#रेसिपी_आणि_मी_शापित_सुगरण
© Velvet Kavisha
त्याची ऑफिसला जायची घाई. टिफिन, पाण्याची बाटली देऊन झाली. "बाय बाय, tc, good day वगैरे वगैरे" झालं आणि मिस्टरांना अचानक काही आठवलं. म्हणाले "भाजीची रेसिपी लिहून दे पटकन. तो शर्मा चार दिवस डोकं खातोय."
"कोणती भाजी..???" मी विचारलं
"सुरणाची गं... उशिर होतोय दे पटकन लिहून.."
मी टायपून पाठवते whsup वर म्हणत वेळ मारून नेली. पण रेसिपी लिहून द्यायच्या विचाराने काही सूचेना.
मी सासूबाईंच्या हातचं खावून इतकी वर्षे तब्बेत बनवली. ३९ किलो ते ४६ किलोपर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेमाने खाऊ घातल्याचा परिणाम.
हल्ली भाज्या काही हव्या त्या मिळत नाहीत. मग जी मिळेल ती आणून जादूचे प्रयोग करत बसायचे.
कांदा, टोमॅटो , मिरची आलं-लसूण-मिरची पेस्ट, जीरं मोहरीची फोडणी दिली. सुरणच्या फोडी काही केल्या देखण्या दिसेनात. आता वरून डाळीचे पीठ भुरभुरावं की काय या विचारात असताना सकाळच्या नाश्त्याची ओल्या खोबऱ्याची चटणी नजरेस पडली. मग काय तेलावर फिरत असलेल्या भाजीत दिली ओतून. झाकण मारून ठेवून दिली शिजायला. पाच मिनिटांत मस्त झाली भाजी... हुश्श झालं.
ही एवढी रेसिपी with उचापत्या लिहून कशी द्यावी ब्वॉ.... बरं समोर शर्माजी जरा इकडंच तिकडे केलं तर भाजी वारलीच समजायची.... सुरण आहे तो. मग त्यातल्या त्यात अंदाजे लिहून दिलं आणि पुढे "चवीनुसार" लिहायला विसरले नाही...
दुसरी गोष्ट..... मखाण्याची.
पंधरा दिवसांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदाच कळलं की मखाणा खातात... मिस्टरांनी आणलेला. म्हणाले हेल्दी असतो, ऑफिसमध्ये सगळे आणतात.
झालं एक रेसिपी पाहिली तर त्यात तो मखाणा वर आणि जे काय ऍड केलेलं ते तळाशी. अँ अस्सं कसं खायचं बुवा... तिखट खात नाहीत पण मसालेदार खातो ना...
झालं. मखाण्याची होडी पैलतीरावर. हुश्श...!!
संध्याकाळी पोचपावती..."भाभी को बोलना #मास्टर_शेफ में हिस्सा लिजिएगा..." च्यायला इथं तो मखणा बनून डिशमध्ये जाईपर्यंत किती उलथापालथ झाली ती माझी मला माहिती... मास्टर शेफ मधले जज्ज डोकं आपटतील माझ्यासमोर. साहित्यामध्ये प्रमाण काय देणार....🤔🤔
तिसरी गोष्ट बोंबील वगैरेंची...
"बोंबील." ......
टाळकंच सटकलं. असं बोलतं का कुणी..?? ते ही स्वतःच्या बायकोला..!! 😠😠 लहानपणापासून "फिगर" मेनटेनीत हाय आपली. त्याला मैत्रिणींच्या भाषेत "चवळीची शेंग" वगैरे म्हणतात..🤗🤗 आणि हा बाबा डायरेक्ट "बोंबील" म्हणतो..??😡😡😒😒
तसं कोकणी आम्ही. तिरकस बोललो नाही, तर आम्हांला "अजीर्ण" होतं. आमच्या गावी आज्या, काक्या, माम्या माझं कौतुक "सुक्या बोंबीलांसारखी आहेस" म्हणत करायच्या. जाऊ दे "सुका बोंबील" म्हणजे?? ....आ ता नाही सांगत. खुप राग यायचा तेव्हा. पण करता काय..!!
एकदा शिक्षक दिनाच्या दिवशी "साडी" नेसून चालले होते, तर एक ओळखीची काकी भेटली रस्त्यात. म्हणाली, "साडी नेसलंस काय गे बाय..??"
"व्हय काकी, कशी दिसता..???" मी विचारलं.
"काठयेक फडको गुंडाळल्यासारो वाटतां... तशी अगदीच वायट नाय हां पण.." काकीने सांगितले.
"हे बघा, बोंबील म्हणायचं काम नाही...!! तुम्ही पाहून सवरून पसंत केलंय स्वतःहून.... आम्ही काही मागे मागे नव्हतो आलो तुमच्या.. आता तेरा वर्षानंतर तुम्ही मला "बोंबील" म्हणताय...??🤨🤨मेंटेन केलीय मी स्वतःला... किती जणीं माझ्यामुळे "कॉम्प्लेक्स" मध्ये जातात..." 😜😜😜 सांगूनच टाकलं मग तावातावाने...
"तु भांग पितेस का गं अधूनमधून..?? मी काय बोलतोय ?? तू काय बोलतेस..!!! तू Bombay duck म्हणजे काय विचारलंस ना तर "Bombay duck" ला मराठीत "बोंबील" म्हणतात.... !!" उत्तर आलं...
"आयला असं कसं...?? 'डक' म्हणजे ते मला आपलं 'पॅक पॅक पॅक पॅक बदक पळाला, कुणाच्या घरी गेला.' सारखं वाटलं ना काहीतरी... हे म्हणजे आलिया भटला "कालिया" भट म्हणण्यासारखं आहे..." मी एकदम आश्चर्याच्या चक्कीत बिक्कीत पडत म्हटलं....
"अग ही मच्छी फक्त मुंबई आणि लगतच्या किनारपट्टीवर मिळते. आपल्या गावीसुध्दा नाही मिळत ताजी. ती इकडूनच पाठवतात सुकी (dry bombay duck). इंग्रजांसाठी "बॉम्बे डाक" ने ही मच्छी पाठवली जायची म्हणून तिला अपभ्रशांच नाव लाभलयं...." बॉम्बे डाक" चं "bombay duck" समजावून सांगणं संपलं. 😮😮
झालं.... आता एवढं सगळं झाल्यावर रविवारच्या "संड्डे" ला bombay duck नाही आणले, तर त्यांचा अपमान होईल... मग काय आले ते घरी.. जरा खात्यापित्या घरचे होते. आम्ही अजूनही "पाट्याखाली" ठेवतो त्यांना.
अग्ग आई गं... वेगळे करता येईनात की "क्रिस्पी" करता येईनात. खाणारे कसे बरं खातील, ते ही कळेना... पर हम तो " हम" है ना.!!! लगेच तो गोळा बाजूला केला आणि बाकीचे फ्राय करून घेतले. थंड झालेल्या गोळ्यात कॉर्नफ्लॉवर टाकून मस्त "टिकीया" deep fry केल्या... नवीन रेसिपी पाहून घरचे खुश झाले...
बाब्बो, कुठून सुरु झालेलं "बॉम्बे डक"चं पुराण कुठे येऊन संपलं...🤦♀️🤦♀️ पण आता मला कळलंच की "बॉम्बे डक" म्हणजे "बोंबीलच." मी पण जरा येडीच आहे. गुगल बाबा आहे मोबाईलमध्ये त्याला विसरले आणि एवढं सगळं रामायण झालं...🙃🙃 असो..!!
तुम्हांला म्हणून सांगते, गेल्या चार महिन्यात माझ्या पाककलेच्या कौशल्यात उत्क्रांती झालीय. पण माझी एक मैत्रीण मला शापित सुगरण म्हणते ना राव...🙆♀️
तर मग फ्रेंडो ज्या मित्राच्या "स्टेटस्" वरून हे सगळं झालं त्याची "नांगांव बीच-अलिबाग" ला अथर्व खानावळ आहे. घरगुती राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे. निसर्ग वादळात जमीनदोस्त झालेली आणि कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून "अथर्व खानावळ" पुन्हा उभी राहिलीय. तुम्ही ही जर थोडं कंटाळवाण्या स्थितीतून बाहेर पडून कुटुंबासोबत कुठे जायचा विचार करत असाल तर नक्की नागांवला भेट द्या. त्याआधी तुमच्या खाण्याजेवण्याची, राहण्याची सोय करण्यासाठी श्री. मनोज नागांवकर - मो. नंबर 7083387590 यांना नक्की फोन करा. आणि सांगा बिनधास्त की, तुझ्या "ताईचं" लिखाण वाचून आलोय.. स्वॅग हे होगा आपका स्वागत... डेफिनेटली..
वरील साहित्याचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कट, कॉपी, पेस्ट करु नका. शेअर केलात तर लिंकसहितच करा. निनावी शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल...

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box