"आयटम मत कहों ना...!!"
© Velvet Kavisha
नवीनच ओळख झालेली मैत्रीण. वय विचारलं मला... माझं वय दिसत नाही म्हणून बिनधास्त सांगते..
"अग, चाळीशीत आहे मी."
"अय्या, हो का..! वाटतंच नाही"
असं म्हटलं की माझं दिल "गार्डन गार्डन हो जाता है ना बाब्बो.."
एक मित्र म्हणाला.. " तुम्हांला अहो जाहो म्हणू की नावाने हाक मारु..??.."
"नावच बेस्ट.. मी फेसबुकचे काही मित्र सोडून सगळ्यांना एकेरी संबोधते. कोणाला अहो जाहो म्हणायला आणि म्हणवून घ्यायलाही आवडतं नाही...फारच शिष्टाचार वाटतात... वैसे भी है तो हम चालीस के। पर दिल अभी अठरा का ही है... बच्चावाला... ये चालीस की उमर तो, हम खाली तजुर्बा बताने के लिये कहते है। क्युंकी तजुर्बा तो साठ साल का है अपने पास " मी नेहमीच्या फुशारक्या मारल्या.
आता मित्रच तो. शोधून घेतलेला. सच्चा दिलवाला. कवी मनाचा . म्हणाला " अरे बहेन, तजुर्बा तो हमारे आजुर्बा के पास भी बहोत था.. वो तो दो दो शादी कर के बैठा था..। लो कर लो बात..। " मर गयें ना ना बाबा हँस हँस के वो भी सुबे सुबे...।
तेव्हापासून फक्त वय सांगते तजुर्बा गेला...
हां... मुद्दा राहिला की बाजूलाच... तर झालं असं की, मोठ्या बहिणीकडे राहायला होते लग्नाच्या आधी...
त्यामुळे तिच्या मुलांशी जवळीक अगदी त्यांच्या लहानपणापासून... आईसाठी म्हणून ती कल्याणात राहायला आली आणि आता पोरांशी पुन्हा नव्याने गट्टी झाली... आपण बाबा all time favorite मावशी त्यांची... त्या भाचीच्या नादी लागून, हल्ली एकाच पायात anklet घालून फिरते मी ... मावशी अशी लिपस्टिक लाव, ह्या कलरची कुर्ती घे, अमुक तमुक आणि खुप काही....
भाच्याला चिकन लॉलीपॉप खायचे असोत की स्पोर्ट्स सायकल घ्यायची असो... Only with मावशी... त्यामुळे ताई बिनधास्त... College, क्लास कुठेही जायचं असो... Admission पासून results पर्यंत सगळीकडे आपणच. भाचा बारावीला. त्याचे बरेचसे मित्र ओळखतात चांगले.. आणि मी ही त्यांच्यात मौसी, मावशी म्हणूनच फेमस..
भाच्याचं annual function. मला म्हणाला "मावशी तु ये चचचचच." मग काय गेले नेहमीसारखी. एका हातात पर्स लटकवून. पोरांकडून top रिस्पेक्ट... एकदम सेलिब्रिटी फिलिंग ना राव..!! हम तो अपने ही नजर में उँचे लगने लगे ना बाबा....फिर वहीं लंबी सी गर्दन और लपकती हुई आँखों से घुम ही रहें थे की गडबड हुईं ना..।।
मागून कोणीतरी पोरटं म्हणालं.." अरे ये सन्नी की मौंसी तो क्या आयटम लग रहीं है..."
आयला आजपर्यंत नवरा कधी आयटम नाही म्हणाला आणि हा पोरं आयटम म्हणाला. कानात बाँम्ब फुटला ना बाब्बो...जीव नुसता आयटम आयटम झाला....
"अरे बाबा सन्नी.. कोण रे हा विद्वान.. सांग रे त्यांना... गद्धेचाळीशी झाली माझी... दोन पोरी आहेत.. मोठी लेक फक्त सहा वर्षांने लहान आहे रे तुमच्यापेक्षा... केस पण हल्ली डायशिवाय काळे दिसत नाहीत माझे... आयटम बियटम काहीही काय..!!" मी थोडसं रागावून म्हटलं.....
"अग मावशी, इतकं टेन्शन नको घेऊस. तो अस्लम् आहे. आगाऊ आहे जरा. ते तु आज छान दिसतेस ना.. म्हणून बोलला तो. ती बोलायची स्टाईल आहे पोरांची...
तुमच्या काळातलं आयटम वेगळं होतं. आम्ही " खुप छान दिसते" असं न म्हणता आयटम म्हणतो. ते मिस ला पण असंच बोलतात. आमचं आयटम म्हणणं शुद्ध आणि सात्विक असतं. तू लक्ष नको देऊस.." भाच्याने समजावलं..
"आयटम" हा शब्द शुद्ध सात्विक आहे. हे आताच कळलं. म्हणजे आम्ही येडे. इतक्या सात्विक शब्दाला बिथरतो ते. 😂😂 स्वतःकडेच पाहिलं पुन्हा एकदा. वात पेटलेला आयटम बाँब झालाय आपला. भाच्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे गप्प राहायला हवं. पण गप्प तरी कसं राहणार..?? राग बोलून टाकत नाही तोपर्यंत पोटात मळमळून पोटातल्या पोटात उलटी झाल्यासारखं होतं राहिल.
अजून एक सांगते.. मी आणि माझी एक मैत्रीण एका शाळेत पार्टटाइम शिकवायला जायचो घाटकोपरला..२००१ साली. माझी मैत्रीण दिसायला एकदमच सुंदर. देखणी. डोळे तर इतके भारी काही विचारुच नका. तेव्हा चौथीतल्या एका मुलाने तिला "बाई तुमचे डोळे सेक्सी आहेत" म्हटलेलं आठवलं मला या आयटम शब्दावरून. बिचारी माझी मैत्रीण . फुल्लं Vibrate mode वर गेलेली.. जाऊ दे.
ही पोरं तरी सतरा वर्षांची आहेत...
पण म्हणून चुकीला माफी नाही... आणि लक्ष देवू नकोस म्हटल्यावर मी लक्ष देणारच.. तुम्ही सांगितले आणि मी ऐकलं असं होतं नाही.... माझा मोर्चा पोरांकडे... भाचा ऑक्सिजनवर.. "जाऊ दे ना मावशी. कशाला उगाच (राडा).आपण auditorium मध्ये जाऊ चल..."
माझं नेहमीचच आहे. असं कोणी काही बोललं की मी सरळ #आधारकार्ड दाखवते... कारण त्यावरचा फोटो पाहिला की पाहणाऱ्याच्या डोळ्यातलं सौंदर्य मरून जातं....
तोच फंडा इथे ही... "देख अस्लम् देख... ये मेरा आधारकार्ड देख... ये लोगों ने complex दिया मुझें..। तब जा के मैनें थोडा मेक ओव्हर किया है...। तु मेरे को 'मौंसी, aunty, चाची, बुआ, दादी, दीदी, भाभी, नानी..." कुछ भी बोल पर ये आयटम मत बोल यार... मन में आयटम आयटम होता है ना फिर... क्या समझा..??" मी समजावून सांगितले.
"वो सॉरी मौसी.." अस्लम भाय
"चल इस बात पें चाय पिते है... साथ में .. मेरी तरफ सें..। की वडापाव खाओगे सब लोग..??" मी.
"नहीं, नहीं मौसी..। ठीक है..।" घोळक्यातून एकजण.
पोरांना आपण आईच्या मायेने समजावतो बुवा. अस्लम आणि गँगशी आपली दोस्ती फिक्स झाली.
ये तो अस्लम् था.... समझ ही जाएगा ना बाब्बो... पर नासमझ है उनका क्या करें..??.🤦🤦 खैर जाने दो..।
आमच्या काळात साधारण ३६×२४×३६ ला आयटम म्हणत. पण माझ्यासारख्या हाडाच्या सापळ्याला ही पोरं आयटम म्हणतात म्हणजे खरचं सात्विकताच आहे. भाचा बरोबर बोलतोय. दहावीनंतर पोरांनी दोन वर्षात एकदम कसून अभ्यास केलेला दिसतोयं..🤗🤗
आता माझं कसं आहे. मला कोणतंही ज्ञान मिळालं की मी वाटतेच. जे जे आपणांस ठावे ते इतरांस सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन आणि येडे झाले तर जबाबदारी त्यांची. 😂😂😜😜
न्यु जनरेशन बरोबर चालायला हवं. नाहीतर आऊटडेटेड म्हणतील. झालं..आयटम हा शब्द सात्विक म्हणून डोक्यात फिक्स झाला. मैत्रिणींच्या ग्रुपवर एका मैत्रिणीने फोटो टाकला.. "काय क'माल' दिसून राहिली बे... बोले तो एकदम आयटमच.." मी कमेंटलं. डोळ्यात दिलवाले इमोजी टाकून.
बाब्बो... मैत्रिणीच्या तळपायाची आग मस्तकात.. माझी फुल्लं ढाक्की टिक्की... "मी तुला तशी वाटले का..?? मी काय आयटम वाटते का?? आणि बरंच काही.." 🤐🤐🤐
माझं आरारारा झालेलं. पोरांच्या नादी लागून नको तिथे ट्राय केलं आणि तोंडावर पडले ना. आयटम हा शब्द अजूनही सात्विक नाहीच मुळी..!! पोरं चू बनवतात... तरीही यांच्यात राहून L लागले, कोणी काही बोललं की- तुमच्या पॉईंटला टोक आहे.. सहीं जा रहे हो वाकडे वाकडे... असं मैत्रिणींच्या घोळक्यात बोलू लागलेय.. वाण नै पण गुण लागलाय मैत्रिणींना..🤭🤭🤭
एकदा ताईच्या घरी गेले तर ही चांडाळ चौकडी तिथे हजर... Hi, hallo करून घरात गेले. पोरं गॅलरीत बसलेली. बाहेर त्यांच्या गप्पांचा आणि आत आमच्या गप्पांचा महापूर... हॅ हॅ हु हु ही ही
तेवढ्यात - -
“मेहनत इतनी खामोशी से करो की,,,
सफलता शोर मचा दे।”
हा शेर कानावर पडला. खुप छान शेर आहे... "गाजावाजा न करता मन लावून एखादं काम केलं की यश तुमचंच आहे..." इतका भारी अर्थ आहे या शेरचा.
बाहेरून हा शेर ऐकू आला. भारी वाटलं. सगळी पोरं बारवीतली. वाटलं कोणाला तरी कशात तरी चांगले मार्क्स मिळालेत. अभिनंदन करायला हवं...किती चांगली पोरं आहेत.
मैं अपना मुस्कराहट भरा चेहरा ले के बाहर.
"छान आहे हा शेर... कोण बोलले रे... " मी.
"हा आफताब बोलला मावशी.." अस्लम बोल्या.
"अरे व्वा..! अभिनंदन... कशात यश मिळालंय...? " मी भोळीभाबडी...
"कसलं काय मावशी.. तु कुठे यांच्या नादाला लागतेस.... आगाऊ आहेत पक्के... " सुरज मियाँ बोल्या...
"काय झालं... ?? " माझा प्रेमळ प्रश्न.
"जाने दो मौसी... छोड़ दो. आपके सिलॅबस के बाहर का है ये..।" आफताब भाई.
"अबे, सांगो जल्दी. " मी पण त्यांच्यातच.
"अग मावशी, या आफताबच्या भावाला मुलगा झालाय सहा दिवसांपुर्वी..." एकजण
"अरे व्वा...!! तु तो काका बन गया...पार्टी दे.." मी उत्साहात.
"कसलं काय मावशी...!! तो दिवसा झोपतो आणि रात्री जागतो. रडत राहतो. आफताबची रुम दहा बाय पंधराची सहा मोठी आणि हे छोटे नवाब असे सातजण राहतात घरात. बाळाच्या आवाजाने झोपमोड होते. आता परीक्षा जवळ आलीय. अभ्यासही होत नाही. म्हणून तो वैतागून हा शेर भावाला म्हणतो की, तेरी सफलता शोर मचा रहीं है....." भाच्याने सांगितले.
🤦 हम तो उधरीच टोटली फ्लॅट... निशब्द वगैरे वगैरे.... आयला इथपर्यंत आपले विचार पोचलेच नाहीत कधी... पोरं अगदीच वरताण निघाली..🙆♀️
काय करावं या आफताबचं ..??? एकीकडे अभ्यास. दुसरीकडे कुटुंब. एकीकडे काका बनल्याचं सुख तर दुसरीकडे छोट्या घरातली कुचंबणा. सगळी परिस्थिती पोराने या वयात हसत स्विकारलीय. पर हिरो ने इस शेर को ढेर कर के खरगोश कें पिंजडे मे बिठा दियाँ..।
कधी कधी वाईट वाटतं पण करता काय..!!" एखाद्या study center मध्ये बसवायला हवं आफताबला. हेच योग्य आहे." आपला निर्णय झाला. सिरीयसनेस संपला की आपली गाडी भंकसवर येते.
भाच्याला म्हटलं.. "बाबू, तु रोज तुझी चांडाळचौकडी घेऊन येत जा चहाला... " बच्चों की नजरों से शेर देखने को.... भारी वाटून राहिलं ना बाब्बो...!!! 😜😜😉😉
© Velvet Kavisha
निनावी शेअर करू नका. तसं आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box