संमोहिनी भाग १

 


संमोहिनी भाग १

©️सपनारवि

विमनस्क अवस्थेत बिपाशा कार ड्रायव्हिंग करीत होती.. आज सकाळपासूनच्या सगळ्या घटना पुन्हा पुन्हा तिच्यानजरेसमोरून एखाद्या चित्रफिती प्रमाणे  सरकत जात होत्या.. संध्याकाळी जेव्हा राघवनला तिने  डॅडच्या ऑफिसमध्येपाहिलं तेंव्हा ती स्वतःला कंट्रोल करू शकली नाही..पण त्याला न दिसताच तिथून माघारी फिरली...

तशी बिपाशा अत्यंत कूल माइंडेड अगदी तिच्या डॅड सारखी..  तिच्या भावनांवर तिचं आश्चर्यकारक नियंत्रण असतं. भावनांचं प्रदर्शन तिला कधी जमलं नव्हतं आणि ते तिला आवडतही  नव्हतं...  

आज जेव्हा ती काही कामानिमित्त डॅडच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिने त्यांच्या केबिनमध्ये राघवनला पाहिले.. तिने वारंवार तंबी देऊनही तो डॅडला भेटायला गेलाच कसा.. त्याने तिच्या आयुष्यात घातलाय तो गोंधळ पुरेसा आहे.. यासगळ्या गोष्टी डॅड पासून दूर ठेवायचा तिचा आटोकाट प्रयत्न असतो..  'आय मस्ट डू समथिंग...'

एवढ्यात अचानक एक स्त्री तिच्या भरधाव कार समोर आली आणि काहीही कळायच्या, सावरायची आधी प्रचंड वेगातदूर फेकल्या गेली.. हे सारं इतक्या लवकर झालं की बिपाशाला काहीच कळलं नाही...

रस्ता नेहमीचाच... रात्रीच्या अकरा सडे अकराचा सुमार.. फारशी वर्दळ नसलेल्या या रस्त्यांवर या वेळेला बिपाशाआपल्या नेहमीच्या वेगात गाडी चालवत होती.. तिचा स्टेअरिंग वरचा ताबा सुटता सुटता राहिला... गाडी करकचून ब्रेकमारत टायरचा घासल्यासारखा आवाज करीत रस्त्याच्या कडेला दोन तीन मीटर अंतरावर जाऊन थांबली..  

लगबगीने डोअर उघडून बिपाशा पळतच मागे आली.. ती स्त्री ज्या दिशेने फेकल्या गेली तिकडे तिने शोधाशोध केली.. खूप शोधूनही कुणी सापडलं नाही.. ती घाबरली होती.. पण या घडीला ती स्त्री जर जखमी असेल तर तिला मदतीची गरजआहे हे जास्त वाटत होतं.. बिपाशाला भोवळ आल्यासारखे झाले.. ती परत गाडीत जाऊन बसली..  

गाडीतील गार पाण्याची बॉटल काढून थोडे पाणी ती प्यायली.. थोडं चेहऱ्यावर मारलं.. गाडीतील एसी सुरू असूनतिला दरदरून घाम फुटला.. लांब श्वास घेऊन दोन क्षण ती थांबली.. परत एकदा आता झालेल्या अपघाताबद्दल विचारकरू लागली.. जे झालं ते खरं होतं की आपला काही भ्रम होता.. तिला कळेनासे झाले.. किती वेळ ती विमनस्क अवस्थेतगाडीत बसून होती.. 

फार वेळ असं रस्त्यात थांबणं ठीक नव्हतं.. म्हणून सकाळी बघू असा विचार करीत तीने गाडी स्टार्ट केली..

घरी पोहोचेपर्यंत साडे बारा झाले होते.. आता वॉश घेण्याचेही त्राण तिच्यात उरले नाही.. अंगावरील कपड्यानिशी तिनेबेडवर अंग टाकले.. आणि कधीतरी गाढ झोपी गेली..

अचानक ती स्त्री कारच्या समोर आली.. तिचे डोळे.. अगतिक, लाचार... काही तरी सांगू पहात आहेत...'नो...'

जवळपास किंचाळत बिपाशा उठून बसली.. "बिशु..व्हाट्स हॅपन बेबी.. आर यु ओ के..." हातात कॉफीचा मग घेऊनराघवन ला समोर पाहताच तिच्या मस्तकात सनक उठली.. 

"क..काय झालं?" आणि तू .. तू कधी आलास?? "

 हलके हसत राघवन ने हातातील मग खिडकीत ठेवला..  

बेडच्या काठावर बसत बिपाशाच्या चेहऱ्यावरचे विस्कटलेले केस आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीने बाजूला करीत तिच्याडोळ्यातील नजर न हटविता म्हणाला, ”असं काय करतेस डार्लिंग...? नवऱ्याला असं कुणी विचारतं?? आणि आपल्याफ्लॅट ची एक किल्ली माझ्याकडे पण असते न.. तूच दिलीस.. विसरलीस एवढ्यात??"

राघवन अजूनही तिच्या डोळ्यांत खोल वर पहात होता.. त्याला लोटत बिपाशा उठली.. बाथरूममध्ये जात  दाराशी उभीराहून त्याला म्हणाली..." कुठेही जाऊ नकोस.. आय वॉन्ट टू टॉक यु..." उत्तराची वाट न पाहता ती आत गेली... 

मस्त गार पाण्याने शॉवर घेऊन आल्यानंतर तिला बऱ्यापैकी ताजेतवाने वाटत होते..   गुलाबी बाथ गाऊनमध्ये ओले केसपुसत ती बाहेर आली.. चॉकलेटी सावळा रंग.. तेज तर्रार डोळे.. त्यातील मादक झाक.. एकोणतीस वर्षे वयाची ही तरुणीआकर्षक न दिसावी तर नवल.. राघवन सोफावरून उठला.. 

बिपाशा वॉर्डरोब मधून कपडे काढीत पाठमोरी उभी होती.. तिच्या अर्धवट बांधलेल्या केसांमधून ठिबकणारे पाणीउघड्या खांद्यावरून ओघळत होते... राघवनने वॉर्डरोब च्या दाराशी असलेल्या तिच्या डाव्या हातावर हात ठेवून.. उजव्याहाताने कानामागून खांद्यापर्यंत तर्जनीने नक्षी काढली..  

"व्हॉट आर यु डूइंग..  मूर्ख माणसा... लांब हो.." बिपाशाने त्याला दूर लोटत ओरडली.. 

"ओ के.. ओ के.. फाईन.. तू कर चेंज... तोवर मी तुझ्यासाठी एक कॉफी आणतो.. " म्हणत राघवन बाहेर गेला...

राघवनच्या आत्ताच्या कृतीने चरफडलेल्या  बिपाशाने तो बाहेर जाताच आधी  बेडरुमचं दार बंद केलं आणि मग कपडेचेंज केले.. मग दार न उघडता फक्त जवळ लोटून ती परत गॅलरीत येऊन बसली..

तिला लोवर- टी शर्ट मध्ये बघून ही आज घरीच राहणार या विचाराने राघवनच्या कपाळावर आठी पडली.. पण तिनेपहायच्या आधी चेहरा नॉर्मल करीत तिच्याकडे कॉफीचा मग पुढे करीत राघवन म्हणाला, "अ स्ट्रॉंग कॉफी फॉर याब्युटीफुल लेडी.. घे गं.. काही नाही घातलंय यात..." " बिपाशाने त्याच्याकडे दचकून पाहिलं.. 

तो बेफिकिरीने तिच्या समोरच्या खुर्चीवर बसत मग टी पॉयवर ठेवला.. आणि हसत शीळ घातली..  

किती बेशरम माणूस आहे हा... एक दिवस आपण याच्यावर प्रेम केलंय ह्या विचाराने तिला स्वतःचीच कीव आली.. 

"तू सकाळी डॅड कडे कशाला गेलास??" तिने अगदी शांत स्वरात विचारलं... 

राघवन च्या चेहऱ्यावरचे भाव बदलले..

"बिशू मला जरा पैसे हवे होते....."  

" मी सांगितले आहे तुला की मला मागायचेस.. डॅडकडे का गेलास??  बाय द वे ही तुझी या महिन्यातली सहावी वेळ आहेपैसे मागण्याची... आणि तुझ्या प्रोजेक्टचं काय झालं..??

"अगं त्या साठी तर हवेय.. बिशू यार मला तरी कुठं आवडतंय असे तुझ्यापुढे हात पसरायला.. बट.. यु नो डार्लिंगलवकरच माझं प्रोजेक्ट सुरू होईल आणि...

"पुरे पुरे...हा चेक घे.. मी साइन केलाय.. अमाउंट तितकीच असायला हवी..जितकी तू मागितली आहेस.."

"थँक्स .. तुझी गाडीची चावी दे न जरा.. माझी गाडी गॅरेजला टाकली आहे.." तिने मान हलवून संमती दिली..

ह्याचं काहीतरी करायलाच हवं.. काल ह्याने  डॅडला दिलेली धमकी जर स्वतः ऐकली नसती तर कधीच कळलीनसती... हा विचार बिपाशाच्या मनात सुरू होता तेवढ्यात राघवन गेल्या पावली परत आला...  

" बिशु गाडी स्टार्ट होत नाही आहे.. आणि बंपरला काहीतरी लागलं आहे.. ठोकलयस का कुणाला रात्री...??"

" व्हॉट रबिश.. काहीही काय म्हणतोस? रात्री ची उतरली नाही का?' चेहरा शक्य तेवढा नॉर्मल ठेवत बिपाशा उत्तरली.. 

" बिशु तुला आवडत नाही म्हणून मी पीत नाही... "हो..हो.. कळलंय.. जा आता .. आणि हो तुझी बाईक घेऊन जा किंवाकॅब कर..

" गाडी..." 

" मी बघते.. "

तिने गॅलरीतून बघितलं राघवनला जाताना... आणि लगबगीने खाली आली... नव्यानेच बनलेल्या या अपार्टमेंट मधीलबरेचसे फ्लॅट अजून रिकामे असल्यामुळे पार्किंग मध्ये फारसं कुणी नसतं.. आजही ती खाली आली तेंव्हा लांबूनदिसणाऱ्या चौकीदारशिवाय तिथे कुणी नव्हतं..  

रात्री तर नीट होती गाडी हा विचार करत तिने डोअर खोललं.. मग काहीतरी आठवल्यासारखं ती घाईत खाली  उतरलीआणि गाडीच्या समोर जाऊन वाकून काही लागलंय का पाहू लागली.. तिथे तर काहीच नव्हतं..."मग राघवन असा काम्हणाला... हा विचार करत ती परत गाडीत येऊन बसली.. गाडी खरच स्टार्ट होत नव्हती.. तीने परत एकदा चावी लावलीथोडं प्रयत्नाने गाडी स्टार्ट झाली.. तिने समोर बघताच....

परत एकदा काचाबाहेर काहीतरी क्षणभरसाठी हलले आणि परत तेच डोळे... फक्त क्षणभरच आणि बिपाशा तशीचपुतळा बनून राहिली.. काय होतंय काहीच कळेनासे झाले.. पुन्हा तोच भास.. भानावर येताच ती घाईत खाली उतरली.. पुन्हा एकदा गाडीच्या आजूबाजूला कुणी आहे का याची खातरजमा करून गाडी लॉक करीत तिने वॉचमनला आवाजदिला.. " दादा तू कुणाला पाहिलंस का आत येताना..??  

" नाही मॅडम मी हितच आहो.. आता थोड्या वेळ आधी राघव सर गेलेती..."

 "बरं ठीक आहे .. जा तुम्ही.."

थोड्या वेळापूर्वी झालेल्या भासाचा विचार करीत ती लिफ्ट कडे वळली.. रात्री पासूनच काहीतरी विचित्र वाटत होतेतिला.. पण काय ते मात्र कळत नव्हतं.. 

काहीतरी खायला ऑर्डर करावी म्हणून तिने मोबाईल पाहिला तर डॅडचा मिसकॉल.. " हॅलो डॅड.. "  

" बिशु आज दुपारी येऊ शकशील... काही महत्त्वाचे काम आहे.. आपण लंच सोबतच घेऊया.." 

" ओके डॅड.. मी येतेय..." फ्रीजमध्ये ऑरेंजजूस होते.. सोबत रोस्टेड गार्लिक नानसोबत ब्रेकफास्ट संपवून ती तयारझाली..

तासाभरात बिपाशा ऑफिसमध्ये पोहोचली.. ती एक जैव विज्ञान संशोधन केंद्राची एक भव्य इमारत.. त्यातीलआलिशान ऑफिस मध्ये तिचे डॅड रमाकांत केळकर  तिची वाट पहात होते.. ती आत जाताच त्यांच्यासमोर त्यांचे खाजगीवकील मिस्टर राव... . "ये ये.. बेटा आम्ही तुझीच वाट पहात आहोत.."  

"हॅलो अंकल.."  

" हॅलो बेटा.." आज असे डॅडने का बोलावले असावे? शिवाय राव अंकलना तिथे बघून ती विचारात पडली.. 

"बिशु मी माझं मृत्यूपत्र बनविले आहे त्या संदर्भात तुला इथे बोलावलं आहे.. राव अंकल या संबंधी तुला डिटेल देतील... " 

" पण आताच याची काही आवश्यकता??"

 "खरं तर मिनाक्षी असतानाच आम्ही आमचं मृत्यूपत्र बनविलेले आता फक्त यात काही बदल केले तेवढे तू अंकल कडूनसमजून इतर फार्मलिटी पूर्ण करून घे..." 

" ओके डॅड.." 

लंचला अजून वेळ होता..तोवर बिपाशाची पावलं लॅब कडे वळली..कॉरिडॉरमधील तैलचित्र बघताच तिची पावलंतिथेच घुटमळली... ते एक कॉलेजमधील कार्यक्रमाचे चित्र होते..  

बिपाशाचे डॅड रमाकांत केळकर एक यशस्वी शास्त्रज्ञ.. एका प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यातील रमाकांत अत्यंतकुशाग्र बुद्धिचे... परंतु पारंपरिक व्यवसायात रस न दाखवता त्यांनी विज्ञानाची कास धरली..आजच्या जागतिक युद्धाचीबदललेली परिभाषा.. त्यातून विषाणूंच्या  वापराचा  संभाव्य धोका...यावर त्यांचे आणि टीमचे संशोधन चाललेले.. यासंबंधीत काही शोधांचे पेटंटपण त्यांच्या नावे आहेत..  

बिपाशाची मम्मी मिनाक्षीपण एक सुप्रसिद्ध गॉयनेक्.. बरीच वर्षे स्वतंत्र प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी स्वतःलासमाजसेवेत झोकून टाकलं.. अत्यंत दुर्गम भागातील, आदिवासी लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून झटत.. अशाच एका दुर्गम भागात काम करीत असताना परतीच्या प्रवासात दरड कोसळून त्यांच्या कारचा अपघात झाला.. आणित्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला..

बिपाशा तेव्हा लंडनमध्ये तिचं पदव्युत्तर शिक्षण घेत होती.. केम्ब्रिज विद्यापीठातील टॉपर असलेल्या बिपाशाला कामकरण्यासाठी तिच्या डॅडला जॉईन करण्याचा पण पर्याय होता.. पण त्या आधी तिने मम्मीच्या अर्धवट राहिलेल्या कार्यालाएक व्यवस्थापन देण्याची गरज होती...

लंच दरम्यान डॅड काहीच बोलले नाही.. पण त्यांना काहीतरी बोलायचं आहे नक्की हे तिला जाणवत होतं..

 "बिपाशा बेटा.. राघवन आला होता.."

 "आय नो डॅड.. मी तुमचं बोलणं ऐकलेलं.. मी बघते त्याचं काय करायचं ते.." 

" बिशु बाळ मला तुझी काळजी वाटते.. आज ह्या घडीला तुझी मम्मा असती तर कदाचित ती काही योग्य निर्णय घेऊशकली असती.. मला तुझा डॅड म्हणून कधी कधी खूप दुबळे वाटते..."

"ओह!!! डॅड व्हाय डिड यु थिंक सो... तू नाहीसच दुबळा.. अँड मम्मा कुठेही गेली नाही.. ती असते तुझ्या माझ्या सोबत.. मला माहित आहे राघवनच्या बाबतीत मी चुकले.. नाही ओळखता आलं मला... माणसं गणितातल्या सिद्धांता सारखीसरळ का नसतात ???"  

तिने सोफावरून उठून डॅडच्या बाजूला बसली.. त्यांच्या हातावर हात ठेवत खांद्यावर विसावत पुटपुटली.." आपणमम्माला मिस करतोय..."

त्यानंतर बऱ्याच दिवसांनी बाप लेकी गप्पांत रंगले.. असे निवांत क्षणं त्यांच्या आयुष्यात कमीच असतात..

रात्रीला मी घरी येणार नाही असा मेसेज राघवनला टाकून तीची कार ऑफिस जवळ असलेल्या त्यांच्या बंगल्याकडे वळली..

क्रमशः

भाग २ 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_2.html

कथा कशी  वाटली नक्की कळवा.. 

तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे.. 

शुद्धलेखनाच्या चुकांसाठी 🙏🙏.

©✍ सौ.सपना इंद्रवार (यवतमाळ)

कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.

सदर ही कथा लेखिका सपना इंद्रावार यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.

आम्ही साहित्यचोरीचा निषेध करतो.

धन्यवाद..

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


 Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments