युगायुगांचे नाते अपुले १

 #युगायुगांचे_नाते_अपुले_१


©️जया पाटील 





" आँखें बंद करके जो इक चेहरा नजर आया

  वो तुम्हीं हो… ऐ सनम वो तुम्हीं हो… ऐह सनम" 


" तुम्ही जानेजाना मेरे , प्यार का सपना ....

  दिल ने मेरे माना , दिलबर तुम्हें अपना ....

  मेरे यार पे ,मेरे यार पे, है मुझको बड़ा ही नाज़..

  मेरी चाहतों से तुम , ना करना कभी ऐतराज़ ...."


" आँखें बंद करके जो एक चेहरा नजर आया

   वो तुम्हीं हो… ऐ सनम वो तुम्हीं हो… ऐ सनम ."


" जिससे प्यार करते ही दिल को मेरे क़रार आया

  वो तुम्हीं हो…ऐ सनम वह तुम्हीं हो.. ऐह सनम."


मिनाक्षी नेहमीप्रमाणे डोळे मिटून हे गाणे ऐकत होती. त्याचवेळी तिची आई आली टेपरेकॉर्डर बंद केला आणि मिनाक्षीला बोलू लागली ...


" असे काय विशेष आहे गं , मिनू या गाण्यात कि एक दिवसही असा जात नाही कि हे गाणे तू ऐकत नाहीस , माझ्या लाडक्या लेकीला कोणी आवडू लागले आहे कि काय ...? आईला तरी सांग बाळा .." 


मिनाक्षी गालातल्या गालात लाजली आणि म्हणाली ...


" तसे काही नाहीये गं , आई आणि हो कोणी आवडला तरी सगळ्यात पहिले तुलाच येऊन सांगेल ना ... माय डियर आई ..." 


" चल मला ऑफिसला उशीर होतोय. मी निघते."  


इतके बोलून मिनाक्षी घरातून निघून गेली.


मिनाक्षी ..एक स्मार्ट , टॅलेंटेड , हुशार मुलगी. दिसायला अतिशय सुंदर , काळेभोर केस , गोर्या गालांवर रेंगाळणारी कुरळ्या केसांची बट तिचे सौंदर्य आणखीनच खुलवत असे. मोहक डोळे , चाफेकळी नाक , गुलाबी ओठ ....जशी काय  स्वर्गातील अप्सराच जणू.....! 


मिनाक्षी दिसण्यात तर देखणी होतीच पण त्याच बरोबर अभ्यासात देखील हुशार , एकदम फोकस्ड , करियर ओरिएंटेड मुलगी. तीचे स्वप्न म्हणजे सतत पुढे जाण्याचे , यशाचे नवीन क्षितिज गाठण्याचे ...!


तिचे वडील लहानपणी देवाघरी गेले असल्यामुळे आजी- आजोबांच्या साथीने तिच्या आईने अर्थातच लताताईंनी तिला एकटीनेच मोठी केली. परंतु मिनाक्षीला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची संपूर्ण मुभा लताताईंनी दिली. उत्तम संस्कार करून तिला त्यांनी घडवले. कॉलेज मध्ये प्रत्येक वर्षी अव्वल येत असतानाच कॅम्पस सिलेक्शनमध्ये तिला कॉलेज संपताच चांगली नोकरी देखील मिळाली. 


लताताईंनी केलेल्या त्यागाची मिनाक्षीला देखील चांगलीच कल्पना होती. त्यामुळेच आयुष्यभर मला माझ्या आईला आणि आजी आजोबांना सांभाळता यावे हीच मिनाक्षीची इच्छा होती. या सगळ्यात तिच्या होणाऱ्या जोडीदाराने तिला साथ द्यावी हीच एकमेव माफक अपेक्षा होती तिची तिच्या भावी जोडीदाराकडून ...!  

 

तसा तिला नितेश मनापासून आवडत होता.नितेश तिचा कॉलेज पासूनचा मित्र. कॉलेजला असतानाच तिची भेट नितेश सोबत झाली. कॉलेजच्या पहिल्याच स्नेहसंमेलनात


त्याने गाण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर बक्षीस पटकावले होते आणि गाण्याचे बोल होते ..


" आँखे बंद करके जो एक चेहरा नजर आया ..वो तुम्ही हो.. ऐ सनम .. वो तुम्ही हो .. ऐ सनम.. ! " 


स्नेहसंमेलनात गाताना मिनाक्षीने नितेशला पहिल्यांदा पाहिले आणि पाहताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडली.


नितेश अतिशय हॅंडसम , राजबिंडा खूप हुशार , आईबाबांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या करिअरच्या बाबतीत मात्र तो खूप जास्त अँबिशियस होता. कोणत्याही परिस्थितीत मागे हटणे त्याला मान्य नव्हते. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे लक्ष मिळवायचेच मग त्यासाठी कोणतेही पाऊल उचलावे लागले तरी बेहत्तर असा त्याचा स्वभाव होता.


पुढे हळूहळू कॉलेजच्या कामानिमित्त , नोट्सच्या देवाणघेवाणीत नितेश आणि मिनाक्षीची एकमेकांसोबत ओळख झाली. मिनाक्षीला नितेश मनापासून आवडत होता पण त्याच्याकडून मात्र कधी ग्रीन सिग्नल मिळाला नाही म्हणून मिनाक्षी मात्र स्वतःच्या भावना कधीच बोलू शकली नाही.


पुढे जाऊन दोघेही एकच कंपनीत कामाला असूनही ती नितेशची फक्त जवळची मैत्रीण म्हणूनच राहिली. हळूहळू दिवस पुढे जात होते. कधीतरी नितेशला देखील आपण आवडू या आशेवर मिनाक्षी जगत होती. 


नितेश आणि मिनाक्षी एकच कंपनीत कामाला होते. मिनाक्षी तिच्या कामात अतिशय परफेक्ट होती. त्यामुळे त्या वर्षीचा "बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द ईयर" हा पुरस्कार मिळाला मिनाक्षीला...! सगळीकडेच तिचे कौतुक होऊ लागले.काही दिवसात होणाऱ्या कंपनी पार्टीत तिला हा पुरस्कार देण्यात येणार होता. नितेशने देखील तिचे अभिनंदन केले पण मनापासून मात्र नाही  कारण हा पुरस्कार त्याला मिळेल अशी त्याची अपेक्षा होती.


कंपनीची पार्टी झाल्यानंतर नितेश आणि त्याचे मित्र बराच वेळ हॉटेलवरच बसून होते.


सगळ्यांच्या बोलण्याचा विषय होता फक्त मिनाक्षी ...!


नितेशचा एक मित्र बोलू लागला ...


" अरे यार , या मिनाक्षी सोबत ज्याचे लग्न होईल ना ..he will be very luckiest guy .. एवढी सुंदर आणि हुशार बायको मिळाली तर उसकी तो चांदीही चांदी ... ! " 


तितक्यात दुसरा मित्र बोलू लागला ..


" येत्या दोन तीन वर्षात तिला onsight मिळेलच मग तर काय पाहायलाच नको.... "


" डॉलर कि कमाई ... "


" नित्या , आम्हाला वाटते कि मिनाक्षी तुला लाईन देते नेहमीच .. कॉलेजचा मित्र ना तु तिचा ...? "


" तु जाम आवडतो तिला असे ऑबसेर्व्हशन केले आहे आम्ही .... नित्या , पटव तिला ... लाईफ सेट होईल तुझी ..."


"काहीच वर्षात दोघेही onsight ला जाणार... आणि मग काय ...जय जय मनी .... ! " 


मित्रांच्या बोलण्याचा नितेशवर खूप जास्त प्रभाव पडला. 


खरंच लग्नासाठी मिनाक्षी अगदी योग्य मुलगी आहे. तिला आपल्यासोबत लग्न करण्यासाठी तयार करायलाच हवे असे त्याने मनोमन ठरवले. पण त्याला कुठे माहित होते मिनाक्षी त्याच्या आधीपासूनच प्रेमात होती ते...!  


पार्टी झाल्यानंतर नितेश मिनाक्षीला बरेचदा भेटू लागला. तिला वेळ देऊ लागला. तिलाही हे सगळे आवडत होते. तिचे मन आनंदून गेले होते.


एक दिवस ऑफिस संपल्यावर आपण कॉफी पिण्यासाठी जाऊया असे म्हणून एका सुंदर गार्डन रेस्टॉरंट मध्ये नितेशने मिनाक्षीला बोलावले. मिनाक्षीने होकार दिला. नितेशच्या या इन्व्हिटेशन मुळे ती मनोमन सुखावली. 


ठरलेल्या वेळेवर मिनाक्षी नितेशने मेसेज केलेल्या पत्त्यावर पोहोचली.


एक सुंदर शामियाना गार्डनच्या कोपऱ्यात उभारला होता. त्याला खूपच सुंदर सजवले होते. 


चहूकडे सुरु असलेली लायटिंग , चहूकडे पसरलेले रंगीबेरंगी फुगे , मंद आवाजात सुरु असलेले संगीत , टेबलवर सजवून ठेवलेला केक .. हे सगळे मनमोहक वातावरण पाहून मिनाक्षी खूपच आनंदी झाली.


तितक्यात तिच्या मागुन आवाज आला ....


" I Love u , मिनाक्षी ...


 माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर .. ! 


 I Love u so much .....! "


तिने मागे वळून पाहिले तर मागे नितेश उभा होता. त्याला पाहून मिनाक्षीला खूपच आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.


ज्या क्षणाची ती मनापासून वाट पाहत होती तो प्रत्यक्षात उतरल्यामुळे तिला आभाळ ठेंगणे झाले होते. नितेशने देऊ केलेले गुलाबाचे फुल तिने स्वीकारले.  


नितेश आणि मिनाक्षी दोघांनीही आपल्या नात्याबद्दल आपापल्या घरी सांगितले. 


दोघेही समवयस्क , हुशार त्यामुळेच घरच्यांकडून देखील त्यांच्या लग्नासाठी लगेच होकार मिळाला. 


दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले. माप ओलांडून मिनाक्षी नितेशच्या घरची लक्ष्मी झाली. करियर करतानाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली.  


ती नितेशच्या आईबाबांची देखील स्वतःच्या आईबाबांइतकीच काळजी घेऊ लागली. मुलगी नसल्याची उणीव मिनाक्षीने भरून काढली.. म्हणूनच नितेशचे आईबाबा खूप संतुष्ट होते.


नितेश आणि मिनाक्षी दोघांचेही लग्नानंतरचे 


मोरपंखी स्वप्नांनी सजलेले , आनंदाने मोहरलेले दिवस अगदी सुखात जात होते. मिनाक्षीने आनंदाची बातमी दिली. त्यांच्या संसाराच्या वेलीवर आता नवीन फुल बहरणार होते.नऊ महिने पूर्ण झाले. मिनाक्षीने एका गोंडस परीला जन्म दिला. 


आजी आजोबा सगळेच आपल्या दुधावरच्या सायीला पाहून सुखावले.  खूप कौतुकाने बाळाचे बारसे करण्यात आले. बाळाचे नाव ठेवले मिहिका... ! मिहिका पण अगदी नावाप्रमाणेच गोड. घरी आजी आजोबा असल्यामुळे मिहिकाच्या लाडात आणखीनच भर पडली.  


छोट्या मिहिकाच्या बाललीलांमुळे मिनाक्षीचा वेळ कसा जाऊ लागला हे तिलाच कळेनासे झाले. तिचे गोड हसणं , घरभर पळणं , सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणे ,  कारणाशिवाय तिचे रुसुन बसणे , या सगळ्यात मिनाक्षीचा वेळ कुठे जात असे ते तिलादेखील समजत नसे.


नोकरी करून छोट्या मिहिकाचा सांभाळ देखील ती उत्तम प्रकारे करत होती आणि मदतीला नितेशचे आईबाबा , मिनाक्षीची आई देखील होतीच. नितेशचा तर मिहिका जीव कि प्राण होती...!  


नितेश आणि मिनाक्षी दोघांचेही करियर उत्तम चालू होते. भरपूर पगार , आपली प्रेमाची माणसं ,सगळी भौतिक सुखं. सगळेकाही आलबेल होते. 


अजून काय हवे असते सुखी आयुष्य जगायला ...? 


परंतु नितेशची महत्वाकांक्षा मात्र संपत नव्हती. मिनाक्षी त्याला सतत समजावत असे ..मात्र तिच्या बोलण्याचा नितेशवर कुठलाच असर होत नसे. बघता बघता मिहिका नऊ वर्षाची झाली.


त्याचदरम्यान मिनाक्षीच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. मिनाक्षीने खूप प्रयत्नांती तिला वाचवले.  


त्यानंतर सहा महिन्यातच ...नितेश आणि मिनाक्षीला परदेशी जाण्याची उत्तम संधी चालून आली. 


नितेशला ही संधी हातातून गमवायची नव्हती , पण मिनाक्षीने मात्र सपशेल नकार दिला. या गोष्टीमुळे नितेश आणि मिनाक्षी मधील वाद आणखीनच वाढला. 


नितेश तावातावात मिनाक्षीला म्हणाला ...


" या संधीची मी कधीपासून वाट बघत होतो , आज जेव्हा ही संधी आपल्याकडे स्वतःहून चालत आली , तेव्हा तु नाही म्हणतेस ..? "


"खूप जास्त पैसे कमविण्याची एक चांगली संधी मिळतेय आपल्याला ...!  आपले आयुष्य सेट होईल , मिहिकाचे फ्युचर ब्राईट होईल ,  या सगळ्या गोष्टींचा विचार का नाही करत आहेस तु ..? "


" आईबाबा , माझी आई , तिची तब्येत या सगळ्यांचा विचार करून नाही म्हणते आहे मी नितेश ...आणि फक्त पैसा सर्वस्व नसतो कधीच .. !!"


" आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी आयुष्यभर खूप कष्ट केले आहेत ..ज्यावेळी त्यांना आपली गरज आहे .त्याच वेळेस आपण त्यांना सोडून इतक्या दुर निघून जायचे हे नाही पटत मला .... " 


मिनाक्षी नितेशला समजावणीच्या सुरात म्हणाली ,  


पण नितेश मात्र ऐकायच्या तयारीत नव्हता.


" आईबाबांची जबाबदारी आपण सोडणार कुठे आहोत मिनाक्षी ..आपण वेळोवेळी पैसे पाठवू त्यांना .. हवे तर आपण सेट झाल्यावर त्यांना देखील नेऊ आपल्याकडे .. " 


नितेश मिनाक्षीला प्रत्युत्तर देत म्हणाला.


" आईबाबांना पैसे पाठवणे आणि स्वतः त्यांची सोबत करणे यात फरक आहे. ते नाही राहु शकणार स्वताःचे घर सोडून दुसरीकडे आणि इथे मिळतोय त्या पैश्यात आपण सुखी राहू शकतो.."


" पैसा आयुष्यभर कमवता येईल पण आपली माणसं ती एकदा गमावली कि पुन्हा नाही मिळवता येत...! " 


" माझा निर्णय पक्का आहे मी तुझ्यासोबत onsight येऊ शकत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे. " 


मिनाक्षीने नितेशला निक्षून सांगितले.


" ठिक आहे मग , मी जातो एकटाच ..तुला डिवोर्स पेपर पाठवेल  , त्यावर सही करून पाठव. कारण त्याशिवाय तु मिहिकाला माझ्यासोबत पाठवणार नाहीस. " 


नितेशच्या बोलण्यामुळे मिनाक्षीला खूप मोठा धक्का बसला , परंतु तिने स्वतःला सावरले. तिने मन घट्ट करून सांगितले.


" नितेश , पहिल्यांदा पाहिल्यावरच मी तुझ्या प्रेमात पडली आणि आता डिवोर्स ..असे बोलू नकोस ... ! "


" मिहिकासाठी तुला कोर्टात जाण्याची गरज नाही. आपल्या लेकीला मी कधीच तुझ्यापासून दुर करणार नाही. तु तिला तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतोस. "


" मला या कायद्याच्या कचाट्यात अडकवू नकोस. आपण गुड नोटवर वेगळे होऊ या. "


" फक्त मिहिकाला माझ्या कायम संपर्कात ठेव इतकीच विनंती करते मी तुला..एक आई म्हणून माझ्या लेकीसोबत बोलण्याचा , तिला पाहण्याचा अधिकार मला दे ....! "


मिनाक्षीच्या या विनंतीला होकार देऊन नितेश तिथून निघून गेला.


मिनाक्षी नितेशच्या या वागण्यामुळे पूर्णपणे खचली. ज्या नितेशवर आपण जीवापाड प्रेम केले , त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांपेक्षा त्याची महत्वकांक्षा इतकी महत्वाची...हे पाहून मिनाक्षी खूप हळवी झाली.


मिनाक्षीने मात्र नितेशला विरोध केला नाही कारण तिचे मनापासून त्याच्यावर खूप प्रेम होते , 

त्यामुळे तिने त्याच्यासाठी आपल्या लाडक्या लेकीला त्याच्याकडे सोपवून खूप मोठा त्याग केला , कारण तिलाही माहित होते कि ,मिहिका नितेशची जीव कि प्राण होती.., त्यामुळे तो मिहिकाला स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपेल याची तिला खात्री होती.


पोटच्या लेकापेक्षा सुनेला आपली इतकी काळजी आहे या गोष्टीची जाणीव झाल्यावर नितेशचे आईबाबा भरून पावले. आपलं देखील जवळचं माणूस , आपल्या हक्काचं माणूस आपल्या जवळ आहे या जाणीवेने ते सुखावले.


अवघ्या दोन आठवड्यात नितेश मिहीकाला घेऊन अमेरिकेला निघून गेला. मिनाक्षीचा सोन्यासारखा संसार कोलमडून पडला होता.


" होता सोन्याचा संसार ..राजा राणीचा दरबार "


आयुष्याचा सोबतीच असा अर्ध्यात सोडून गेल्यावर , जगायचं तरी कोणासाठी ... ? या विचाराने ती कोलमडली होती. पण आई , नितेशच्या आईबाबांच्या काळजीने ती जिद्दीने पुन्हा उभी रहात होती.  


ती फक्त नितेश आणि मिहीकाच्या आठवणींसोबत जगत होती. तिच्या मनातील भावना ओरडून ओरडून फक्त हेच सांगत होत्या...


" युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा 


  सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा "


" भासे सारे सुने तुझ्याविण


  तुझ्याचसाठी आसुसले मन 


  तोडून बेड्या सर्व जगाच्या


  कधी आपुले होईल मिलन 


  उनसावल्या झेलत हासत जन्म सरावा ..! " 


" युगायुगांचे नाते अपुले, नको दुरावा 


  सहवासाची ओढ निरंतर, नको दुरावा "


क्रमशः 


नितेश मिहिकाला घेऊन निघून तर गेला पण त्याचे आणि मिहिकाचे पुढचे आयुष्य कसे असेल? त्याला आणि मिहिकाला या प्रेमाच्या बंधनांची किंमत कळेल का ..? हे सगळे जाणून घ्यायचं आहे ना ...मग याच कथेचा पुढचा भाग " युगायुगांचे नाते अपुले भाग 2 " वाचायला मात्र विसरू नका.


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


उर्वरीत भाग वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

👉  युगायुगांचे नाते अपुले भाग दोन

👉  युगायुगांचे नाते अपुले भाग अंतिम


फोटो साभार - Pinterest 


✍©️ जया पाटील




  





 ..

Post a Comment

2 Comments

Please do not enter any spam link in the comment box