सारथी .. भाग अंतिम

 #सारथी .. भाग अंतिम


©️जया पाटील 



भाग एक वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

👉   सारथी.. भाग एक

मागील भागात आपण पहिले कि श्वेताला हिमोफेलिया या आजाराचे निदान झाले. तिच्या शारीरिक अस्वास्थ्यामुळे तिला तिचे इंजिनीरिंगचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तिच्या या आजारामुळे लग्नासाठी तिला सतत नकार येऊ लागले. इतक्या आजारपणात जिद्दीने तिने इतिहास क्षेत्रात ग्रॅजुएशन पूर्ण केले आणि पोस्ट ग्रॅजुएशन पूर्ण करण्याचे ठरवले. अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं आणण्यासाठी श्वेता लायब्ररीमध्ये जाते आणि तिथेच तिची भेट निखिल सोबत होते.


आता पुढे ......


लायब्ररी मध्ये पुस्तकं काढत असताना श्वेताला चक्कर आली आणि ती खाली पडणार तितक्यात शेजारी उभ्या असलेल्या निखिलने तिला सावरले आणि बाजूच्या बाकावर नेऊन तिला बसवले आणि तो पुढे बोलु लागला ...


" आहो मॅडम , तब्बेत बरी नसेल तर कशाला यायचे लायब्ररी मध्ये अभ्यास करण्यासाठी .. ?   ' health is wealth ' आधी तब्येतीची काळजी घ्या आणि मग किती अभ्यास करायचा तो करा. "  


" तब्येतीचे कारण जर आयुष्यभर धरून बसली तर माझ्याकडून आयुष्यभर अभ्यास होणार नाही ..Mr .... " श्वेता निखिलला म्हणाली ...


" i am sorry , mam , पण तुमच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही. anyway माझे नाव निखिल .... , बाय प्रोफेशन मी इंजिनिअर आहे आणि एका आय टी कंपनीत काम करतो पण मनाने मात्र मी मराठमोळा रसिक माणूस , मला मराठी पुस्तकं वाचन करण्याची प्रचंड आवड , त्यामुळे माझी ताई इतिहास विषयात MA करतेय पण तिच्या पुस्तकांचा तोफखाना मात्र मीच सांभाळतो. लायब्ररीतून तिची पुस्तकं नेण्या आणण्याची जबाबदारी माझी असते. तुम्हाला देखील काही मदत हवी असेल तर सांगा. " 


निखिलने श्वेताला स्वतःचा परिचय करून दिला.


" थँक्यू निखिल , तुम्हाला भेटून खूप छान वाटले. मदतीसाठी खूप खूप आभारी. माझे नाव श्वेता ,  actually मी पण इंजिनीरिंगची स्टुडन्ट होते पण काही कारणास्तव मला इंजिनीरिंग अर्ध्यातच सोडावे लागले आणि मी इतिहास विषयात ग्रॅजुएशन केले. आता पोस्टग्रॅजुएशनचा अभ्यास सुरु केला. " श्वेताने देखील त्याला स्वतःची ओळख करून दिली.


दोघांच्याही भेटी लायब्ररीच्या निम्मिताने वाढत गेल्या. एकमेकांसोबत वेळ घालवत असताना श्वेताने त्याला स्वतःच्या आजाराविषयी देखील सांगितले. तिला हिमोफेलिया असल्याचे ऐकून निखिलला खूपच मोठा धक्का बसला. 

मात्र इतक्या कठीण परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची श्वेताची जिद्द त्याला मनापासून भावली. त्याच्या मनात श्वेताविषयी आदर निर्माण झाला.


श्वेता आणि निखिल दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण झाले. या दरम्यान देखील श्वेताचे उपचार सुरूच होते परंतु तिला अचानक रक्तस्राव सुरु होत असल्यामुळे तिचा त्रास वाढत गेला. त्यामुळे मध्ये काही दिवस ती लायब्ररी मध्ये देखील गेली नाही. श्वेता इतके दिवस भेटली नाही म्हणून निखिल व्याकुळ झाला.  


त्याने लायब्ररीअन कडून श्वेताचा पत्ता मिळवला. सुरुवातीला प्रायव्हसी पॉलिसीमुळे लायब्ररीअन पत्ता देण्यासाठी तयार झाला नाही. मात्र श्वेता आणि निखिल दोघांनाही लायब्ररी मध्ये बोलताना त्याने अनेकदा पाहिले असल्या कारणाने ते दोघेही एकमेकांचा ओळखतात याची त्याला खात्री होती आणि निखिलने खूपच विनवण्या केल्यानंतर तो श्वेताचा पत्ता देण्यासाठी तयार झाला.


लायब्ररीअनने दिलेल्या पत्त्यावर अर्थातच श्वेताच्या घरी निखिल पोहोचला. श्वेताने निखिलची तिच्या आईबाबांसोबत ओळख करून दिली. पहिल्याच भेटीत निखिलचा स्वभाव श्वेताच्या आईबाबांना खूपच आवडला. श्वेताची अवस्था पाहून निखिलचे डोळे भरून आले. 


निखिल मी लवकर बरी होईन असे आश्वासन श्वेताने निखिलला दिले. आता घरच्यांसोबत ओळख झाल्यामुळे श्वेता आणि निखिलच्या भेटी वाढू लागल्या. श्वेता निखिलला मनापासून आवडू लागली आणि तो तिच्या प्रेमात पडला. निखिलने श्वेताला लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले.


थोड्याच दिवसात श्वेताच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि जिद्दीने तिने पुन्हा लायब्ररी जॉईन केली. निखिलने स्वतः च्या मनातील श्वेताविषयीच्या भावना तिला सांगायच्या ठरवल्या. बरेच दिवस तो तिला भेटलाच नाही. निखिल खूप दिवस भेटला नाही आणि त्याच्या सोबत बोलणे देखील झाले नाही म्हणून श्वेता देखील व्याकुळ झाली होती. " आग दोनो तरफ बराबर लगी थी । " असे म्हणायला हरकत नाही कारण श्वेताला पण निखिल मनापासून आवडत होता. परंतु माझ्या आजारामुळे मी त्याला कुठले सुख देऊ शकेल कि नाही याची तिला शाश्वती नव्हती. त्यामुळे स्वतःच्या भावना तिने कधीच ओठावर आणल्या नाहीत.


निखिलला भेटण्यासाठी , त्याच्यासोबत बोलण्यासाठी तिने अनेकदा कॉल केले परंतु काही ना काही निम्मिताने त्याच्या सोबत बोलणे होऊ शकले नाही. श्वेताची व्याकुळता वाढत चालली होती आणि अचानक निखिलचा मेसेज आला. त्याने श्वेताला पत्ता मेसेज करून ठरलेल्या ठिकाणी भेटायला सांगितले. आता निखिलला भेटल्यावर इतका त्रास का दिलास ..?  का भेटला नाहीस मला ..? याचा जाब मी नक्की विचारणार असे श्वेताने मनोमन ठरवले.  


ठरलेल्या वेळेवर श्वेता निखिलने मेसेज केलेल्या पत्त्यावर पोहोचली. दरवाजा उघडून आत आली तर आत कोणीच दिसलें नाही मात्र त्या रूमला खूपच सुंदर सजवले होते. चहूकडे सुरु असलेली लायटिंग , चहूकडे पसरलेले रंगीबेरंगी फुगे , मंद आवाजात सुरु असलेले संगीत , टेबलवर सजवून ठेवलेला केक .. हे सगळे मनमोहक वातावरण पाहून श्वेता खूपच आनंदी झाली. तितक्यात तिच्या मागुन आवाज आला ....


" I Love u , श्वेता ...माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर .. ! I Love u so much .....! "


तिने मागे वळून पाहिले तर मागे निखिल उभा होता. त्याला पाहून श्वेताला खूपच आनंद झाला. कोरड्या जमिनीवर मृदु तुषारांचा शिडकाव झाल्यावर जी तृप्ती अनुभवायला मिळते तशीच तृप्तता श्वेता अनुभवत होती.


निखिल पुढे बोलु लागला ...


" ज्या दिवशी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासूनच मला जाणवले कि तु काही तरी खास आहेस आणि आपल्या होण्याऱ्या प्रत्येक भेटीनंतर मी तुझ्यात गुंतत गेलो. तुझ्या स्वभावापासून , तुझ्या जिद्दीपर्यंत सगळ्याच गोष्टींच्या प्रेमात पडलो मी ... जोपर्यंत आपण दोघे आहोत तोपर्यंतचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. माझ्यासोबत लग्न करशील ...? will u marry me ....? "


श्वेताला हे सारे स्वप्नवत वाटत होते. ती खूपच खुश होती. पण अचानक तिची फुललेली कळी पुन्हा हिरमुसली आणि ती बोलु लागली ...


" निखिल , तु तुझ्या मनातल्या भावना मला सांगितल्या आणि मला आभाळ दोनच बोट राहिले रे ..! खरं सांगायचं तर तुझ्या इतकीच मी देखील गुंतत गेली रे .. तुझ्यासोबत आणि कधी तुझ्या प्रेमात पडली ते मला देखील समजले नाही. मला तु माझा , खूप जवळचा वाटतो. I am really attracted to u Nikhil..."


" पण हे सगळे शक्य नाही. तु जो काही विचार आपल्या दोघांबद्दल करतोय ते कधीच शक्य नाही. कारण तुला माझ्या आजाराबद्दल माहिती आहे त्यामुळेच एक पत्नी जे काही सुख आपल्या नवऱ्याला देऊ इच्छिते ते मी तुला देऊ शकेल कि नाही हे मला देखील माहिती नाही."


" प्रत्येक मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या सुखी संसाराची , मुलाबाळांची स्वप्न पाहतात पण तुझी ही सगळी स्वप्ने माझ्यासोबत कधीच पूर्ण होणार नाहीत त्यामुळे मला विसरून जा ....आपण चांगले मित्र मैत्रीण आहोत तसेच राहूया ..या पेक्षा जास्त पुढे नाही जाऊ शकत रे मी तुझ्यासोबत .."


i am really sorry ..."


हे सगळे बोलताना श्वेताला स्वतःचे अश्रू रोखता आले नाही आणि ती रडू लागली. त्यावेळेस निखिल तिला शांत करू लागला आणि तिचा हात हातात घेऊन तो बोलु लागला ..


" तुझ्या आजाराबद्दल मला सगळे काही आधीच माहित आहे श्वेता .., तु तरीही स्वतःला का अपराधी समजतेस ..? या सगळयात तुझा काहीच दोष नाही , तु माझ्यापासून काहीच लपवलेले नाही , त्यामुळे स्वतःला अपराधी समजणे आधी बंद कर. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या स्वप्नांचा .. , तर तुझी देखील ही सगळी स्वप्न असतीलच ना .... ,पण आपण दोघेही सोबत असताना मला ही स्वप्ने फारशी महत्वाची वाटत नाही कारण देव सगळ्यांना सगळेच देतो असे नसते. "


" आपले दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम असणेच माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे बाकी इतर कुठलेही प्रश्न त्याच्या पुढे मला कमी महत्वाचे वाटतात. राहता राहिला प्रश्न आईबाबा होण्याचा ..तर ही एक सुंदर भावना आहे , उर्मी आहे. motherhood or parenhood is a behaviour.. ! "


" स्वतः जन्म दिला म्हणजेच आईवडील होता येते असे नाहीये , आईबाबा होण्यासाठी आपल्याच पोटात मुल वाढवावे असे काही नसते. सहवासानेही प्रेम , माया निर्माण होतेच कि ....


या जगात कितीतरी जोडपी अशीच आहेत कि ज्यांना मुल होऊ शकत नाही पण याचा अर्थ असा  नाही कि ते चांगला संसार करू शकत नाही. मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळाली आहे यापेक्षा अजून मोठे मला काहीच नको आणि माझ्या ह्या निर्णयात मला माझ्या कुटुंबीयांची देखील साथ आहे. "  


" त्यामुळे आता नवरी बनून तयार हो.. मी  घोड्यावर बसून तुला न्यायला येतोय ...." 


आणि श्वेताला हसविण्यासाठी निखिल गाणे गुणगुणू लागला ...


हीरिए सेहरा बाँध के मैं तो आया रे ....

डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे ....


अब तो ना होता है .... 

इक रोज़ इंतेज़ार सोनी ....


आज नहीं तो कल है ....

तुझको तो बस मेरी होणी रे ....


तैनू ले के मैं जावांगा ....

दिल दे के मैं जावांगा ....


तैनू ले के मैं जावांगा ....

दिल दे के मैं जावांगा ....


श्वेताने धावतच जाऊन निखिलला मिठी मारली. तिच्या मिठीतुनच निखिलला तिचा होकार समजला. दोघांच्याही घरचे मोठ्या आनंदाने त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले आणि थोड्याच दिवसात त्यांचा विवाह साधेपणाने पार पडला. श्वेता निखिलची अर्धांगिनी झाली.


या सगळ्या लग्नाच्या धावपळीत मात्र निखिल श्वेताच्या उपचारांकडे देखील लक्ष देतच होता. परंतु लग्नानंतर काहीच काळात मात्र श्वेताला अनेक वेळा पोटात रक्तस्राव झाला त्यामुळे क्लॉटिंग फॅक्टर शिरेवाटे देण्याची वारंवारता वाढवण्यात आली. त्यादरम्यान श्वेताची पोस्ट ग्रॅजुएशनची परीक्षा देखील जवळ आली. निखिलने तिला ती परीक्षा न देण्याचा सल्ला दिला पण श्वेताची जिद्द मात्र तिला असे करण्यास रोखत होती. शेवटी तिने परीक्षा देण्याचे ठरवले.  


या सगळ्यात निखिलने स्वतःची नोकरी सांभाळून तिला सर्वप्रकारे मदत केली. तिच्या तब्येतीची खूपच काळजी घेतली. निखिलच्या साहाय्याने श्वेता ही परीक्षा नुसती पास झाली नाही तर तिला इतिहास विषयात विद्यापिठातून प्रथम येण्याचा मान मिळाला. ती गोल्ड मेडलिस्ट ठरली. निखिलचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्वेता देखील तिला मिळालेल्या यशामुळे आनंदून गेली. पण हे यश निखिलच्या साथी शिवाय अशक्य होते हे देखील ती जाणून होती.


माझी स्वतःची स्वप्न तर पूर्ण झाली पण निखिलच्या स्वप्नांचे काय ...? हा विचार करून श्वेता अस्वस्थ होत असे. कितीतरी वेळा निखिल जवळ ती बाळाचा विषय काढत असे परंतु या सगळ्यात श्वेताच्या जीवाला धोका असल्याचे माहित असल्यामुळे निखिल बाळासाठी तयार होत नव्हता. 


श्वेताला मात्र आई व्हायचे होते. शेवटी तिने बाळासाठी पुढील ट्रीटमेंट घ्यायची ठरवली. निखिलने याला खूपच विरोध केला पण श्वेताच्या हट्टापुढे त्याला हार मानावी लागली. डॉक्टरांनी श्वेताला क्लॉटिंग फॅक्टर देण्याची ऍडव्हान्स ट्रीटमेंट चालू केली. श्वेताला दिवस गेले. आपण आई होणार हा आनंदच तिला खूप सुखावणारा होता. निखिलने श्वेताची संपूर्ण काळजी घेतली आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस उजाडला ...


ठरलेल्या वेळेत प्लॅन करून श्वेताची डिलिव्हरी करण्यात आली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. डिलिव्हरी नंतर बराच वेळ श्वेताला under observation ठेवण्यात आले. श्वेताच्या जीवाचा धोका टळला होता. श्वेता आणि बाळ दोघांनाही सुखरूप पाहून निखिल खूप आनंदी झाला होता. निखिल आणि श्वेता दोघांचेही कुटुंब खूप आनंदी होते. श्वेता आणि निखिल दोघांच्याही मनात एकच गाण्याची धून वाजत होती...


किती सांगू मी सांगू कुणाला ....

आज आनंदी आनंद झाला .... 


रास खेळू चला, रंग उधळू चला ....

आला आला ग कान्हा आला ....


अष्टमिच्या राती ग यमुनेच्या काठी, गोकुळ अवतरले ....


गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले .... 


कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून

नव्या नवतीचा शृंगार केला .... 


मूर्ति अशी साजिरी ग, ओठावर बासरी, भुलले सुरासंगती .... 


कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती .... 


रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून

सांजसकाळी गोपालकाला .... 


खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे .... 


लपुन छपुन गिरिधारी, मारितो ग पिचकारी, रंगाचे पडती सडे .... 


फेर धरती दिशा, धुंद झाली निशा

रास रंगाच्या धारांत न्हाला ....


किती सांगू मी सांगू कुणाला ....

आज आनंदी आनंद झाला ....  



हिमोफेलिया सारख्या गंभीर आजारावर मात करत श्वेताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. विद्यापीतील परीक्षेत गोल्ड मेडल मिळवले पण हे सगळे तिला एकटीलाच शक्य नव्हते. 

निखिल एक उत्तम सारथी बनला म्हणूनच श्वेता तिच्या आयुष्याच्या महाभारताचे युद्ध जिंकू शकली. 


" जोडीदार म्हणजेच जो प्रत्येक संकटात जोडीला असतो ... ! "


" साथीदार म्हणजे जो प्रत्येक संकटात साथ देतो ...! "


" सखा जो मित्राप्रमाणे सगळ्या गोष्टी समजुन घेतो ... ! "


" प्रियकर म्हणजे जो आयुष्यभर प्रेमाने जपतो ! "


" जोडीदार, साथीदार , सखा , प्रियकर ही सगळी पात्र आणि त्यांचे कर्तव्य निभावताना जो योग्य मार्ग दाखवतो तो सारथी असतो. "  


निखिलने देखील असेच सारथ्य केले म्हणून श्वेता आयुष्याची लढाई नेटाने , धैर्याने लढू शकली.


पतीपत्नीचा एकमेकांवरचा विश्वास , एकमेकांवरचे प्रेम आयुष्याला एक वळण देऊन जाते आणि नात्यातल्या या अतूट विश्वासावरच आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो.


हिमोफिलिया या आजाराबद्दल समाजामध्ये माहिती कमी प्रमाणात आहे. अनेकवेळा कोणतीही शस्त्रक्रिया करण्याआधी या संदर्भातील चाचण्या करण्याची गरज असतानाही त्या होत नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना रक्तस्त्राव थांबत नाही. आपल्या घरातील कुणालाही ह्या आजाराचे निदान झाल्यावर कुटुंबीय खचून जातात परंतु या बाबतीत जनजागृतीची आवश्यकता आहे. परदेशांमध्ये या आजारातील वाटचाल सुसह्य व्हावी, म्हणून एकमेकांचे हात धरून सहाय्य करण्यासाठी सहाय्यता गट असतात. भारतातही आता असे मदतगट सुरू झाले आहेत.


या सगळ्यावर मात करण्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला जागृत होण्याची गरज आहे कारण सगळ्यांच्या साथीने आपण नवीन भारत घडवू शकतो कारण संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत ..


" एकमेकां साहाय्य करू , अवघे धरू सुपंथ ...! "


समाप्त! 


तळटीप - हिमोफेलियाची संपूर्ण माहिती गूगलवरून साभार .🙏 सदर कथा ही सत्यघटनेवर आधारित असून फक्त कथाचित्रण करण्यासाठी काही गोष्टीत बदल करण्यात आला आहे.


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels & google 


✍©️ जया पाटील



Post a Comment

0 Comments