पत्ता...

मी तारीख परत वाचली... कायं?? आज 26 चं आहे... आणि आपण bday विसरलो

मी परत कॉल केला....यानी कट केला

मी लगेच.bday मेसेज टाकला...

पण हा ऑफलाईन गेला...

अरे देवा आता काय करू...

बरं मैत्रिणीला तरी कुठल्या तोंडानी हा पराक्रम सांगू...?

थोडा वेळ तसाच गेला.... बाबा ही बाहेर जाऊन आले...

मी अधीरपणे विचारलं... काय मिळाली माहिती??

बोलूयात नंतर... आणि ते फ्रेश व्हायला निघून गेले...

मी पुन्हा विचारात पडले... नांव तरी वाचून हायस वाटलं...

निदान तेवढ्यापुरत... संध्याकाळ झाली आणि आई आत्तू आवरायला लागल्या...

आई तर सकाळपासून बोलतच नव्हती...

आता ही आली..

दागिने साडी दिली आणि गेली तशीच...खूप वाईट वाटत होत...

मुरलीधराची सुंदर पंचधातू ची मूर्ती आहे माझ्याघरी... मी जाऊन हात जोडले..

बाबा रे... तूच वाचव आता...

नमस्कार करून आवरून निघाली आमची वरात त्या मुलाला बघायला...

टिक टिक... धक धक सगळंच एक्दम डॉल्बी आवाजात वाजू लागलं...

आम्ही पुन्हा त्या कालच्या वाड्यात आलो...

दारातच ती सगळी मंडळी उभी ...

नक्की नवरा मुलगा कोण हेच कळत नव्हतं... आम्ही बायका आत गेलो..

मीरा जवळ आली... तिच्याशी गप्पा मारल्या पण टेन्शन वाढत होत...

आणि मला बाहेर बोलावलंय असा निरोप आला मी मान खाली घालून गेले...

मला त्याला बघायचंच नव्हतं...

मला त्याच्या समोर बसवलं.... काही जुजबी प्रश्न विचारले त्या बाकीच्या लोकांनी... मग सगळे उठून आतल्या खोलीत गेले त्या बाहेरच्या झोपाळ्यावर तो... आणि समोर मी...

किती ते अवघडलेपण... नको वाटत होता तो एकांत..

आणि तो समोर आला.. मी ही उठून उभी राहिले... आणि क्षणभर वाटलं की माझा श्री आहे समोर...

मी घाबरले... बापरे मी इतकी प्रेमात पडलिये की त्याचाच भास व्हावा..

इतक्यात त्यानं माझा हात धरला...

बापरे... मी दचकून त्याच्या कडें पाहिलं आणि हात झटकला..

आणि त्यानी पुन्हा मनगट धरलं...

मी त्याला पाहून शॉक मधे..

गरगरलं..

मेलं ह्यांच्या घरात काय चकरा येतात मला..

मला श्री चे भास होतायत असा जबरी फील आला आणि त्यानं त्याच्या मिठीत सावरलं...

इतक्यात माझ्या कानाशी आवाज आला.... बायको... अशी डायरेक्ट मिठीत

बायको???

आता आवाजाचे ही भास???

तरी मी स्वतः ला सावरत बाजूला झाले....

आणि पुन्हा धाडस करून पाहिलं... इतक्यात मागून सगळे हसत हसत बाहेर आले...

आणि आमच्या भोवती जमले.... त्यानं अगदी गुडघ्यावर बसून अंगठी पुढे करत मला मागणी घातली... आणि मी....

मी ही हो म्हणाले....

कशी नाही म्हणणार होते....?

हिऱ्याची लखलखती अंगठी....घेऊन तो राजकुमार समोर होता

काय रागावलात माझ्यावर... का अंगठीला भुलले असं वाटलं ना....

मुळीच नाही....

माझा श्रीरंग समोर होता..... त्याच्या पुढे मला काहीच दिसत नव्हतं

कसं वाटलं सरप्राईज?? आत्तू पुढे आली... आणि म्हणाली....

म्हणजे तो मुलगा तूच होतास जों आम्ही बघायला आलो

काय हा जुगाड ??

काय राधाबाई आवडला का मी पसंत केलेला मुलगा??

मी ही हसून तिच्या गळ्यात पडले आणि पुन्हा चोरून त्याला पाहू लागले..

अजून काय हवं होत??

आम्ही दोघे ही सातवे आसमान पर

मग जेवणं झाली...केक कापला... आणि तो म्हणाला ..आता मी सोडायला जातो... म्हणजे गाडीने आई आत्तू बाबा गेले आणि मी हा आणि लैला

तीचं जी बंद पडली म्हणून ही story घडली

घराच्या अलीकडे एक आडोसा होता हा तिथेच थांबला...

मी त्याला bday wish केलं.... आणि तो म्हणाला...

मग माझं bday गिफ्ट कुठाय??

काय देऊ मी तुला??

त्यानं बायको...

म्हणत जवळ घेतलं आणि डोळे मिटून म्हणाला.... ह्म्म्म दे...

मी ही इश्श्य म्हणत लाजले..

दे ना... डोळे उघडत म्हणाला...

मी त्याच्या कपाळावर kis करायला टाचा उंच केल्या आणि त्यानं अजून मान उंच केलेली अचानक खाली केली आणि पुन्हा माझे अधर याच्या अधरांवर .

मग पुढचे मंतरलेले क्षण कसे गेले ते कळलेच नाही..

आम्ही एकमेकांच्या मिठीत.... श्वासांनी एकच लय पकडली, आणि पुन्हा एकदा त्याच्या भरदार छातीवर डोकं ठेवत मी लाजले...

मला गाभाऱ्यातला श्रीरंग प्रत्यक्ष आयुष्यात मिळाला....

मी त्याची अन् तो माझा झाला.

© मनस्वी ✍️

आवड्या का सौ. राधा श्रीरंग साने ची गोष्ट.

नक्की सांगा......



"श्रीरंग" ही प्रेमकथा लेखिका मानसी अर्जुनवाडकर (मनस्वी) यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.

धन्यवाद..

✍️ Partners

 Velvet Kavisha

 

Post a Comment

0 Comments