आम्ही नाही त्यातल्या..😀😀
माझी एक मैत्रीण आहे..
जी फेसबुकवर माझ्या सगळ्या activities पाहणार.. लाईक, कमेंट काही नाही. Whatsapp वर मात्र हळूहळू करून बरंच डोकं खाणार... फुल्लं CCTV camera.
आता तुम्ही म्हणाल हिला मैत्रिणी तरी किती...? तर या अशा मैत्रिणी ज्या आपण रस्त्याने चालत निघालो की, तोंड उघडून हसतात. मुड असेल तेव्हा थांबून बोलतात, कुठे काही फिसकटलेलं असलं की, आपण नेहमीच्या सवयीने तोंड पसरुन हसावं आणि त्यांनी एरंडेल प्यायलेल्या चेहऱ्याने बाजूने निघून जावं. पुन्हा भेटल्या की.. तोंड उचकटून काल घाईत होते ग म्हणावं आणि थांबवून काल काय बिनसलं ते आपल्या माथी मारावं.....
खरंतर अशांना मैत्रीण कसं काय म्हणतेस बुवा तू??? असं आमची जयश्री कन्हेरे विचारते. तुम्हांलाही तसंच वाटू शकतं. तर ते वर्गातील सर्व मुलींना आपण वर्गमैत्रिणी म्हणतो ना त्यातलाच हा प्रकार... या काही बेस्ट फ्रेंड नाहीत हो ... असो...
तर मुद्दा असा...
मी एक कविता पोस्ट केलेली.. "प्रेमाचा रंग लाल." तिला माझी कविता आवडली. पण त्याखाली आलेल्या कमेंटसने बिचकली. कमेंट्स होत्या माझ्या कवितेला रिवर्टलेल्या. आता तिच्याच भाषेत सांगायचं तर...... " एकतर तु इतकं कचकचीत रोमँटिक लिहितेस ते ठीक आहे. पण त्याला रिवर्ट करणारे तुला समोर ठेवून लिहित नसतील कशावरून... "
अरे देवा..!! कचकचीत..?? आयला ये तो wild वाली बात हो गयी... हम तो mild लिखते है ना डार्लिंग...🤦🤦
"अग कचकचीत काय..?? साहित्य आहे ते. तो काय स्वभाव नाही.. प्रतिभा म्हणतात त्याला.. शब्दांची गुंफण आणि भावनांची मांडणी म्हणत तिला एक चारोळी पाठवली..
चारोळीच हे गाव
जरा बरं वाटतं
तु म्हणजे तु आणि
मी म्हणजे मी नाही
सगळं माहिती आहे मनाला
तरी ते इथंच रमतं...."
" ही चारोळी वाच.. असं असतं ते सगळं.." मी समजावलं..
"जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.. " ती
माझ्या अभ्यासानुसार अशा बायकांना व्यवस्थित न समजावता पाठवलं ना तर ह्या स्वतः इतकं तोंड उचकटवत फिरणार आणि सोबत आपल्या नावाचा डंका. अशा लोकांना फार handle with care धोबीपछाड द्यावा लागतो...
"नेमका problem काय झालाय सांग बरं..." मी विचारलं.
"त्याच्या खाली कमेंट्स बघ मग कळेल तुला... मी काय म्हणतेय ते.." तिने सांगितलं..
पाहिलं. कमेंट बऱ्याच होत्या. त्यापैकी दोन माझ्या कवितेला रिवर्टलेल्या. एक दिलीप राणे आणि दुसरी संजीव मांद्रेकर
◆ दिलीप राणे आमच्या गावचे. ते माझ्या बाबांना काका म्हणतात आणि मी त्यांना काका म्हणते. माझा जन्म झाला ही नव्हता तेव्हा ते दहावी पास आऊट झालेले... घरची गरीबी तरी अभ्यासात खुप हुशार. सगळ्या स्पर्धांमध्ये अव्वल. सातवीच्या scholarship परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोनच पोरं मेरीटमध्ये आलेली. त्यातला एक विद्यार्थी म्हणजे दिलीप काका... पुढे कष्टाने शिकत आज "सामना"सारख्या वर्तमान पत्रात नोकरी करतात.. प्रुफ रीडर म्हणून. अंदाजे पंच्चावन्नाकडे झुकणारं वय असेलं...
माझं लिखाण त्यांना आवडतं. फोन करून सांगतात... आता "प्रेमाचा रंग लाल " त्यांनी वाचली. त्यावर त्यांना चार ओळी सूचल्या त्या त्यांनी whatsapp वर कळवल्या "अग , मी काही लेखक नाही ग. तुझं वाचलं आणि वाटलं लिहावं. पण तिथे कसं लिहिणार?? तुझ्या सगळ्या मैत्रिणी लेखिका." तेव्हा मीच त्यांना "अहो असं काही नसतं.... कमेंटून टाका काका बिनधास्त." असं सांगितलं.
◆ संजीव मांद्रेकर - यांच्याशी ओळख नाही पण यांना मी कमेंटमुळे ओळखते.. एका मैत्रिणीच्या पोस्टवर त्यांच्या कमेंट पाहिलेल्या. मैत्रिणीच्या सेफ्टीसाठी माझी या माणसावर बारीक नजर... आणि मग लक्षात आलं की ही व्यक्ती तुमच्या ब्लॉगचा शब्द न् शब्द वाचून कमेंट करते. जेवढ्या ग्रुपवर ते आहेत त्या ग्रुपवर आलेल्या प्रत्येक चांगल्या पोस्टला मनापासून दिलेली सात्विक दाद... लिहिणारी स्त्री असो वा पुरुष. दाद फक्त लिखाणाला... बरं रिवर्ट करताना ते परवानगी घेतात... शब्दांवर कमालीचं प्रभुत्व.
हे ग्रुहस्थ साधारण वय पंच्चावन्न ते साठमधील असावेत. नोकरीतून निव्रुत्त किंवा व्हीआरएस घेतलेली असावी. त्यांच्या इतरांना आदर देण्यावरून पक्के कुटुंबवत्सल असावेत... सर्वसामान्य माणूस साधारणपणे जे कष्ट करतो ते सगळे यांनी केलेले असणार.. आता हे सगळं खरंच असेल असं नाही ...हा आपला अंदाज अपना अपना...!!
आता आयुष्याच्या या वळणावर दिलीप काका किंवा संजीवजींना थोडं छान मन रमवत जगावंस वाटतं असेल, क्षण दोन क्षण स्वतःसाठी काढावेसे वाटत असतील तर काय हरकत आहे... बरं त्यांनी केलेल्या कमेंटही "organic..."
आता हे इतकं तुम्हाला सांगितले तसं तिला ही समजावलं.. तरी ही पहिले पाढे पंच्चावन्नच...
" अग ते सगळं ठीक आहे.. पण ते तुला समोर ग्रुहित धरून लिहित नसतील कशावरून...??? " पुन्हा तीच.
अरे देवा..!! हिची गाडी अजून इथेच अडकलेली.. आता हिला चांगल्या शब्दांत सांगितले नाही तर मीच माझा अपमान करतेय असा फील येईल मला.. आणि मग मळमळत राहील ना रावं....
"अग्गं, असं नसतं काही लिहिताना शब्द सुचत जातात.. आणि तुझ्या म्हणण्यानुसार ते कोणाला समोर ठेवून लिहतात असं म्हणत असशील तर ते नक्कीच आपल्या पार्टनरला डोळ्यासमोर ठेवून लिहित असतील..." मी.. अजून तरी बडी सिद्दत से च...
"कशावरून..??" ती
" मग जा त्या दोघांना हिप्नोटिस्टकडे घेऊन. हिप्नोटाइज करून विचारलंस तरी ते तेच सांगतील जे मी तुला सांगितलंय.." मी समजावलं तिला आणि पुढे म्हटलं..
"आमचा एक चारोळी whatsapp ग्रुप आहे 'वेडी संध्याकाळ' नावाचा. त्यात तुला add करते. तिथे एखादा शब्द दिला जातो. त्यावर एकदम इंस्टंट चारोळी करतो आम्ही. शब्द काहीही असतात. झोप, मिठी, थंडी, श्वास, उब. इत्यादी इत्यादी. आपण एक चारोळी लिहेपर्यंत चार चारोळ्या पोस्ट होतात. इतक्या कमकुवत मनाने वाचशील तर आमच्या चारोळ्या वाचूनच दुसऱ्या दिवशी तुला प्रेग्नंट असल्याचा फील येईल. मग काय करशील..???" संपला विषय...
बाब्बो... किती दमले समजावून... आता अशा दोनचार मैत्रिणी भेटल्या तर माझं झालंच समजा ओम फट् स्वाहा...
हुश्श करत नाही तोवर अजून एक भेटली..
लॉकडाऊनच्या काळात खुप स्तुत्य उपक्रम राबविले गेले. काव्यहोत्र, पुस्तक वाचन, कविता वाचन, चार दिवस कवितेचे, कविता तुझी माझी. असे आणि बरेचसे. खुप सगळ्या मैत्रिणींनी भाग घेतलेला. त्यामुळे जमले तेवढे पाहिले. लाईक, कमेंट सगळं कसं एकदम शिस्तीत.....
त्याच फेऱ्यात एक मैत्रीण व्हाया व्हाया लिस्टमध्ये आली. तिने मी बनवलेला चारोळ्यांचा विडिओ पाहिलेला.
"ताई, तु भारी विडिओ बनवतेस गं. मला माझ्या कवितेचे बनवायचेत.. मी चारोळ्या लिहिते गं ताई. म्हणजे मला कोणताही एक शब्द दिला ना तर मी त्यावर किती ही चारोळ्या लिहू शकते.." तिने इनबॉक्सला सांगितले.
कोणी स्वतःबद्दल असं बोललं ना की मलाही माझ्याबद्दल भरभरून बोलावंस वाटतं. Bcoz I Love Me ना... म्हटलं घ्यावी शेखी मिरवून.
"मी रोमँटिक जरा बरं लिहिते गं. तुला माहिती नाही लोकं मला लेडी काकोडकर म्हणून ओळखतात. सध्या एक कथा लिहितेय. " वो मेरा प्यार मुझे लौटा दे". यावेळी थोडी बोल्ड लिहितेय..." मी एकदम फुशारकीने सांगितले. फुशारकी कसली आत्मप्रौढीच ती...
मी बऱ्याचदा स्वतःचं कौतुक करण्याच्या स्वभावामुळे बोलून जाते असं.. पण यावेळी मी बहुतेक राहू केतूच्या पत्रिकेत घुसले होते वाटतं.
"तुला माहिती आहे का ताई...?? हे कशामुळे होतं..?? " ती म्हणाली.
"काय ते... ?? " मी विचारलं.🤔🤔
"लेडी काकोडकर म्हणण्याइतकं रोमँटिक लिखाण..!!" ती.
"नाही गं. कशामुळे होतं.." मी आश्चर्य व्यक्त करतं.
"तुझ्यात ना पुरुषी हार्मोन्स असतील थोडे. त्यामुळेच तू बोल्ड रोमँटिक लिहितेसं..!!!" ती.
मी ब्लँक...400 झटका. अनपेक्षितपणे..😖😖😖
"अssssग्गं काहीही काय... ??? रोमँटिक लिहायला धाडस लागतं गं.. आणि मी ते करते..!! यात पुरुषी हार्मोन्सचा काय संबंध...??" मी उत्तरादाखल लिहिलं. 🤦🤦🙆🙆🙆
बाब्बो...!!! हे ज्ञान माझ्यासाठी अगाधच ना झालं रावं.. 360° अंशात माझ्या डोक्यात गरगरलं. एकतर माझ्यावर टिका होते किंवा कौतुक. हे म्हणजे syllabus बाहेरच्या प्रश्नासारखं.
सगळ्यात रोमँटिक /शृंगारिक कोण असेल तर ती स्त्री. काया, वाचा, मन, बुध्दी सहित समर्पणाला तयार झालेली स्त्री म्हणजे रतिच जणू. आणि तिला असं खुलवत खुलवत तयार करणारा पुरुष म्हणजे मदन. स्त्री शृंगारिक (रोमँटिक) नसती तर मानवी जीवन निरस झालं असतं.
ज्या पति पत्नीच्या नात्यात शृंगार आहे ते समाधानी दिसतात. खरंतर स्त्री इतका शृंगार कोणीच समजून घेऊ शकत नाही.
शृंगार नसता तर कधीतरी माजावर आलेली मादी आणि तिला तृप्त करणारा नर इतकीच घटना घडली असती. पशुपक्षांचा हंगाम असतो. तसा माणसात नसतो. माणसाचं पोरं ३६५ दिवस जन्मतंय. आणि हे शृंगारिक मनबुध्दीमुळे होतं. निसर्गतः देणगी आहे ती. नऊरसांपैकी महत्त्वाचा आहे शृंगार रस... त्यात पुरुषी हार्मोन्सचा काय संबंध...🙆🏻♀️🙆🏻♀️
साधारणपणे मानवी शरीरात हार्मोन्स हलले डुलले की गडबड होते हे माहिती आहे मला... गेली बारा वर्षे थायरॉईड झेलतेयं. हार्मोन्सच्या बऱ्याच टेस्ट झाल्या आहेत आजवर. त्यात कुठे पुरुषी हार्मोन्स आहेत असं काही निदर्शनास आलेलं नाही. बरं तर बरं, नवरा ही काही बोलला नाही आजवर. तुम्हीच सांगा मग मला साक्षात्कार होणार कसा??
जसे अंगातील मस्ती, खोडकरपणा, आगाऊपणा, अहंकार, गर्व, मीपणा, लोभ, व्देष, दंभ, तिरस्कार हे कोणत्याच CT scan / MRI मध्ये दिसत नाहीत. तसेच हे पुरुषी हार्मोन्स hidden असावेत. असो.
प्रणय/शृंगार लिहिताना बऱ्यापैकी कसोटी लागते. कितीदा तरी एडिटिंग होतं प्रसंगांचं. मैत्रिणींना टेक्स्ट पाठवून romance आणि vulgar/porn यातली सीमारेषा सांभाळली गेलीय ना हे पाहावं लागतं. पण याला काही अर्थ नाही.. हे सारं तुमच्याकडे असणाऱ्या पुरूषी हार्मोन्समुळे घडतं असतं हे कळल्यावर माझ्या प्रतिभेने त्या पुरुषी हार्मोन्ससहित जीव दिलाय... 🙄🙄
खरतंर आध्यात्मिकतेच्या जोरावर बोलायचं झालं तर प्रत्येक मानवी शरीर हे अंतरीचा अंतरात्मा म्हणजे पुरुष आणि नश्वर शरीर म्हणजे देहबुद्धी, माया म्हणजेच स्त्री. या दोहींमुळे शरीर चालतं. त्यामुळे प्रत्येक शरीरात दोन्ही प्रकारचे हार्मोन्स असतातच.... जाऊ दे विषय खुप खोल आहे आणि खोलात गेले की मला गुदमरायला होतं..
वरवर स्वतःला परखड, कणखर, करारी समजणारी मी कधी कधी उगाचच एखाद्या छोट्याशा शब्दानेही बॅक फूटवर जाते. एक नवीन चारोळी सुचली नाहीय. जून्या चारोळ्याचं नवीन फोटोवर लिहून टाकणं सुरू आहे... 🤦♀️🤦♀️
नवऱ्याला माझ्यात मोठी लेखिका दिसतेयं.. आता ती जेव्हा मला ही दिसू लागेल तेव्हा गाडी रुळावर येईल. 😜😜😜
बाब्बो...!! हिला पण जर आमच्या "त्या" व्हॉट्सअप ग्रुपला नेलं तर सगळे पुरुषी हार्मोन्सच सापडतील... इतके की ही जीव देणार हे नक्की... 🙊🙊🙊
बरं झालं मी त्या मैत्रिणीला unfriend केलं म्हणून. नाहीतर जवळच्या मैत्रिणींना Love you सहित टाकलेल्या 💞💞😍😍😘😘 या इमोजींचा संबंध थेट कुठल्या कुठे लागला असता ना रावं... मग होतीच फुल्लं ढाक्की टिक्की...
शेवटी माझा अंतरात्मा बोललाच की देवा वाचव रे बाबा यावेळी.... पुढच्या वेळेपासून अजिबात फुशारक्या मारणार नाही....🤣🤣🤣
और आज फिर हमनें दिल को समझाया - - सफर लंबा है..। ऐसें भी हमसफर मिलते रहेंगे..। मायुस नहीं होने का... जिंदगी अपनी है.. अपनी तरीके सें जियेंगें...।😊😊😊😊😊
© Velvet Kavisha
सदर साहित्याचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. निनावी शेअर करु नका. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल...

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box