जिथे सागरा धरणी मिळते - दीपिका सामंत

जिथे सागरा धरणी मिळते...

सौ.दीपिका सामंत


मालवणच्या निळ्याशार समुदाकिनाऱ्यावर असलेल्या धक्क्याच्या एका टोकावर ती बसली होती

,एकटक समुद्राकडे बघत.

तिची ती नेहमीचीच जागा होती.विचारमंथन करायला तिला ही जागा खूप आवडायची.आणि

विचार कोणाचा म्हणाल तर त्याचाच,चंद्रशेखर बर्वेचा, तोच गोरा घाऱ्या डोळ्यांचा .

कितीतरी दिवस नाही वर्षे झाली होती त्याला भेटून पण अजूनही त्याचा विचार तिच्या

मनातून जात नव्हता

त्याला येत असेल का माझी आठवण?छे!नसेलच,तो तर शहरी बाबू,माझ्यापेक्षा एक सो एक

मुली त्याला भेटत असतील?.

म्हणजे मी दिसायला बरी आहे म्हणून त्याला आवडत होते?आणि मग मला तो काय

दिसायला वैगरे बरा म्हणून आवडत होता?

छे छे! असं नसेल, आमच्या दोघांमध्ये या आवडनिवडीपेक्षा अजून काही तरी होतं,

पण हे मला वाटतं तसच त्याला वाटत असेल का?

सूर्य अस्ताला चालला होता, गुलाबी संधी प्रकाश सर्वत्र पसरला होता. ती उठली

आज मालवणातला त्यांचा शेवटचा दिवस होता.उद्याच ती आणि तिची आई आचऱ्याला

कायमची जाणार होती.तिच्या वडिलांचे मालवणात छोटेसे दुकान होते ते त्यांनी आधीच विकले

होते. जेव्हा ते आजारी झाले.पण तरीही ते मालवणात आणि सुप्रिया नोकरीसाठी आचऱ्याला

अशी व्यवस्था होती.पण नुकतंच तिच्या वडिलांचे निधन झाले.आणि आता सारी निरवानिरव

करायची वेळ आली होती. यापुढे तिचा मालवणशी कायमचा संबंध तुटणार होता.म्हणूनच ती

विचारांच्या भोवऱ्यात एवढी अडकली होती.तिला ते मागचे दिवस आठवत होते.

     ती नववीत होती त्याच वेळी चंदूची तिच्या गावात बदली झाली,आणि त्याचे कुटुंबीय

त्यांच्या शेजारीच रहायला आले.चंदू ने तिच्याच शाळेत प्रवेश घेतला . ती नवविला होती तर

चंदू दहावीला.त्याचे बोर्डाचे वर्ष त्यामुळे तो सतत अभ्यास करत असे.अभ्यासात ती पण हुशार

होती पण असा सतत अभ्यास करणे तिला आवडत नसे.मग ती त्याच्या घरी गेली की ती

कशी समुद्रावर फिरायला गेली होती आणि कशी मज्जा मज्जा केली,ती बोर्डिंग ग्राउंडवर कशी

क्रिकेट ची मॅच बघायला गेली,आणि आपल्या शाळेतल्या मुलांनी कसं मेडल मिळवलं त्या

गोष्टी सांगायची,तिच्या अशा गमतीजमती ऐकून चंदू ला पण सगळीकडे जावंसं वाटे,परंतु

आईची करडी नजर त्याच्यावर असे .

मग तिने त्याच्या आईला पटवायचा चंग बांधला,ज्या दिवशी चंदू असा फिरून येई तेव्हा तो

जास्त उत्साहाने अभ्यास करायला बसेमग आईच्या ही गोष्ट हळूहळू लक्षात आली.

 

     दहावीला चंदू चांगल्या गुणांनी पास झाला. त्याला भविष्यात डॉक्टर व्हायचे होते म्हणून

त्याने सायन्सला ऍडमिशन घेतली. 11 वि झाल्यावर बारावीला पण त्याने झटून अभ्यास करून

मेडिकल ला सहज प्रवेश मिळेल असे मार्क्स मिळवून दाखवले .

     यथावकाश सुप्रिया पण दहावी झाली. तिने डीएड ला प्रवेश घेतला. तिला शिक्षिका व्हायचे

होते.आता त्या दोघांची फक्त मैत्री राहिली नव्हती त्या पेक्षा ही वेगळं काही त्यांना एकमेकांना

भेटताना वाटू लागलं होतं.

एकमेकांना भेटायची त्यांना हुरहूर तर वाटायची पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर मात्र काय बोलायचं

ते सुचत नसे.

अशातच चंदू बारावी झाला आणि त्याच्या वडिलांची पुन्हा मुंबईला बदली झाली.

जाताना ती दोघे प्रथमच एकमेकांना खुप आतुरतेने भेटली,विरहाच्या दुःखाची त्या दोघांना

कल्पनाही करवत नव्हती.

येताना त्याने तिच्यासाठी अबोली आणि सदाफुलीची फुलं घेऊन आला.तिला हसायला आलं,”हे

काय ?असली फुलं कुणी आपल्या मैत्रिणीला देतो का?”तो फुरंगटून म्हणाला,” मला हीच फुल

तुझ्यासाठी आवडतात. तू या सदाफुली सारखी नेहमी हसतमुख असतेस,आणि या अबोली

सारखी प्रसन्न गोड दिसतेस”.ती हसली,” बरं बाबा दे मला”,तो म्हणाला, “अंहं,मी ही तुझ्या या

लांबसडक केसात स्वतःच्या हातानी माळणार,” ती हसली.जेव्हा ती घरी आली तेव्हा आई सुद्धा

हसली,”अग ही अशी सदाफुली आणि अबोली काय माळलीस केसांतती नकळत लाजली

आणि आई आश्चर्य वाटून पहातच राहिली.

     दुसऱ्या दिवशी त्यांचा जायचा दिवस उजाडला.दोघांनी परस्परांचा डोळ्यांनीच निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशीपासून तिला अगदी करमेनेसे झालं.अन्न पाणीही गोड लागेना.

तो जुना काळ होता. फोन कवचितच कुणाकडे तरी असत.त्यामुळे पत्र हा एकच मार्ग होता.पण

पत्र तरी पाठविणार कोठे.घरच्या किंवा शाळेच्या पत्त्यावर पाठविले तरी सगळ्या गावाला

कळणार,त्यामुळे तो मार्ग ही बंद झाला.

     ती डीएड झाली प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्यानंतर बाहेरून बीए करून

बीएड सुद्धा केले आणि आचरा येथे एका माध्यमिक शाळेत रुजू झाली.

     आता तिच्या लग्नाचे वेध तिच्या आईवडिलांना लागले.

पण अजूनही तिच्या मनात चंद्रशेखरचाच विचार होता,त्याला ती विसरू शकत नव्हती.पण

एवढ्या वर्षात त्याची काही ख्याती खुशाली सुद्धा कळली नाही.त्याच्या मित्रांना तिने

विचारले,पण त्यांना ही फारसे माहीत नव्हते.त्याने ग्रँट मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला एवढे

कळले होते त्या वरून त्याचा डॉक्टरकीकडे प्रवास चालू आहे एवढे कळले.

     मध्यंतरीच्या काळात तिच्या वडिलांचे निधन झाले आणि उद्या ती आईला घेऊन जाणार

होती.म्हणूनच ती मालवणच्या सागराचा शेवटचा निरोप घ्यायला आली होती .त्यांच्या भेटीची

जी  ठिकाणे होती तिथे ती परत परत जाऊन आली.त्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून येत

होते.

 

     आईला घेऊन ती आपल्या नोकरीच्या ठिकाणी आली.

पण आईचा आता  तिला लग्नाचा आग्रह चालू झाला आणि आता सुप्रियाला चंद्रकांतविषयी

गंभीर विचार करणे भाग पडले.त्याला शोधायचे तर सुरुवात कशी करायची आणि कुठून

करायची

आणि त्याचं लग्न झाले असेल तर गुपचूप त्याच्या आयुष्यातून निघून जायचे असे विचार

तिच्या भोवती रिंगण घालू लागले पण चंद्रशेखर चा विचार मनात ठेवून दुसऱ्याशी लग्न करणं

हा खोटेपणा होईल हा विचार पक्का होता.

    तिने खूप विचार केला,आपल्या मुंबईला असलेल्या मैत्रिणीला तिने ही गोष्ट सांगितली तिने

सुप्रियाला मुंबईला बोलावले . दोघी ग्रँट मेडिकल कॉलेज मध्ये गेल्या आठ वर्षांपूर्वी पास आऊट

झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट पहिली आणि खरंच एका वर्षाच्या लिस्ट मध्ये त्याचं नाव होतं 

पण तिथून तो सायन हॉस्पिटल ला इंटर्नशिप करण्यासाठी गेला होता.

     त्या दोघी सायन हॉस्पिटल ला गेल्या ,त्याचवेळी काउंटर वर एक व्यक्ती उभी होती त्याने

नाव ऐकलं आणि माहिती सांगितली. तो चांदरशेखरचा मित्रच होता,पण हल्ली त्यांची फारशी

गाठभेट नव्हती,.  त्याच लग्न झालं होतं आणि तो आणि त्याची पत्नी  ठाण्याला एक मोठे

हॉस्पिटल चालवत होते.

सुप्रियाची मैत्रिणीने त्या हॉस्पिटल चा नावपत्ता त्या मित्राकडून घेतला

ती सुप्रियाला म्हणाली आपण उद्या ठाण्याला जाऊ.

पण सुप्रियाचा चेहरा साफ पडला होता,नंदाने विचारलं ,” काय झालं?”

सुप्रिया म्हणाली,” त्याने काय सांगितलं ऐकलं नाहीस का? तो आणि त्याची बायको चालवतात

हॉस्पिटल म्हणजे त्याचं लग्न झालं,मग आता तिथे जाण्यात काय अर्थ?”.

“     ”अगं ,पण एकदा जाऊन खात्री तर करूया आणी बघुया तरी तू ज्याच्यासाठी एवढी

यातायात केलीस तो निदान तुला ओळखतो तरी काय!”

तरीही सुप्रिया तयारच नव्हती पण नंदाने खूपच आग्रह केला तेव्हा ती तयार झाली.

     दोघीही ठाण्याला आल्या,खूप मोठे आलिशान हॉस्पिटल होते,तसं नंदाने नाव ऐकलं होतं.

दोघींचीही आत जायला छाती दडपत होती.धीर करून दोघी काउंटरपाशी गेल्या आणि त्यांनी डॉ

चंद्रशेखर बर्वे आहेत का चौकशी केली .त्या काउंटर वरच्या रिसेप्शनिस्ट ला माहिती नव्हती

पण तेव्हढ्यात तिथे एक जुनी नर्स आली तिने सांगितले सरांनी आणि त्यांच्या मिसेसने हे

हॉस्पिटल आता दुसर्यांना चालवायला दिले आहे. त्या दोघांचा घटस्फोट झाला.मॅडम अमेरिकेला

निघून गेल्या.

पण सर आता कोठे असतील ?”त्या दोघीनी विचारलं.

तिकडे कोकणात कुठे तरी सरकारी हॉस्पिटल ची नोकरी पत्करली  असं ऐकलं.त्यांना पेशन्ट ची

सेवा करायची होती पैसा कमवायचा नव्हता यावरूनच त्या दोघांची भांडणे होत .नर्स ने

अधिकची महिती दिली .”ठीक आहे”  असे म्हणून त्या दोघी सटकल्या.

 

आता नक्की काय करायचं दोघींनाही सुचेना सुप्रियाने गावी जायची तयारी केली 

नंदाचे आभार मानून ती गावी आली.

     पण आता पुन्हा शोधकार्य कसं सुरू करायचं याचा विचार करू लागली.

     त्या दिवशी सुप्रिया अशीच अंगणात पुस्तक वाचत बसली होती.शेजारीच आई काहीतरी

निवडत बसली होती.

तेव्हाच तिथून त्यांच्याकडे नेहमी येणारी जाणारी वसुताई दिसली.

तिने सुप्रियाच्या आईला आवाज दिला,” काय गे गोवेकरणी, काय करतस?”

काय नाय गो,असाच आपला,पण तू हल्ली दिसणं नाय,बरेच दिवसांनी ईलस”.

वसुताई ही तिथून जवळच असलेल्या वायंगणी खेडेगावातून यायची .आचऱ्याचा, बाजार,डॉक्टर

यासाठी तिच्या फेऱ्या व्हायच्या .विशेषतः डॉक्टर साठी,कारण तिचा पाय बरेच दिवस दुखत

होता त्यामुळे तिच्या वारंवार फेऱ्या होत.अशातच सुप्रियाच्या आईशी तिची ओळख

झाली.सुप्रियाची आई तिला कधी जेवण दे,काही खायला दे कधी उसने पैसे दे अशी मदत करत

असे त्या बदल्यात वसू तिची वरची कामे करायला मदत करी पण उसन्या पैशाची परतफेड

मात्र आठवणीने करी.

तर ती म्हणालीआमच्या वायंगणित मोठो डॉक्टर इलो आसा,त्यांनाच माझो पाय बरो केल्यान

आता फक्त  आठवड्यातून एकदाच व्यायाम शिकूक जावचा लागता, गे तू पण तुझ्या गुढग्या

साठी एकदा जावन ये”.

काय तरी काय,मालवण कणकवलीचे मोठे मोठे डॉक्टर झाले,आता काय वायंगणी

जावं?”सुप्रियाच्या आईने हसून विचारले.

आई अगं, तसं नाही ती म्हणते तर बघूया जाऊन एकदा.”सुप्रियाने आईची समजूत काढली.

““पण आधी त्यांका विचारून या,नाय तर खय गेले असतील तर?आणि गर्दी पण खूप

असतावसुताईने सांगितले.

एक काम करते मी उद्याच तुझ्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन येते

सुप्रिया म्हणाली.

गो ,तू जातलं तर माझा  एक काम कर,हे शंभर रु मी त्यांच्याकडसून उसने घेतलेले ते देशील

काय?आणि ह्यो बघ त्यांच्या नोटी बरोबर फोटो इलेलो चुकान तो पण दी”.वसुताई ने फोटो

आणि पैसे दिले.

      

     सुप्रिया ने पैसे घेतले आणि फोटो बघून ती  हादरली.

तो तिचाच दहावीचा फोटो होता दोन वेण्यातला आयकार्ड साठी काढलेला.

तिने धडधडत डॉक्टरचे नाव विचारले.

ता माका नाय माहीतवसुताई म्हणाली.

बरं म्हणून ती गप्प बसली आणि उद्या जायचंच असा तिने निश्चय केला.

 

मनात तिच्या जो विचार आलेला तो खरेच असू दे अशी देवाकडे प्रार्थना करत ती झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच ती निघाली सोबत तिने त्याचा तिच्याकडे असलेला दहावीतलाच

छोटा फोटो बरोबर घेतला.

धडधडत्या  मनाने तिने हॉस्पिटल च्या आवारात प्रवेश केला,हॉस्पिटलच्या भोवती अबोली आणि

सदाफुलीच्या फुलांची बाग होती ती पाहून तिची खात्रीच पटली.

आज कितीतरी दिवसांनी त्याची भेट होणार होती.,कसा असेल ,कशी असेल त्याची

प्रतिक्रिया,आपला फोटो त्याने अजून पर्यंत जपून ठेवला म्हणजे आपण नक्कीच त्याच्या मनात

असणार, या विचाराने तिला थोडा धीर आला.

तिने रिसेप्शनला चौकशी केली आणि डॉक्टरांच्या केबिनवर टकटक केली.

येस कम इनत्याचा धीरगंभीर आवाज ऐकला आणि तिला अगदी भरून आलं,भरल्या

डोळ्याने तिने त्याच्याकडे पाहिलं ,त्याची नजर तिच्याकडे जाताच तो आश्चर्याने उभा राहिला

आणि ती धाडकन त्याच्या अंगावर कोसळली.त्याने तिला पटकन हाताने सावरले.ती भानावर

आली तेव्हा थोडं लाजून बाजूला झाली.

तिने आपल्याकडचा तिचा फोटो त्याला दाखवला शंभर रु ची नोट दिली आणि आपल्याकडचा

त्याचा फोटोही दाखविला.

सुप्रिया असे म्हणून त्याने तिला मिठी मारली.

एवढे दिवसाची शोधाशोध,विरह सगळं सगळं त्याच्या मिठीत विरघळून गेलं,तर एवढे दिवस

तिचा फोटो जपून ठेवलेला अचानक हरवला आणि मग समोर प्रत्यक्षच ती त्याची प्रियाच उभी

राहिली या बद्दल देवाचे कसे आभार मानावे त्याला कळेना....


सौ.दीपिका सामंत

डोंबिवली पूर्व



disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

Post a Comment

0 Comments