चुकीच्या धिंगाण्याचे १० लाख देणार का?
© Velvet Kavisha ✍️
स्टार प्रवाहवर सुरू झाला नवीन कार्यक्रम!
काल आणि परवा स्टार प्रवाहवर "आता होऊ दे धिंगाणा" नावाचा कथाबाह्य कार्यक्रम सुरू झाला आहे. अभिनेते, दिग्दर्शक सतिश राजवाडे यांनी स्टार प्रवाहाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
आघाडीचे अभिनेते करत आहेत सुत्रसंचालन
"आता होऊ दे धिंगाणा" या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुमच्या आमच्या मनात आणि हृदयात स्थान मिळवलेले मराठीतील आघाडीचे अभिनेते, "सिद्धार्थ जाधव" करत आहेत.
स्टार प्रवाह वाहिनी वळतेय कथाबाह्य कार्यक्रमांकडे
स्टार प्रवाहने चांगले कंटेंट देऊन मराठी विश्वात आपले पाय भक्कम रोवलेत. त्यांनी सध्या कथाबाह्य कार्यक्रमावर फोकस केलाय असं मागील काही महिन्यांपासून लक्षात येतंय. "आता होऊ दे धिंगाणा" या कार्यक्रमात त्याच वाहिनीवर सुरु असलेल्या दैनंदिन मालिकांचे कलाकार भाग घेताना दिसले.
आवडत्या मालिकेतील कलाकार स्पर्धक
शनिवार, रविवारी "सुख म्हणजे नक्की काय असतं?" आणि "तुझेच मी गीत गात आहे" या मालिकेतील कलाकार उपस्थित होते. रविवारी शेवटच्या खेळात "तुझेच मी गीत गात आहे" मधल्या "इला" मॅडमना टीमच्या वतीने पैशांची थैली निवडून आणण्यासाठी पाठवण्यात आले. यात लक फॅक्टर महत्वाचा होता.
एक लाख ही सर्वोत्तम रक्कम
आत गेल्यावर इला यांनी घंटा वाजवून एक थैली उचलून बाहेर आणली. त्या थैलीतून किती रक्कम निघते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. "एक लाख" ही सर्वोत्तम रक्कम असल्याने तीच मिळावी यासाठी टीमने फिंगर क्रॉस केले होते.
प्रॉपर्टीवाल्याची चूक की आणखी कोणाची?
नेहमीच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी पॉज घेत घेत उत्सुकता ताणून धरली. काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर "इला" यांनी म्हणजेच तुझेच मी गीत गात आहे च्या टीमने "एक लाख रुपये" जिंकल्याचे जाहीर केले.
थैलीतून एक सोनेरी रंगाचा बोर्ड बाहेर काढून तो सर्व प्रेक्षकांना दाखवला आणि तिथेच गडबड झाली.
त्या बोर्डवर लिहिलेली रक्कम ही एक लाख नसून #दहा_लाख आहे.
आता सर्वसामान्य प्रेक्षकांचा प्रश्न हा आहे की, हा चुकीचा धिंगाणा कोणी घातला? तोंडाने एक लाख सांगून दहा लाखांचा बोर्ड दाखवणे ही चूक स्टार प्रवाह मान्य करणार आहे का? आणि केलीच तर कशाप्रकारे?
सगळ्यात महत्त्वाचे हे आहे की, स्टार प्रवाहकडून आता अशा चुकांची अपेक्षा करावी का?
तुम्हांला हे ही वाचायला आवडेल 👇
फोटो साभार- स्टार प्रवाह वाहिनी (स्क्रीनशॉट)
© Velvet Kavisha ✍️
सदर लेखाचे अधिकार सौ. वर्षा विशाल ठुकरुल यांच्याकडे राखीव आहेत. त्या Velvet Kavisha या टोपणनावाने लिहितात. लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह करावा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.









0 Comments
Please do not enter any spam link in the comment box