जीवनसाथी .. भाग 2
✍©️जया पाटील
मालकीण बाईने केलेला अपमान गिळून किसन आणि रखमा बंगल्यावरून आपल्या खोलीवर जाण्यासाठी निघाले. मोठ्या साहेबाला शिक्षा मिळवून देण्यासाठी किसन करत असलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते. मोठ्या साहेबाच्या सांगण्यावरून किसनच्या मालकाने त्याला कामावरून देखील काढून टाकले.
रखमाचे काम तर आधीच बंद झाले होते. गणु आणि पारुने देखील आपल्या कामावर दगा येऊ नये म्हणून किसन आणि रखमाची साथ सोडली होती. मोठ्या साहेबाच्या मोठ्या लोकांसोबत ओळखी होत्या त्यामुळे त्याच्याविरुद्ध बोलायची कोणाचीच हिम्मत नव्हती. किसन हताश झाला होता. रखमाला न्याय मिळायलाच हवा, त्याच्या या निर्णयावर मात्र तो ठाम होता.
एक दिवस त्याची भेट गोदावरी सोबत झाली. गोदावरी म्हणजे पूर्वाश्रमीची किसनच्या गावाची गोदा होती. आईबाबांसोबत शहरात आलेल्या गोदाने लहानपणीच अशा वासनांध साहेबाचा सामना केला होता पण परिस्थिती पुढे न डगमगता ती वकील झाली होती. गोदावरी एक उत्तम वकील होती. स्त्रियांवर झालेल्या अन्याया विरुद्ध लढणे हेच तिच्या जीवनाचे लक्ष होते.
रखमाची केस गोदाने लढायचे ठरवले. सर्वप्रथम तिने महिला दक्षता समितीची मदत घेऊन मोठ्या साहेबाविरुद्ध केस फाईल केली पण त्या साहेबाच्या ओळखी खूप मोठ्या होत्या , परंतु किसन , गोदा आणि रखमा नेटाने सगळ्या प्रसंगांचा सामना करत होते.
साहेबांची पूर्वाश्रमीची माहिती काढतांना त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची माहिती गोदाला मिळाली पण मोठ्या साहेबाविरुद्ध साक्ष द्यायला कोणीही तयार होत नव्हते.
काही जणी घरच्यांना घाबरून गप्पा होत्या. मात्र किसन हरला नाही. त्याने त्या महिलांची भेट घेतली. रखमा आणि तुम्ही सगळ्या महिला जरा अशाच चूप राहिल्या तर नेहमीच अश्या मोठ्या साहेबांचे फावेल.
आपल्या पुढच्या पिढीसाठी , आपल्या लेकी- बाळींच्या भविष्यासाठी तुम्ही मोठ्या साहेबाविरुद्ध साक्ष द्यायलाच हवी असं किसनने त्या पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना समजावलं. त्यांना साक्ष देण्यासाठी तयार करायला त्याने खूप पराकोटीचे प्रयत्न केले. किसनच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले. त्या महिला साहेबाविरुद्ध साक्ष देण्यासाठी तयार झाल्या.
गोदानेही महिला दक्षता समितीच्या मदतीने त्या साहेबाच्या चौकशीसाठी पोलिसांवर दबाव आणला. किसनच्या या तक्रारीमुळे अनेक महिलांना हुरूप आला. सगळ्यांच्या साक्षीच्या आणि इतर पुराव्यांच्या आधारे विनयभंगाच्या आरोपाखाली त्या साहेबाला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
अखेरीस किसनचा विश्वास जिंकला आणि रखमाला न्याय मिळाला. जेव्हा तिला किसनची साथ मिळाली त्याचवेळेस ती तिची अर्धी लढाई जिंकली होती. कोर्टातील निकाल जाहीर झाल्यांनतर रखमा किसनला धरून रडू लागली ....
धनी ....म्या नशीबवान म्हणून तुमच्यासारखा धनी गावला ,...... मायावर जीव वोवाळून टाकणारा .... , मायावर इश्वास करणारा .....
तुम्ही बरोबर सांगत व्हतात....शहरातील माणसं लई कोत्या मनाची ....आपल्या सारख्या साध्या माणसाचा ठाव नाही लागायचा शहरामंधी ....चला घरला ....आपल्या गावाकडं .....
मैत्रिणींनो शक्यतो अश्या प्रकारच्या गोष्टीत नवरे आणि घरचेच साथ सोडतात अथवा समाज काय म्हणेल म्हणून आपली पत्नी, बहीण ,आई सगळ्यांनाच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत नाही.
आपल्या कथेचा नायक किसन मात्र अशिक्षित असून देखील तो खऱ्या अर्थाने सुशिक्षित असल्यासारखा वागला. रखमाला न्याय मिळवून देण्यात गोदा सोबत किसनची साथ देखील खूप महत्वाची होती. किसनच्या साथीमुळेच रखमा खंबीरपणे उभी होती. आपल्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी तो धडपडला, तिची कमजोरी होण्यापेक्षा तो तिचा एक भक्कम आधार झाला. सुख- दुःखात साथ देण्याच्या सातफेऱ्यातील सगळ्या वचनांचा भागीदार झाला....
खऱ्या अर्थाने एक जीवनसाथी झाला .... !
वरील कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

1 Comments
Ashikshit kisan che kharave titke kautuk kami ch ahet...pan asa kisan gharoghari asla tr pratyek mahile la tichya vr annyay atyachara viruddh ladnyachi takat vadel..
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box