पैलतीरी - श्रावणी लोखंडे

पैलतीरी..

श्रावणी लोखंडे..

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या.. गाडी क्रमांक ८०१०३ दिवा - रत्नागिरी पॅसेंजर प्लॅटफॉर्म क्रमांक  सात वरून थोड्याच वेळात रवाना होत आहे..


यात्री क्रिपया ध्यान दे..गाडी संख्या ८०१०३ दिवा - रत्नागिरी पॅसेंजर प्लॅटफॉर्म क्रमांक सात से थोडीही समय मे रवाना हो रही है|

गाडी सुटण्याची अनाउन्समेंट झाली. डाव्या खांद्याची मोठी बॅग आणि हातात असलेली लगेज सांभाळत उजव्या खांद्याच्या मधे फोन अडकवून ती बोलत होती.

"अग हो माझे आई..पोचले मी स्टेशनला. ट्रेन सुटण्याची अनाउन्समेंट झाली आहे आता तू फोन ठेवलास ना तर पळत पळत जाऊन ट्रेन मधे चढेन तरी..चल ठेवते फोन." घाई घाईत कानाचा फोन काढून पर्स मधे ठेवताना तो खाली पडला..त्याला पटकन उचलून पुन्हा पर्स मधे ठेवत ती पळत निघाली.

ट्रेनच्या दरवाज्यात उभ राहून वाट बघणारा तो..
"नेव्ही ब्लू  रंगाची डेनिम..त्यावर प्लेन व्हाईट टी-शर्ट..डाव्या हाताच्या मनगटात फास्टट्रॅकचं घड्याळ.. जेल लावून सेट केलेले सिल्की केस आणि ट्रेनच्या दारात उभ राहून तिला शोधत भिरभिरणारी त्याची नजर..

अखेर ती दिसलीच..

"पिवळ्या रंगाचा सलवार कुर्ता..त्यावर गुलाबी रंगाचं बारीक नक्षीकाम केलेली ओढणी..मोकळे सोडलेले केस..एका हातात कडं आणि दुसऱ्या हातात नाजूक पट्टीच घड्याळ. ओठांना हलकेच गुलाबी रंगाची लिपस्टिक लावून लांबूनच त्याला बघत ओठांची हालचाल करून डोळे बारीक करत.. सॉरी म्हणुन मान हलवत पटापट पायऱ्या उतरणारी ती...

ती.. सौम्या..नावाप्रमाणे सौम्य..
छे हो..अजिबात नाही...नाव सौम्या असलं तरी नटखट..बडबडी..कुणाचही ऐकून न घेता..अखंड बोलत राहणारी ती..

तिच्याकडे एकटक बघणार तो.. तो म्हणजे...प्रसाद भोसले..
अगदीच सत्यनारायणाच्या प्रसादासारखा गोड..तितकाच शांत..संयमी..आणि अबोल..
बोटांवर मोजण्याइतकाच मित्र परिवार..त्याच मित्र परिवारातील एक व्यक्ती म्हणजे सौम्या..जवळची व्यक्ती म्हणायला हरकत नाही.

"सॉरी रे प्रसाद..अरे मी लवकरच निघाले होते..पण ताईची स्कूटी बंद पडली आणि रिक्षा पण मिळेना! मग काय..स्टेशन जवळच असल्याने चालत आले..चालत कसले..धावत पळत आले. त्यात मावशीने पण निघतांना एवढ्या सूचना दिल्या ना..जशी काय मी पहिल्यांदा चाललेय गावी. असो आपली सीट कोणती?" अखंड तोंडाचा पट्टा सुरूच ठेवत तिने इकडे तिकडे मान फिरवत सीट बघण्याची धडपड सुरू केली.

"सौम्या..का सीट शोधत आहेस..मी दिव्यावरून जागा पकडून आलोय!" तो म्हणाला.

"अरे हो..मी विसरलेच बघ.."
ट्रेन मधे अखंड वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता..रात्री साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान ट्रेन चिपळूणला पोहोचली.
बाबांनी रिक्षा पाठवून दिली होती म्हणून त्यामुळे  पाठवलेल्या रिक्षात बसून दोघेही सरळ घरच्या रस्त्याला वळले.

पौर्णिमेच्या चांदण्याने लक्ख प्रकाश पडला होता रस्त्यावर. वाऱ्यातला गारवा अंगाला झोंबत होता. जवळपास पाऊण तासाने दोघेपण घराजवळ उतरले.

बाबांनी पैसे आधीच दिले असल्याने फक्त बॅगा उतरवायचा होत्या. सगळे भावंडं सौम्याला बघताच ताई ताई करत बाहेर येऊन तिच्या गळ्यात पडले. प्रसाद मात्र हे सगळ बघून मनात सगळ्या आठवणी जमा करत होता.

दाराच्या उंबरठ्यापाशी जाताच सौम्या आवाज देते.
" आई..!"
सौम्याची आई औक्षणाच ताट घेऊन येते. सौम्याला हळद कुंकू लावून तिच्या पायावर पाणी टाकून भाकर तुकडा तिच्यावरून ओळवून टाकते..

घरात पाऊल ठेवताच जिकडे तिकडे तिच्या आठवणी मांडलेल्या सौम्या बघते. काजळ लावलेल्या काळ्याभोर डोळयात आसवांचे टपोरे थेंब तो नोटीस करत होता.

दारात सजलेला मांडव..सगळ्या भावंडांची मिठी..रात्रीच्या वेळी पण सगळे नातेवाईक तिच्यासाठी गात असलेली गाणी..सगळ सगळ तो बघत होता..त्याच्या मनात कुठेतरी होणारी चलबिचल मधेच गळा दाटून आणत होता.

दोघांनी रात्री जेवून घेतलं कारण दुसऱ्या दिवशी पासून तिच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार होते. त्या दोघांचा बाकी मित्र परिवार सकाळच्या गाडीने येणार होता.

दुपारचा साखरपुडा..संध्याकाळी उटण.

"प्रसाद..आता वेळ निघून गेली यार!" खांद्यावर हात ठेवत त्याचा मित्र म्हणाला.

त्याने मात्र  एक स्मित करत फक्त डोळ्यांची उघडझाप केली आणि तिथून निघून गेला.

दुसरा दिवस उजाडला. हळद लागली..नवरी हळदीने पिवळी झाली. हातावर काढलेली मेहंदी हळदीच्या पिवळ्या रंगाने आणखी गडद झाली होती.

हळदीच्या अंगाने जवळ येत दोन बोटं तिने त्याच्या गालावर उमटवली.

"मनातल्या भावना बोलला असतास तर आज चित्र वेगळं असत प्रसाद!" डोळ्यातलं पाणी गालावर कधी ओघळल तिला देखील समजल नाही. तिच्या पाठोपाठ त्यांची एक मैत्रीण येत बोलली.

"प्रसाद..वो भी तुझे बहोत चाहती थी.. मगर इतना समझाने के बावजुद तुम कभी कुछ बोल नही पाये..वो बस घरवालो के लिये खुश हे.. आगे भी खुश रहेगी..लेकीन दिलं का क्या?"

प्रसाद मात्र एकाजागी स्तब्ध होऊन फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला.

"तिसऱ्या दिवशी अखेर ती आली..लग्नाच्या मांडवात... भटजींनी सूचना दिली..'नवऱ्या मुलीला घेऊन या!'
आंबा रंगाची नऊवारी..त्यावर केसांचा आंबेडा..आबोली आणि मोगऱ्याची फुलं असलेला गजरा..नाकात नथ..असा मराठमोळा साजशृंगार करून मांडवात प्रवेश करणारी बोलकी सौम्या..खूप सुंदर दिसत होती. जणू काही आकाशातून अवतरलेली परीच भासत होती. अंतरपाटाच्या अलीकडे नवरदेवाच्या हातातल्या चाकूच्या टोकाला पकडुन मान खाली घालून उभी होती.

'शुभ मंगल..सावधान..' बोलताच
आशीर्वाद रुपी अक्षता दोघांच्याही डोक्यावर पडत होत्या.
आपल्या लेकीला नवरीच्या रुपात बघणायच घरतल्यांच स्वप्न पूर्ण झालं होत..पण आपला जोडीदार कोणी दुसराच आहे या विचाराने मात्र सौम्या मनातून कोलमडून गेली होती.

रिसेप्शन साठी जेंव्हा सौम्या तयार व्हायला गेली तेंव्हा प्रसाद तिच्या पाठी गेला.

"मला दोन मिनिट कामाचं बोलायचं होत..मी लगेच संध्याकाळच्या गाडीने निघणार आहे. थोड महत्वाचं आहे..प्लीज बोलून घेऊ का पटकन.." त्याने तिच्या करवल्यांना विनंती केली.
सौम्याने डोळ्यांनीच इशारा केला तश्या सगळ्याजणी बाहेर गेल्या.

"सौम्या..मला खरच माहित नव्हत तुझ माझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्या डोळ्यात दिसत होत ग पण खात्री नव्हती. सौम्या.. मी किती अबोल आहे तुला माहित होत तरी तू का नाही बोललीस कधी? सौम्या..बोल ना काहीतरी."

"जो मुलगा माझ्यावर असलेलं प्रेम नाही व्यक्त करू शकला तो उद्या माझ्या बाजूने स्टँड घेऊ शकला असता का? एकदा बोलला असतास ना..तर हसत हसत हो म्हणाले असते मी. माझ्या घरच्यांनी पण परवानगी दिली असती अरे.. तुला मोनिका आणि सागरनी सुद्धा माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायला सांगितल होत..तरी तु मात्र काहीच बोललास नाही..मग आज का? मी माझ्या आयुष्यात आता मुव्ह ऑन केलं आहे प्रसाद..
तु सुद्धा मुव्ह ऑन करावस..तुझासाठी असलेला हळवा कोपरा..कायम तुझा राहील. आपल्या आठवणी नेहमी मनात ताज्या राहतील प्रसाद! बराच वेळ झाला प्रसाद..आता तुला बाहेर गेलं पाहिजे." डोळ्यातलं पाणी पुसत सौम्या म्हणाली.

तो पण उलट्या पावली बाहेर निघाला. शालू नेसून जेंव्हा ती बाहेर आली तेंव्हा सगळ्या मित्रांनी तिला स्टेजवर जाऊन गिफ्ट दिलं..प्रसादने हातात हात मिळवून दोघांचही अभिनंदन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दोघांच्याही डोळ्यातलं पाणी काठापर्यंत आल होत पण प्रेमाच्या मर्यादेन त्यांना काठवरच थोपवल..हलकेच स्मित करत नेहमी सारखं दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.
प्रेम यावेळी अपूर्ण राहिल असल तरी आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती पुढे आयुष्यात आली तर तिला आपल्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नाही अस ठरवत तो परतीच्या प्रवासाला निघाला..
समाप्त
©®श्रावणी लोखंडे..

Post a Comment

0 Comments