मला साथ देशील ना भाग १०



मला साथ देशील ना भाग १०

संकल्पना आणि कथाबीज ©जया पाटील

लेखिका © Velvet Kavisha

भाग नऊ वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_15.html


अनुराज बेडरुममध्ये गेला.

कपाटातून कपडे काढून बेडवर ठेवले. 

टॉवेल घेऊन बाथरुममध्ये गेला.

भिजलेला शर्ट, पँट, बनियान काढून बादलीत टाकली. 

इनरवेअर तशीच ठेवून टॉवेल गुंडाळून बेडरुममध्ये आला. 

इतक्यात रागिणी चहा घेऊन आली. 

टॉवेल गुंडाळलेल्या पाठमोऱ्या अनुराजकडे पाहिलं आणि हृदयात वाजे समथिंग झालं. 

टेबलवर चहाचा ट्रे ठेवून तिने अनुराजला पाठीमागून मिठी मारली. 

पावसाने थंडावलेल्या शरीराला रागिणाचा उबदार स्पर्श सुखावून गेला. 

शरीरावर शहारा आला. 

काखेतून छातीवर आलेल्या तिच्या हातांवर त्याने हात ठेवले अन दंड हलकेच काखेत दाबले.

"अनुराज ऽऽऽ " म्हणत ती त्याला घट्ट बिलगली.. 

त्याने तिच्या एका हाताला धरून पुढे ओढली आणि एक घट्ट मिठी मारली. 

ही हवीहवीशी मिठी दोघेही पहिल्यांदाच अनुभवत होते. 

तिच्या हातांची बोटं त्याच्या उघड्या पाठीवर गच्च रुतली होती. 

त्याचे हात तिच्या पाठीवर वेगात फिरून चेहऱ्याजवळ आले.

तिच्या दोन्ही कानांच्या बाजुला हात धरून तो किंचित खाली झुकला. 

त्याचे ओठ तिच्या ओठांवर विसावले. 

गेल्या सहा वर्षांची ओढ वेगाने पुढे सरकत होती. 

तो खुप साचलेला तरीही कायम शांत असणारा आता बरसू पाहत होता. 

त्याचे स्पर्श तिचा रोम न् रोम उत्तेजित करत होता. 

ही मिठी अन् हे भाव म्हणजे अर्ध्या तपातली तपश्चर्या होती. 

जी आता बंधमुक्त होऊ पाहत होती. 

तो आता वेडावल्यासारखा तिच्या चेहऱ्यावर ओठ टेकवत होता. 

ती तेवढ्याच तत्परतेने त्याला प्रतिसाद देत होती. 

त्याच्या प्रेमावेगाने ती अजुनच विरघळत होती. 

इतक्यात त्याने तिच्या दंडाला पकडत पाठमोरी फिरवली.

 सावकाशीने तिच्या टी-शर्टमधून त्याचे हात छातीवर विसावले.

 एका झंकारलेल्या लहरीने तिने वरून तसेच दाबून धरले आणि मान त्याच्या खांद्यावर मागे रेलली. 

टी-शर्टमध्ये त्याच्या हातांची होणारी हालचाल तिला सुखावत होती. 

तिच्या चेहऱ्याकडे पाहत त्याने आपल्या ओठांचा चंबू तिच्या ओठांवर ओठ टेकवला.

 आता मात्र दोघांनाही पुढच्या प्रवासाची ओढ लागली होती. 

त्याने तसंच खाली वाकून तिच्या मांडीखाली हात घालत तिला उचलून घेतली. 

तिने डोळे गच्च मिटून घेतले. "आय लव्ह यू डार्लिंग" म्हणत तिला बेडवर ठेवली.

 खाली वाकून टी-शर्ट वर करून तिच्या बेंबीवर ओठ टेकवले. 

हात पुन्हा टी-शर्टमध्ये हरवलेले. बेंबीला जीभेने गुदगुल्या केल्या. 

"स्ससससस अऽनुऽऽऽ " म्हणत तिने त्याच्या दंडावर जोरात दाबलं‌.

 आणि तो तसाच वर येत तिच्या अंगावर रेलला.

 एक हुंकार देत तिच्या शरीराने त्याचं वजन झेपवलं. 

त्याच्या अशा भाराने अंग अंग चुरगळून जावं असं तिला वाटतं होतं. 

तिने आपले दोन्ही हात त्याच्या पाठीवर घट्ट धरले. 

आणि एका बेसावध क्षणी त्याने तशीच पलटी मारुन तिला स्वतःवर घेतली.

 त्या गडबडीत तिच्या हातातली काचेची बांगडी फुटून एक काच त्याच्या पाठीत आणि तिच्या मनगटात घुसली. 

"आऽऽ" करत दोघे विसावले. 

तिच्या हातातून रक्त निघत होतं.

 त्याच्या पाठीला ही काच लागली होती. 

तिने दुसऱ्या हाताने जखम दाबून धरली होती. 

तशीच उठून कपाटापाशी गेली. 

ड्रॉवर खोलून रुमाल काढला. 

अनुराजकडे देत हाताला बांधायला सांगितला. 

रुमाल बांधून होताच तिने first aid box काढून अनुराजच्या छोट्याशा जखमेची मलमपट्टी केली.

 नंतर स्वतःच्या हाताचं ड्रेसिंग केलं. 

टेबलवर ठेवलेला चहा थंड होऊन त्यावर साय धरली होती. 

तिने अनुराजकडे न पाहताच दोन्ही कप उचलून किचनमध्ये घेऊन गेली.

नवीन चहा बनवून बाहेर घेऊन आली. 

अनुराज धीरजचे कपडे घालून सोफ्यावर बसला होता. 

तिने त्याच्याकडे न पाहताच चहा टिपॉयवर ठेवला आणि स्वतःचा कप घेऊन खुर्चीत बसली. 

सहा वर्षे झाली, अनुराजला ओळखतेय पण आज नजरेला नजर देण्याचं धाडस होत नाहीय.

अनुराजची ही अवस्था तशीच होती.

 कुठून सुरुवात करावी काही म्हणत,

"आज तू लवकर कसा काय आलास..??"

 रागिणीने चहाच्या कपाकडे पाहत शांतता तोडत विचारलं.

"बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून आलो... 

खरंतर आज ऑफिसला गेलोच नाही." घसा खाकरत अनुराज म्हणाला.

"का..??" रागिणीने विचारलं.

"काल तन्वीने घरात न सांगता लग्न केलंय. 

आज तिच्याकडेच जाऊन आलो. 

ती भेटली नाही. 

तिच्या सासुबाई भेटल्या.

 चांगली वाटली माणसं..!!" म्हणत अनुराजने सौरभ विषयी सगळं सांगितलं. 

रागिणी ऐकत होती. 

"आपण पण तन्वीसारखंच करायला हवं होतं. 

आता या तन्वीबाईंनी असं लग्न केलंय. 

घरात वातावरण तापलेलं आहे अशावेळी आपल्याबद्दल कसं सांगावं काही कळतं नाही."

"आजचा क्षण बांगडीमुळे सावरला.

 पण नेहमीच सावरला जाईल असं नाही ना.." अनुराज पायांच्या बोटाकडे पाहत म्हणाला.

"आपण फोनवर बोलू. 

तु असा येत जाऊ नकोस ना.." रागिणीने सांगितलं.

"तुझ्या ओढीने येतो गं इकडे. 

आता तर नवरा बायको आहोत तरीही.....

सांग कसं आणि किती समजवावं स्वतःला..?? 

पुढ्यात भरलेलं ताट आहे. 

जेवणाऱ्याला भूक आहे, ताटाला प्रतिक्षा आहे. 

तरीही उपवास आहे म्हणून ताट बाजूला सारावं लागतंय.. " 

अनुराज हताशपणे म्हणाला.

रागिणी उठून त्याच्या बाजूला बसली. 

त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"बाप्पाला साकडं घालून आलास ना..?? 

निघेल काहीतरी मार्ग..!!" रागिणीने समजावलं. 

"मी निघतो आता.. घरी जाऊन बघतो काय परिस्थिती आहे ती. 

आईला तन्वीबद्दल सांगावं लागेल सगळं.." अनुराज.

"हं. बोलू फोनवर. आणि सॉरी.." रागिणी.

"कशासाठी सॉरी..??"

"मघाशी माझ्यामुळे म्हणजे मी मारलेल्या मिठीमुळे पुढचं सगळं घडलं. 

प्रतिज्ञा तुटली असती आज. म्हणून सॉरी." रागिणी नजर झुकवून बोलत होती. 

अनुराजने तिचा चेहरा तळहातात पकडला. 

"एक वेडाबाई, प्रतिज्ञा आपणच केली होती. 

एखाद्या नाजूक क्षणी तुटली असती तर तुटली. 

मुद्दाम ठरवून नव्हतं केलं आपण. 

आणि आता कायद्याने नवरा-बायको आहोत आपण.. सो चिल्.. 

सारखं स्वतःला दोष देणं बंद करा मॅडम. 

मलाही गिल्ट येतं मग..."

"आजचे तुझ्यासोबतचे सगळे क्षण हृदयावर कोरले गेलेत. 

मी जगलोय खुप आनंदाने. 

तु ही जगून घे.. किती भारी वाटतंय बघ..." म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केलं. 

"चल खरंच निघतो मी आता. 

नाहीतर पुन्हा तुझ्यात वेडा होईन." 

तिनेही त्याच्या मळहातावर किस केलं आणि "बाय" म्हटलं.

अनुराज निघून गेला. 

रागिणीने दरवाजा नीट लावून घेतला. 

बेडरुममचा दरवाजा आतून बंद केला. 

आरशासमोर बसली. 

अनुराजने आज सर्वांगाला स्पर्श केला होता. 

तिने आरशातल्या स्वतःला निरखून पाहिलं. 

अनुराजचं अनुकरण करत टी-शर्ट मधून हात आत नेत हळूवार गोंजारलं. 

त्याचा हातांचा, ओठांचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हळुवार हात फिरवत राहिली. 

भावनांचा जणू उद्रेक होऊ पाहत होता. 

अर्ध्या ताटावरून कोणी तरी उठवल्यासारखं वाटत होतं. 

शरीर ही वेडावलं होतं. 

नकळत डोळ्यांत पाणी दाटून आलं आणि तिने बेडवर झोकून दिलं. उशी पोटाशी धरली. 

"अनुराज खुप वाट पाहतेय रे या क्षणांची. 

लवकर बोल बाबांशी.. 

मला तुझ्यासोबत हे सगळे क्षण जगायचेत..." म्हणत हमसून हमसून रडू लागली... 

कधीतरी धीरज घरी आला तेव्हा उठून तिने स्वयंपाक केला.

उदास वाटत होतं फार. 

रात्रभर अनुराजच्या आठवणीत ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत जागी होती. 

---------------

इकडे अनुराज रागिणीकडून निघून घरी आला. 

मन बेचैन होतं.

 काही केल्या रागिणीशी झालेली जवळीक मनातून जात नव्हती.

अंगातून हजारो तारा झंकारत होत्या. 

पहिलाच अनुभव. 

त्याची अनुरागिणी.

त्याच्या मिठीत होती. 

जे स्वप्न आजवर पाहिलं होतं तेच प्रत्यक्षात येणार होतं. 

आपला तर "घर का ना घाट का" झालाय.  

त्याच विचारात त्याने कपाटातून कपडे घेतले आणि बाथरुममध्ये गेला. 

गिझर लावला.

बादली भरेपर्यंत त्याने रागिणीच्या आठवणीत स्वतःला मोकळं केलं. 

मगभर पाणी डोक्यावर ओतलं. 

काय हे परमेश्वरा...!! लग्न झालंय. 

बायको आहे. 

दोघांची संमती आहे तरी दोन सुखाचे क्षण जगता येऊ नयेत. 

फक्त दुर्देव. 

दुसरं काहीच नाही. 

आता लवकरात लवकर काही तरी करायला हवं. 

एकीकडे गिझरचा कॉक फुल स्पीडमध्ये पाणी ओतत होता. 

बादलीभर म्हणत म्हणत दोन-चार बादल्या संपल्या होत्या. 

 अनुराजचं डोक्यावर पाणी घेणं काही थांबलं नव्हतं. 

जणू तो भावनांचा निचरा करत होता.

 डोक्यावरून वाहणाऱ्या पाण्यात डोळ्यांतलं पाणी समरसून गेलं होतं....

दोन जीव एकमेकांसाठी तडफडत होते.

-----------

अनुराज थोडंसं खाऊन उठला. 

झोप गायबच झाली होती. 

त्याने पुन्हा एकदा रागिणीच्या आठवणीत रमून तिच्या मिठीत झोपलोय असं समजून हळूहळू झोपेची आराधना केली. 

-------------

दुसऱ्या दिवशी सकाळी फोनच्या रिंगनेच अनुराजला जाग आली. 

साने सरांचा फोन होता. 

त्यांनी पूजेला बोलावलं होतं. 

रागिणीला पण निरोप दे म्हणाले. 

ऑफिसमधून डायरेक्ट येतो म्हणून अनुराजने फोन कट केला. 

बाबा आंघोळीला गेले तेव्हा त्याने आईला तन्वीबद्दल सगळं सांगितलं. 

संध्याकाळी साने सरांच्या घरी जाणार असल्याचे ही सांगितले. 

आवरून ऑफिसला गेला.

रागिणीला मेसेज टाकून साने सरांचा निरोप दिला. 

आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनजवळ भेटायला सांगितले....

---------------

ठरल्याप्रमाणे अनुराज आणि रागिणी सरांच्या घरी पोचले. 

नमस्कार करून प्रसाद घेतला.

आता महाप्रसाद घेऊनच जा असा सरांनी आग्रह केला. 

दोघे खुर्चीत बसून होते. 

सोसायटीतल्या बायका एकदम आल्या. 

अनुराज आणि रागिणीला घेऊन सर गॅलरीत खुर्च्या टाकून बसले.

 गप्पा सुरू झाल्या. 

अनुराजने तन्वीबद्दल, स्वतःच्या लग्नाबद्दल सगळं सांगितलं. 

सरांना खुप वाईट वाटलं. सोबत बाबांसाठी ही वाईट वाटलं. 

"अनुराज, या सगळ्यात माझी काही मदत लागली तर सांग.." 

सरांच्या वाक्याबरोबर अनुराजच्या डोक्यात विचार आला की, सरांना रागिणीचं स्थळ घेऊन बाबांना भेटायला सांगितले तर कसं होईल... ???

.

.

आता अनुराज काय करेल हे पुढच्या भागातच समजेल...

क्रमशः

वाचा पुढील भागात....

संकल्पना आणि कथाबीज ©जया पाटील

लेखिका © Velvet Kavisha

वाचकहो, कथेच्या लेखिका जया पाटील यांना डेंग्यू झाल्यामुळे त्या ही कथा पुर्ण करु शकणार नाहीत. संकल्पना व कथा जया पाटील यांचीच असून आजपासून या कथेचे पुढील भाग आमच्या लेखिका वर्षा ठुकरुल लिहिणार आहेत...

Thank you...🙏🙏

Post a Comment

0 Comments