माझ पाहिलं प्रेम
बरेच दिवस झाले श्री दगडुशेठ गणपती चे दर्शन घेतले नव्हते म्हणून मी त्या दिवशी मंदिरात गेलो. नेहमी प्रमाणे छान दर्शन झालं. बाहेर येऊन परत निघण्यासाठी वळलो आणि अचानक समोर पायल दिसली. पायल! माझ पाहिलं प्रेम; मनोमनी जपलेली मैत्रीण.
एक-दोन मिनिट ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे पहातच राहिलो. मग तिनेच कसा आहेस? म्हणुन विचारलं. मी ठीक आहे असं उत्तर दिलं. ति म्हणाली वेळ आहे तुझ्याकडे? मी म्हणालो हो. मग चल बोलता येईल अशा ठिकाणी जाऊया. मला तुला खूप काही सांगायचंय.
आम्ही मॅकडोनाल्ड ला गेलो. तिने विचारलं कॉलेज संपल्यावर कुठे गायब झालास रे तू? खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण तु काही भेटला नाही. तुझा फोन नंबर पण नव्हता माझ्याकडे. मी म्हणालो कॉलेज संपल तस पुणे गाठल. नोकरी शोधली आणि कमवायला लागलो.
पायल म्हणाली कधि आठवण आली नाही माझी? हा प्रश्न ऐकला आणि मनात धस्स झालं. या प्रश्नाचं काय आणि कस उत्तर देऊ मला कळेनाच. आली आठवण असं उत्तर दिलं. “कधी भेटला का नाहीस मग मला?” तू कॉलेज मध्ये असताना तुझं ते चोरुन पाहणं, मी येई पर्यंत वर्गात न जाणं, मी कॉलेजला आले नाही तर काळजी करण आणि मला सोडायला माझ्या घरापर्यंत मागे येणं.
मी एकदम आश्चर्यचकित झालो हे सगळं ऐकून. “बापरे म्हणजे तुला माहिती होत? मी हे अस वागतोय ते?” अरे वेड्या येतात अशा गोष्टी लक्षात आणि मलाच काय पण आपल्या सगळ्या क्लास ला माहिती होत. बापरे, तेव्हाच सॉरी आत्ता म्हणतो मी तुला. यावर जोरजोरात हसू लागली आणि म्हणाली सॉरी नको म्हणुस. मला पण आवडायचं तुझं अस वागणं. पण खंत एकच गोष्टीची वाटते तू मला कधी बोलला नाहीस. काय बोललो नाही? हेच की मी तुला आवडाचे म्हणून. मी स्मित हास्य केलं आणि शांत बसलो. बोल की आता काहीतरी.
आपण खूप वेगळे आहोत आणि एकत्र येऊ शकलो नसतो त्यामुळे मी कधी तुला बोलण्याचा किंवा मैत्री करण्याचा प्रयत्न नाही केला. नेहमी प्रेमापेक्षा जबाबदारीच महत्वाची वाटली.
अजूनही आठवतोय तुझा तो मोरपंखी ड्रेस ज्यामध्ये तू खूप छान दिसायचीस. तो ड्रेस घालून आलीस की मी तुला पाहण्याची एकही संधी सोडायचो नाही. मग ते लायब्ररी असो किंवा पार्किंग स्टँड असो. तुझ्या गोऱ्या गोऱ्या हातांवर कोपऱ्यापर्यंत काढलेली मेहंदी खूप उठून दिसायची. अशा आणि अनेक गोष्टी आहेत ज्या मी मनामध्ये जपून ठेवल्यात. ती म्हणाली तुला आठवतंय तू फाउंडेशन चा सब्जेक्ट मध्ये पाहिला आला होता आणि सगळे तुझं अभिनंदन करत होते मी पण आले होते हाथ पुढे करून तुला शेकहॅण्ड करायला पण तू लाजून हाथ जोडले होतेस माझ्यासमोर आणि बाकीच्यांसोबत शेकहॅण्ड केलं होतंस. खरतर तेव्हा मला तुझा राग आला होता. अगं मला सुचलेच नाही. तू समोर आलीस आणि अचानक हाथ पुढे केलास काही कळायच्या आत माझे हाथ जोडले गेले.
ए कसे होतो ना आपण! आता त्या गोष्टी आठवल्या की हसायला येत. तू खूप शांत, अभ्यासू आणि मितभाषी होतास. अजूनही तसाच आहेस
का? गेली १५ मिनिट आपण बोलतोय त्यावरून तुला काय वाटतंय? ती म्हणाली नाही मितभाषी नहीयेस तू. मी म्हणालो मला खूप वाटायचं तुला भेटाव, तुझ्याशी मैत्री करावी बाकी काही नाही झालं तरी मैत्रीण म्हणून तू नेहमी आयुष्यभर सोबत असावीस. पण परत मनात विचार यायचा तुला बोलायला गेलो आणि तुला ते नाही आवडलं तर? म्हणुन मग.....
अरे वेड्या एकदा प्रयत्न
तर करून बघायचास! मी ही वाट पाहत होते तू बोलशील, माझ्याशी मैत्री करशील. मलाही तितकसं
पुरे होत रे.
तुला मी तुझ्या दुकानात
काम करताना पाहिलं आहे. वर्गात पाहिलं येताना पाहिल आहे आणि मेन मुद्दा हा आहे की तुला
कसला गर्व नव्हता
तुझ्या हुशरीचा. असा मित्र सर्वांनाच हवा असतो ना. मलाही हवा होता. तुझ्या डोळ्यात नेहमी मी माझ्यासाठी प्रेम, काळजी आणि जिव्हाळा पाहिला. एका मुलीला आणखी काय हवं असत सांग ना? मान्य आहे त्यावेळी आर्थिक परिस्थिती आपली दोघांची वेगळी होती
पण माझ्यासाठी ती गोष्ट महत्त्वाची नाहीये. तू फक्त एकदा विचारायला हवं होतस अमेय. मला तू कॉलेज मध्ये असताना फॉलो करायचास ते आवडायचं. एखाद्या दिवशी तू आला नाहीस कॉलेजला तर मलाही करमत नसायचं. मी हे कधीच कुणाला कळू दिलं नाही. तुझं प्रेम तू न बोलता न सांगता तुझ्या कृतीतून व्यक्त करायचास. पण माझी वेगळीच अगतिकता होती. मला आठवतंय तुझे मित्र तुला चिडवायचे माझ्यावरून. मला माहित नाही तू त्यांना काय सांगितलं होतस माझ्या बद्दल? कि सांगितलं नव्हतस. पण माझ्याकडे तशी मैत्रीण पण नव्हती कि जिला मे हे सांगू शकले
असते. गॅदरिंग असो किंवा ट्रीप असो तू कधीच आला नाहीस. मी मात्र नेहमी या आशेने जायचे की तू येशील आणि त्यानिमित्ताने का होईना. बोलशील माझ्याशी. सेंड ऑफला मी चंद्र कोर टिकली लावून आले होते आणि तू नकळत बोलून गेला होतास चंद्र कोर छान दिसते तुला. तेव्हा पासून मी आजपर्यंत चंद्र कोर शिवाय टिकली नाही वापरत. आजही पाहिलं असशील नीट माझ्याकडे तर लक्षात आले असेल तुझ्या. निखळ प्रेम होत तुझं माझ्यावर पण; अव्यक्त!! बराच काळ लोटला आणि नंतर मलापण वाटू लागले की आपण भेटणार नाही. हे सांगत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि मी नकळत तिचे डोळे पुसले. आज मी हा तिला केलेला पाहिला स्पर्श होता. तिचे पूर्ण बोलणं ऐकून घेतल्यावर मी बोलू लागलो. मला खरंच अस वाटलं नाही की आपली मैत्री होऊ शकते प्रेम तर लांबचीच गोष्ट होती. शाळे पासून आपण सोबत आहोत आणि मला तू ८ वी पासून आवडत होतीस. तेव्हा कळतं नव्हत पण तू दिसली की छान वाटायचं. सारखं तुझ्याकडे पाहत राहावं वाटायचं. याला प्रेम किंवा आकर्षण म्हणतात हे त्यावेळी कळत नव्हत. पण जसे आपण कॉलेजला आलो आणि तू सेम कॉलेज मध्ये आहेस हे मला समजलं. तेव्हा एक वेगळाच आनंद झाला होता मला. हळू हळू काळ सरू लागला आणि ग्रॅज्युएशन संपायला आल्यावर लक्षात आले की मला तू आवडतेस आणि माझं प्रेम जडलय तुझ्यावर. एकीकडे मनाची ही अवस्था आणि दुसरीकडे घराची परिस्थिती. जबाबदारी आणि प्रेम यामध्ये काहीतरी निवडायची वेळ आल्यावर आपोआप कल जबाबदारी कडे गेला. कॉलेज संपून पुण्यात नोकरीला लागलो. सोबत मास्टर डिग्री कंप्लीट केली. या मागच्या ४ वर्षात पायल एकही दिवस असा नाहीये गेलेला की मी तुला मिस नाही केलंय. हे ऐकताच तिने माझा हाथ घट्ट पकडला आणि म्हणाली माझीही अवस्था अशीच काहीशी आहे. पण एक प्रॉमिस कर अमेय आता तू कॉन्टॅक्ट मध्ये राहशील माझ्या. तिने हळूच विचारले लग्न झालंय का तुझ? मी हसलो आणि म्हणालो नाही. थँक गॉड! नाहीतर तुझ्याशी मैत्री करायला आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी तुझ्या बायकोची परवानगी घ्यावी लागली असती. आम्ही दोघेही हसलो. नंतर मी भितभित तिला विचारलं
तुझं लग्न झालंय? त्यावर ती म्हणाली गळ्यात काही दिसतंय मंगळसूत्र वगैरे? मी म्हणालो नाही पण आज काल लग्न झालेल्या मुली मंगळसूत्र घालतीलच अस नाही. त्यावर पायल म्हणाली नाही रे माझं नाही झालंय लग्न. मी डॉक्टरेट करतेय अजून २ वर्ष आहेत मग बघू लग्नाचं काय ते. यावर मी म्हणालो चला म्हणजे तुझं लग्न होई पर्यंत तरी आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकतो. यावर पायल थोडी नाराज
झाल्या सारखि दिसली.
मी तिला विचारलं कायग एकदम शांत का झालीस? ती म्हणाली काही नाही. आजच आपण ४ वर्षांनी
भेटलो. मी
तुला म्हणाले की आपण
इथून पुढे कॉन्टॅक्ट मध्ये राहू आणि आता लगेच तू म्हणतोस की फक्त लग्न होई पर्यंतच
कॉन्टॅक्ट मध्ये राहू! कोणी
शोधली का लग्नासाठी की
अरेंज मॅरेज? मी म्हणालो ना लव ना अरेंज. तिने विचारले मग काय असाच राहणार आहेस कायमचा?
जिला
शोधत होतो ती आज भेटली
आता बघू पुढे. वा म्हणजे तू मला इनडायरेक्ट प्रपोज करतोयस की! हवं तर तस समज वेळ घे
आणि सांग मला.
ए नाही आता परत तू निघून
जण्या आधी मीच तुला डायरेक्ट प्रपोज करते अमेय लग्न करशील माझ्याशी? माझा आनंद गगनात
मावेनासा
झाला होता. कधी स्वप्नातही
वाटल नव्हत पायल आणि मी एकत्र येऊ.
रोहित सूर्यकांत समेळ.
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box