खरे प्रेम...
'राधा ...ए राधा..' मोहन ह्ऱदयापासून साद घालत होता...आणि दुसऱ्याच मिनीटाला त्याचे डोळे कुणितरी मागुन येऊन दाबले..क्षणात तीचा मनमोहक गंध त्याच्या मनाला स्पर्शून गेला..त्याची कळी खुलली...हाच तो राधेचा गंध..ती मागुन येऊन हसतच त्याला चिडवत होती...त्याने पटकन तिचे हात काढुन तिला पुढ्यात उभे केले...आणि समोर एखाद्या सुंदर कलाकृतीला पहावे तसे त्याचे नेत्र चमकले...ती सुस्नात होती..न्हायल्यामुळे केसांना टॉवेल होता आणि सुंदर इरकल घातलेली ती....मुळातच तिचा गौर रंग ,न्हायल्यामुळे केसांच्या समोर आलेल्या बटा..उफ्फ ही अदा जीवघेणी...मोहन ही पुढे काय बोलायचंय हे विसरूनच गेला..ती खट्याळपणे त्याची छेड काढत हसतच राहिली...तो वेड्यासारखा तिला नुसता बघतच बसला..
मोहनने पुढच्याच मिनीटाला तिला जवळ ओढले व ओठांनी तिच्या ओठांशी सलगी करत मनीचे भाव मोकळे केले..ती चंचलपणे त्याच्या मिठीतून सुटण्याचा अविरत प्रयत्न करत राहिली पण तो आज वेगळ्याच रंगात होता..तिला आज कुठेही दूर जाऊ द्यायचे नाही व असंच प्रेम करत रहायचं असं त्याने ठरवलं होतं..तीचा प्रतिकार क्षीण झाला व मग हलकेच आपल्या प्रियावर चुंबनाचा वर्षाव करू लागली...त्याने हसतच तिला दोन्ही हातांवर उचलले व आपल्या बेडरूममध्ये आणले..'आज आपले काही खरे नाही' हे राधेच्या मनात आलेच...तीचीही कळी खुलली...लग्न झाल्यापासून मोहनच्या प्रेमात ती अशीच नहात होती...भरगच्च प्रेम!!!ती सुखावून गेली होती...
आज तर प्रणयातुर सख्याने तिचे अंगन्अंग झंकारावे अशी जादू केली...तिला प्रेमाच्या जादूभऱ्या रंगांनी चिंब चिंब केले..पश्चिमेला चंद्र चांदण्यांची चाहुल दोघांना अजुनच सुखावत राहिली...त्याच्या सावळ्या बाहूत तिची कोवळी मुर्ती जणू सोन्याच्या अंगठीत हिरा चमकावा तशी चमकत होती..ती व तो खिडकीजवळ आले..तेथे वाहणारा गार वारा मिलनातील गोडवा वाढवत होती..अजुनही तो प्रणयाचा माहौल निवळला नव्हता..रात्रभर ती व तो, कृष्ण राधेच्या मधुर मिलनात दंग होते...
हळूहळू दिवस जात होते. ते दोघेही एकमेकांवर
लैला मजनुसारखे जिवापाड प्रेम करत होते..अन् एक दिवस..
सकाळ झाली नी सहजच राधा फेसबुकची फ्रेंडलीस्ट बघत होती...अन् तीची नजर एका प्रोफाईलवर गेली...क्षणात ती भुतकाळात बुडाली...डोळ्यात हळवे अश्रू जमा झाले..क्षणभरात तिचा भूतकाळ झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेला...तीला फेसबूकमध्ये अनिशची प्रोफाईल दिसली... तो तिचं पहिलं वहिलं प्रेम होता.राधा कॉलेजमध्ये असतांना त्याच्या प्रेमात पडली होती.तो खरंतर तिच्या कॉलेजमधला मुलगा नव्हताच. तो लांबचा तिचा नातेवाईक होता.ती कळत नकळत त्याच्या प्रेमात गुंतत गेली.राधा दिसायला अत्यंत देखणी, गोरीपान, नाजूक आणि हुशार! Beauty with Brain म्हणतात तशी! अनिश दिसायला फारसा सुंदर नसला तरी अतिशय हुशार नी विनोदी स्वभावाचा होता.त्याच्या हजरजबाबी विनोदी स्वभावाच्या ती प्रेमात पडली होती.
तोही लहानपणापासून तिच्या कॉलनीत यायचा.त्याचे नातलग तिच्याच कॉलनीत रहायचे.तो मिश्किल स्वभावाचा होता म्हणून ती जरा लांबूनच गप्पात सहभागी असायची.पण एक दिवस त्याने तीचा फोन नंबर घेतला.ती अन् तो आता तासन्तास गप्पात रमू लागले.तो नागपुरात चांगली नोकरी करू लागला.तिही कॉलेजमध्ये नाव कमवत होती.त्याचा स्वभाव उनाड,मस्तीखोर तरिही पुस्तक वाचण्याची आवड, माणसात रमण्याचा स्वभाव तसेच नुकतेच इंटरनेटच्या जगाची ओळख झालेली असतांना त्यातही मास्टरी असणारा तो तिला नकळत फार फार आवडून गेला.त्याचं खळखळून हसणं, कौतूक करणं, मनापासून समोरच्याला मान देणं, तीला त्याच्या अनेक पैलूंचा लांबूनच अंदाज आला होता..
नंतर राधा कॉलेजमधून पुढे ती पुण्यात जॉब करू लागली..तेंव्हा नुकताच तिला तिच्या बाबांनी पहिला नोकीयाचा मोबाईल घेऊन दिला होता.मग काय ती नेहमी त्याच्या फोनची वाट पहायची..तोही दिलखूलास चर्चा करून परत बरेच दिवस तिला फारशे फोन न करता मेसेज करायचा.त्यांचं मेसेजिंग चॅट बरंच चालायचं..ही गोष्ट हळूहळू तिच्या मैत्रिणींना समजली नंतर ऑफिसमध्येही सगळे चिडवू लागले होते.ती मनातुन हरखून गेली होती.पण तीला त्याची एक गोष्ट खटकत होती की तो इतर बऱ्याच गप्पा मारायचा पण प्रेम किंवा तत्सम कुठल्याच गोष्टीबद्दल कधी बोलत नसे.जणू आपण फक्त मित्र आहोत असं भासवून तिला आपल्यात गुंतवत होता.
ती स्वभावाने अतिशय साधी सरळ सुस्वभावी मुलगी होती.पण त्याचे
दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळेच होते.तो इंजिनीअरींग करतांना अनेक लफडी करणारा,
प्लानचिटसारखे टुकार उद्योग करणारा , कॉलेजमध्ये अतिशय असभ्य वागणारा मुलगा होता हे
राधाला फार फार उशीरा कळलं.तेंव्हा वेळ निघुन गेली होती.ती नोकरी करत असतांनाच त्याच्या
प्रेमात वेडी झाली.नको तितकी गुंतली.तो मात्र तिची मजा घेत राहीला.
एक दिवस तिने आपल्या मनातलं त्याला सांगायचं ठरवलं..हो ती त्याला प्रपोज करणार
होती.तिने त्याला फोन लावला..तिच्या काळजात विलक्षण धडधडत होतं..त्याने फोन उचलला..नेहमीप्रमाणे
तो बोलत होता..
ती- ऐक ना..मला तुला काहितरी सांगायचंय..
तो-
बोल नं..काय सांगायचंय...
खरं
म्हणजे त्याला अंदाजा होताच..पण तो नाटक करत होता.
ती- I love you अनिश..
तो- काय? परत बोल.
ती-
मी तुझ्यावर प्रेम करते...
ती बोलतांना आवंढे गिळून बोलत होती..थरथरत होती.ही
तिची पहिलीच वेळ..प्रेमात पडण्याची..
तो..अच्छा...
ती-
तुझंही माझ्यावर प्रेम आहे नं?
तो- अं ...हो आहे तसंच काहीसं पण मी सांगेन तुला नक्की
काय ते..अशी उडवाउडवी करत त्याने तिला बाय म्हंटले.
ती
मनापासून त्याच्या प्रेमात असल्यामुळे त्याचे वागणे तिच्या लक्षातच आले नाही..कि तो
फक्त सेक्स या एका अपेक्षेने तिच्याकडे पहात होता...प्रेम करणे,लग्न करणे हा त्याचा उद्देश नव्हताच..ती मात्र मनापासून प्रेम, लग्न
अश्या सुखस्वप्नात गुंतली होती..नशिब तिने त्याच्याशी आतापर्यंत कोणतेही शारीरीक संबंध
ठेवले नव्हते. ती पवित्र मनाने त्याच्यावर प्रेम करत होती.
राधेच्या घरी तीने तिचं मत घरच्यांना सांगितलं...कोणाही नकार दिला नाही..रितसर
तिच्या बाबांनी त्याच्या घरच्यांना लग्नाबाबत विचारलं..पण अनिशने त्यांना परस्पर "मी
इंटरेस्टेड नाही" असं सांगून प्रकरण गंभीर करून टाकलं...राधा ओक्साबोक्शी रडली..मनातून
संपली..तिला कितीतरी दिवस मानसोपचार तज्ञांची गरज पडली..तिची अवस्था दिशाहीन पाखरासारखी
झाली..किती सुंदर, तरल स्वप्न तिने रंगवले होते..तो अन् ती...
पण
तिला दुःख पचवता येत नव्हते..वर्ष जात राहिली..ती या दुःसह दुखण्यातुन खंगत गेली..४
वर्षांनी तिचे लग्न ठरले पण तेही या तिच्या आजारामुळे मोडले..ती अजुनच कोलमडली..तिच्या
सोबतीला मैत्रिणीही कोणी फारशा नव्हत्या..एक श्यामाच होती तिला सावरणारी, हसवणारी...पुन्हा
तिला माणसात आणनारी..श्यामाने तिला नवसंजीवनी दिली..परत राधाला माणसात आणून तिचे कलागूण,
तिची बुद्धिमत्ता , तिचे कौतूक करणारी श्यामा राधेला परत हुशारी आली..ती पुन्हा जगू
लागली...कधीमधी त्याच्या आठवणींनी अश्रू गाळत ती येणारा दिवस घालवत होती.
पण आता तिला कळून चुकले की त्याने परत कधिही
तिच्या विश्वात डोकावून पाहिले नाही..तो पूर्णपणे तिच्यापासून दूर निघून गेला..
एक
दिवस तिला कळले की तो एका नागपूरच्याच मुलीशी लग्न करून परदेशात स्थायिक झाला.. कायमचाच!
ती यावेळी मात्र झणझणीत अंजन डोळ्यात पडल्यावर जसा माणूस जागा होतो तशी ती पूर्णपणे
शुद्धीवर आली.ती पुण्यात असतांना नशिब त्याने तिच्याशी कुठलेही शारिरीक संबंध ठेवले
नव्हते नसता राधा जिवंतच राहिली नसती हे तिला
आता कळले..म्हणजे ती ज्याला प्रेम समजत होती ते त्याच्या दृष्टीने आकर्षण होते व तो
अनेक मुलींना नादाला लावून संभोगातच सर्व सुख समजून हजार लफडी करत होता..पण हे सगळं
कळायला तिला उशीरच झाला...तोपर्यंत तिच्या आयुष्याची वाताहात होऊन गेली..खोट्या व्यक्तीवर
प्रेम केलं...तो चतुर , स्वार्थी ,ढोंगी,चारित्रहीन माणूस निघाला..
राधेला डोळ्यात अश्रू दाटले.पुढे मोहनच्या हाती हात देऊन सप्तपदी चालतांना तिला
जाणवले की सगळे पुरूष जात सारखी नाही..राधेचा आजार माहीत असुनही तिला खंबीर साथ देणारा
मोहन तिला खूप आश्वासक वाटला..ती सुखावली..प्रेम यालाच तर म्हणतात...जगात अत्यंत जखमांनी
विव्हळणाऱ्या व्यक्तीला प्रेमाने, विश्वासाने
साथ देऊन परत जगायला लावणे हेच तर खरे प्रेम..ती काळजी , तो विश्वास तीला मोहनच्या रूपात देवाने देऊ केला...जे प्रेम
मिळवण्यासाठी तिने अनिशच्या बाबतीत जीवाची ससेहोलपट करून घेतली तेच प्रेम मोहनने अगदी
सहज तिला देऊ केले..तो मुक्तपणे तीला स्विकारून तीला आपल्या विश्वासाने, मायेने प्रेम
करत होता..
राधा
तिच्या आयुष्यात सुरू झालेल्या या नव्या पर्वाला हसतच सामोरे गेली..त्याला कारण मोहनचा
प्रेमळ स्वभाव! राधाची खऱ्या प्रेमाची गोड प्यास मोहनने शांत केली होती..राधा व मोहन
हे वेगळे तनाने पण मनाने एकरूप झाले..राधा मोहनच्या स्वभावात व प्रेमळ वागणुकीमुळे
जुने ते सारे विसरून गेली...ती विसरून गेली की तिचाही काही भूतकाळ आहे जो अत्यंत दुःखद
आहे..
राधेच्या
स्वप्नपंखी आयुष्यात मोहनने सुरेल तारा छेडल्या होत्या.ती रडणे विसरली होती..आणि आता
तर त्यांच्या घरी गोड चिमुकला पाहुणा येणार होता...ती गरोदर होती..तीला दर दिवसागणिक
मोहनचे भरपूर प्रेम लाभले..तो तिची मनापासून काळजी घेत होता..अन् ते सुख तिच्या पदरात
पडले..राधेला पहिला मुलगा झाला त्याचे नाव ठेवले रोहन..राधा व मोहनचा रोहन!..सारेच
सुखावले..राधा नविन संसारात गुंतली..हळूहळू मागचे विसरून गेली..मोहन मोठ्या पदावर काम
करत असल्यामुळे त्याचा दिवस व्यस्तच असे..राधा घरकामात गुंतली व मुलाच्या शिक्षणात गुंतली होती..अन् अचानक एक
दिवस..
"राधा, ए राधा , हे बघ आपल्या कंपनीला मोठी ऑर्डर आलीये परदेशातुन".
" अरे वा , हो का, अभिनंदन मोहन" राधा सुखावली.
मोहनने तिला उचललेच.ती व छोटा रोहन व सगळे घर आनंदून गेले..ही बिजनेस डील मोहनला
बिजनेससाठी माईलस्टोन वाटत होती.. राधेने देवासमोर साखर ठेवली व पेढ्याने दोघांचेही
तोंड गोड केले.
रात्री जेवतांना सहजच त्याने बोलता बोलता सांगितले की तो ज्यांच्यासोबत काम
करणार आहे ती कंपनी जर्मनीची आहे व एक महिन्यासाठी त्याला तिकडे जावं लागणार आहे..राधा
नाराज झाली..मीही तिकडे येते असा तिने हट्टच धरला..मोहनने अखेर तयारी दर्शवली व राधा व रोहन त्याच्यासोबत जर्मनीला रवाना झाले..
पुढिल
आठवडाभरातच तो कामात बुडून गेला..राधा व रोहन बाहेर फार पडतच नव्हते..एक दिवस राधेच्या
घरी बिजनेस पार्टी ठरली होती.मोहनचे मित्र व पार्टनर्स त्यात सहभागी होणार होते..राधा
सकाळपासून कामात मग्न होती..दारावर बेल वाजली..मोहनने दार उघडले..हळूहळू त्याचे मित्र
व पार्टनर्स यायला सुरवात झाली..राधा मस्त भारतीय पोशाखात साडीत सुहास्य वदनाने बाहेर
आली..अन् ती क्षणात अवघडून गेली ..परत तोच समोर..हो तोच अनिश..अनिश सदावर्ते..राधा
चेहऱ्यावर काहीच न दाखवता सगळ्यांशी हसून बोलली.मोहनने सर्वांशी तिची ओळख करून दिली..अनिश
मनातुन चांगलाच चपापला..बाहेरून तिचे व्यक्तीमत्व पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटली..आपण
या मुलीला फसवलं हे त्याला परत आठवलं..
पार्टी
चांगली झाली व सगळे घरी गेले.राधा आता कोलमडली नाही की दुखावलीही नाही तर तिला काहीच
वाटले नाही..केवळ ती त्याच्या येण्याने अवघडली पण दुःखी झाली नाही.कारण,राधाने
मोहनकडूनच आनंदी जगण्याची गुरूकिल्ली मिळवली होती..
राधाने रात्री योग्य मूडबघून मोहनला तिच्या
पुर्वायुष्याबद्दल व अनिशबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकलं..मध्ये २ क्षण शांतता पसरली..मोहन
नाराज दिसत होता..त्याने रागावून राधेकडे पाहिलं..राधा थंडगार पडली..आता पुढे काय होणार
म्हणून कासाविस झाली..
मोहन
रागावून म्हणाला," हेच का तुझे माझ्यावरचे प्रेम राधा..अगं हे सगळं तू मला कधिच
का नाही बोललीस?" राधा बावरली.
" मी ते सगळं विसरलेच होते. तुझ्या आयुष्यात
येण्यामुळे मी आनंदी बनले. मी खऱ्या कृष्णाची राधा बनले.तो तर स्वार्थी, मतलबी पुरूष
होता.."
राधेच्या डोळ्यात पाणी दाटले. मग मात्र मोहनचा
धीर सुटला हसतच तिला मिठीत घेत म्हणाला ,
"अगं वेडे, तूला ओळखूनच मी तुझ्या प्रेमात पडलो..अनिशच्या प्रेमात तू वेडी झाली
होतीस हे मला माहीत नव्हते.तो माझा बिजनेस मित्र आहे पण हे सगळे मला माहीत नव्हते.
जर आधी तुला ओळखत असतो ना तर त्याला फोडून काढलं असतं..राधा जे झालं त्यात तुझी काहीच
चुक नव्हती.मी तुला खूप चांगलं ओळखतो राधा.तू तर फक्त माझीए.. फक्त माझी..मोहनकी राधा"
अन् राधेच्या डोळ्यातून खळ्ळकन् अश्रू ओघळले..राधाचा
मोहन तिचाच आहे हे तिला परत एकदा कळाले..त्याच्या प्रेमामुळे ती कृतार्थ झाली..तृप्त
झाली..
सौ. स्वरूपा कुलकर्णी
disclaimer :
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.

4 Comments
खुप छान लेख आहे
ReplyDeleteधन्यवाद
Deleteचांगली कथा आहे 👌👌
ReplyDeleteधन्यवाद
DeletePlease do not enter any spam link in the comment box