स्पर्श
विशाखा कित्तुर
शकुंतला आणि निलेश याचा मुलगा संग्राम एका खेड्यात वाढलेला. पण संग्राम हुशार असल्यामुळे त्याने कॉलेजचे शिक्षण शहरात घेतले होते. पिहु त्यांच्या शेजारी राहणारी महितीतली असल्यामुळे संग्राम च्या आईने मागणी घालून लग्न लाऊन दिले होते. पिहू अतिशय सालस साधी भोळी होती तिचे शिक्षण बारावी पर्यंत झाले होते.
संग्राम ला शहरात नोकरी असल्यामुळे त्याने पुण्यात 3 Bhk चा मोठा फ्लॅट घेतला संपूर्ण सोईनियुक्त असा. काहीच कमी नव्हते, संग्राम खेड्यातला रांगडा गडी होता सिक्स प्याक्स ने तर पिहुला वेडे केले होते.
त्याची ती रोमान्स करण्याची रांगडी पद्धत सतत पुढे मागे करणे रात्र रात्र जागवणे, लाडिक लाडिक बोलणे आज सुट्टीचा मूड आहे म्हणणे मग जबरदस्ती त्याला ऑफिस ला पाठवणे हे फार रोमँटिक होते पिहू साठी. असेच मोरपंखी दिवस चालू होते रोज नवीन नवीन काहीतरी असायचेच असे करता, करता सहा महिने उलटले त्याच दरम्यान शेजारी एक जोडपे राहायला आले मेधा आणि मिलिंद. पिहुला छान सोबत झाली कारण साधारण दोघी एकाच वयाच्या होत्या.
तिचा नवरा आणि हिचा नवरा दोघेही ऑफिस ला गेले की या दोघींचा गप्पांचा फड चालायचा.
हळू हळू दोघीत घट्ट मैत्री होत गेली आणि विषय बेडरूम पर्यंत येऊन कधी पोहोचला समजलेच नाही. घट्ट मैत्री मुळे दोघी एकमेकांचे अनुभव share करू लागल्या , पिहुला इतके प्रेम आधी कधीच मिळाले नसल्याने ती आत्ता ते भरभरून अनुभवत होती त्यामुळे मेधा ला सांगताना ती इतकी तल्लीन होऊन जायची की ती काय काय सांगते याचे भानच राहत नसे आणि इथेच ठिणगी पडली.
पिहू गप्पांच्या ओघात म्हणा किंवा मेधाच्या विचरण्यामुळे म्हणा रोज काय काय घडले हे मेधाला सांगत असे. न कळत मेधा संग्राम आणि मिलिंद मध्ये तुलना करू लागली .
मिलिंद पण रोमँटिक होता त्यांचे ही छानच चालले होते पण मेधाच्या मनात संग्राम आणि पिहू बद्दल असूया वाटू लागली त्यामुळे मिलिंद चे वागणे मेधा ला खटकू लागले काहीच कारण नसताना मिलिंदशी अबोला धरणे त्याला वाट्टेल तसे बोलणे जवळ येऊ न देणे असे होऊ लागले .
बिचाऱ्या मिलिंद ला आपले काय चुकते आहे तेच कळेना लग्न होऊन वर्ष झाले किती फुलपाखरू दिवस होते अगदी पर्वापर्यंतचे ,असे अचानक काय झाले तेच कळेना तो अगदी बिचारा होऊन गेला.
मेधाला आता सारखा रांगडा संग्रामच दिसू लागला ती पिहुशी छान बोलत होती. पीहूला तर काहीच कल्पना नव्हती मेधाच्या मनात संग्राम बद्दल ओढ निर्माण झाली आहे ते
एकदा पिहू बाजारात गेली होती आणि अचानक संग्राम लवकर आला हे मेधा ने पाहिले आणि त्याला कॉफी पिण्यासाठी बोलावले दोन्ही घरचे चांगले असल्यामुळे तो ही निःसंकोचपणे पणे गेला कॉफी देताना मेधाने हळूच संग्राम च्या हाताला स्पर्श केला आणि ती थरथरली संग्रामच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही की हा स्पर्श जाणूनबुजून केलेला आहे ते इतक्यात पिहू आली आणि कॉफी घेऊन दोघेही त्यांच्या घरी गेले.
पिहू आल्यामुळे मेधा चा खुप जळफळाट झाला.
जेंव्हा पासून संग्राम चा स्पर्श झाला तेंव्हा पासून मेधा त्याला मिळवण्यासाठी पार वेडी झाली.
तिने नविन युक्त्या अवलंबायला सुरवात केली तो दिसला की ती इतकी मधाळ हसायची की समोरच्याची विकेट च जावी पण त्या बाबतीत संग्राम साधा होता पिहू एके पिहू त्या शिवाय कोणीच नाही.
तो लक्ष देत नाही म्हणतल्यावर तिचा तिळपापड होऊ लागला .
तश्यात पिहुला दिवस गेले तिचे डोहाळे इतके कडक होते की पार मार्गळून गेली .
शकुंतला आणि निलेश येऊन पिहुला घेऊन गेले .
जाताना पिहूने मेधाला संग्राम कडे लक्ष दे त्याला काय हवे नको ते पहा असे सांगून चक्क आयते कोलीतच दिले .
आता संग्राम ला कसे वश करायचे याचा मेधा विचार करू लागली
त्याला जाळ्यात ओढणे इतकाच अजेंडा होता मेधाचा.
दुसरे दिवशी मिलिंद ऑफिस ला गेला हे बघून मेधा ने संग्राम च्या फ्लॅट ची बेल वाजवली संग्राम अंघोळ करून नुकताच आला होता दार उघडतो तो समोर मेधा त्याला असे बघून मेधा अनिमिष डोळ्यांनी पाहताच राहिली
तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले कुस्त्या करून कमावलेले शरीर , बळकट बाहू पाहून त्याला घट्ट मिठी मारावी वाटली आणि त्या इराद्याने ती आत पाऊल टाकणार तोच संग्राम ने पट्कन दरवाजा लावून घेतला, थोड्यावेळाने येतो म्हणून सांगितले
तिचा नुसता तिळपापड झाला ती पार वेडीपीशी झाली ,तिचा तिच्यावर कंट्रोलच राहिला नाही घरी जाऊन तिने खुप आदळआपट केली.
इथे संग्रामच्या लक्षात आले
मेधा च्या डोळ्यात त्याला वासना दिसली होती आत्ता
त्याने मागून सगळा विचार केला कॉफी पितानाचा तो जाणून बुजून केलेला स्पर्श , तिचे ते मधाळ हसणे, हॉट ड्रेस घालून घायाळ करणे, तो दिसला की ओढणी किंवा पदर खाली पाडणे,
तो एकदम सावध झाला कारण हल्ली कायदा महिलांच्या बाजूने आहे आपण काही केलें नाही तरी उगीच बालंट यायचे इतक्यात ऑडिओ मेसेज ची रिंग वाजली त्याने ऑडिओ ऑन केला मेधाचाच होता .
तिने खुप विनवणी केली होती फक्त एकदा तिचा हो, फक्त एकदाच सेक्स कर पुन्हा कधीच त्याला ती त्रास देणार नाही असे म्हणत होती आणि खुप रोमँटिक आवाजात तो मेसेज तिने tape केला होता. समोरचा पाघळूनच जाईल.नंतर तिने तिचे नको तसे फोटो पाठवले पिहू पेक्षा मी किती सुंदर आहे एकदा बघ तरी अशी गळ घातली होती
एकतर पिहू नव्हती बरेच दिवस, त्यामुळे फोटो पाहून संग्राम पाघळू लागला काय करावे त्याला सुचेच ना समोरून इतकी जबरदस्त ऑफर होती घ्यावा का चान्स त्याची स्तिथी दोलायमान झाली
त्याला फोटोतली मेधा समोर दिसू लागली तिचा तो कमनीय देह त्याला खुणावू लागला त्याला समजत होते आपण विचार करतोय तो चुकीचा आहे पण शरीर त्याच्या ताब्यात राहिना
तो बेडरूम मधून बाहेर आला टॉवेल गुंडाळलेलाच आणि दार उघुडून पलीकडे जाणार इतक्यात त्याच्या वडिलांचा फोन आला पिहू ने मुलीला जन्म दिला आहे.
संग्राम खाडकन जमिनीवर आला त्याला त्याच्याच विचारांचा राग आला
कसे काय वाहवत गेलो त्याचे त्यालाच समजेना काय करायला निघालो होतो या विचारांनीच त्याला घाम फुटला.
मेधा ला यातून बाहेर काढले पाहिजे असे त्याला मनोमन वाटले, आणि
वेल ड्रेस करून तो बाहेर पडण्यासाठी दार उघडतो तो समोर वनपीस मध्ये मेधा पार पेटली होती तिच्यात इतका जोर होता की दार उघडल्या उघडल्या तिने त्याला आत ढकलून दिले आणि घट्ट मिठी मारली आणि त्याला काही कळायच्या आत आपले ओठ तिच्या ओठावर टेकवून चुंबनाचा वर्षाव सुरू करून त्याला आव्हान दिले तिचा स्पर्श आणि मिठी इतकी जबरदस्त होती की संग्राम चा तोल ढळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण संग्राम पूर्ण होश मध्ये होता त्याने तिला एक मुस्काडीत दिली आणि बाहेर काढून दार लावून तो निघून गेला
मेधा स्वप्नातून जागी व्हावी तशी जागी झाली. आपण संग्रामच्या प्रेमात पडलो आहोत असे तिला वाटत होते पण ते प्रेम नसून वासना होती हे तिला जाणवले आपण काय करत होतो आपले मन आणि शरीर इतके कसे ताब्यात नाही राहिले याचा ती विचार करू लागली खुप राडावेसे वाटत होते पण रडू येत नव्हते
तिची तिलाच शरम वाटली आणि हे सगळे करून आपण मिलिंद वर एकप्रकारे अन्यायच केला याची तिला जाणीव झाली .
इकडे संग्राम ने मिलिंद चे ऑफिस गाठले .
घडला प्रकार त्याला कथन केला
तिला कोठेतरी थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जा तिला रिलॅक्स कर तिच्यावर न रागावता तिला समजवून सांग
मी होतो म्हणून दुसरे कोणी असते तर पूर्ण फायदा घेतला असता याचा विचार कर ,इतके सांगून संग्राम तिथून बाहेर पडला ऑफिस मध्ये 8 दिवसांची रजा टाकून तो लेकीला बघायला गावाकडे गेला
मिलिंद हे सगळे ऐकून फार अस्वस्थ झाला ह्या सगळ्या नादात मेधा ने मिलिंद ला लांब ठेवले होते त्याने समजुतीने घ्यायचे ठरवून घरी आला मेधा रडून रडून झोपली होती त्याने छान कॉफी केली त्याला यातले काहीच माहीत नाही असे दर्शवले आणि आपण ट्रिप ला जातोय हे सांगून ब्याग भरायला लावली आणि महाबळेश्वर ला नेले तिला पूर्ण मोकळे होऊ दिले छान वातावरणामुळे ती रिलॅक्स झाली तिने स्वतःहून घडलेला प्रकार सांगितला आणि मिलिंद ची माफी मागितली इथून पुढे असा कोणताही प्रकार तिच्या हातून घडणार नाही हे तिने काबुल केले
आणि त्यांचा हनिमून साजरा करून ते दोघेही परत आले आल्या आल्या मिलिंद ने दुसरीकडे घर बघितले आणि पिहू परत यायच्या आत शिफ्ट केले
समाप्त
सौ विशाखा कित्तुर
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box