बडे धोके है उस राह में

 बडे धोके है उस राह में


©Velvet Kavisha





ते झालं काय की... 


मैत्रिणींचे कोणी कोणी उकरुन काढलेले फोटो आणि हल्ली ते बऱ्याच चॅलेंजेससाठीचे साडीतले सुंदर सुंदर फोटो. ते सिंगल फोटो. कपल्स फोटोज.फोटोज विथ फॅमिली. फोटोज विथ पेट्स.  मन एकदम प्रसन्न झालं रावं. मैत्रिणींचं कौतुक मैत्रिणींनी नाही करायचं मग कोणी करायचं. 🤔🤔 कौतुक करताना आपण हातंच काही राखून ठेवतं नाही. कमेंट करणार तर एकदम दिल से च..




तेवढ्यात कोणीतरी ज्ञान दिलं की, challenges साठीच्या पोस्टवर छान कमेंट केल्या तर चालतील पण जुन्या फोटोवर मात्र खतरनाक डायलॉग हाणायचा. आरं देवा..!! डायलॉग काय जमेनात. मैत्रिणींना कसं बुवा काय पण डायलॉग मारायचे. तत्व बित्व काही आहे की नाही. नौटंकी जमते यार पण खाजगीत. चारचौघात नाही ना. जाऊ दे..!!




सगळ्या भानगडीत अख्खा दिवस मी फेसबुकवर वस्तीला ना रावं. मैत्रिणींचे जुने नवे फोटो, त्यावरच्या जुन्या नव्या कमेंट्स वाचून अगदीच धन्य झाले... ज्यांनी tag केलं त्यांच्या पोस्ट लगेच मिळाल्या. बाकीच्या जशा येत गेल्या तशी कमेंटत गेले. "काश हम लडका होते तो लाईन में खडे होते."... "दिल गार्डन गार्डन हो गया" , "आयला, क्या आँखें है.. हम तो खो ही गयें ना डार्लिंग उसमें".. " चल, चिअर्स करते है.." "दिल करता है, तुझे भगा के ले जाऊँ, पर दोस्त जो ठहरी..." अशा आणि याच्यासारख्या बऱ्याच कमेंट करून झाल्या.

 


अशा कमेंटस् फक्त आपल्या खास मैत्रिणींसाठी असतात. ज्यांंना त्यातला मिश्किलपणा कळतो. माझ्या सगळ्या activities पाहणारा माझा एक मित्र न राहवून बोलला. 



"तुम्ही पोरी जेवढ्या मैत्रिणींशी फ्लर्ट करता ना तेवढं नवऱ्याशी कराल तर जिंदगी हसीन बन जायेगी शौहर की..." 


"आयला दादुस, कुठं ऐकलास हा डायलॉग..??" 


"माझा मीच बनवलाय..." त्याने अभिमानाने सांगितले.


अरे देवा..!! असे डायलॉग बनवण्यापेक्षा.हे लोकं हिमालयात का जात नाहीत बरं... 🤔🤔 फार स्वच्छ निर्मळ नजरेने फोटो पाहत, चार सुंदर कमेंट केल्या, थोडी स्तुती केली तर त्याला "फ्लर्ट" म्हणतात रावं ही पोरं. फसतात ही तिथेच... 




काय बोलणार यावर... आणि नवऱ्याशी फ्लर्ट... ??? 🤣🤣🤣 काही बोलत नाही मी आता.. तुम्ही सूज्ञ आहात..




बरं हा सगळा वाह्यातपणा कमेंटबॉक्सपुरताच मर्यादित असतो. मेसेंजरवर आम्ही याचा लोड घेत नाही. कोणालाही entertain करत नाही.  




दुसरा एक मित्र मैत्रिणीच्या फ्रेंडलिस्टीतही होता. फुल्लं शीशीटिव्ही.... सायलेंट रिडर. त्याला काय वाटलं काय माहिती... मेसेंजरवर स्क्रीनशॉर्ट पाठवले. म्हणाला, "हे बघ, या बायका अशा मला भलतेसलते मेसेजेस पाठवतात. तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचतो मी. तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून तर मला टार्गेट नाही ना केलयं. ही सगळी तुमचीच फेक अकाउंट तर नाहीत...???"


🤦🤦च्यायला,,, हे म्हणजे भलतंच ना.  इथे ओरिजिनल अकाउंटने बदनाम आहोत आधीच. तर अजून फेक अकाउंट काढून कोण बदनाम होतयं होय.....???

 


समोर असता तर याच्या कानाखाली नक्कीच आवाज निघाला असता.  त्या दिवशी दोन शॉक बसले. एक- फेसबुकवर जसे पुरुष स्त्रियांना त्रास देतात, तशाच स्त्रियाही पुरुषांना त्रास देतात हे कळलं. आणि दुसरं - आम्ही आपसांत केलेल्या कमेंट्स पाहून, आम्ही फेक अकाउंट काढून पुरुष मंडळींना त्रास द्यायची फालतुगिरी करू असा विश्वास लोकांना वाटतोयं...🙆🙆


काय बोलायचं रावं... डोकं ब्लॉक होतं अशावेळी.


माझी आई एकदा म्हणाली की "लंका हनुमंताने नाही तर रावणाने जाळली." मी विचारलं तेव्हा म्हणाली की, "अग हनुमंत वानर होता तर तो इकडे तिकडे उड्या मारणारच ना... रावणाला नाही कळलं...."        

 


लहानपणी मोठी नव्हते त्यामुळे तेव्हा काही इतकं कळलं नाही पण आता मोठेपणी मोठी झालेयं. आता कळतंय की, आम्ही आमच्या वागण्यानेच बदनाम झालोय. म्हणजे - लंका "रावणानेच" जाळली ना बाब्बो..... तुम्हाला काय वाटतं "लंका" कोणी जाळली असेल...🤔🤔


आता बऱ्याच लोकांना कमेंटस् करताना विचार करू लागलेयं. काहींच्या पोस्टवर कमेंट्स करणंही सोडून दिलं. मस्त स्त्रियांचे ग्रुपस् जॉईन केलेत. भारी वाटतं..


तरीही मैत्रिणी या मैत्रिणी असतात. मैत्रिणीशी फ्लर्ट करणं म्हणजे healthy friendship चं लक्षण असतं ते. "ले प्यार की झप्पी" म्हटलं की आधार वाटतो संकटात. असो. तुम्हांला नाही कळणार ते..

 


मैत्रिणींशी फ्लर्ट करणं, कोणीतरी नॉमिनेट केलेल्या challenge साठी फोटो टाकणं, आणि बेधडक कमेंट करणं म्हणजे "बडे धोके है उस राह में" असं वाटून राहिलं ना मला बाब्बो..!! 🤦🤦


शेअर करा नावासहितच. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. 




© Velvet Kavisha


आवडल्यास कमेंट करा...

Post a Comment

1 Comments

  1. लंका रावणानेच जाळली.madness Certificate राहिले ग आपले...धमाल झाली होती त्याने आणि कमेंट ने

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box