#अपायकारक_उपाय
© Velvet Kavisha
लंच टाईम. सोशल डिस्टन्सिंग फॉलों करायचं म्हणून कॉन्फरन्स रुम लंचरुम मध्ये कन्व्हर्ट झालेली. रोज तारीफ करत त्याच्या डब्यातली भाजी संपवणारे, आज जरा आखडत्या हाताने भाजी घेत होते.
शेवटी एकाने एक मीटर दूर उभं राहत त्याला विचारलंच.
"यार, सच सच बता. सब्जी कौन बनाता है..??" मित्र.
तेरी भाभी। रोज वहीं बनाती है। क्युं रे.." तो.
"भगवान की कसम लेके बता भाभी से कुछ झगड़ा नहीं है तेरा...???" मित्र.
"अरे, नहीं रे.. पर तुझें ऐसा क्युं लग रहा है..?" तो
"कुछ नहीं रे फेसबुक पर आज कल भाभी के quotes पढ़ता हुँ..। हिंदी में रहतें है कर कें समझं मे आते है..। मराठी नहीं समझं में आती..। अभी लगातार पढ़ रहां हुँ..। कोटस् पढ़ के लगा की तेरा भाभी से कुछ जोरदार झगड़ा हुआँ है...।" मित्र.
"अरे घोचू, तु भी आ गयां ना वो quotes की चक्कर में..। अभी तक दस लोग पुछ़ चुके है..। तु हीं बाकी था..। अरे तेरे भाभी को लिखने के लिये झगड़े की जरुरत नहीं होती..! किसीं सहेली ने उसको जोर का धक्का दियां होगा. तो पड़ा हुआ सब talent एकसाथ बाहर आया...। अभी अभी नया है तब तक पढ़ने को मिलेगा..। बाद में भाभी और भाभी के quotes दोनों गायब...।" तो...😀😀😀
काय मित्र आहेत रावं. यांना मित्राबद्दल इतका विश्वास आहे की, १००% हाच भांडणार. भाभी तो भांड ही सकती ना..🤦♀️🤦♀️ यांच्यासाठी तरी एकदा भांडायला हवं. त्याला वाटूनच गेलं.
घरी येऊन जसाच्या तसा किस्सा सांगितला... "बापरे म्हणजे लाईक आणि see first केल्यामुळे quotes तुमच्या फ्रेंन्डस् ना दिसतात. म्हणून एवढे गैरसमज ते ही समजूतदार नवऱ्याच्या बाबतीत..It's not fair हां... सोल्यूशन काढायला हवं." मी
"आता काय सोल्युशन काढणार आहेस...??" तो.
"आताच प्रॉब्लेम कळलाय तर थोडा वेळ तरी द्या." मी.
नेहमीप्रमाणे खुप विचार करून, सगळ्या शक्यतांंची खातरजमा करून. देवाला हात वगैरे जोडून बेस्ट मधलं बेस्ट सोल्युशन निघालं.
"तुम्ही तुमच्या फ्रेंडलिस्टमधून unfriend करा माझं नाव. आणि तुमच्या प्रोफाईलचा पासवर्ड द्या.. I like this lines घ्या caption सहीत quotes टाकते तुमच्या वॉलवर. तुम्हांला आवडले म्हणून तुम्ही पोस्ट केले असं वाटून जाईल सगळ्यांना... त्याने होईल काय की, तुम्ही भांडता असं वाटणार नाही मित्र मंडळाला..." मी.
"😠😠😠 आजारापेक्षा इलाज भयंकर." तो
बाब्बो... इतका भारी उपाय सांगितला तरी मेलं कौतुक म्हणून नाही...नुसतं रागवायचं. पासवर्डच मागितला ना. प्रॉपर्टी नावावर करायला थोडीच सांगितली... 🙆🙆
अरे ही म्हण तर माझी ताई म्हणते..."आजारापेक्षा इलाज भयंकर." आणि मी ताईला फॉलो करते. मोठी हाय न्हवं ती.. 🤗🤗🤗
#विश्वास बिश्वास
स्थळ :- मैत्रिणीचं घर
प्रसंग:- मैत्रिणीचा नवरा आंघोळीला गेलाय आणि त्याच्या फोनची रिंग वाजतेय. मैत्रिणीने फोन उचलला.
आता संवाद....
"हॅ ssss लो "---मैत्रीण
"----" पलिकडून.
"पंडीत नहाने गया है...।" मैत्रीण
"--------" पलिकडून
"अरे वर्क फ्रॉम होम हो या फिल्ड पें, पंडीत सुबह उठ के पहले नहाता ही है..." मैत्रीण.
"--------" पलिकडून
" जैसे भी बाथरुम सें निकलेगा मै तुरंत बता दुँगी.." मैत्रीण
"--------" पलिकडून
"पक्का.. पक्का। पाँच मिनट में आ जाएगा बाहर.." मैत्रीण
"--------" पलिकडून
"हां. हां...... शुअर शुअर " मैत्रीण.
"--------" पलिकडून
"अगर नहीं आया पाँच मिनट में तो बाहर से आवाज देके बता दुँगी...।" मैत्रीण.
आपल्याला बुवा झेपत नाही इतकं. छ्या, एवढं कोण "हां, हां" करत राहतं होय.
तिला म्हटलं ..."अग कधीची सांगतेस तरीही त्याचं सुरुच आहे... सांग ना विश्वासाने कि ---- अगर पंडीत जल्दी बाहर नहीं आयेगा नहा के , तो मैं अंदर जा के आपका मेसेज दे दुँगी....।"
"नको गं नको. पंडीतचा मित्र कल्पनेनेच मरेल." मैत्रीण.
बाब्बो.... मी आपल्या बोलण्यावर समोरच्याला विश्वास वाटावा म्हणून सांगितले ना... "मरेल" का बरं.. 🤔🤔
जाऊ दे. आता कोणाचं मरण कशात आहे आपण कसं सांगणार राव...😜😜😜
#कॉन्फिडन्स
काय झालं तीन महिने होऊन गेले. लॉकडाऊनमध्ये घरचा कर्ता पकलेला. मुलाची बारावीची परीक्षा झालेली. त्याचं पुढचं शिक्षण. चांगलं स्थळ आलं आणि जमलंच तर लेकीचं लग्न ही पुढच्या वर्षी करायचं होतं त्याला. बावीस पूर्ण केलीत तिने. कोरोनाचं संकट आलं. तो पुरता भांबावून गेला. ट्रेन बंद झालेल्या. नोकरी प्रायव्हेट. तिथेही जवळपासच्या एरियातली मुलं भरती करून घेतल्याचं कळलं. आणि तो अगदीच घाबरला. इतक्या लांबून जायचं कसं.?? शेवटी ऑफिसकडून मेसेज आणि आयडी आलं. फार्मा रिलेटेड नोकरी. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत.
ऑफिसने स्टाफसाठी बस ही सुरू केलेली. पहिल्या आठवड्यात सकाळी पाचला उठून, सव्वासहा - साडेसहाला बस पकडून पुन्हा घरी संध्याकाळी येताना साडेनऊ - दहा वाजू लागले...
16/ 17 तास म्हणजे too much.. त्यात तीन महिन्याचा अर्धा पगार दिलेला कंपनीने घरात बसून. मोजक्या स्टाफवर कामाचा लोडच लोड... हा घरचा कर्ता क्रियापदासह लटपटून गेला....
ताईने सगळं सांगितले आणि म्हणाली रविवारी आईकडे जायच्या आधी घरी ये जरा. यांना समजावुया. नोकरीपायी अगदीच हाल करून घेतलेतं.
"ताई भावोजी" आम्हां तात माय समान. त्यामुळे गेले रविवारी. चहा घेतला. दोघी बसलो. सुरुवात ताईनेच केली.
" बघ गं, यांना रोज म्हणते की स्वतःचे हाल करत एवढ्या लांब का जाता...?? थकतात बघ किती. सोबतचे बरेच पॉझिटिव्ह आलेत. घोर लागतो गं जीवाला. ऑफिसकडून ट्रेनचा पास काढून घ्या म्हटलं तर ते ही ना. सोडून द्या ही नोकरी. इथे जवळपास बघूया कुठे असेल तर. असं ही सांगून झालं. पण ऐकतील तर शप्पथ. स्वतः टेन्शन घेतात मग पर्यायाने आम्हांलाही येत." एका दमात सांगून झालं तिचं.
"इतकं टेन्शन नका घेऊ हो भावोजी. ते डिप्रेशन सारखं होईल नाहीतर. हल्ली कोरोनासोबत फ्री आहे ते. खायचंच म्हणाल तर, आयुष्यभर नोकरी केलीय ना. चार पैसे आहेत गाठीला तेच जपून वापरा. पण स्वतःची हेळसांड नका करून घेऊ. नसेल झेपत तर खरचं नोकरी द्या सोडून. बघू पुढे कसं करता येईल ते..." मी मोठ्या माणसाला मोठं होऊन समजावलं... कारण अशावेळी धीर देणं गरजेचं असतं. मी तेच केलं.
ताई ही समजावत होती. मध्ये मध्ये भाचा आणि भाची ही "हो ला हो" करून किंवा "बरोबर आहे" म्हणत आम्हांला सपोर्ट करत होती.
"आता जायला सुरुवात केली तर हा महिना पूर्ण करतो. शेठला उद्या सांगतो. आठच दिवस राहिलेत या महिन्याचे. रेल्वेचा पास काढून दिला तर ठीक नाहीतर मग सोडतो ही नोकरी." भावोजींचा समजुतीचा सूर...
"मी जॉब सोडला तर मग नवीन नोकरी शोधायचं काम तुझं." माझ्याकडे पाहत भावोजी म्हणाले.
"हो. हो. नक्की शोधेन." मी ही आत्मविश्वासाने सांगितले.
आता आम्ही बहिणी म्हणजे अशा आहोत ना की, जास्त लोड घेत नाही कशाचा. प्रॉब्लेम्स वर सोल्युशन मिळेपर्यंत जीव थोडा वरखाली होतो. पण एकदा का आमच्या परीने आम्ही प्रश्न सोडवला की घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेतो. तशी अंमलबजावणी करतो.
तसंच झालं आज. सिरीयसनेस संपला आणि भंकस करायची ताईला हुक्की आली.
भावोजी काही बोलणार इतक्यात ताई म्हणाली, "अगं यांना म्हटलं मी, की आपण गरीब लोकं. नाही एखाद्या वेळेस मीठ भाकरी जमली तर झोपडीतला 'पिझ्झा' मागवून खावू. दरवेळेस चार मागवतो तर तीन मागवत जाऊ. पण कसेतरी दिवस ढकलू." मला ताईचा रोख कळला..
"हां भावोजी, चिकन मटण नाहीच झेपलं आणायला तर KFC मधून मागवा. गहू नाही परवडले तर ब्रेड आणून खा. केळ्याने कफ होतो त्यामुळे वेळेला लागलीच तर सफरचंद आणून खा. रस्त्यावरचे व्यापारी नाहीत, त्यामुळे Amazon वरून डिलिव्हरी चार्जेस देऊन वगैरे कपडे मागवा. पापी पेट का सवाल आहे. तर ड्रायफ्रूटमुळे भुक लागत नाही म्हणतात, तर ते खा हवेतर रोज शंभर दिडशे ग्रँम प्रत्येकाने.
पण आता आलेले दिवस कसेतरी ढकला. फक्त हाडाची काडं करत कामाला जाऊ नका. आखिर "जान है तो जहाँन है..। क्या समझे जीजाजी." मी ही ताईसोबत समजावलं. म्हणजे आम्हांला असंच समजवायला येतं.
"च्यामारी यांच्या... दोघी पण नग आहेत अगदी. कोणीतरी फ्रीजमधलं स्प्राईट आणून ओता रे दोघींच्या डोक्यावर.. च्यायला समजावतात की औकात काढतात काहीच कळत नाही.. प्रसंग काय... बोलताय काय..." इति भावोजी. आणि मग एकच हशा.. ह्या ह्या ही ही हू हू...😂😂
बाब्बो ..... हम तो ऐसें ही है... स्ट्रगल खिशात घेऊन फिरतो. हमारे साथ रहोगें तो सुधर जाओगे... क्युं की जिंदगी जीने का तरीका जो सीख लियां हमने...
तुमचं रडगाणं आमच्यासमोर एकदा गायलात तर पुन्हा येणार नाहीत तुम्ही सांगायला. तितका कमालीचा कॉन्फिडन्स देऊन पाठवण्याची जिगर बाळगून आहोत..... विषय संपला.
© Velvet Kavisha
नावासहित शेअर करा. नाहीतर माझी ताई लय डेंजर हाय. उन्हात घर बांधील तुमचं.... मग म्हणाल आधी का नाही सांगितले...

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box