स्वप्नं की सत्य.. भाग 2
©️®️नियती जगताप
धरा जिवाच्या आकांताने ओरडतं होती ,
पण तिच्या घश्यातून आवाज बाहेर पडतं नव्हता.
थोड्या वेळाने पुन्हा ते पिवळे डोळे तिच्या डोळ्यांच्या अगदी जवळ आले.
तिच्या कानात आवाज घुमला
" तू माझी शिकार आहेस,
नाही सोडणार तुला.
माझ्या हद्दीत येनारया प्रत्येकाची मी शिकार करणार."
त्याच्या छन्नी हसण्याने तिच्या अंगावर सरसरून काटा आला.
दुसर्या दिवशी ती ऑफिस मध्ये गेली ,
पण तिचं कामात लक्ष लागेना.
ती पुर्णपणे घाबरली होती.
तिच्या मैत्रिणीने, सायलीने विचारलं ,
तशी ती बोलती झाली.
सायली त्याच कंपनी एरीयात राहत होती.
तिने धरा ला मदत करण्याची तयारी दर्शवली.
घरी आल्यावर सायलीने तिच्या आज्जीला धरा सोबत जे काही घडलं ते सगळं सांगितलं.
ऐकता ऐकताच आज्जीचा चेहरा गंभीर झाला.
त्यांची खात्री पटली की तो परत आलाय.
तो, दैलतराव, पंन्नास वर्षांपूर्वी तो त्या गावचा पाटिल होता.
आज्जी सांगू लागली:
दैलतराव दिसायला जेवढा रांगडा तेवढाच मायाळु.
वडीलोपार्जित वाड्यात आपली बायको, मिरा, सोबत, रहायचे.
या दांपत्याला मुलबाळ न्हवतं.
गावालाच आपलं मुल मानून पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावायचे.
पूर्ण गावाला पण दैलतरावांचा खुप आधार होता आणि दरारा ही.
दैलतराव सगळं खपवून घेत असे
पण खोटेपणा त्यांना सहन होत नसे.
दुसर्याना विनाकारण त्रास देणार्या लोकांना ते सोडत नसत.
एकदा का राग आला की तो त्यांना आवरता येत नसे.
त्यांना शांत करनं फक्त त्यांच्या बायकोला
मिरालाच जमत असे.
त्यांच्या अगदी विरुद्ध त्यांचा आतेभाऊ विश्वासराव.
खोट बोलणं, फसवणूक करणं हे सगळं त्याच्यासाठी अगदीच सामान्य होतं.
गावाला लागूनच दहा एकराची जमीन वारसाहक्काने दैलतरावांना मिळाली होती.
हि तीच जमीन होती,
ज्यावर त्याकाळी विश्वासरावांची नजर होती
आणि आता धराची कंपनी त्याच जागेवर उभी होती.
कंपनीच्या मालकाने बरेचदा दैलतरावांना ती जागा त्यांना विकण्याची विनंती केली होती.
पण दैलतरावांना तिथे पवनचक्की प्रकल्प उभारायचा होता,
जेणेकरून गावाला विज मिळेल.
विश्वासरावांना याची कल्पना होती.
त्यानी ती जमीन हडप करून कंपनी ला विकण्याचा कट रचला.
कंपनी च्या मालकाला भेटून त्याला खात्री करून दिली की जमीन तो दैलतरावांकडून विकत घेत आहे.
दोन दिवसांनी विश्वासराव दैलतरावांकडे गेला,
त्यांची माफी मागितली.
पश्चात्ताप करण्यासाठी म्हणून स्वतःच्या नावावर असलेली जमीन गावच्या शाळेला देण्याची गळ घातली.
विश्वासरावामध्ये अचानक झालेला बदल दैलतरावांना खरा वाटत न्हवता,
पण जसं विश्वासराव जमीन शाळेला देण्याचं स्वतःहून बोलला ,
तसं दैलतरावांना त्याच्यावर विश्वास ठेवला.
मिराला या सगळ्यावर बिलकुल विश्वास न्हवता,
पण नवर्याला वाईट वाटू नये म्हणून त्या पण गप्प बसल्या.
विश्वासरावांनी दैलतरावांना गाफिल ठेवण्यासाठी शाळेचा प्लॅन बनवून घेतला.
दैलतरावांना भेटून त्या प्लॅन मध्ये जास्त सुधारणा करण्यासाठी संध्याकाळी घरी बोलावलं.
बराच वेळ गप्पामध्ये गुंतवून अंधार पडत असताना ,
विश्वासराव दैलतरावांना घेवून त्यांच्या जमीनीवर आला.
दैलतरावांनी त्याला विचारले
"आपण या जमीनीकडे का आलो आहोत?"
विश्वासराव नुसताच मोठ्याने हसत सुटला.
दैलतरावांना आता त्याचा कट लक्षात आला पण वेळ निघून गेली होती.
विश्वासरावाच्या चार माणसांनी दैलतरावांना घट्ट पकडून ठेवले.
विश्वासराव जवळ येऊन त्यांना म्हणाला
" जमीनीवर खूप जीव आहे ना मग आता याच जमीनीवर जीव दे".
दैलतराव स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होते ,
पण त्या चौघांपुढं त्यांची ताकद अपुरी पडत होती.
ते खूप चिडले होते.
कोणालाच सोडणार नाही आशी धमकी देत होते.
विश्वासरावांनी लोखंडी हातोडा दैलतरावांच्या डोक्यात घातला.
दैलतराव जमीनीवर कोसळले.
विश्वासरावांनी त्यांच्या शरीरावर पेट्रोल टाकून त्यांना तिथेच जाळून टाकलं.
गावात येऊन जंगली प्राण्यांनी दैलतरावांना मारल्याची अफवा पसरवली.
पुढे काही वर्षांनी विश्वासराव पण त्याच्या वाड्यात मेलेला आढळून आला.
पोलिसांनी 'डोक्यात लोखंडी हातोड्याच्या घावाने म्रुत्यु' असा अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला.
त्याच्या चार साथीदारांचाही हार्ट अॅटॅक ने मृत्यु झाला.
त्या नंतर बरेचदा दैलतरावांना त्या जमीनीवर लोकांनी पाहिले,
आत्ता पर्यंत त्यांनी कधीच कोणत्याही गावातल्या माणसांना त्रास झाला नाही.
पण धराला दैलतरावांनी त्रास का दिला हे मात्र कोणालाच माहित न्हवतं.
**** क्रमशः ****
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
©️®️नियती जगताप
स्वप्नं की सत्य...भाग एक ते चार ही कथा लेखिका नियती जगताप यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.
धन्यवाद..
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Velvet Kavisha
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box