मला साथ देशील ना...भाग ३



 #मला_साथ_देशील_ना...भाग_३

©️ जया पाटील 

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_08.html

एक आठवडा लोटला पण रागिणी कॉलेजला आली नाही.

रागिणी कॉलेजला येत नाही म्हणून अनुराज खूप अस्वस्थ होता.

त्याने रागिणीच्या घरी जायचे ठरवले.

" पण आपण गेलो आणि रागिणीच्या घरच्यांना ते आवडलं नाही तर ..

एक मुलगा तिचा तपास करत घरी आला हे कोणालाच आवडणार नाही.

मी तिच्या घरी जाण्यामुळे रागिणीला त्रास होणार असेल तर नको जायला. 

माझ्यामुळे रागिणीला त्रास झालेला मला मुळीच आवडणार नाही." 

असे अनेक प्रश्न अनुराजला सतावत होते.

शेवटी रागिणीच्या घरी जायचा निर्णयच त्याने रद्द केला.

त्यानंतर देखील एक आठवडा लोटला.

पण रागिणीचा कॉलेज मध्ये पत्ता नव्हता.

अनुराजची अस्वस्थता वाढत होती.

रागिणी खूप हुशार मुलगी होती. 

त्यामुळे कॉलेजच्या टीचर्सने देखील ती कॉलेजला का येत नाहीये..? 

असा प्रश्न तिच्या वर्गमैत्रिणींना केला.

मात्र रागिणीच्या गैरहजेरीबद्दल कोणालाच काहीच माहित नव्हते.

" रागिणी बरी असेल ना ...?

तिला काही झालं तर नसेल ना ..?

रागिणीचे घरचे काही प्रॉब्लेम असतील का..?

आर्थिक प्रॉब्लेम तर नसेल ना ...? 

ती अडचणीत तर नसेल ना ...?

रागिणी सोबत काय झालेय नेमके ..?"

असे अनेक प्रश्न अनुराजची अस्वस्थता वाढवत होते.

त्याला पडलेले सगळेच प्रश्न अनुत्तरित होते.

"आता मात्र काहीही झाले तरीही..

 रागिणी कॉलेजला का येत नाहीये... ? 

याचा तपास लावायलाच हवा. 

मी असा हातावर हात ठेवून नाही बसू शकत.

परिणाम काहीही झाला तरी मी रागिणीच्या घरी जाणारच....! "

असे अनुराजने ठरवलं.

कॉलेजचे सगळे लेक्चर संपल्यावर तो रागिणीच्या घरी जाण्यासाठी निघाला.

रागिणीचा पाठलाग करतांना त्याने ती कुठल्या बिल्डिंग मध्ये राहते हे अचूक टिपलेले.

त्यामुळे तिच्या घराचा पत्ता शोधण्यात त्याला फार मेहनत पुरली नाही. 

त्यावेळी रागिणीचा पाठलाग केलेला आज कामात आला असे त्याला मनोमन वाटून गेले.

बिल्डिंगच्या गेटवर आल्यावर तिथल्या वाॅचमन काकांना भेटून अनुराज म्हणाला ...

" काका , रागिणी  देशमुखला ओळखता का..? 

मला तिचा फ्लॅटनंबर सांगू शकाल का...? "

" हो , ओळखतो मी तिला ....

पण तू कोण आहेस ...? 

तिच्या घराचा पत्ता विचारणारा ..

आणि तिच्यासोबत तुझा काय संबंध ..? 

माझ्या लेकीसारखी आहे ती ...

तिच्याकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही."

असे बोलून वाॅचमन रागाने अनुराजकडे पाहत होते.

" आहो काका , तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. 

रागिणी गेले पंधरा दिवस कॉलेजमध्ये गैरहजर आहे. 

तिने कॉलेजमध्ये न येण्याचे कारण देखील कळवलेले नाही.

त्यामुळेच आज कॉलेज मधल्या सरांनी वर्गात विचारले की ..

रागिणी खूप हुशार विद्यार्थिनी आहे.

पण गेले पंधरा दिवस ती गैरहजर आहे.

रागिणी बद्दल कोणाला काही माहित असेल तर सांगा.

नसेल माहित तर तपास करा.

म्हणूनच मी सरांना सांगितलं की तपास करतो.

मी इथेच स्ट्रीट नंबर १०ला राहतो.

त्यामुळे रागिनणी याच बिल्डिंग मध्ये राहते हे मला माहित होते.

बऱ्याच वेळा मी तिला इथे पाहिलं आहे.

म्हणून मी तिचा तपास करायला आलो होतो.

तुम्ही गैरसमज करू नका. "

अनुराज त्या वाॅचमन काकांना शांत करत म्हणाला.

" अस्स होय ...

मग ठीक आहे.

फ्लॅट नंबर ६०५, बिल्डिंग - B " वॉचमन

" ओके .., थँक्यू काका .." अनुराज 

सेक्युरिटी गेटवरच्या रजिस्टर मध्ये अनुराजने 

त्याच्या येण्याची वेळ ,

भेटीचे कारण, 

स्वतःचे नाव ,

मोबाईल नंबर ,

सगळे काही नमूद केले आणि तो आत जायला निघाला.

पण पुन्हा मागे वळून आला.

वॉचमन काकांजवळ येऊन थांबला.

त्यांना उद्देशून तो म्हणाला ...

" काका,  मी आजवर पाहिले आहे की कामावर असताना आपण फक्त काम करतो.

पण रागिणीचे नाव काढले आणि 

तुम्ही तर तिचे प्रोटेक्टर झालात.

एवढे आपलेपण नाही पाहायला मिळत, 

आजकाल कुठेच ...

पण तुमच्यात तुम्ही तो आपलेपणा जपला आहे. 

थँक्यू फॉर दॅट..."

इतके बोलून तो निघणार तेवढ्यात काका म्हणाले ...

" हे आपलेपण मला देशमुख साहेबांनी आणि रागिणीनेच शिकवलं आहे.

माझ्या पडत्या काळात खूप साथ दिलीय त्यांनी मला ...

रागिणीने सख्या लेकीपेक्षा जास्त प्रेम लावले आहे.

माझी बायको जीवघेण्या आजाराने आजारी होती.

तेव्हा आमच्या सारख्या गरीब माणसासाठी सुद्धा जेवणाचा डबा आणून द्यायची रागिणी..

माझी लेकचं आहे ती ...

माझा तिच्यात माझ्या मुलीइतकाच किंबहुना तिच्या पेक्षा जास्त जीव आहे.  

सध्या त्यांच्यावर प्रसंग पडला आहे. 

पण देव सगळे काही नीट करेल. " 

इतके बोलून वॉचमन काकांनी आपल्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा हळूच पुसल्या.

" कसली मुलगी आहे ना ही रागिणी  ....

प्रत्येकावर काहीतरी जादू करते. 

तिला जो भेटतो तो तिच्या प्रेमातच पडतो ...

जसा मी ...." 

अनुराज लिफ्ट येण्याची वाट पाहत मनातल्या मनात विचार करत होता.

तितक्यात त्याच्या मनाचा दुसरा कोपरा त्याच्याशी बोलू लागला ...

" अनुराज , आवर स्वतःला ...

वॉचमन काकांकडून मार खाता खाता वाचलास तू ....

आता रागिणीच्या घरी पुन्हा तिच गती नको. "

हे सगळे मनात सुरु असतानाच सहावा मजला आला.

समोरचाच फ्लॅट होता ६०५.

"सौ आसावरी आणि श्री महेश देशमुख.

       धीरज आणि रागिणी ..."

अशी सुंदरशी नेमप्लेट सजवलेली होती दरवाज्यावर ..

अनुराजने दरवाज्याची बेल वाजवली.

त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती.

समोरून दरवाजा उघडला.

एक पंचेचाळीशी मधल्या काकू होत्या.

मोरपंखी रंगाची साडी. 

कपाळावर मेडीयम साईझची टिकली.

भांगात भरलेले सिंदूर.

दोन्ही हातात दोन दोन काचेच्या बांगड्या. 

केसांचा जुडा मारलेला. 

त्यांच्या पेहरावावरून 

आणि 

त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून त्या रागिणीच्या आई असणार असे अनुराजला वाटलं.

" कोण पाहिजे ..? " काकू 

" अं..ऽऽ.. हं..ऽऽ.. अं..ऽऽ.. मी..ऽऽ..हं..

काकू , मी अनुराज ...

रागिणीचा क्लासमेट .." 

घाबरत आणि अडखळत अनुराज म्हणाला.

यावर काकूंची रिएक्शन काय असेल. 

याचा विचार करूनच त्याला घाम फुटला होता.

" ओह ...ये ना बाळा ...

मग आत ये ...

मी रागिणीला बोलवते. " काकू 

अनुराजच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी होती त्यांची रिएक्शन ...

अनुराज त्यांच्या मागुन घरात गेला.

तो संपूर्ण घराचे निरीक्षण करत होता.

फॉयर एरिया खूप सुंदर सजवलेला होता.

खूप सुंदर वॉल आर्ट लावलेली होती तिथे..

त्याच्या खालीच सुंदर राधाकृष्णाची झोपाळ्यावर बसलेली मूर्ती होती ...

मन मोहून टाकणारी ....!

लिविंग रूम मध्ये एन्ट्री केल्यावर ..

संपूर्ण फाईव्ह सीटर कॉर्नर सोफा, 

बाजूलाच नक्षीदार डिजाईन केलेले पार्टीशन ,

त्याच्या बाजूला डायनिंग रूम ,

समोरच्या भिंतीवर इंद्रधनुष्य असलेला फोटो,

त्याच्या अपोझिट किचन कडे जाणाऱ्या भिंतीवर पूर्णपणे सजवलेली फोटो वॉल..

त्यावर रागिणी  , 

तिचा भाऊ ,

त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे वेगवेगळे फ़ोटोज सजवलेले होते.

हे सगळे निरीक्षण करत असतानाच रागिणी बाहेर आली.

" Hi ,अनुराज ....

तू इथे कसा ...? 

बस ना ....

उभा का आहेस .." रागिणी 

" Hi ...,

बरेच दिवस झाले तू कॉलेज मध्ये येत नव्हतीस.

आज साने सर पण विचारत होते..

इतकी सिन्सियर मुलगी कॉलेजला अबसेन्ट आहे.

म्हणजेच काहीतरी गंभीर कारण असणार.

 म्हणूनच सरांनी तपास करायला सांगितला." अनुराज 

" ओह ...म्हणजे सरांनी तपास करायला सांगितला.

म्हणून तू आलास...?

अच्छा , म्हणजे तुझी मैत्रिण म्हणून तुला माझा तपास करावासा वाटला नाही.." 

रागिणीने अनुराजला शब्दात पकडले.

" अ.. ऽऽ... हा ऽऽ..

तसं नाही ग ...

फ्रेंड आहे म्हणूनच तर तुझा तपास करायला आलो होतो ना ..."

अनुराजने अडखळत उत्तर दिले.

तितक्यात रागिणीची आई अनुराजसाठी चहा आणि बिस्कीट घेऊन आली.

" नको काकू ...

याची काही गरज नव्हती..

निघतो मी ..

थँक्यू ...." अनुराज 

" अरे गरज नव्हती ...

असे कसे ..

तू पहिल्यांदा घरी आला आहेस ..

रागिणीचा मित्र आहे.

आणि लगेच निघतो काय ...

बस जरा वेळ ...

गप्पा करा.

रागिणी ...

तुम्ही दोघेही बोलत बसा.

मी तोवर बाबांजवळ थांबते.

धीरज येईल जरा वेळात ..

त्याची पण ओळख करून दे अनुराज सोबत .." 

इतके बोलून रागिणीची आई आत निघून गेली.

त्यानंतर रागिणी पुढे बोलू लागली.

" अरे दोन आठवड्यापूर्वी ...

बाबांचे खूप डोकं दुखत होते.

त्यांना वाटले कामाचा ताण असेल 

किंवा खूप जास्त स्क्रीनटाईम झाल्यामुळे डोकं दुखतं ...

असे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.

पण नंतर नंतर चक्कर येणे , गरगरणे असा बराच त्रास जाणवू लागला बाबांना ...

त्यांना बोलताना अडचण येत होती.

मग मात्र मी ऐकले नाही. 

आम्ही बाबांना घेऊन डॉक्टरकडे गेलो.

त्यांनी एम आर आय करण्याचा सल्ला दिला.

आम्ही सिटी स्कॅन आणि इतरही सगळे रिपोर्ट करूनच घेतले. 

तर त्यात बाबांना ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले.

त्यानंतर बाबा आणि आम्ही सगळेच खूप खचलो.

आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता हा ...

पण मग आम्ही यातून सावरलो कसं बस ...

कारण आमच्या वागण्यामुळे बाबांना त्रास नको.

म्हणून त्यांना सावरण्यासाठी आम्ही धीट झालो.

आम्ही स्टिरिओटॅक्टिक सर्जरी’च्या मदतीने ट्युमरची बायोप्सी करून घेतली.

देवाचीच कृपा म्हणायची की गाठ कॅन्सरची नव्हती.

आणि मग बाबांच्या सर्जरीचा डिसिजन घेतला.

एक वीक बाबा हॉस्पिटल मध्येच होते.

बाबांना बरे वाटेल की नाही हीच चिंता लागून होती आम्हाला ...

या सगळ्यात कॉलेजला कळवायचे पण राहिले. " 

" ओह ..आता बरे आहेत ना मग काका ...

काही मदत लागली तर कळव.

मी सांगेन सानेसरांना तुझ्या बाबांच्या तब्येती बाबतीत..

तू फक्त एक लिव्ह अँप्लिकेशन लिहून दे माझ्याजवळ.

मी सबमिट करतो ते कॉलेजला.

तू नको काळजी करूस.

सगळे व्यवस्थित होईल." अनुराज 

" थँक्यू अनुराज ...

"मला माझा इतका मिस झालेला अभ्यास कसा पूर्ण होईल त्याचे टेन्शन आले आहे.

अजून पण काही दिवस मला कॉलेजला यायला जमेल असं वाटत नाही. "

रागिणी उदास होऊन म्हणाली.

तिचा उदास चेहरा अनुराजकडून पहावला गेला नाही.

" अगं मी आहे ना ....

तू नको चिंता करू.

मी रोज तुला कॉलेज मध्ये शिकवलेल्या नोट्स आणून देईल.

आतापर्यंत जे काही शिकवले आहे. 

तो सगळा सिलॅबस समजून सांगेल तुला..

तुझ्या नोट्स मी लिहून देईल हवं तर ..." अनुराज 

" थँक्यू अनुराज ..

खरंच मी किती लकी आहे ना ..

मला तुझ्यासारखा मित्र मिळाला. 

थँक्यू देवा .....

मला इतका चांगला मित्र दिल्याबद्दल ..." रागिणी

" चल , निघतो मी ...

बराच उशीर झाला आहे.

आई वाट पाहत असेल.

उद्या कॉलेजहून येताना नोट्स आणतो

तुझ्यासाठी ....

बाय ..."  

इतके बोलून अनुराज निघाला.

" बाय .....

आणि थँक्यू सो मच..." रागिणी 

नोट्सच्या , अभ्यासाच्या निमित्ताने..

अनुराज आणि रागिणीच्या भेटी वाढीस लागल्या.

अनुराजचे रागिणीच्या घरी जाणे येणे वाढले.

रागिणीचा भाऊ धीरज देखील अनुराजचा चांगला मित्र झाला.

रागिणीचे कुटुंब खूप समजूतदार होते.

त्या सगळ्यांचाच एकमेकांवर खुप विश्वास होता.

त्यांच्या ह्याच गोष्टी मनापासून अनुराजला आवडत होत्या.

त्याच्या घरची परिस्थिती याच्या उलट होती.

अनुराज आणि रागिणीची मैत्री खूप वाढली होती. 

पण हे प्रेम आहे हे सांगण्याची अनुराजमध्ये हिम्मत नव्हती.

आणि रागिणी या सगळ्याला फक्त मैत्री समजत होती.

हळूहळू अकरावीचे वर्ष संपून बारावीचे वर्ष सुरु झाले.

अनुराज आणि रागिणी दोघेही जोमाने अभ्यासाला लागले.

बारावीची परीक्षा आणि एंट्रन्स एक्साम देखील संपल्या. 

सगळ्यांना आता रिझल्टची उत्सुकता होती. 

या सगळ्यात रागिणी आणि अनुराजचे बोलणे सुरुच होते. 

एक दिवस अचानक रागिणीचा फोन आला. 

ती फोनवर खूप जोरात रडत होती.

तिला नीट बोलता देखील येत नव्हते.

" रागिणी , काय झालेय...? 

नीट सांग ...

काही टेन्शन आहे का..? " अनुराज ...

" अनुराज ....बाबा ....

माझे बाबा ....." रागिणी  

" काय झालं बाबांना... ?

नीट सांग रागिणी .." अनुराज 

" अनुराज ...बाबा ...आम्हाला सोडून गेले ...

He is no more ..." रागिणी 

अनुराजला हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. 

तो तडक रागिणीच्या घरी गेला.

.

.

.

.

 तिच्या बाबांच्या मृत्यूचा धक्का रागिणी पचवू शकेल का..? 

अनुराज रागिणीला या धक्क्यातून कसा सावरणार ..? 

अनुराज रागिणीला त्याच्या मनातील भावना सांगू शकेल का..? 

वाचू पुढच्या भागात .

.

.

.

.

क्रमश: 

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

फोटो साभार - Google 

✍©️ जया पाटील

























Post a Comment

0 Comments