श्रीरंग भाग २





श्रीरंग भाग २


लेखिका © मनस्वी ✍️


Love story, romantic story

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/09/blog-post_24.html


तो निघून गेला असं वाटून मी मैत्रिणीकडें पाहिलं आणि जरा रागावूनच म्हणाले... अर्थात रागं मनातून लटका चं होता.. की...


आता जर हा पुन्हा समोर आला ना.. तर?


तर काय करायचा प्लॅन आहे मॅडमजी???


ती हीं चेष्टेत म्हणाली..


काहीं नाहीं... तू पण सामील हॊ त्याला..


नाहीं गं . पण खरचं कसलं गोड़ प्रेम आहे त्याचं... तुझ्यावर ..


गप गं... काहीही.. आणि माझ्या घरी कळलं तर?


मी घाबरूनच गेले... चला.. नको ती स्वप्न बघू नकोस ..


खरंतर मला हीं आवडतं होतं सगळं... पण आता मनं पुन्हा आलं ताळ्यावर...


घरी येऊन पोचले तोच आत्तूचा आवाज...


ढमे जरा... गच्चीवर हे कपडे नेऊन वाळत घाल...


चांगलं ऊन पडलय..


जुनी सोसायटी होती.. जोडून इमारती आणि गच्च्या पण


मी हीं तें सगळे कपडे घेऊन वर आले... मी गाणी लावली होती मोबाईल वर...


एक लडकी को देखा तो ऐसा लगा....


आणि उगाचच तिच्या सारखं (मनीषा कोईराला हॊ ) त्या लांब दोऱ्यांवर माझ्या ओढण्या वाळत घालताना style मधे घावत होते..


कपडे तर झाले वाळत घालून... म्हणत खाली जायला वळले तर हा समोर...


छे... भास व्हायला लागलेत काहीही काय होतंय म्हणत माझा मलाच चिमटा काढणार.. इतक्यात त्यानं माझा हात धरला आणि टाकीच्या बाजूला ओढलं...


नेमकं तिसरं कुणीतरी आता जिन्यात असल्याची चाहूल लागली..


आता आली का पंचाईत...


टाकीच्या मागे त्या एवढ्याशा जागेत भिंतीला टेकलेली मी अन 4इंचअंतरावर तो...


आता या परिस्थितीतं माझा मोबाईल 'थरथरला '


त्यानं झटकन हातातून घेतला आणि बंद करून टाकला..


त्याचा हीं ऑफ... शांतता, पाण्याची टाकी मागे असल्यामुळे पाठीला गार गार लागत होतं...


आणि इतक्यात त्यानं मला थोडं जवळ ओढलं.. आता ह्या परिस्थितीतं ह्याला रोमान्स कसा सुचतोय.. ह्याचाच मला राग आला.. मी डोळे मोट्ठे केले... नजरेनंच काय? विचारलं..


तर त्यानं त्याचा हात माझ्यापाठी मागे पालथा भिंतीला लावला..


आणि कानाशी येऊन विचारलं...


आता नाहीं ना गार लागतं आहे?


कसलं गं गोड तें


म्हणजे तसला विचार नव्हता त्याच्या डोक्यात..


आता गच्ची तला आवाज थांबला.. कुणी तरी जिना उतरून जातंय असं कळल.. आणि तो त्या एवढ्याशा जागेतून बाहेर पडला .. अंदाज घेत मला बाहेर काढल आणि कान पकडून sorry म्हणाला..


Sorry.. तुला असं अडचणीत आणायचा विचार नव्हता...


आणि जायला वळला..


जेमतेम दोन पावलं पुढे गेला आणि मीच त्याचा हात धरला..


त्यानं चमकून मागे पाहिलं...


अन त्या भर माध्यान्ही मी 'माझा चाँद' मागितला..


माझा चेहरा ओंजळीत धरत तो जवळ आला ..


आणि...


आणि....


कपाळावर kiss करून निघून गेला...


वेडू... कुठला...


आणि ह्या घटनेची साक्षीदार होती.... माझी अत्तु... कारण ती पलीकडच्या गच्चीतून आम्हालाच बघत होती


मेले मी...


मी तर आत्तूला समोर बघून हबकले... जागीच थिजले..


हा तर निघून गेला आणि आता मी एकटीच... कशी सामोरी जाऊ..


मी कपड्यांची रिकामी बादली घेऊन खाली पळाले..


पुस्तक काढून वाचतं बसले... निदान भासवायला की मी अभ्यास करतीये... पण बराच वेळ झाला तरी अत्तु येईना ..


मग दारापाशी जाऊन बघून आले...शेजारच्या काकूंना हीं विचारलं... तर म्हणाल्या...


आत्याबाई दिसल्या नाहीत...


नाहीं नाहीं तें विचार पिंगा घालत होते मनात...


इतक्यात त्याचा मेसेज आला...


कशी आहेस?


अजिबात बरी नाहीये .


का?


आत्यानी पाहिलंय आपल्याला एकत्र...


पलीकडून काहीच रिप्लाय नाहीं ..


फोन करावा का... असं जी वाटून गेलं... पण तेवढ्यात बाबा आले...


ढमे चहा टाक...


आणि आई कुठाय तुझी..?


अं? मी ब्लँक ..


अगं अशी पुतळ्यासारखी काय उभी...


काय झालंय?


अं.. काही नै.. आले मी.. मी गुमान चहा बनवला आणि बाबांना दिला... आता आई आली... तिला हीं चहा दिला आणि संध्याकाळच्या स्वैपाकाची तयारी करायला घेतली ..


तसा नियमच होता... कुठल्याही एका वेळेचा स्वैपाक माझ्याकडे.. इतर वेळी आई, आत्या होत्या...


आता आत्या आली.. पण माझ्याकडे पाहून ण पाहिल्यासारखं केलं...


बापरे... रागवलीये का हीं...?


काहीच अंदाज येतं नाहीये?


कणिक मळताना ती मागे आली...


नी मग म्हणाली... मला का बोलली नाहीसं?


अगं काय सांगू... सगळं इतकं अचानक घडलं की वेळच नाहीं मिळाला...


ठीक आहे आज माझ्या खोलीत ये झोपायला...


तिच्या आवाजावरून काहीच कळत नव्हतं...


कशीबशी जेवले आणि मागचं आवरून तिच्या खोलीत गेले ..


आई बाबांना कळु नये म्हणून आत्तूला हात जोडले...


तिनही शब्द पाळला...


तिच्या खोलीत.... खाली गादी घातली.... आणि आम्ही बसलो...


आई बाबा निजलेत अशी खात्री करूनच बोलायला सुरुवात केली.. आत्तू गं... sorry... मला लपवायचं नव्हतं..


ह्म्म्म... बोला.. काय विचार आहे मग?


बापरे.. क क कसला?


नुसतीच फिरवणार आहे का तुला? तिच्या आवाजात जरब होती ..


फोन लाव त्याला.... मला बोलायचंय...


अरे देवा... आत्ता? आत्ता नको ना...


गुमान फोन लाव...


बरं लावते... मी कॉल केला...धडधड वाढली.. मनोमन धावा केला.. नको उचलूस फोन..


पण छे! देव हीं परीक्षा बघतो म्हणतात तसंच झालं..


ह्यानी फोन उचलला ...


आता उगाचच लाडात बोलला नाहीं म्हणजे मिळवलं...


व्यवस्थित हॅलो म्हणाला...हुश्श्य...


काय झालं? काही अडचण आलीये का?


आई गं... असला भारी आवाज ऐकून मला कसकसचं झालं..


पण समोर वाघीण बघून माझी शेळी झाली


हॅलो... माझ्या आत्याला तुमच्याशी बोलायचंय... मी एकादमात माझं टेन्शन त्याला दिलं.


दे फोन... हा निवांतच होता..


हॅलो...मी राधाची आत्या बोलतीये...


नमस्कार मी श्रीरंग साने... बोला..


स्पष्टच विचारते....


किती दिवस फिरवताय हिला? आणि विचार काय आहे नक्की पुढचा?


फिरवत नाहीये.. भेटलोय एकत्र..


पण तें हीं ठरवून नाहीं...


आणि पुढचा विचार अजून पक्का व्हायचाय... कारण तुमच्या भाचीच अजून ठरत नाहीये...


आता हीं माझ्याकडे संशयाने बघू लागली


काय बोलला हा


बरं उद्या सकाळी देवळात भेटू मग ठरवू...


आताच मरणं उद्यावर गेलं....


आत्या घोरायला लागली आणि इकडे मेसेज वाजला ..


Gn शोना...


मी मात्र.......... ब्लँक


दुसऱ्या दिवशी सकाळी आत्या निघाली देवळात आणि मला मात्र ठेवलं घरात...


रेडिओ वर गाणं लागलं होतं. m


ओ.. . साजण साजण में करु ..


तो साजणी जीव जडी ss


साजणी फूल गुलाबरो सुंघू घडी घडी


हॊ.. केसरीया बालम आवोणि पधारो म्हारे देस...


काय झालं कुणास ठाऊक??


वाट पाहून मी कंटाळले.. आत्तू ला जाऊन तास उलटला होता..


मग पुन्हा एकदा हेडफोन घालून गाणी ऐकत बसले...


गाणं तरी काय लागावं ..


बावरा मनं देखने चला एक सपना ..


आणि मेसेज आला...


आत्याबाईंना घराजवळ ड्रॉप करणार होतो.. पण ऐकत नव्हत्या..


So त्या निघाल्या आहेत चालत..


बरं... पण बोलणं काय झालं?? मी गॅस वर..


रिप्लाय?? हा का करेना...


काही नाही... भेटू.. त्याचा अति थंड रिप्लाय आला


अरे आता एवढं झाल्यावर मला आत्तू कशी सोडेल ??


बघू .. अजूनही निवांतच... हा


अस्सा रा ssss गं येतो ना या पुरुषांचा...


घडाघडा बोलतं नाहीत... घुमे कुठले


ओके. नको सांगुस... मी नाही येणार भेटायला


चिडलेच मी...


अगं खरंच विशेष काहीच बोलली नाही ती.. चिडू नको शोना...


झालं... हे शोना म्हटलं की आम्ही पाघळायचं का मी ठाम


खरंतर risky रिप्लाय


हा चिडला... रुसला तर... असं हीं मनात येऊन गेलं..


पण जाऊदे .. आता अत्तुला विचारायचं...


आणि तेवढ्यात ती दिसली... आत जाऊन गार पाणी घेऊन आले..


ती बसली... पाणी घेतलं.. मग हातपाय धुवायला निघून गेली आत..


मी हीं कोकम सरबत घेऊन आले... आत्तू...


काय झालं?.. काय म्हणाला तो?


तिने माझ्याकडे रोखून पाहिलं... तसं मी परत सावरून म्हणाले .. म्हणजे तें?


कळतील' रंग ' लवकरच... ह्या श्री 'रंगाचे ' .. तिच्या एकेका अक्षरावरचा जोर पाहून मला टेन्शन च येतं होतं...


मी फार विषय न वाढवता... मैत्रिणीकडे गेले... अशा वेळी सखींच बरी...


तर ती हीं भाव खाऊ... आज तुटक बोलत होती... काय राग तर म्हणे गच्चीतली गम्मत मला का नाही सांगितली


घ्या कुणाचं काय तर कुणाचं काय


मग तिनेचं त्याला फोन लावला... भेटायला बोलावलं... तो आला सुदधा...


आणि समोर येताच माझ्याजवळ येऊन म्हणाला...


जर घरचे विरोधात गेले तर पळून येशील ना..?


मग मात्र माझं पित्त उसळलं...


काय हॊ... काय चालवलय तुम्ही?


बापरे... आत्ता पासून अहो जाहो?? तो थट्टा करत होता..


एक मिनिट..


ना तुम्ही मला प्रोपोज केलंय ना मी तुम्हाला हॊ म्हटलंय.. मग लग्न कुठून आलं...


माझा राग वेगळाच...


ओह्ह अस्स होय... म्हणजे आधी राणी सरकारांना पटवायचयं.... बर्रर्रर्रर्र...


पण जाऊ दे... सुस्कारा सोडत म्हणाला..


का? मी गोंधळून विचारलं...


नाही करत मी प्रोपोज...


का??


तसं हीं तू नाही म्हणालीस तर... उगाच कशाला नकार घ्या... किती तो गंभीर आवं आणून बोलला.


आणि मी... पटकन बोलून गेले...


आणि मला हॊ म्हणायचं असेल तर .. ...आई गं.. नकळत काय बोलून गेले हे कळून जीभ चावली आणि हाताच्या ओंजळीत चेहराच लपवून घेतला...


मैत्रीण कमरेला चिमटा काढून निघून गेली हसत...


आणि मी .. तशीच लाजेनं चूर होऊन उभी....


तो आता समोर आला...


धक धक वाढली...


त्यानं दोन्ही मनगटांना धरून हातं बाजूला केले...


डोळे मिटलेली मी... श्वास जाणवण्या इतपत जवळ आलेला तो .


आणि....


आणि...


पुन्हा एकदा कपाळावर kiss... इश्श्य म्हणून लाजून पाठमोरी झाले..


मागून डाव्या खांद्यावर हनुवटी टेकत म्हणाला...


प्रोपोज करायचा प्लॅन आहे पण उत्तर हॊ असेल तरच..


काय??


हॊ म्हणशील ना??


पुन्हा मला मागे वळवत माझी हनुवटी त्याच्या बोटांनी तोलून धरत वर केली... मी त्याच्या डोळ्यात थेट पाहिलं...


आणि त्यानं बोटं बोटात गुंफून जवळ खेचलं....


अहो... ऐकायला आतुर आहे...


लवकरच भेटूयात...


आणि आत्या काहीही बोलल्या नाहीत... जुजबी चौकशी केली घरच्यांची आणि निघून गेल्या... म्हणून काही बोललो नाही..


टेन्शन घेऊ नकोस... मी आहे ना....


आणि सारखी अशी लाजलीस तर प्रेम कधी करू


त्यानं हात सोडवून घेतला... आणि निघाला...


आज मी त्याचा हात धरला... आणि तो मागे वळला..


खूप काही बोलायचं होतं... पण बघत राहिले त्याला...


इतक्यात मैत्रीण परत आली...


मुद्दाम उंहू... करून खोकली... हम आपके तल्या माधुरी सारखी


चला... आज साठी इतकं पुरे.....


जातानाही तो पाहत होता... काळजी घे... करु नकोस... बाय


म्हणत निघून गेला...


मी हीं घरी आले.....


आणि आल्या आल्या.... बाबा म्हणाले....


या... राजकुमारी... आता यंदा कर्तव्य काढूयात का??


बापरे.. बाबांना कळलं??


आत्तू बोलली


मी घाबरून तिच्याकडे पाहिलं.... ती रागावून माझ्याकडे पाहत म्हणाली....


करूयात बघायला सुरवात.... जमेल योग असेल तेव्हा...


आता?????


काय चाललंय तिच्या डोक्यात???


नाही आवडला का तिला??


आत्तू ज्या रागानं बघत होती तें पाहून तर माझा मगाचचा आनंद पार मावळून गेला... बाबा आई नीं आत्तू चार पाच पत्रिका आणि फोटो घेऊन बसले होते...


बापरे ! एवढयात इतकी स्थळं आली मला


आत्तू नीं काय दवंडी पिटवली


मला तर काहीही दिसू लागलं... तें स्वयंवर and all


छे... पण असं स्वप्न रंजन बरं नाही .. मेरा उसके पास हैं... हे आठवलं आणि पुन्हा एकदा हमरी नैय्या गोते खाने लगी..


मी आत जाण्याच्या बहाणा केला आणि त्याला msg केला..


मेलो... आता कै खरं नाही आपलं .


लगेच रिप्लाय...


का गं.. काय झालं?


बाबा आत्तू आई सगळे पत्रिका फोटो घेऊन माझ्या साठी दुल्हा शोधत आहेत...


हसू नका ... मला भीती वाटली की ती हिंदीत वाटते ..


असो...


इकडून टाकलेल्या बॉम्ब नीं एव्हाना त्याच्या दिलात "हिरो -साकी* " इफेक्ट दिला होता... पलीकडचा शामियाना शांत... नव्हे


खर्जात म्हणाला...


आज भेटूया दोन तासांनी .. प्लीज बाहेर ये ..


इकडे आमच्या शामियानात अचानक सनई चौघडे वाजू लागले...


खरंच काय भार्री फीलिंग असतं ना


मग मैत्रिणी शी गॉसिप...


पुन्हा गहन चर्चा..


कसं होईल?? काय होईल?? लांबचा पल्ला ss


हॊ मग आमचं वऱ्हाड योग्य जागी पोचायला नको?


चला आता पुन्हा मैत्रीण ... अभ्यास जुगाड लावत बाहेर पडणार


इतक्यात आई म्हणाली ..


राधे .. आज मला संध्याकाळी दाते बाईंना भेटायला जायचंय... तासात तुझं आवरून घे...


अगं आई मला कसं जमेल?


का?? तुला का नाही जमणार . तें काही नाही..


त्यांच्याच भाच्यांच स्थळं आहे... आत्याबईंनी पसंती दिलीये ..


(आई गं.. आत्तू अशी वागली... फुल्ल टू व्हिलन... देवा आता मी काय करू... )


हे सगळं स्वगत...


बरं मग आधी मी निशा कडें जाऊन येते आणि मग थेट तिथेच येते चालेल??


आईचा बरं ऐकला आणि माझ्या जीवात जीव आला.


लगेच मेसेज केला... लवकर भेटूयात... आई बरोबर जावं लागतंय..


तो बिचारा... लगेच जागा वेळ ठरवून वाट पहात बसला ..


मला आई बाहेर नेणार म्हणजे साडी नेसावी लागणार..


मी लगेच आईच्या कपाटातून 2 साड्या काढल्या... आणि मग डोळे मिटून एक निवडली.. जी त्याला आवडू शकेल...


आणि गेले नेसून.. रिस्क तर होती पण माझी साडी नेसायची आवड जगजाहीर होती त्यामुळे घरातल्यांना संशय नाही आला...


पुन्हा एकदा जागा ठरली ती मुरलीधराच्या मंदिरात... पण त्याच्या मागे एक बाग होती आणि दिवसा फारसं कुणी नसायचं तिथं...


मी फोन केला तर आमची स्वारी आधीच पोचलेली मी हि पोचले...


गाभाऱ्यातल्या श्रीरंगाचं दर्शन घेतलं आणि गेले माझ्या श्री दर्शनाला...


मागे गेले तर तिथं स्वारी पाठमोरी उभी...


कुठल्याही अँगल नीं चिकणा दिसतो हा


मला तर काहीही सुचतं होतं..


मी मागे जाऊन उभी राहिले... तो फोन लावणार इतक्यात खांद्यावर हात ठेवला.. आणि तो मागे वळला आणि अचानक खालीच बसला..


तेच मुळी गुडघ्यावर..


माझ्यापुढे चाफ्याची फुलं एका पानात आणली होती ती दिली.. आणि म्हणाला...


मला या जन्मात माझ्या राधेपासून दूर नाही जायचंय...


माझी बायको होशील??


काय सांगू काय वाटलं हे ऐकून..


अय्या इश्श्य सगळं एकत्रच उमटलं...


नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता..


मी हि लाजत हॊ म्हणाले ..


आणि खुष झालेल्या स्वारीनं मला घट्ट मिठीत घेतलं...


अहो सोडा.. म्हणतं मी हि पळाले ...पण तरी हि सापडलेच


मी... मग अलगद हात त्याच्या भक्कम हातात घेत मला जवळ ओढलं आणि काही कळायच्या आत त्यानी प्रेमाची मोहोर उमटवली...


मग तिथेच काही क्षण विसावलो.. आणि मग त्यानं घरच्यांचा विषय काढला...


मला टेन्शन नको घेऊस... आजच घरी सांगतो... आणि आई बाबांना बोलणी करायला पाठवतो म्हणाला...


आत्तू नीं पसंत केलेल्या मुलाला आता भेटायचंय.. कैसा होगा वों ?


*हिरोशिमा नागासाकी... ब्लास्ट उध्वस्त... आठवलं...




त्याचा निरोप घेऊन मी निघाले खरी.. आई कडें जायला... पण मनात मात्र याचाच विचार चालू होता...


का कुणास ठाऊक.. सारखं वाटत होतं आजची वेळ टळावी.. आणि तो मुलगा भेटूच नये...


पण हाय रे कर्मा !!


आई मला दाते काकूंसोबत आमच्या घरापाशी भेटली आणि तो so called हिरो ही..


आता दिसायला lbw होता (लांबून बरा वाटला )


पण जवळ पोचले आणि हसूच आलं


अगंबाई हा तर तो देवळातला... ह्याचा मित्र..


सुटले... मनातल्या मनात मुरलीधराचे पाय च धरले...


त्यानी ही मला पाहिलं आणि जाताना गाडी मुद्दाम जवळून घेतली आणि म्हणाला..


तेवढं दादा ला सांगू नका... खेटरानी पूजा बांधेल माझी


येतो... वहिनी !!!


...अहो.... काय झकाsssss स्स वाटलं म्हणून सांगू...


मला तर इश्श्य,, अगंबाई, सगळंच होत होतं...


आई माझ्यापाशी आली आणि म्हणाली... आवडला का मुलगा?


मी ही पटकन म्हणाले.... नाही... कसा आवडेल नवरा म्हणून..


का??


का नाही आवडला?


आता हिला काय सांगावं.. तेवढ्यात आत्तूचा फोन आला...


बाजारात लवकर या... ती विठ्ठल चौकातल्या सानें आज्जींच्या घरात होती... आणि त्यांनी आईला आणि मला तातडीनं बोलावून घेतलं...


आम्ही पत्ता टिपून घेतला.. रिक्षा पकडली आणि निघालो...


घर तसं लांब होतं...


पुन्हा फोन... साने आज्जींच्या नातवाला पाठवलं आहे तो जिथं वळायचं आहे त्या गल्लीच्या तोंडापाशी उभा आहे...


आता आम्ही तिथवर पोचलों आणि पाहिलं तर एका साध्या मोपेड वर एक पोरगेलासा वाट पाहत होता...


आम्ही त्यालाच विचारलं... साने ना?


तो ही हो म्हणाला आणि गेलो घरापाशी..


मोठ्ठा चौसोपी वाडा... आत जाताच डावीकडे छोटासा हौद


पाय धुतले आणि आत आलो...


मोठ्ठा शिसवी झोपाळा..


त्यावर साने आज्जी आणि आत्तू बसलेल्या...


साने काकू बाजूच्या बैठकीतून उठून पुढे आल्या..


या या म्हणत स्वागत केलं..


लगेचच कोकम सरबत कि चहा म्हणून विचारलं


आम्ही सरबत घेतलं...


काकू आणि आज्जी दोघी धप्प गोऱ्या.. चैत्र गौरीच्या मुखवट्या सारख्या सुंदर, नाजूक आणि चाफेकळी नाकाच्या... नाकात हिऱ्याची चमकी, आणि अंगावर मोजके पण सुबक दागिने...


तेवढ्यात मोठ्या गाडीचा आवाज आला..


घरातली बाकीची पुरुष मंडळी आत आली.. आम्ही बायका आतल्या खोलीत गेलो.. आणि त्या लोकांना चहा पाणी मी नेऊन दिलं... आपापसात काही गप्पा झाल्या... त्यांच्या आणि आई आत्तू च्या.. मला मागच्या विहिरीपाशी घेऊन गेल्या होत्या काकू..


आणि अचानक तिथे एक जण समोर आला...


त्यानी काकूंना वाकून नमस्कार केला नीं माझ्या कडें पाहूनत्यांच्या काहीतरी कानात पुटपुटला...


माझं काळजात धस्स च झालं...


आता हाच कोण?? आणि मला कुठं पाहिलं बिहिल की काय??


आईला कळलं तर??


मला तर चक्कर चं आली टेन्शन नीं...


जाग आले तर त्यांच वाड्यातल्या एका आलिशान पलंगावर... बाजूला आई आत्तू काकू आज्जी सगळी मोठी माणसं आणि डॉक्टर सुद्धा...


डॉक्टर म्हणाले... ताण आलाय मनावर... सध्या आराम करू दे...


मी सावरून बसायचं म्हणून उठायला गेले आणि पुन्हा ग्लानीत गेले


आता बऱ्याच वेळाने शुद्ध आली तर काकू आणि आत्तू जवळ बसल्या होत्या..


त्यांनी मायेनं हात फिरवला डोक्यावरून.. आणि म्हणाल्या..


सगळं मनासारखं होईल... कसली काळजी करतियेस?


कुणी काही बोललं का?


मी गप्पच... मग त्या बाहेर गेल्या...


खोलीच्या खिडकीतल्या पडद्यांना कुणी तरी बाहेरून हलवतंय असा भास झाला...


उठले आणि खिडकीपाशी गेले...


पण भासच असावा... कोण होतं तिथे?


काय होईल पुढे??


क्रमश :


©मनस्वी ✍️


"श्रीरंग" ही प्रेमकथा लेखिका मानसी  (मनस्वी) यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.


धन्यवाद..


✍️ Partners


 Velvet Kavisha

Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box