स्वप्नं की सत्य... भाग एक
©️®️नियती जगताप
धरा एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली सरळमागी मुलगी,
शिक्षण पूर्ण करून एका नामांकीत कंपनी मध्ये अकाउंटन्ट म्हणून काम करत होती.
मल्टिनॅशनल कंपनी असल्यामुळे महीना अखेरीस कंपनी मध्ये रात्री उशिरा पर्यंत काम करणं तिच्या साठी काही नवीन नव्हतं.
कंपनी चे स्वतःचे तेरा मजली गेस्ट हाऊस कंपनी कॅम्पस मध्येच होतं,
उशिरा पर्यंत काम करणार्या कर्मचार्याची राहण्याची सोय येथेच केली जायची.
एका मन्थ एन्डींग ला धरा ला नेहमी प्रमाणेच काम संपावायला रात्रीचे 2 वाजले.
दुसर्या दिवशी तीला सकाळी लवकर काम सुरू करायचे होते,
त्यामुळे ती गेस्ट हाऊस ला गेली.
रितसर नोंद करून तीने रिसेप्शन कडून रूम ची चावी घेतली.
फ्रेश होउन ती बिछान्यावर आडवी झाली.
बेड च्या समोरच लावलेल्या घड्याळात 2:30 वाजले होते.
डोळे मिटताच तिला गाढ झोप लागली.
थोड्या वेळाने अचानक तीला ऑफिस मधल्या एका मैत्रिणीचा आवाज ऐकू आला.
ती दचकून जागी झाली पण तीला डोकं जड झाल्यासारखे वाटले,
जसे की ती स्वप्नं पाहत होती.
तिने घड्याळाकडे पाहिले,
रात्री चे 3 वाजले होते.
तेवढ्यात तीची मैत्रिणी बंद दरवाज्यातून आत आल्यासारखं वाटलं.
तिने डोळे चोळून बघण्याचा प्रयत्न केला तर त्या मैत्रिणीचा चेहरा पूर्ण काळा पडला होता.
धरा ला अजूनही काही कळत नव्हतं की ती स्वप्नं पाहत आहे की,
खरंच काहीतरी घडत आहे.
ती बेड वरून ऊठण्याचा प्रयत्न करू लागली,
पण अचानक तीला काहीतरी पिवळं डोळ्यांजवळ दिसलं.
ती अचानक बेड वर निपचित पडली.
ती जोरात ओरडत होती पण घश्यातून आवाज बाहेर पडतं नव्हता.
ती हात पाय आपटत होती,
पण तिचं अंग तसूभरही हालत नव्हतं.
तिला दरदरून घाम फुटला होता,
तिच्या छातीवर कोणीतरी बसल्याचं तिला स्पष्ट जाणवतं होतं.
तिचे अर्धवट उघडे डोळे उघडझाप पण करू शकत नव्हते.
तिला कोणाचातरी चेहरा तिच्या चेहर्याजवळ जाणवत होता.
पण तिला फक्त त्याचे पिवळे डोळेच दिसत होते.
ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती.
तिचं पूर्ण शरीर मात्र अर्धांगवायू झाल्यासारखे निपचित पडून होतं.
ती प्राण कंठाशी आणून ओरडतं होती,
कधी देवाचं नाव घेत होती तर कधी मदत मागत होती.
तिचा आवाज मात्र घश्यातच अडकून पडला होता.
तीच्या समोरच भिंती वर असलेलं घड्याळ तिला स्पष्ट दिसत होतं.
आता तिला खात्री पटली की हा तीचा शेवटचा दिवस आहे,
आता ती वाचू नाही शकणार.
ते पिवळे डोळे तिच्या डोळ्यांच्या अगदी जवळ होते,
आणि अचानक तिच्या अंगावरचं ओझं कमी झालं.
तिला काही कळायच्या आत एक काळी आकृती,
तिच्या बेड वरून ऊठून समोरच्या भिंतीतून आरपार जाताना दिसली.
ती पटकन उठुन बसली.
समोर बघितलं,
घड्याळात पहाटेचे 4 वाजले होते.
तीने लगेच रूम मधले सगळे लाईटस् लावले.
मोबाईलवर भजन आणि स्रोत लावले.
कशीबशी तीने सकाळी 6:30 पर्यंत वाट पाहिली.
साडेसहा वाजता ती बेड वरून उठली,
घाईघाईने अंघोळ करून,
आवरून तिने लगेच गेस्ट रूम सोडली.
दरवाजा बंद करताना तिला जाणवलं की ,
कोणीतरी पळत येवून दरवाजा आडवण्याचा प्रयत्न केला.
धरा पळतच रिसेप्शनला आली
आणि गेस्ट रूम ची चावी परत करून पळतच ऑफिसमध्ये गेली.
तिने मनाशी पक्के केले होते की आता पुन्हा त्या गेस्ट हाऊस मध्ये चुकूनही पाऊल टाकायचं नाही.
ती काम संपून घरी आली.
असाच एक आठवडा गेला.
कामाच्या ओघात ती झालेलं सर्व विसरत चालली होती.
एके दिवशी ती घरी गाढ झोपली असताना तीला अचानक जाग आली.
ती किचन मध्ये गेली,
पाणी पिऊन तिने घड्याळाकडे पाहिले,
रात्री चे 3 वाजले होते.
ती बिछान्यावर आडवी झाली
आणि अचानक तीला परत ते पिवळे डोळे दिसले.
ती भितीने ओरडनार तेवढ्यात परत कोणीतरी तिच्या छातीवर बसले.
धरा जिवाच्या आकांताने ओरडतं होती
पण पुन्हा एक तास ती पॅरलाईज़ झाली.
*** क्रमशः ***
भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
©️®️नियती जगताप
स्वप्नं की सत्य...भाग एक ते चार ही कथा लेखिका नियती जगताप यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.
धन्यवाद..
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Velvet Kavisha
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box