नवा गडी नवा राज्य - अनिता खाडिलकर

नवा गडी नवा राज्य 

लेखिका-अनिता जयंत खाडिलकर. मिरज

 

अशोकराव पाटील वाईला एका सहकारी पतसंस्थेत कारकून म्हणून काम करत होते.त्यांची पत्नी कमलताई खूप कष्टाळू सुगरण होती.मुलगा निखिल नुकताच काँप्युटर इंजिनिअर होऊन एका अमेरिकन कंपनीत पुण्यात नोकरीवर रुजू झाला होता. मुलगी सुवर्णा महाविद्यालयात अकरावीत विज्ञान शाखेत शिकत होती. अस त्यांच खूप सुखी समाधानी कुटुंब होतं.वाईला त्यांच स्वतःच चार खोल्यांचे घर थोडी शेती होती.मुलगी निखिलचे आईवडील वाईला राहत होते.निखिल पुण्यातून सुट्टी मिळेल तेव्हा वाईला येत असे.कमलताईचा पापड,विविध प्रकारची लोणची,चटण्या यांचा छोटासाच गृहउद्योग करत.आजुबाजूच्या गावातून त्यांच्या या घरगुती पदार्थांना भरपूर मागणी होती.सुवर्णाही त्यांना आपला अभ्यास सांभाळून मदत करत असे.निखिल कंपनीत नोकरीला लागल्यावर घरात थोडीफार सुबत्ता आली होती.घरातील वातावरण तसे खेळीमेळीचे होते

 निखिलला नोकरीला लागून दोन वर्ष झाल्यावर कमलताईंना लेकाच्या लग्नाचे वेध लागले होते.शेजारी पाजारी ,नातेवाईक जमले की त्याच्या लग्नाची चर्चा होत असे.कमलताईंनी त्याचे नाव त्यांची मैत्रीण सुधा हिच्या 'शुभमंगल वधूवर सुचक 'मंडळात नोंदवले .त्यातूनच  दोन-तीन स्थळं आली होती. सगळी त्याला हवी तशी नोकरीवर करणार मुलींचीच होती. त्यातीलच एम.बीच..होऊन एका चांगल्या कंपनीत पुण्यात नोकरीवर करणाऱ्या सुखवस्तू घरातील वैशालीचे स्थळ त्यांना पसंत पडले.सुधाच्या मंडळातील स्थळ म्हणून जास्त काही चौकशी नकरता पसंती केली गेली. आणि थाटामाटात लग्न पार पडलं.रितीरिवाजानुसार सत्यनारायण पुजा देवदर्शन झाल्यावर  काही दिवसांनी निखिलने दोघांच्या  नोकरीच्या सोयीनुसार पुण्यात बिऱ्हाड केलं.पण कुठे माशी शिंकली कोणजाणे

   वैशाली लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी होती.तीला महाग,उंची वस्तूंच फार आकर्षण होतं.त्याचबरोबर छानछोकी दागदागिने यांची फार हौस होती.तिचा स्वभाव तसा उधळ्या हट्टी होता.त्यामुळेच तिला काटकसरीने संसार करण्याची पद्धत माहीती नव्हती. सारखीच  शॉपींग करणे, नसांगताच माहेरी जाणे,मैत्रिणींबरोबर हाॅटेलींग,पार्ट्या ह्यातच ती आपला पगार उडवून टाकत असे.आणि मग पगार संपल्यावर निखिलकडे पैशांची मागणी करीत असे.तिचे संसारात अजिबात लक्ष नव्हते. निखिल काटकसर करून राहणारा होता   या सर्व प्रकारामुळे घरात सारखेच खटके उडू लागले. त्यामुळेच वैतागून निखिल तिला काडीमोड देण्याचा  विचार करू लागला होता.तेवढ्यात वैशालीच एक दिवस अचानक आपल्याच बाॅसबरोबर सूत जमवून घरातून  पळून गेली.आणि त्याच्याबरोबर  राहू लागल्याचे चौकशीअंती समजते.आणि मग वैशाली त्याला एक दिवस घटस्फोटाची नोटीस पाठवते.वैतागलेला निखिल त्यावर लगेच सह्या करून मोकळा झाला.आणि  म्हणाला गेली एकदाची बैदा

     यासर्व प्रकरणामुळे निखिल चे जीवन पुर्ण उध्वस्त झाले होते.त्याची मनस्थितीत थोडी बिघडते.पण  त्याने नोकरीवर अजिबात दुर्लक्ष केले नव्हते.त्याची नोकरी छान सुरू असते.त्यामुळेच त्याला कंपनीत प्रमोशन मिळते.आणि त्याबरोबर त्याला कंपनी प्रदेश गमनाची ऑफर  देते. कंपनी त्याला कामासाठीच दोन वर्ष अमेरिकेला पाठणार असते. त्यामुळेच त्याचे जीवन अमुलाग्र बदलते.आणि त्याची  प्रगती परत छान होऊ लागते

  अमेरिकेत जाण्याची ऑफर मिळालेली अजून घरी माहीती नसते. अजून नक्की तारीख व्हायची असते.ते समजल्यावर निखिल वर्क फार्म होम ची ऑफर घेऊन  महिनाभर घरीच येतो.अचानक घरी आलेला पाहून सगळेच आश्चर्य चकीत होतात. घरी आल्यावर निखिल फ्रेश होतो   कंपनीने दिलेल्या अमेरिकेच्या ऑफरह सर्व माहीती घरी सांगतो. तो म्हणतो

'आई-बाबा मला कंपनीत प्रमोशन मिळालंय.आणि दोन वर्ष कामासाठी अमेरिकेत पाठवणार आहेत. ' हे सर्व ऐकल्यावर कमलताई ,अशोकराव सुवर्णा खुपच आनंदित झाली. कमलताईंना तर निखिलला कुठे ठेवू नी कुठे नको असे झाले.त्यांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसर्या डोळ्यात दुखाःश्रू  आलेखुपच भावूक झाल्या.कोणाला वाटत नाही आपल्या मुलाची छान प्रगती व्हावी! त्याचं  जीवन सुरळीत व्हावे! त्याची छान प्रगती व्हावी. पण मन आवरून त्यांनी विचारले 'तुझ्याबरोबर आणखीन कोण येणार आहेत का?तिथे राहण्याची व्यवस्था कशी होणार?'

 'अग होहो,सांगतो सगळं ऐक'. अस म्हणत सर्व माहीती सांगतो.तो त्याच्याबरोबर कंपनीतून आणखीन दोघे असे तिघेजण कंपनीच्या कामासाठी  दोन वर्ष अमेरिकेत जाणार आहोत. पहीले आठ दिवस कंपनी आपली व्यवस्था करते मग मात्र आपण आपली सोय पाहायची असते.तिथे सर्व आवश्यक गोष्टी भाड्याने मिळतात. हे सर्व सांगून तो थोडावेळ बाहेर  गेला.आणि त्याने मित्रांना भेटून त्यांनाही अमेरिकेत जाणार आहोत ही माहीती सांगितली. त्यांना जोडीला घेऊन लागणारी सर्व कागदपत्र तयार करू लागला.अमेरिकची बातमी पुर्ण वाईत पसरते.मग जोतो भेटल्यावर आपल्या माहितीप्रमाणे सल्ले देऊ लागला जमेल तशी मदत करत लागले.न्यायचे सामान खाद्यपदार्थ ही खूप जमले.मित्रांनी त्याला खूप मदत केली. त्याच आनंदात त्याच्याकडून पार्ट वसूल केली.

     निखिलला विमानतळावर पोहोचवायला त्याचे मित्र,अशोकराव,कमलताई सुवर्णा सगळेच आले होते.त्याला दोन विमाने बदलून जाव लागणार असते.पुण्यातील विमान रात्री आठ वाजता सुटतं. आणि रात्री 9.30ला दिल्लीत पोहोचले.मग अमेरिकेत जाणारं विमान  दिल्लीतून पहाटे पाचला सुटून भारतीय वेळेनुसार रात्री ८वाजता न्यूयॉर्क येथील विमानतळावर पोहोचले.तिथून मुक्कामाच्या ठिकाणी  कंपनीच्या गाडीतून मुक्कामाच्या हाॅटेलवर गेल्यावर प्रथम  सर्वांनी घरी सुखरूप पोहोचल्याचा फोन केला.एक दिवस विश्रांती घेऊन मग तेथील कामाला सुरुवात केली.त्यांच्या ऑफिसात -६मुलीही काम करत  होत्या.त्यातच निशा पण होती.ती एक लाघवी सर्वांना मदत करणारी होती.तिच्या लाघवी स्वभावामुळेच ती निखिलला खूप आवडते

  अमेरिकेत गेल्यावर निशा आपली मुलगी स्नेहलच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना घरी बोलावते. तेव्हा निखिलची ओळख आपल्या आईवडीलांना  करून देते.आणि आपल्याला तो आवडल्याचे सांगतेमग महेशराव त्याची मुद्दाम भेट घेऊन त्याची सर्व माहीती विचारून घेतात. त्याला आपला जावई म्हणून पसंत करतात.  

  निशा जरी अमेरिकन मुलगी असली तरी तिचे आईवडील भारतीय असल्याने तिला सर्व भारतीय रितीरिवाज माहीती असतात. त्यामुळेच ती निखिलला निखिल निशाला पसंत करतो. पण   निशाचा पहीला नवरा राकेश एका बस अपघातात ठार झालेला असतो.मग ती आपली मुलगी स्नेहल हिच्याकडे पाहून आपले जीवन जगत असते. हे सर्व निखिल आईवडिलांना फोन करून सांगतो. त्यांची समजूत घालतो. निशाचे वडील महेशरावही अशोकरावांशी  संपर्क साधून सगळं समजावून सांगतात.सर्व जुळून आल्यावर  निखिल निशाचे लग्न ठरते.ती दोघे अमेरिकेत लग्न करतात. तेव्हा अशोकराव,कमलताई सुवर्णा आवर्जून हजेरी लावतातथोड्याच दिवसात निखिलचे अमेरिकेतील पोस्टिंग  संपते.मग निशा भारतात आपली बदली करून घेते. आणि मग एके दिवशी निशा निखिल ,निशाचे आईवडील स्नेहल सर्वजण भारतात येतात.सर्वांचेच स्वागत भारतात छान होते.प्रवासाचा शिणवठा गेल्यावर भारतातील रिवाजानुसार सत्यनारायण पुजा करून निशा निखिल  नव्यानेच संसाराला सुरुवात करतात. थोडे दिवस राहून महेशराव वर्षाताई परत अमेरिकेत जातात.  

  आतापर्यंत सुवर्णाची ही शिक्षण पूर्ण होत आलेले असते. तिही  नोकरीला लागल्यावर तिचेही शिरीष बरोबर लग्न होते.दोघींचे सणवार एकत्रच पार पडतात. दिवाळसणाला महेशराव वर्षाताई पण येतात. खूप आनंदात दोन्ही जोडप्यांचा दिवाळसण छान पार पडतात. थोड्याच दिवसात निखिल निशा एका बाळाला जन्म देतात. स्नेहलला भाऊ मिळतो

  सुवर्णाही एका मुलाला जन्म देते.घराचे गोकुळ होते.

 

लेखिका-अनिता जयंत खाडिलकर. मिरज



disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  


 

Post a Comment

0 Comments