मला बाळ हवंय - अविनाश गडवे (अवती)

मला बाळ हवंय

लेखक - अविनाश गडवे (अवती)

 

“डॉ. विवेक,आता माझ्या संयमाचा कडेलोट झाला आहे. मी आज पर्यंत तुझे ऐकत आलो, एक डॉक्टर म्हणून नाही तर एक मित्र म्हणून मी तुझे सारे ऐकत आलो. पण आता मी ठरवले आहे, मी पूर्णाला या पुढे सहन करु शकत नाही. मी तिच्या सोबत या पुढे राहू शकत नाही.”

“अजय, वेड्यासारखे काय बोलतोय? तुला माहित आहे, डिपर्सोनलायझेशन किंवा डीरिअलायझेशन हा एक आजार आहे. पूर्णा त्या आजाराने आजारी आहे. आपण एखाद्या स्वप्नात किंवा चित्रपटात आहोत आणि धुक्यात किंवा काचेच्या अडथळ्यातून पाहत असल्यासारखे बाहेरील जगापासून अलिप्त आहोत असे वाटणे. सभोवतालची विकृती, वेळेची धारणा, जागा आणि अंतर. प्रिय व्यक्तींपासून भावनिकरित्या डिस्कनेक्ट झाल्याची भावना हे सारे या आजाराचे लक्षण आहे.”

“ डॉ. विवेक हे मी खुपदा ऐकुन झाले, पण आता मी पुढे नाही सहन करु शकत. पुर्णा दिवसाच्या वेळी सभोवताली लोक असताना अगदी सामान्य वागते पण एकांतात? ती मला हात पण लावू देत नाही.  मी आग्रहच केला तर आरडाओरड करते, हिंस्त्र होते. दिड वर्षे झाली आमच्या लग्नाला अजूनही आमच्यात वैवाहिक संबंध प्रस्थापित झालेले नाही,कधी हात लावला तरी तिने कधी रागावून, कधी चवताळून दूर केलंय. असे वागते का कुणी नवऱ्याशी? घरी आता साऱ्यांनाच आमच्यात सारे काही ऑलबेल नाही असा संशय यायला लागलाय. किती दिवस मी ऑफिसचे टेन्शन सांगू? का खोटे बोलू? “

 “अजय, शरीरसंबंधांसाठी एक दुसऱ्यांच्या मनात शिरावं लागतं. समजून घ्यावे लागते. दुर्दैवाने पूर्णाचा आजार लक्षात आला असला तरीही तो बरा व्हायला किती वेळ लागेल सांगता येणे अवघड आहे कारण या मागे नक्कीच एखादी पूर्व आयुष्यात घडलेली घटना असते पण पूर्णा तसे काहीच सांगत नाही.”

“अवघड आहे ना? मग ही जन्मभर अशीच राहिली तर मी काय करु?”

“अजय, चील यार. तुझी मनस्थिती समजू शकतो पण सांग या व्यतिरिक्त तुझी पूर्णा बद्द्ल काही तक्रार आहे?”

“ विवेक, ती दिसायला खूप सुंदर आहे. उच्च विद्याविभूषित आहे. एक उत्तम गृहिणी आहे. आदर्श सुन, वहिणी आहे, अन्नपूर्णा आहे, एक उत्तम कलाकार आहे, गोड गळा आहे, सुंदर गाते. साऱ्यांशी प्रेमाने वागते. साऱ्यांना आपलेसे करते. तिच्या अनेक गुणांवर भाळूनच तर तिच्या सोबत लग्न केले पण हे सारे असले तरी ती एक पत्नी म्हणून पूर्ण पणे अपयशी आहे. आणि... मला ती एक पत्नी म्हणून हवी होती.”

“अजय......” ( मध्येच वाक्य तोडत विवेक म्हणाला)

“तू तिला समजून घे, थोडा वेळ दे. मी उपचार करतोय, थोडा वेळ लागेल पण दृष्ट लागण्यासारखा स़ंसार मोडू नकोस.”

“विवेक, माझी परिस्थिती समजून घे. मी दीड वर्ष काढली आहेत. आता माझी सहनशक्ती संपली. बस्स्, माझा वकील दोन आठवड्यात आला की मी निर्णय घेणार. मला माफ कर मित्रा, पण खरंच माझी मनस्थिती ठिक नाही, मी निघतो.” अजय निराश होऊन निघून गेला.

“या! या पूर्णा वहिनी बाहेर या. ऐकलीत ना तुमच्या नवऱ्याची मुक्ताफळे?”

“डॉक्टर, मी काय करू? मलाच कळत नाही मला काय होतं त्यावेळी,पण.....” असं म्हणून पूर्णा हमसून हमसून रडायला लागली.

विवेकने तिला थोडा वेळ रडू दिले, नंतर तिला पाणी प्यायला दिले. ती थोडी सावरली.

“डॉक्टर मी काय करू?  मला अजयला दुखवायचे नाही, माझा संसार मोडायचा नाही, मला माझे घर हवे आहे. संसार हवा आहे.”

“ मी गोळ्या तर लिहून देतो ज्यामुळे तुमच्या मनातील बेचैनी कमी होईल. थरकाप,अस्थिरता कमी होईल पण शेवटी तुम्हालाच स्वतःला बदलावे लागेल आधी इच्छेविरुद्ध, मग कर्तव्य म्हणून आणि नंतर फक्त प्रेम आहे म्हणून प्रेमाने, प्रेमासाठी.”

 पूर्णा घरी आली. तेव्हा सायंकाळ होत आली होती. साडे पाच वाजले होते म्हणजेच सासुबाई भजनी मंडळात आणि सासरे बागेत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले असणार होते. दोघेही सात, साडे सात वाजेपर्यंत तरी येणार नव्हते. अजय आधीच आलेला होता आणि  खूप डोके दुखतंय म्हणून आपल्या रुममध्ये जाऊन झोपला होता.  पूर्णा आत आली, खोलीचे दार लावुन घेतले. अजयचा निरागस चेहरा बघून तिने स्मित केले. आज काहीही झाले तरीही तिला अजयचा राग दूर करायचा होता. तिने पटकन बाथरूममध्ये जावून वॉश घेतला, कपडे बदलले, गाऊन घातला आणि अजय जवळ येऊन बसली.

हळूवारपणे त्याच्या केसातून हात फिरवत राहीली. खाली वाकून अजयच्या गालाचे चुंबन घेतले. तो तसा डोळे बंद असले तरीही जागाच होता. पूर्णा अजून काय काय करते ते बघत तो तसाच चेहऱ्यावर एक हात आणिपोटावर एक हात ठेवून पडून राहीला.

पूर्णा आपली तर्जनी त्याच्या नावावरुन, ओठांवरुन, हनुवटीवरुन गळ्यावरुन फिरवू लागली.  एक हात त्याच्या केसाळ छातीवरुन फिरवू लागली. अजय पण तापू लागला. ती थोडी त्याच्या अंगावर झुकली, तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकले, त्याच वेळी तिचे दोन्ही वक्ष त्याच्या छातीवर दाबले गेले.

तिचा स्पर्श त्याला बेभान करु लागला. स्वतःवर संयम ठेवणे अवघड करु लागला. तसे त्याने तिला आपल्या मिठीत ओढायचा प्रयत्न केला, ती लाजून दूर झाली, “ रात्री, आत्ता नको.” तिचा स्वर कापरा होता. सासुबाई, बाबा, येतीलच थोड्या वेळात.”

“ मग कशाला माझ्या सोबत अशी करत होती, मला आता हवी आहेस तू चल मिटून टाकू दोघांतील अंतर!” अजय तिचा हात धरत म्हणाला, ती त्याच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करु लागली तस तसा तो अधिक जोरा जोरी करायला लागला.

आणि.... इतक्या वेळ प्रेमाने, लाजेने वागणाऱ्या पूर्णाला अचानक काय झाले कळलेच नाही, जवळ जवळ किंचाळलीच, “ दूर व्हा, दूर व्हा माझ्या पासून, दूर व्हा!!”

अजयला तिने जोरात ढकलून दिले, अजय धडपडला, तेवढ्यात तिने फळ कापायचा चाकू हातात घेतला, “ दूर हो, नाही तर.. नाही तर मी भोसकून टाकीन.” तिचा आवाज हिंस्र होता. डोळे लाल, सूडाने पेटलेले दिसत होते. अजय पण तिचा हा अवतार बघून घाबरला. “ दूर.. दूर हो, नाही तर मी मला भोसकून घेईन! “ आता मात्र अजय घाबरला. न जाणो हिने असेच काही आततायी केले तर? तेवढ्यात बाहेरुन दारावर थापा पडायला लागल्या. पूर्णाचे लक्ष काही सेकंद तिकडे गेले तोच अजयने वेगाने झेप घेत तिच्या हातावर फटका मारला, चाकू दूर जाऊन पडला. लागलीच त्याने एक सणसणीत झापड तिच्या गालावर दिली. ती कोलमडून बेडवर जाऊन पडली.  अजय जवळ गेला तिला हलवले,ती बेशुद्ध झाली होती. त्याने घाबरून दार उघडले, डॉक्टरांना फोन केला. एव्हाना अजयचे आई वडील त्यांच्या रुममध्ये शिरले. समोरचे दृश्य बघून त्यांना धक्काच बसला.

या प्रकारानंतर एक अघोषित शांतता घरात पसरली होती, सारे घरात होते पण संवाद फक्त कामापुरताच होता. पूर्णा सोबत तर सगळ्यांनीच जणू अबोला धरला होता. स्वतः पूर्णाला काय करावे कळत नव्हते. एकीकडे स्वतःचीच भयंकर लाज वाटत होती. अशाच विचारात असताना बसली असताना एके दिवशी दुपारी तिला एक फोन आला, नंबर अनोळखी होता, थोड्या साशंक मनानेच तिने फोन घेतला. “ हॅलो! “

“ हॅलो, कोण पूर्णा बोलते आहे का? “

“ हो, आपण कोण? “

“ आपण कोण? काय गं, डब्बा चोर? मला ओळखत नाही होय? “

“ वैदेही तू!!! इतक्या वर्षांनी? कुठे होतीस? कुठून बोलतेय? माझा नंबर कसा मिळाला? “ पूर्णाच्या बोलण्यात अचानक उत्साह संचारला.

“ बस! बस!!! किती प्रश्न विचारते? एका पाठोपाठ? जरा उसंत घेऊन एक एक विचार?”

“ असू दे, कुठे आहेस तू आता? आणि इतकी वर्षे कुठे होतीस?

“ अगं, दहावी झालं आणि बाबांची बदली झाली, रायपुरला. तेव्हा कुठले मोबाईल होते आपल्याकडे? उन्हाळ्यात तू मामांकडे गेली होती आणि मी रायपुरला आले. तिथून दिल्लीला गेले, एम. बी बी. स. केले, नंतर लंडनला गेले गायनिकची पोस्ट डिग्री घ्यायला, आले तर तुझ्या आई बाबांनी घर बदलले होते.

त्यांचा पत्ता शोधून काढायला मला महिना लागला आणि त्यांचा शोध लागला, तेव्हा त्यांच्याच कडून तुझा विवाह झाल्याचे कळाले आणि तुझा नंबर पण मिळाला. कशी आहेस तू? “

“ मी मजेत आहे.”

“ मी ऐकलं आहे की जिजू पण खूप हॅण्डसम आहे! पण आमची मैत्रीण पण काही कमी हॉट नाही, तेव्हा कशा रंगताहेत रात्री? “

“ वैदेही,...वैदू मला भेटशील? मला तुला भेटायचे आहे” म्हणून तिने आतापर्यंत आवरलेला हुंदका बाहेर पडला. मग मात्र तिला सांभाळता येईना.

वैदेही,काय झाले? म्हणून पलिकडून विचारत राहिली. दुखाचा भार हलका झाला,तशी पूर्णा वैदेहीला इतकेच म्हणाली, “ वैदू, तू माझी शाळेतली मैत्रीण, मी शाळेत असताना आजारी पडले तेव्हा तूच कायम सोबत होती आज मी खूप एकटी पडले आहे. मला तुझी नितांत गरज आहे. प्लीज मला भेट?”

“ पूर्णा मी उद्याच पुण्यात पोहोचते. माझा नंबर सेव्ह कर आणि तुझा डिटेल एड्रेस पाठव.”

पूर्णा ने वैदेहीचा फोन ठेवला आणि बऱ्याच दिवसांनी तिला थोडे बरे वाटू लागले.  दुसऱ्याच दिवशी वैदेही पुण्याला पुर्णाच्या घरी पोहोचली. घरातील सारे वातावरण बघून तिला धस्सच झाले.  तिने साऱ्यांना आपली ओळख करून दिली.

पूर्णाचे सासरे आपल्या खोलीत निघून गेले पण पूर्णाच्या सासुबाईंचा कोंडलेला राग बाहेर पडला.  त्यांनी वैदेहीला पूर्णाच्या विचित्र वागण्याची सारी कहाणी समजावून सांगितली. आपल्या मुलाचा जीव पूर्णा सोबत कसा धोक्याचा आहे ते पटवून दिले. पूर्णा रडतच आपल्या खोलीत गेली.

पूर्णाच्या सासुबाईना मी बघते, तुम्ही थांबा असा इशारा करत ती मागोमाग पूर्णाच्या खोलीत गेली.  पूर्णा पलंगाच्या काठावर बसून हमसून हमसून रडत होती.  वैदेहीने प्रेमाने तिच्या पाठीवरुन हात फिरवला, तसे तिला अजूनच भडभडून आले आणि ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली.

“ वैदू, मला नाही माहित मला अचानक काय होते? मी खूप खूप प्रयत्न करते. अजयवर माझे मनापासून प्रेम आहे. त्यांना होणारा त्रासही मला कळतो.पण..नेमका त्याचवेळी माझ्या मनात कुठून ते विचार येतात? , मी का अशी वागते मलाच कळत नाही. मला तर असे वाटायला लागले संपवून टाकावे स्वतःचे आयुष्यच!”

 “ वेडी आहेस का? जे तोंडात येईल ते बोलते? सारे ठिक होईल. तू शांत हो बघू आधी. “ वैदेही ने पूर्णाला आपल्या मिठीत घेतले आणि तिला शांत करु लागली.

विवेकच्या हॉस्पिटल मध्ये अजय, पूर्णा, वैदेही , डॉ. विवेक समोर बसलेले होते. डॉ. विवेक मला तुम्हाला काही सांगायचे आहे एक अशी घटना ज्याची मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे , जी घटना पूर्णा सोबत घडली होती, आजपासून दहा वर्षांपूर्वी आणि असे असूनही तिला सुद्धा त्याची कल्पना नाही, ना माझ्याशिवाय जगात इतर कुणालाही.

दहावीच्या परीक्षेचा रिझल्ट घ्यायला आम्ही आमच्या शाळेत गेलो होतो . पहिल्यांदाच आम्ही साडी घालून शाळेत आलो होतो. सारे खूप आनंदात होतो. शाळा जवळ जवळ रिकामी झाली होती.अनेक विद्यार्थी शिक्षक घरी निघून गेले होते तरीही आम्ही मैत्रिणी घोळक्यात उभ्या निकालाची चर्चा करत होतो, तेवढ्यात एक मुलगा आमच्या जवळ आला आणि पूर्णाला म्हणाला शितोळे मॅडम तुला पहिल्या मजल्यावरील वर्गात तिला बोलवत आहे. पूर्णाला खूप आनंद झाला.  ती आम्हाला,” मी आलेच म्हणून गेली.” बराच वेळ वाट बघून ती आली नाही, तेव्हा मीच तिला शोधायला वरच्या मजल्याच्या दिशेने चालू लागली.

मला पहिल्या मजल्यावर कुणीही दिसले नाही, मी परत फिरली, तेवढ्यात मला पूर्णाचा अस्पष्ट आवाज ऐकायला आला, जणू ती  काही बोलायचा प्रयत्न करते आहे आणि कुणी तिला बोलू देत नाही. आवाज वॉशरुमच्या दिशेने येत होता. मी धावतच तिकडे गेली आणि समोरचे दृष्य बघून हबकलीच. दोन तरुण पूर्णाच्या शरीराशी झटत होते. एक तिच्या तोंडावर हात धरून ठेवत होता, एक तिच्या साडीशी झटत होता , तिच्या वक्षांना धरायचा प्रयत्न करत होता. पूर्णा त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होती पण तिचा जोर त्या दोघांपुढे कमी पडत होता. समोरचे दृश्य बघून माझे शब्दच जणू गोठले. माझ्या तोंडून पहिले आवाजच फुटेना. माझी नजर खाली मैदानावर गेली काही शिक्षक बाहेर पडत होते मी जोरात धावा धावा म्हणून किंचाळली. त्या तरुणांचेही लक्ष माझ्याकडे गेले. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून खालून कुणी धावत येत आहे हे बघून ते पूर्णाला तसेच ढकलून वरच्या मजल्यावर पळाले. त्यांचा जोराचा धक्का लागून पूर्णा खाली पडली.  तिचे डोके जोरात जिन्याच्या कठड्यावर आदळले आणि तिचा तोल गेला. तिची साडी जिन्याच्या गजांमध्ये अडकली ती मात्र तोल जाऊन पायऱ्यांवरुन घरंगळत खाली गेली. ती शेवटच्या पायरीवर आदळून खाली पडली तेव्हा तिथे रक्ताचे थारोळे झाले होते. मी थरथर कापत होती. खूप लोक तिथे गोळा झाले. त्याचवेळी कुणीतरी माझ्या कानात बोलले,” गप रहा, तोंड उघडले तर तुझ्या सहीत अख्ख कुटुंब खल्लास करु.” मी नखशिखांत हादरली . डोळे गच्च बंद केले. हिंमत करून डोळे उघडले तर माझ्या समोर गर्दीत उभा राहून त्या दोन तरुणांपैकी एक जण लपून चाकू वरुन बोट फिरवून मला दाखवत होता. मी घाबरली. तिथे गोळा झालेल्या शिक्षकांना खोटेच आम्ही उतरत असताना पूर्णा तोल जाऊन खाली पडल्याचे सांगितले. पूर्णाला दवाखान्यात नेण्यात आले. डोक्याला मार लागला होता. बरेच रक्त वाहून गेले होते. पुढचे दोन महिने ती कोमात होती. शुद्धीवर आली तर तिला काय घडले काहीच आठवेना. साऱ्यांनी तिला ती जिन्यावरून खाली पडली आणि तिची शुद्ध गेली इतकेच सांगितले. पुढे आमचे मार्ग वेगळे होत गेले, बाबांची बदली, माझे शिक्षण,परदेशात उच्च शिक्षण या काळात माझा पूर्णा सोबत संपर्क पुर्णपणे तुटला. मी परत आल्यावर पुन्हा पुर्णाचा शोध घेतला आणि जेव्हा पूर्णा भेटली तर तिची ही अवस्था होती. “ 

डॉ.विवेकला आत्ता पूर्णाच्या तशा वागण्याचा उलगडा झाला. त्याच्या चेहऱ्यावर संतोष होता, त्याला त्याची केस आटोक्यात आल्यासारखे वाटू लागले. पूर्णाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. वैदेही ने तिला प्यायला पाणी दिले आणि तिला केबिन बाहेर नेले. अजयला काय बोलावे काही कळत नव्हते. त्याला पूर्णाची दया येत होती. तिने कित्ती सोसले आणि आपण तिला किती चुकीचे समजलो या बद्दल पश्चात्ताप होऊ लागला. डॉ. विवेक जागेवरून उठला त्याच्या जवळ गेला आणि त्याचे खांदे थोपटत म्हणाला,” अजय, पूर्णा वहिनी का तशी वागत होती हे आपल्याला कळाले. तसाच, तोच प्रसंग तिच्या सुप्त मनात निद्रिस्त मेंदूत घर करून राहिला. त्यामुळे तसेच जेव्हा केव्हा घडत होते ते निद्रिस्त मन जागे होऊन बंड करायचे. तिच्या नकळत. तिचा काहीच दोष नव्हता.”

“ आता मग, मी काय करायला पाहिजे? “

“ काही नाही, थोडा संयम ठेव, सरळ सरळ संबंध प्रस्थापित करायची घाई करु नकोस. पहिले काही दिवस तिला बाहेर घेऊन जाणे, तिच्या मनाप्रमाणे खरेदी असे कर. तिला वेळ दे. त्याची खूप खूप गरज आहे. तिचा हात हातात घेऊन गप्पा मार, भटकंती कर, हळूहळू मिठीत घे. लाड कर, कधी हाताने थोपटून धीर दे. जस जसा विश्वास वाढत जाईल एक एक पाऊल पुढे जा. रात्री काही दिवस फक्त जवळ मिठीत घेऊन झोप. मग हळूच अंगावरुन हात फिरवायला सुरु कर. जस जशी ती संमती देत जाईल एक एक स्टेप पुढे जा.”

अजयने विवेकचे आभार मानले. दोन दिवस थांबून वैदेही पण परत गेली,मात्र ती येताना घरात जे वातावरण होते ते आता पूर्णपणे बदलेले होते. धुळ झटकल्यावर एखादी वस्तू पुन्हा झळाळून यावी, स्वच्छ दिसावी तसे ते आनंदी, सुखी दिसायला लागले.

जवळपास पंधरा दिवस होत आले होते. डॉ. विवेकचे समुपदेशन, औषधोपचार , अजयचा समजुतदारपणा, घरच्यांची पुन्हा झालेली प्रेमळ भुमिका या साऱ्यांचा परिणाम म्हणून की काय, अजय आणि पूर्णा यांतील मधुर संबंध नव्याने निर्माण व्हायला लागले.

दोघांचाही एकमेकांवर पुन्हा विश्वास निर्माण व्हायला लागला. हळूहळू पूर्णा अजयच्या मिठीत शिरायला लागली. तिचे मादक ओठ अजयच्या उष्ण ओठांशी संवाद करायचा लागले. नजरेच्या इशाऱ्यातून, एकमेकांच्या देहबोलीतून नवी भाषा निर्माण होऊ लागली. पूर्णाला अजयचा राकट स्पर्श हवाहवासा वाटू लागला.

टि. व्हि. सिनेमातून दिसणाऱ्या उत्तेजीत करणाऱ्या दृष्यांनी पूर्णाचे शरीर पण तापू लागले.  आणि.... एका रात्री दोघांनाही कळले नाही, एकमेकांच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरवत असताना, चुंबनाची देवाणघेवाण होत असतानाच, हळूहळू दोघांच्याही अंगावरचे कपडे दूर होत गेले. दोघांचीही तापलेली शरीरे एकमेकांना भिडली. थोड्याच वेळात दोघांचेही श्वास एक झाले पुर्णाचे गोड सुस्कारे खोलीत फिरायला लागले. दोघांचीही शरीरे घामाने चिंब भिजली. शेवटी दोघांचाही आवेग मंदावला. एक तृप्तीचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर झळकायला लागला. अजयने प्रेमाने पूर्णाचे चुंबन घेतले. त्याचवेळी अजयच्या कानाचा हलकेच चावा घेत पूर्णा त्याच्या कानात कुजबुजली,”मला बाळ हवंय!! आपलं बाळ!” आणि अजयने तसेच तिला पुन्हा मिठीत ओढुन घेतले.

 

....... अविनाश गडवे,(अवती).

 

disclaimer

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये. 

 

Post a Comment

0 Comments