शिर्षक - मनानुबंध
मोहिनी लिमये, बदलापूर
ती रोज सकाळी ९ . ३० च्या बससाठी बस स्टॉपवर उभी असायची . अगदी रोज नियमाने माझ्या आधीच . दोघेही एकाच बसने ऑफिसला जात होतो . तीच ते दिसण असण रोज नव्याने बहरावे असे कॉटनचीच साडी टुबाय टु चे ब्लाऊज अगदी चपखल आणि अतिशय सुबकतेने नेसलेली कुठेही ना पदर हललेला ना निरी हललेली.
मला रोज वाटत असे की आपण बोलावे पण धीर होत नसे . तशी ती एकदच सरळ स्वतःतच
रमलेली . असेल एक २६/२७ ची फार वय नसाव .
एक दिवस मी बसस्टॉपवर पोहोचलो पण ती दिसली नाही . मन चलबिचल झाल . का बर
आली नसावी? अनेक विविध विचार मनात येऊ लागले . आणि बस आणि ती एकदमच समोर आल्या .
ती पटकन बस मधे चढली . हुश्य .. आज मात्र मी थोडा बोलण्याचा धीर केला .
आज उशीर झाला काही अडचण होती का ? नेहमी वेळेआधी येता म्हणून विचारले
हं
ती :- हलकीशी हसत . अडचण अशी नाही निघाले आणि नेमकी चप्पल तुटली .
मी :- ओहो मग
ती :- थोड चालत आल्यावर चप्पल शिवणारा होता तिथपर्यंत आले कशितरी मग तिथे
त्याच काम चालु होते थांबावे लागले थोडा वेळ गेला त्यामुळे उशीर .. वाटत होत ही बस
मिळते की नाही . पण मिळाली .
मी :- बरच झाल ना ऑफिसला लेट व्हायला नको .
ती :- हं
बस बिघाली तिला खिडकीतील जागा मिळाली . मी उभाच होतो . एका हाताच कोपर
खिडकीवर आणि मुठ हनुवटी वर ठेवुन खिडकी बाहेर अगदी निरागसपणे पहात होती . वाऱ्यावर
तिचे रेशमी केसांची बट उडत होती . मला मात्र पाहतांना खूप आनंद वाटत होता .
असेच जवळपास तीनेक महिने आम्ही एकत्र जात होतो . ती तशी निर्मळ आणि शांतच .
एक दिवस मीच धीराने विचारले ऑफिस किती वाजता सुटत ?
ती :- कधी ६ कधी ७ कामं उरकूनच निघते .
मी :- ok ok सहजच विचारले . आपण एखाद्या संध्याकाळी एकत्र कॉफी घ्यायला जाऊ
शकतो का ? म्हणजे तुमची इच्छा असेल तरच हं मी थोडेसे हसतच बोललो .
ती :- हं उद्या सांगते ह मी तुम्हाला.
मी :- हो हो काहीही हरकत नाही तुम्हाला वेळ असेल तेंव्हाच No problem
मी मनातून मात्र खूप आनंदलो होतो .
दोन दिवसांनी बस मधे चढतांना ती स्वताहूनच म्हणाली . आज मी साडेपाच
वाजताच निघणार आहे . परवा तुम्ही म्हणाला होतात ते .
मी :- ok मीही तेंव्हाच निघतो सहा वाजेपर्यंत कॉफी हाऊस च्या इथे
भेटुयात चालेल ना ?
ती :- हो ठीक आहे .
ठरल्याप्रमाणे सव्वासहा वाजता मी कॉफी हाऊसला पोहोचलो .
ती अगदी बसस्टॉपवर उभी असते तशीच खांद्यावर पर्स घेऊन उभी होती . मनात शंका
होती की ही दरवेळी आपल्या आधीच कशी पोहोचलेली असते ?
मी :- हॅलो सॉरी थोडा उशीरच झाला मला .
ती :- नाही नाही हरकत नाही . मला वेळेवर पोहोचण्याची सवय आहे .
तिच्या सवय आहे ह्या ह्या वाक्यावरुन मात्र मी थोडा चरकलो . आपण चुकीच्या
वळणावर तर जात नाही आहोत ना :
दोघे आत गेलो . दोन चेअरच एकच टेबल खाली होत . दोघे समोरासमोर बसलो . ही
आमची तशी थेट समोरासमोर येण्याची पहिलीच वेळ .
तिची मान खालीच होती . मीच विचारले its ok ना काही problem नाही ना ?
ती :- नाही हो छे काहीच नाही . बोला ना तुम्ही .
मी :- तुम्ही समोर न पहाता खाली मान घालुन बसलात म्हणून विचारले . असे बसले
तर बोलणार कसे ना ? मी जरा हसतच बोललो .
ती माझ्याकडे पहात . नाही हो तसे काही नाही मी मात्र क्षणभर तिच्याकडे
तिच्या डोळ्यांकडे पहातच राहिलो . क्षणात भानावर आलो .
मी :- काय ऑर्डर करुया ?
ती :- only coffee .
मी :- ok
वेटरला २ coffee pls
दोघेही मौनच मग मीच विचारले . जॉब कसा चालू आहे ?
ती :- ठीक आहे रुटिन वर्किंग
मी:- हं सगळ्यांच तेच आहे रोज जा या कामे करा . आपल नाव सांगाल का ? म्हणजे
माहिती असाव म्हणून हं
ती :- संध्या
मी :- सुंदर खरच खूप छान नाव आहे तुम्हाला शोभेल अस. माझ सागर .
ती :- तुमचेही नाव छानच आहे की अथांग अविरत संतत
गप्पा मारत राहिलो इतक्यात कॉफी आली .
दोघांनी एकमेकांकडे पहात कॉफी घेतली आणि निघालो .
नेहमीप्रमाणेरोजचे बसने जाणेयेणे अधूनमधून थोडेसे बोलणे होत असे . पण ती
मात्र स्वतःतच मग्न असते हरवल्यासारखी . काहीतरी गुढ असाव नक्की जे ती मोकळेपणाने
बोलू शकत नाही आहे . आपल्यालाच बोलते करावे लागणार आहे असे सतत वाटत असे पण ते कसे
ते मात्र समजत नव्हते .
आम्ही दोघे कॉफीसाठी भेटलो होतो त्याला जवळपास एक महिना उलटून गेला होता
.
आज मात्र मी निस्चयच केला होता की संध्याकाळी भेटण्याबद्दल बोलावे .
सकाळी सकाळी दिसणारा प्रसन्न चेहरा समोर दिसला . बस यायला थोडा वेळ होता .
मी तिच्या जवळ गेलो आणि जरासे खाकरतच बोलायला सुरुवात केली .
मी :- आज बस जरा लेटच झाल्ये ना ?
ती स्वतःतच मग्न होती पटकन माझ्याकडे पहात म्हणाली .
ती :- हो ना त्यामुळे आज पोहोचायलाही लेट होणार
मी :- आणि म संध्याकाळी निघायलाही लेट होणार
ती गालातल्या गालात हसली .
आणि बस आली आम्ही दोघेही पटकन बस मधे चढलो . आज नेमकी दोघांना आजूबाजूलाच
सीट मिळाली बसायला . साधारण अर्ध्या तासाचा प्रवास असा एकत्र बाजुला बसुन . मनातून
सुखावतो होतो मी .
मग मी बोललोच .
आज संध्याकाळी चौपाटीवर भेटुया का ? एक महिना होऊन गेला ना कॉफी पीऊन आज
जरा भेळ .
कसतरी धीराने बोललो होतो .
ती :- .... हं कळवते मी तुम्हाला
हे आपले नेहमीचेच ठरलेले उत्तर .
बरोबर पाच वाजता तीचा फोन आला . साडेपाच पर्यंत निघते मी येते चौपाटीवर सहा
सव्वासहा पर्यंत .
मी अचंबित काय बोलावे तेच कळेना .
ती :- हॅलो हॅलो ऐकताय ना ?
मी :- हो हो हो ठीक आहे पोचतो मी पण .
आज मी पक्क ठरवलेल की आज आपणच आधी पोचायचे . पण नेमके टॅफिक ने लोचा
केला . सगळे लक्ष घड्याळाकडे होते . पावणेसहा वाजले होते . मी बरोबर सहा वाजून पाच
मिनिटांनी पोहोचलो . पहातो तर काय .. समोरील सुर्यबिंबाकडे पहात ती वाळूत रेघोट्या
मारीत बसली होती . आज तीने नेसलेली रेशमी झुळझुळीत साडी त्या सुर्यप्रकाशात जास्तच
चमकत होती . मी तिच्या बाजूला जाऊन बसलो ( थोडे अंतर राखूनच )
मी :- Hello
ती :- Hi
मी :- कधीही कुठेही माझ्या येण्यापूर्वीच कशी काय पोचतेस ग तु ( संध्या )
मला आधी पोचण्याची संधीच देत नाहीस .. हाहाहा ..
ती :- वेळ काटेकोरपणे न पाळल्यामुळे नियतीने माझ्याशी एक खेळ खेळला आहे . त्यादिवसापासून
वेळ हा शब्द मी चांगलाच आत्मसात केला आहे .
मी चपापलो आपण उगाचच अस बोलून गेलो असे वाटले .
मी :- sorry मी आपल मजेत बोलुन गेलो खरच sorry .
ती :- Its ok
मी :- नक्की काय घडले तुला आवडणार असेल तर सांग .
ती :- झाली त्या गोष्टीला पाच वर्ष .
मी :- बर मी आपल्यासाठी भेळ घेऊन येतो पटकन ती खात खात बोलुयात चालेल ना ?
मी पटकन जाऊन भेळ घेऊन आलो . तिच्या हातात देत हं घ्या - आता बोला .
ती :- काय आणि कस बोलू सारा नियतीचा खेळ आहे . ती गोष्ट घडली त्याच्या
बरोबर दोन वर्ष आधी आमचे लग्न झाले होते . प्रेमविवाह होता आमचा . दोघांचेही
एकमेकांवर नितांत प्रेम . खूप छान संसार सूरु झाला होता कुणाचीही कुठलीही आडकाठी न
येता .
मी :- हं
ती :- तो सैन्यात होता आणि मी आत्ता आहे त्याच ऑफिस मधे . त्यादिवशी
तो सुट्टीवर घरी येणार होता . माझ ऑफिस सीएसटी स्टेशन पासून जवळच असल्यामुळे तो
मला सीएसटी स्टेशनवरच भेटणार होता आणि मग आम्ही दोघे एकत्र घरी जायचे असे ठरवले
होते . ठरल्याप्रमाणे त्याच्या वेळेवर तो तर स्टेशनवर आला होता . पण मला माझ्या
ऑफिसच्या कामाच्या गडबडीत तिथे पोहोचायला अर्धातास उशीर झाला होता . मी पोहोचले तर
तो माझी वाटच पहात बसला होता . तिथेच त्याने मला मिठीत घेतले . तो म्हणाला किती
वाट पहायला लावलीस ग ह्या प्रेमिकाला ..
मी :- sorry म्हणून त्याच्या गालाच चुंबन घेतल . त्याने मला जवळ घेतले
हातात हात घेतला आणि तो मला म्हणाला किती प्रेम करतेस ग माझ्यावर ? मी म्हटले तू
करतोस ना तेवढेच रे जास्त नाही करणार हो .
नको करुस इतके प्रेम अग नी सैन्यात आहे आणि हे ठाऊक असतांनाही तू माझ्याशी
लग्न केल आहेस . पण आमच्या आयुष्याचे काही खरे नसते ग . आणि हे मला आत्ता
लग्नानंतर तुझ्यापासून जवळपास दोन वर्ष लांब होतो ना तेंव्हा प्रकर्षाने जाणवले बघ
.
मी म्हटल हं पण आता आपण घरी जायचे की इथेच रात्र काढायची आहे ..
तो म्हणाला घरी जायचेच आहे ग पण मला बोलुदे घरी गेल्यावर कदाचित बोलायचे
राहून जाईल .
तर जर का मला कुठल्याही युद्धात मृत्यू आलाच तू पुन्हां लग्न कर नव्याने
आयुष्य सूरु कर .
पण त्याला हे माहिती नसावे का की मी त्याच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसऱ्या
कुणाचा विचारही माझ्या मनाला शिवू शकत नाही .
मी :- आज हे काय असे बोलणे रे मस्त आलायस ते दिवस आनंदात घालवूया की . चल
असल काहीतरी अभद्र बोलु नकोस .
तो म्हणाला मला आत्ताच्या आत्ता वचन हवय तुझ्याकडून . असे म्हणत त्याने
त्याच्या हाताची पकड जास्तच घट्ट केली आणि मला मिठीत घेऊन . म्हणाला जोपर्यंत तू
हो म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही .
आणि तो हल्ला गोळीबार बाहेर सूरु झाला होता . ते आम्हांला आधी समजलेच
नव्हते आणि बरोबर त्याच्या पाठीमागून धाडधाड गोळ्या आल्या आणि त्यातील तीन गोळ्या
त्याच्या पाठीत घुसल्या . आणि त्याने माझा धरलेला हातमाझ्या हातातून सुटला
.
मी बावरले घाबरले त्याची मान माझ्या खांद्यावर विसावली होती . मी स्तब्ध
डोळ्यात अश्रूही येईनात मनात विचार मात्र येत होते . त्याला आधीच कळले होते की काय
की त्याचा मृत्यू जवळ आला आहे . तो इथेच इतक्या हट्टाने माझ्याशी सर्वकाही बोलत
होता . नानाविध विचार मनात कल्लोळ करीत होते त्यामुळे आजूबाजूला चाललेला गोळीबार
आणि परिस्थिती मला काहीही ऐकू येत नव्हते . ऐकू येत होते ते त्याचे शब्द
पुन्हापुन्हा तेच शब्द सर्वकाही संपले होते . आणि त्याने नकळत माझ्याकडून अलगदपणे
वचन घेतले होते . पण त्याला ह्याची जाणीव होती नव्हती माहिती नाही पण मी मात्र
त्याची जागा कोणालाही देऊ शकत नाही हे तितकेच सत्य आहे . त्याच्या आठवणी त्याचा तो
शेवटच्या क्षणी माझ्या हातात असलेला हात आणि माझ्या खांद्यावर ठेवलेली मान आजही
माझ्या सोबत आहे आणि सदैव असणार आहे . माझ्यासाठी इतकेही पुरेसे आहे .
मग मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले . मी निशब्द .. पाचेक मिनिटे
दोघेही शांतच .
ती :- आणि म्हणूनच मला वेळ काटेकोरपणे पाळणे वेळेपूर्वी पोचणे फार महत्वाचे
वाटत आहे . त्यावेळी कदाचित मी अर्धातास उशीरा पोचले नसते तर आम्ही दोघेही
स्टेशनवरुन लवकर निघालो असतो . आणि तो आजही माझ्या सोबत असता .
निघुयात का आता आपण भेळही संपली आहे आणि माझी दुर्दैवी कहाणीही .
मी :- हो निघुयात पण फक्त पाचच मिनिटे थांबशील ?
ती :- हो पण फक्त पाचच मिनिटे.
मी :- खूप विदारक दुख: आहे हे आणि तुझे त्याच्यावर असलेले प्रेम अलौकिक
अनमोल आहे . मी फक्त एक विचारु
ती :- हो बोला ना फक्त लग्नाबद्दल बोलणे सोडून काहीही बोला .
मी :- छे छे तसा विचारही माझ्या मनाला शिवु शकत नाही . पण माझ तुझ्यावर खूप
प्रेम आहे अगदी खूप जे मी शब्दात व्यक्त करु शकत नाही . आणि तुही माझ्यावर
प्रेम कर अशी माझी आसक्तीही नाही . पण मला हे मनातले प्रेम असेच करीत राहुदेत आणि
आपली मैत्री आणि आपली मैत्री अशीच राहुदेत इतकीच अपेक्षा आहे . नेहमीप्रमाणे नंतर
सांगते विचारकरुन सांगते असे उत्तर नको आहे काय ते आज आत्ताच सांग .
ती दोन मिनिटे शांत
ती :- तुमच्या प्रेमाचा मी नक्कीच आदर करते . तुम्ही पहिल्यांदा बस स्टॉपवर
दिसल्यापासुन आजपर्यंत मी तुमचा अभ्यास केला आहे . पण ... पुढे जाऊन ह्यात तिळमात्र
बदल होणार नाही ह्याची खात्री देऊ शकाल ? म्हणजे लग्न करुयात किंवा फिजिलल
रिलेशन्स ह्या गोष्टी जर आड येणार नसतील तर मी तुमच्या ह्या निस्वार्थी प्रेमळ
मैत्रीचा स्विकार करायला तयार आहे .
मी मनोमन हर्षलो
ती :- आणि हो उद्या जर तुमचे लग्न झाले तर त्या क्षणीच आपण आपल्या मैत्रिला
पुर्णविराम द्यायचा आहे कबुल ?
मी :- लग्न ? मी लग्न करणारच नाही कारण मला फक्त तुच आवडली होतीस आणि
आवडतेस त्यामुळे तुझ्या सुखासाठी आनंदासाठी मला जे जे म्हणून करता येईल ते
करण्याचा माझा कायम प्रयत्न असेल .
ती :- पण मला अपराधी व्हायचे नाही आहे तुमच्यावर असा अन्याय करुन .
मी :- अन्याय !! न्याय अन्याय त्या वरच्यानेच केला आहे आता फक्त मला
त्याच्याकडून मिळालेला न्याय पूर्ण करायचा आहे . ती संधी फक्त तुच देऊ शकतेस .
आणि हो आजपासून मला आहो जाओ करायचे नाहीस ए सागर असेच हाक मारायचे मला
मित्र आहोत ना आपण नवरा बायको नाही .. हाहाहा ..
ती :- काय बोलावे ह्यावर मी बापडीने ..
दोघेही निघताना मनात एक नवीन आनंद आणि उभारी सोबत घेऊन निघाले .
त्यानंतर बसस्टॉपवर रोजच आणि अधूनमधून कुठेतरी कॉफी चौपाटी अशा दोन ती
महिन्यांनी भेटी होत असत .
कालांतराने मी रिटायर्ड झालो . बसस्टॉप भेट थांबली मग फोनवर बोलणे होत असे
अगदी रोज एकदातरी . दोघांचीही साठी ओलांडली होती पण मैत्री मात्र तशीच होती कायम .
आज माझा ७० वा वाढदिवस होता . आम्ही दोघांनी चौपाटीवर पहिली भेळ खाल्ली
होती त्याच ठीकाणी भेटायचे ठरवले होते . संध्याकाळी ६ वाजता .
आजमात्र आम्ही दोघेही एकाचवेळी एकमेकांच्या समोरासमोर चालत येऊन त्याच
जागेवर बसलो तिने मला विश केले आणि मला वाळुचे घड्याळ भेट म्हणून दिले .
ती :- माझ्या थोड्याफार सहवासात राहुन तुही वेळ पाळायला शिकलास . पण आता ती
वेळ कधी थांबेल आणि कोणाची आधी थांबेल ? म्हणून ही भेट दिली मी आज तुला .
आज तीने पहिल्यांदाच माझा हात हातात घेतला . ज्या स्पर्शासाठी मी आयुष्यभर
थांबलो होतो . तिने माझ्या हाताचे चुंबन घेतले . ती अलगद माझ्या मिठीत विसावली .
मी तिच्या केसांवर हात फिरवत राहिलो आणि अचानक तिच्या हाताची पकड घट्ट झाली
. तिने दिलेले वाळुचे घड्याळ थांबले होते . मीही अलगद माझी मान तिच्या खांद्यावर
ठेवुन डोळे मिटले .
सागराच्या येणाऱ्या लाटेने ते घड्याळ स्वतःकडे खेचून घेतले .
अखेरच्या श्वासासह आज माझे प्रेम जिंकले होते .
आज माझे प्रेम जिंकले होते ..
मोहिनी लिमये, बदलापूर
disclaimer

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box