ऋणानुबंध... (भाग 1)
© सपनारवि (यवतमाळ)
चेहऱ्यावर हलकासा मेकअप चा फिनिशिंग टच देऊन नंदिनी आरशासमोरून उठली.. गोड गुलाबी चेहरा.. अभिनेत्री लीना चंदावरकर ची आठवण करून देणारा..आणि भरीस दोनही गालांवर खळी..
हसताना बारीक होणारे डोळे..आणि इवल्याशा अर्धवट उमललेल्या गुलाब कळीच्या पाकळ्यांसारख्या ओठांवर सदैव खळखळनारं हसू..
गुलबक्षी रंगाच्या साडीत इतकी मोहक दिसत होती की कुणीही पाहता क्षणी प्रेमात पडावं..
समोर आज्जीला बघताच त्यांच्या गळ्यात पडत नंदिनी म्हणाली "बोल डार्लिंग कशी दिसते आहे मी???"
"कित्ती गोड दिसते माझी बाय ती..!!! "म्हणत आज्जीने दोन्ही हातांनी तिचा चेहरा कुरवाळत आपल्या कानशिलावर बोटं मोडली..
" आज्जी श्रुती कुठे आहे गं??" "ती दादूच्या खोलीत लॅपटॉप वर काम करताना दिसली सकाळी.. अभ्यास करत असावी बहुतेक.." आत येत आईने उत्तर दिलं..
आई नंदिनीकडे थोडावेळ पाहतच राहिली..नाही म्हटलं तरी आईच्या डोळ्यांत आभाळ उतरू पहात होतं..
आज्जीने एकदा नंदिनीकडे पाहत सुनेला म्हटलं" मुली किती लवकर मोठ्या होतात नाही गं…"
"हो न आई.."पाहुणे पोहोचतील तासाभरात. दादू गेलाय तालुक्यापर्यंत त्यांना घ्यायला.."
"ही श्रुती पण ना..आलीय मला मदत करायला नि आता सापडेनाशी झालीय.." म्हणत नंदिनी बाजूलाच असलेल्या दादूच्या खोलीकडे वळली..
आज नंदिनीला बघायला पाहुणे येणार..हे पहिलंच स्थळ.. नंदिनीचे काका मुकुंदरावांच्या बालमित्राची मुलगी सुमतीच्या सासरचे. सुमतीच्या लहान देरासाठीच..नंदिनीला पाहण्यासाठी येत होते.
आजीच्या इच्छेखातर कांदेपोहेचा , दाखवण्याचा कार्यक्रम गावाकडेच करण्याचे ठरवले गेले होते.. नंदिनीचे आजोबा मल्हारराव जगताप 'सावरी' गावातच नाही तर पंचक्रोशीतील बडे प्रस्थ.. पैशानेच नाही तर मनाने पण मोठा माणूस..
त्यांच्या नंतर सगळे पारंपरिक व्यवसाय आणि शेती नंदिनीचे वडील सुशांत राव पाहत. ते सुद्धा त्यांच्या वडीलासारखे मातीशी इमान राखणारे , माणुसकी जपणारे..
नंदिनी त्यांची एकुलती एक मुलगी..मल्हाररावांना चार मुलं..पण सगळ्यांना मुलेच.. दोन पिढीनंतर त्यांच्या घरात मुलीने जन्म घेतला.. नऊ भावांत नंदिनी अगदी राजनंदिनी सारखी वाढलेली. नंदिनीचे दोनही काका व्यावसायिक, शहरांत सेटल झालेले..
कॉम्पुटर इंजिनिअरींग च्या शेवटल्या वर्षाला असलेली नंदिनी तिच्या सगळ्यात लहान काकांकडे पुण्याला शिकत होती.. तिथेच नंदिनीची मावशी पण राहत असे..
सुमतीचे माहेर याच भागातील. त्यामुळे पाहुणे गावात यायला तयार झाले. म्हणून नंदिनी तिची मावस बहीण श्रुती सोबत दोन दिवसांपूर्वी इथे गावात आलेली..
"श्रुती..श्रु..ती... श्रुते..." नंदिनी दारावर थाप मारत वेगवेगळ्या सुरात श्रुती ला आवाज देत होती.. "
"येते गं... नंदू प्लीज..वेट अ मिनिट यार... वॉश-रूम ला आहे .. "आतून आवाज आला..
"श्रुते पाहुणे मला बघायला येत आहेत.. तुला नाही..'नंदिनीचा सा... वरच्या पट्टीत...
"ए ..बावळट.,काहीपण काय बोलतेस...!!!" रागावून
श्रुती ने दार उघडले..
श्रुती आणि नंदिनी दोघी मावस बहिणी असून त्यांच्यात जराही साम्य नको.. नंदिनी म्हणजे ठुसका बांधा ठसला मनी अशी..नाजूकशी, पोरसवदा..
दुसरीकडे श्रुती पाहताच नजरेत भरावी अशी पाच चार ची उंची, आणि लांब सडक कुरळे केस..डोळे .. इतके टपोरे की त्यात बघणारा पैलतीरावर पोहोचनारच नाही..डिट्टोआपली मानसी नाईक..
बेबीपिंक कलर चा चिकन प्रिंट च्या चुडीदार सलवार वरती मल्टी कलर ची ओढणी डाव्या खांद्यावर पिनप करून , मेकअप च्या नावावर फक्त डोळ्यांत दाट काजळाची रेघ आणि कपाळावर छोटीशी पिंक टिकली लावून जेव्हा श्रुती समोर उभी राहिली तेंव्हा नंदिनीने क्षणभर तिच्याकडे पाहताच शीळ वाजविली...
"ओह ..माय..माय... यू आर लुकिंग सो... ब्यूटीफुल.. माय स्वीटहार्ट.. आज तो किसीं की मुक्कमल तौर पे कत्ल-ए-आम होनेे वाली है.. आणि मग नाटकी अंदाजात कपाळावर पालथा हात ठेवून "हाय रब्बा आज तो मेरी शादी बनने से पहले ही टूटनेवाली है.. म्हणत सूर काढू लागली..
तशी श्रुती हसू आवरत खोटं खोटं चिडली.." ए बास हा नौटंकी.. सकाळपासून बाथरूम सोडना झालीस तू शेवटी दादूच्या रूममध्ये अंघोळ करायला लागलं..बघ अजून केस ओले आहेत.. बाय द वे सकाळी सकाळी दादूला तू कुठे पाठवलेलं? "
खांदे उडवत नंदिनी आत आली.. श्रुती तू लॅपटॉप आणलास..अभ्यास करत होतीस???
"अगं ते सबमिशन राहिलेलं.."
"माझे आई जरा तुझ्या पुस्तकांतून बाहेर ये की गं.. मला थोडी पण मदत नाही केलीस..??"नंदिनी गाल फुगवून म्हणाली..
"अगं लाडू...मला कुठं येतेय मेकअप करायला.. किती गोड दिसत आहेस..."असं म्हणत तिने नंदिनीच्या गालाला किस केलं..
"इ... माझा मेकअप खराब होईल ग... तशी श्रुती हसायला लागली.
बाकी नंदू खरच छान तयारी केलीस ह...
" ए कसं वाटते गं साडीबीडी नेसून असं चहा पोहे , दाखवणं वगैरे..
ते आज्जीला बरं वाटावं म्हणून करते आहे.."
" हो का !!मग सांग बरं आतापर्यंत किती सेल्फी काढून झाल्या ते".....
"ते जाऊ दे जरा तुझा मोबाईल दे ग.. माझ्या फोन ला रेंज नाही.. एक कॉल करायचंय..
"एवढ्यात गाडीचा हॉर्न ऐकू आला..
"नंदू दादू आला वाटते " छे ग हा दादूच्या गाडीचा हॉर्न नाही आहे म्हणत नंदिनी बेड वर बसली..
नंदिनी आणि तिच्या दोनही भावांच्या बेडरूम वरच्या मजल्यावर होत्या.. त्यांच्या बेडरूम ची गॅलरी बंगल्याच्या मेन गेट च्या दिशेने असल्यामुळे आत कुणी आलं की इथून स्पष्ट दिसत होते..
आवाज आल्यामुळे कुतूहलाने श्रुती गेटकडे पहात उभी होती.. तेवढ्यात एक गाडी आत येऊन थांबली.. लगेच नंदिनी चा अभिदादा आणि बाबा पाहुण्यांना रिसीव करायला पुढे सरसावले..
गाडीतून आधी सुमती आणि तिचे यजमान उतरले.. थोड्या वेळाने ड्रायवर सीटवरून एक उमदा सोल्जर पर्सनॅलिटी वाला तरुण उतरला..
ती दोघे समोर गेल्यामुळे दिसत नव्हते.. पण चलता चलता त्या तरुणाने अचानकपणे वर पाहिले.. गॅलरीत श्रुती उभी.. क्षणभर त्या तरुणाचा ...तिला पाहताच असा कलीजा खलास झाला असं झालं...
तेवढ्यात क्षितिज.. अशी हाक कानावर पडली आणि तो जरासा घाईने आत वळला..
क्षणभर का होईना पण श्रुती चा पण स्टेचू झालेला.. मग मात्र ती मनातून खजील झाली.. अरे बापरे आपण असं पाहुण्यांना दिसायला नको होतं.. असं वाटून गेलं तिला.. उगा गॅलरीत उभे राहिले आता परत पाहुण्यांसमोर जायला नको असा विचार करीत ती आत आली..
(क्रमशः)
भाग २ ची लिंक 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/10/2_26.html
कथा कशी वाटली नक्की कळवा..
तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे..
शुद्धलेखनाच्या चुकांसाठी 🙏🙏.
©✍ सौ.सपना इंद्रवार (यवतमाळ)
कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box