निखाऱ्यावरचं_पाऊल_भाग_दोन
©️ जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
👉 निखाऱ्यावरचं पाऊल भाग एक
दिशाच्या फसवणुकीबद्दल कळल्यावर स्नेहाच्या मनात देखील अमेय विषयी शंका येऊ लागल्या. अमेय देखील चीटर नसेल ना या विचारांनी ती अस्वस्थ झाली. त्याच वेळेस अमेयचा मेसेज आला. लगेच टाळायला नको म्हणून स्नेहाने त्याच्या मेसेजला उत्तर दिले.
पुन्हा एक आठवडाभर त्यांचे बोलणे सुरूच होते. अमेय नेहमीसारखाच नॉर्मल बोलत होता. त्यामुळे अमेय फसवणाऱ्यातला नाही याची स्नेहाला खात्री पटली आणि दोन दिवसांनी अमेयचा मेसेज आला.
" स्नेहा , आईची तब्येत अचानक बिघडली आहे त्यामुळे थोड्या पैश्यांची गरज आहे. प्लीज , मला मदत करू शकशील ..? "
त्याच्या या मेसेजने स्नेहाला दिवसा तारे दिसल्याचा भास होऊ लागला. मोठ्या हिम्मतीने तिने उत्तर दिले.
" अमेय , सॉरी मी तुला मदत केली असती पण माझ्या अकाउंट मधले सगळे पैसे कालच एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझ्या नवऱ्याने घेतले आहेत. "
" ओके " अमेय
ओके मेसेज पाहून स्नेहाचा जीव भांड्यात पडला. परंतु थोड्या वेळाने अमेयने तिचे काही फोटोज फोटोशॉपने चेंजेस करून तिला पाठवले. सोबत मेसेज देखील होता.
" मला वेडं समजले आहेस का स्नेहा ..? तुझ्या या फ़ोटोज मध्ये तुझी जी हालत केली आहे ना अजून तरी ती फक्त तुझ्यापर्यंतच पोहोचली आहे आणि जर तुला हे फ़ोटोज सगळ्यांपर्यंत खासकरून विशालपर्यंत पोहोचू द्यायचे नसतील तर मला पंधरा दिवसांच्या आत मी सांगितलेली रक्कम मिळायला हवी. "
अमेयने पाठवलेले फोटो आणि मेसेजेस पाहून स्नेहाला काय करू सुचेनासे झाले. तिला स्वतःचाच राग येऊ लागला. सगळे काही विशालला सांगावे असे तिला वाटू लागले. पण हे सगळे ऐकल्यावर विशाल कसा रिऍक्ट होतो याची तिला भीती वाटू लागली.
स्नेहाला कसले तरी टेन्शन आहे हे विशालला जाणवत होते म्हणून तो तिला सतत तिला टेन्शनचे कारण विचारण्याचा प्रयत्न करत होता परंतु स्नेहा विशालजवळ काहीच बोलू शकत नव्हती.
स्नेहाला रिलॅक्स करण्यासाठी विशालने तिला डिनरडेटला न्यायच ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघेही रविवारी सायंकाळी हॉटेलला वेळेवर पोहोचले. विशालने दोघांसाठी अगदी सुंदर असा शामीयाना असलेला , सुंदर सजवलेला टेबल बुक केला होता.
चहूकडे सुरु असलेली लायटिंग , मंद आवाजात सुरु असलेले संगीत ह्या सगळ्या गोष्टीमुळे वातावरण खूप मनमोहक झाले होते. विशाल खूप खुश होता पण स्नेहा ती मात्र तिच्याच विचारात गुंतलेली होती.
विशाल विचारेल तेवढ्याच प्रश्नांची ती उत्तरे देत होता. तिला बोलण्यासाठी प्रवृत्त करत तो म्हणाला..
" स्नेहा , काहीतरी बोल ना ...मघासपासून फक्त मीच बोलतोय. तू फक्त उत्तरं देतेय. तुला आवडलं नाही का हे सगळे.. ? "
" नाही विशाल , आवडलं आहे ना हे सगळे. नाही कसे आवडणार. तू बोलतोय म्हणून मी फक्त ऐकतेय. " स्नेहा
" मला ना तू कुठल्यातरी विचारात गुंतलेली दिसतेय. सांग तरी.. " विशाल
" नाही रे विशाल ..कुठल्याच विचारात गुंतली नाहीये मी .." स्नेहा
" मला माहीत आहे तू नेमके कोणाच्या विचारात आहेस. Guess करू शकतो मी .. करू का .? विशाल
" कर .." स्नेहा
" अमेयचा विचार करते आहेस ना ..? " विशाल
विशालच्या तोंडून अमेयचे नाव ऐकून स्नेहा शॉक झाली.
" तुला कसे माहिती आहे हे विशाल ..? " स्नेहा
" तुझे टेन्शनचे कारण अमेय आहे हे मला माहिती आहे पण मला हे सगळे तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. आता तरी माझ्यापासून हे सगळे लपवून ठेवू नकोस स्नेहा .."
स्नेहाला आता विशालला सगळे सांगण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. स्नेहाने विशालला सगळे काही सांगितले. सगळे सांगता सांगता स्नेहाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते.
" विशाल , मी इतकी वाईट वागली तुझ्यासोबत ..? तुला अमेयबद्दल माहित झाले तरीही एका शब्दाने देखील प्रश्न विचारला नाहीस तू मला ...? का ..? "
" तुझा वेळ मिळत नाही म्हणून मी अमेय सोबत मैत्री केली पण ती फक्त मैत्री होती रे ..." स्नेहा
" हो स्नेहा , मला माहित आहे पण एकदा तरी ही गोष्ट तुला मला सांगावीशी वाटली नाही. " विशाल
" मला माफ कर विशाल ..पण तुला चोरून मी एखाद्या सोबत अशी मैत्री केलीय हे तुला आवडणार नाही असे वाटले मला ..."
" या गोष्टीमुळे आपले नातं तुटेल अशी भीती वाटली मला ..त्यामुळे तुला सांगायची हिम्मत झाली नाही माझी .." स्नेहा
" प्रेम करतेस ना माझ्यावर मग विश्वास नाही का माझ्यावर ...? " विशाल
" विश्वास आहे माझा तुझ्यावर आणि तितकेच प्रेम देखील आहे. "
" चुकलं माझं ...तुझा वेळ मिळत नाही म्हणून मी अमेय सोबत मैत्री केली आणि गुंतून बसले त्यातच..."
" हा..पण इतके मात्र खरं की अमेय सोबत बोलणे फक्त आकर्षण होतं. माझे प्रेम पूर्वीही तुझ्यावरच होतं आणि आजही तुझ्यावरच आहे.."
" विशाल ,मला माफ कर. मी अशी चुकी पुन्हा कधीही करणार नाही. I m really very very sorry " स्नेहा
" चल माफ केले डियर ..माझ्या लाईफसाठी ही माफी मंजूर ..पण त्या बदल्यात मला देखील काहीतरी हवं आहे..? " विशाल
" काय ..? " स्नेहा
" तुझा तो पूर्वीसारखा सुंदर चेहरा आणि त्यावर असणारी ती चाफेकळी स्माईल ..." विशाल
विशालच्या बोलण्यावर खळखळून हसून स्नेहा म्हणाली ...
" एक सांगू विशाल , तुला हे सगळे सांगून मन खरंच खूप हलकं वाटतंय. Really feeling great ..! "
" थँक्यू सो मच.. विशाल ...लव्ह यू ...डियर .." स्नेहा
" लव्ह यू टू ..डियर ... " विशाल
" विशाल, मला एक गोष्ट मात्र लक्षात आली नाही... अमेय बाबतीत मी कोणाच जवळ बोलली नव्हती पण तरीदेखील अमेयबद्दल तुला कसे काय माहित ..? " स्नेहा
" स्नेहा , त्या रात्री तू ऑफिसमधून इतकी थकून आली होती तरी रात्री मोबाईल वर चाट करत होतीस. मला वाटले असेल ऑफिसचे कोणी म्हणून मी दुर्लक्ष केले पण चाट करता करता तुला झोप लागली आणि मी पाणी पिण्यास उठलो तर तुझा फोन ब्लिंक होत होता. स्क्रीन ऑफ करण्यासाठी मी फोन हातात घेतला तर अमेयचे मेसेज दिसले."
" काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिस मधल्या जेनीला देखील फेसबुक वरून एका मुलाने फसवले होते. ते सगळे लक्षात घेऊन तुझ्या मोबाईल मधल्या अमेयच्या सगळ्या डिटेल्स घेऊन त्याची माहिती मी सायबर क्राईम डिपार्टमेंटला दिली. "
" त्यानंतर मी तुझ्या हालचालींवर लक्ष ठेऊन होतो . "
" त्याने तुझ्याकडून पैसे मागितले नाही म्हणून मला त्याच्यावर तोवर गुन्हा दाखल करता आला नाही. "
" तुला या फसवणूकीचा अंदाज यावा म्हणून मला फार काही करावेच लागले नाही कारण .. त्याचदरम्यान तुझ्या ऑफिसमध्ये देखील दिशासोबत अशी फसवणूक झाली तेव्हापासून तू जास्त टेन्शन मध्ये आली. "
" तू दिशाची समजुत काढण्यासाठी तिला मेसेज पाठवत होती तेव्हा ते मेसेज मी वाचले होते. त्यामुळे दिशा प्रकरणाचा अंदाज मला आला आणि मी पोलिसांना त्याबद्दल देखील माहिती कळवली. "
" पण जेव्हा पासून तू टेन्शन मध्ये होतीस तेव्हा माझ्या लक्षात आले किती अमेयने तुझ्याकडून देखील पैश्यांची मागणी केली आहे. तेव्हा मी पोलिसांना ही सगळी माहिती पुरवली. "
" नशीब ,तुझ्या फोनला कुठलाही पासवर्ड लॉक नव्हता त्यामुळे मला तुझी जासूसी करण्यात कुठलीच अडचण आली नाही. "
विशाल हसतच स्नेहाला म्हणाला.
" लग्न झाल्यापासून दहा वर्षात तू एकदाही माझा मोबाईल हातात घेऊन पहिला नव्हता त्यामुळे तू कधी मोबाईल चेक करशील अशी शंका सुद्धा आली नाही माझ्या मनात ..."
" खरंच किती विश्वास होता ना विशाल तुझा माझ्यावर ...? मी मात्र विश्वासघात केला तुझा .." स्नेहा
" स्नेहा , अग झालं गेलं गंगेला मिळाले असं समज. पण आता या सगळ्या प्रकाराला आपल्याला थांबवायचं आहे. "
" तुझ्यासारख्या आणखीन स्नेहा होऊ नये हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे आता या सगळ्यात तू मला आणि पोलिसांना साथ दे. "
" तू अमेयला पैसे देण्यासाठी हो म्हण फक्त मी बँक ट्रान्सफर नाही करू शकत असेच सांग त्यामुळे मला भेट एवढेच सांग. "
" असेही तू सांगितले आहेच अमेयला कि तू तुझे सगळे पैसे मला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे तुझे काम सोपे झालेय. "
" करशील ना एवढे ...? करशील ना मला मदत ...?
" Anyways स्नेहा , मी आजपर्यंत तुझा पगार विचारला नाही आणि तू सरळ सांगितले नवऱ्याला इतके पैसे दिले म्हणून ...कमाल आहे बुवा एका मुलीची💃 ..."
विशाल😉😉 स्नेहाला डोळा मारत म्हणाला आहे आणि स्नेहाने हळूच त्याला मिठी मारली. तिला तिची चूक जाणवली होती. तिने या सगळ्या प्रकारात पोलिसांना मदत करायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे तिने अमेयला मेसेज केला.
" अमेय , सॉरी माझे सगळे पैसे मी विशालला दिल्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत पण माझ्याकडे माझे काही दागिने आहेत. ते तू घे. "
" तू ज्वेलरी विकून मला पैसे दे. मी असा तुला नाही भेटू शकत. " अमेय
" प्लीज अमेय , तितका तरी विश्वास ठेव माझ्यावर. अरे माझ्या नवऱ्याला लपवून या सगळ्या गोष्टी करणे मला अवघड आहे रे..."
" खूप त्रास दिलास आता देऊ नकोस. " स्नेहा
" ठिक आहे , भेटायचं ठिकाणाचा पत्ता आणि वेळ मेसेज करतो पण आधीच सांगतो , जास्त आगाऊपणा केला तर विशालला सगळे समजेल आणि संसार तुटेल तुझा. "
" हो , डोन्ट वरी , मी नाही कळू देणार कुणालाही काहीच. स्नेहा
स्नेहाने खूप घाबरल्याचे नाटक करून अमेयला जाळ्यात ओढले. खूप वेळ तो ऐकायला तयारच नव्हता पण त्याला स्वतःला पैसे घ्यायला बोलवण्यात स्नेहा यशस्वी झाली अर्थातच विशाल देखील तिला हा सगळा प्लॅन सक्सेस करण्यासाठी मदत करतच होता.
भेटीचा वेळ आणि ठिकाण समजल्यावर विशालने अगदी गुप्तपणे पोलिसांना कळवले.
ठरलेल्या ठिकाणी पोलीस वेगवेगळ्या वेषात आधीच गस्त घालून होते.
ठरल्याप्रमाणे अमेय भेटीच्या ठिकाणी पोहोचला. तिथे जाताना स्नेहा थोडी घाबरत होती परंतु विशालने तिचा आत्मविश्वास वाढवला आणि मी देखील तुझ्या जवळपासच असेल फक्त घाबरून जाऊ नकोस. स्नेहा मोठ्या हिम्मतीने अमेयला भेटायला गेली.
अमेय तिथे आला. अगदी राक्षसी नजरेने स्नेहाकडे पाहत म्हणाला. ..
" संसार खराब होऊन नये म्हणून खूप काही करू शकतात तुम्ही बायका ...स्वतःचे दागिने मला द्यायला तयार झालीस ..."
असे बोलून राक्षसी अमेय राक्षसी हसला आणि स्नेहाने त्याला दागिने देण्यासाठी हात पुढे सरसावले. दागिने होऊन तो निघणार तोवर तिथे असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. तो बेसावध होता. अकस्मात झालेल्या या घटनेमुळे तो खूप चिडला...
" मी , तुला सोडणार नाही स्नेहा..माझ्यासोबतची मैत्री जेव्हा विशालला कळेल तेव्हा तो तुला कधीच माफ करणार नाही. "
तेवढ्यात तिथे विशाल आला. विशालला पाहून अमेय आणखीन जास्त शॉक झाला. विशाल त्याला म्हणाला...
" ज्याचे प्रेम कमजोर असते ना त्याचाच संसार तुटतो परंतु माझे स्नेहावर खूप प्रेम आहे आणि तितकाच विश्वास सुद्धा ...त्यामुळे तुझ्यासारख्या माणसांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरीही आमचे नाते कधीच तुटणार नाही."
जेनी , दिशा या सगळ्या देखील स्नेहाच्या हिम्मतीचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे ऑनलाईन महिलांची फसवणूक करणाऱ्या गँगचा परदा फाश होतो. या गुन्हेगारी मागे असणारी संपूर्ण टोळी पकडली जाते.
वाचकहो , फेसबुक किंवा इतर सोशल साईट्स वर महिलांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सोशल मीडिया चे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत.
आपल्या कथेतील नायकाची म्हणजे विशालची साथ स्नेहाला मिळाली म्हणून ती या फसवणुकी पासून वाचू शकली पण प्रत्येक वेळेस असे होईलच असे नाही.
प्रत्येक वेळेस अमेयसारखी माणसं पकडली जातीलच असे देखील नाही. कारण हि माणसं आपल्याला फसवण्यात एक्स्पर्ट असतात त्यामुळे सहजासहजी आपण त्यांना पकडून देऊ शकत नाही.
खूप वेळा घरचेच आपल्या विरोधात जातात त्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था खराब होते. विश्वास दुखावला गेल्याकारणाने कित्येक संसार देखील तुटू शकतात.
जेव्हा आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकतो. किंवा जेव्हाही आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपली स्वतःची माहिती शेयर करतोय तेव्हा आपण जळत्या निखाऱ्यावर पाऊल ठेवत असतो. या सगळ्यात नुकसान आपलेच असते. आपल्या सामाजिक प्रतिमेचे किंवा आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य यात खराब होते.
सोशल मीडियाचा वापर करू नका असेच नक्कीच नाही परंतु आपली वयक्तिक माहिती , फोटोज शेयर करताना परिणामांची जाणीव नक्कीच असू द्या.
आपल्याला असा काही त्रास झाल्यास पोलिसात तक्रार करायला मागे पुढे पाहू नका. शक्यतो सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन सांगा म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही.
तुमच्यासोबत या ऑनलाईन फसणुकीबाबतीत इतरही महिला आणि मुलींना जागृत करा. तुमचे एक पाऊल कितीतरी महिला आणि मुलींना फसवणुकीपासून वाचवू शकते.
फसवणुकीच्या या निखाऱ्यावर पाऊल टाकण्यापूर्वी नेहमीच सावध असा. सोशल मीडियाचा वापर करतांना नेहमीच सावधान असा. दक्ष असा...!
Be alert ....!
काय पटतंय ना ...? विचार नक्कीच करा.
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & instagram
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box