#माझ्या_जगण्याला_पंख_फुटले_भाग_१
©️ जया पाटील
"आर्या, दिवस किती पटापट पुढे सरकतात नाही का ...?
निकेत आणि तुझं लग्न होऊन तीन वर्ष झाली.
अर्णव देखील एक वर्षाचा झाला.
आता सगळं काही आलबेल आहे ,
पण तुमचे आधीचे दिवस किती स्ट्रगल करावं लागलं आहे तुम्हाला ...
मला तर वाटलंच नव्हतं इतकं सगळं होऊनही तुम्ही पुन्हा एकत्र याल.
पुन्हा नव्याने सगळं इतकं छान होईल.
असो , सगळ्या परीक्षा होत्या त्या तुमच्या आयुष्यातल्या ...
तुम्ही त्यात उत्तम गुणांनी पास झाले.
आयुष्यातील बॅड फेज होती ती ..
पण ते दिवसही सरले.
याचा आनंदच आहे आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना..
खरं प्रेम होतं तुझं आणि निकेतचं एकमेकांवर म्हणूनच तुम्ही पुन्हा एकत्र आले."
आर्या आणि तिची मैत्रीण स्नेहा दोघीही गप्पांमध्ये हरवल्या होत्या.
" हो ग ...त्यावेळच्या सिच्यूएशन वरून तर असंच वाटायचं की ,
निकेत आणि मी पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही.
पण आमचं प्रेम खरं होतं.
म्हणून आम्ही आज एकत्र आहोत.
मात्र अमित नसता तर हे सगळं शक्यच नव्हतं.
त्याच्या त्यागामुळेच आज आम्ही एकत्र आहोत.
त्याचेच आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत.
खरं तर त्याने केलेली गोष्ट उपकारात देखील तोलता येणार नाही.
पण त्याने मला दिलेली साथ मी कधीच विसरणार नाही.
स्नेहा , कधीतरी वाटतं ग मला ...
मी चुकीचं वागली का अमित सोबत ..?
त्याने फक्त माझ्या सुखासाठी हे केलं.
आणि मी मात्र स्वार्थी झाले.
कधी कधी या गोष्टीचा विचार करते तेव्हा ..
मला खूप गिल्टी फील होतं ग ..
अमितचा विचार डोक्यात आला तरी खूप वाईट वाटतं मला.
मी त्या वेळेस जे केलं ते चूक होतं की बरोबर हे नाही समजत मला.
मी बरोबर होती की चूक ..?
सांग ना..स्नेहा ...? "
" तू बरोबर होतीस ग आर्या ...
स्वतःला दोषी मानून खंत करत बसू नको.
तू तुझ्या आणि अमितच्या नात्याला न्याय देऊ शकली असती का ..?
त्याच्यावर निकेत इतकं प्रेम करू शकली असतीस का ..?
नाही ना.....
मग तू वागलीस ते अगदी बरोबर होतं.
त्यामुळे आता भूतकाळात रमणं आता सोड ..
आणि प्रेसेंटचा विचार कर.
तुझं आणि निकेतचं इतकं सुंदर आयुष्य आहे.
अर्णव सारखा एक गोड मुलगा आहे आता तुम्हाला...
मान्य आहे अमितच्या समजदारीमुळे हे सगळं शक्य झालं.
त्याला तुझ्या आयुष्य जादुई रंगाने रंगवणारा चित्रकार समज.
आणि स्वतःला आरोपी समजणं आता बंद कर."
त्यांच्या गप्पांची तंद्री मध्येच तोडत लावण्या त्यांना म्हणाली ...
" आर्याच्या आयुष्यात बॅड फेज ...?
हे काय ऐकतेय मी ...?
आपल्या सगळ्या फ्रेंड्स मध्ये लव्ह बर्ड्स म्हणून फेमस आहेत आर्या आणि निकेत.
आपल्या सगळ्या फ्रेंड्स साठी आयडियल कपल आहेत ते.
त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील असं नाही वाटत मला."
" आता त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाहीत ग , लावण्या ...
पण त्यांची लव्ह स्टोरी मात्र एखाद्या फिल्मच्या स्टोरी पेक्षा कमी नाही.
अगदी फिल्म मध्ये घडतं तसंच घडलंय आर्या आणि निकेतच्या आयुष्यात ..."
स्नेहा लावण्याला म्हणाली.
" अय्या ..खरंच..
मला खूप आवडेल ग त्यांची लव्ह स्टोरी ऐकायला ...
I will love to hear Arya & Niket's lovestory ..
मी खूप एक्ससायटेड आहे ..
मला पण सांग ना...स्नेहा ..प्लीज .."
लावण्या स्नेहाला लाडीगोडी लावत म्हणाली.
" आर्या , लावण्या काय म्हणते आहे ऐकलं ना...
सांग ना तिला तुझी लव्हस्टोरी ...
तिला ऐकायची आहे ग ..." स्नेहा
" स्नेहा ..तूच सांग ना...
माझी आणि निकेतची लव्हस्टोरी..
मला पण कोणा दुसऱ्याकडून ऐकायला मजा येईल माझीच लव्हस्टोरी ..."
आर्या स्नेहाला म्हणाली.
" बरं बाई ...सांगते मीच ....
ऐका ..स्नेहा मॅडम ..
अगदी कान देऊन ऐका " स्नेहा
------------------
स्नेहा बोलू लागली......
"आर्या आणि मी कॉलेजच्या मैत्रिणी.
कॉलेजच्या पहिल्या दिवशी कॅन्टीनमध्ये एकाच टेबलवर बसण्याबाबतीत आमच्या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं.
नंतर दोघांनाही आपापली चूक कळली.
दोघींनीही एकमेकांना जाऊन सॉरी म्हटलं.
त्यानंतर मात्र आम्ही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स झालो.
एकमेकांच्या साथीशिवाय आम्हाला सगळं काही अपूर्ण वाटू लागलं.
त्या दिवसानंतर मात्र आम्ही एकमेकांच्या जिवलग मैत्रिणी झालो.
साधी राहत असूनही आर्या आमच्या कॉलेजची क्वीन होती.
आम्हा सगळ्या मैत्रिणींना तिच्या सौंदर्याचा हेवा वाटायचा.
जेन्यूनली सांगायचं तर जेलसी सुद्धा वाटायची कधी कधी.
आर्या अगदी परीप्रमाणे सुंदर होती.
अतिशय सुंदर काळेभोर केस ,
गोर्या गालांवर रेंगाळणारी कुरळ्या केसांची बट,
तिचे सौंदर्य आणखीनच खुलवत असे.
मोहक डोळे ,
चाफेकळी नाक ,
गुलाबी ओठ ....
जशी काय स्वर्गातील अप्सराच जणू.....!
स्वभावाला देखील तितकीच गोड ,
समजदार ,
सतत हसणारी आपली आर्या
आम्हा कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणींची लाडकी होती.
आर्याचा स्वभाव आधीपासूनच लाजरा-बुजरा , थोडासा घाबरट असा होता.
लाजरा स्वभाव असल्यामुळे कधी कोणत्या मुलासोबत मैत्री करण्याचा तिने प्रयत्न केला नाही.
मुलांसोबतची मैत्री प्रेमात बदलली तर ....?
मग त्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणी .....?
त्यामुळे मुलांसोबत मैत्री आणि प्रेम वगैरे या भानगडीत कधीच पडायचे नाही असं तिने ठरवूनच टाकले होते.
पण ठरवून करता आले असते तर ते प्रेम कसले ....?
कोणावरही प्रेम करणं हे आपल्या हातात असतं ,
तर सगळ्याच गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या.
आम्ही कॉलेजला असताना सोशल मीडियाची क्रेज लोकांमध्ये वाढू लागली होती.
व्हाट्सअप , फेसबुक ,इंस्टाग्राम या सगळ्या सोशल अँप्लिकेशनची क्रेज आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागली होती.
आर्या मात्र या सगळ्या गोष्टींपासून थोडी दुर राहत असे.
इतकं घाबरून रहायला काय अर्थ आहे.
एक दिवस आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मागे लागून आर्याला फेसबुक वर अकाउंट क्रिएट करायला लावले.
एकदा फेसबुक युज करायला लागल्यावर आर्याच्या मनातील भीती थोडी दुर झाली.
सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास ते धोकेदायक नाही हे आर्याच्या लक्षात आलं.
सोशल मीडिया हे एका व्यसनाप्रमाणे आहे.
एकदा यात मन गुंतले की लवकर त्यातून सुटका मात्र होत नाही.
हळूहळू मात्र ती या सगळ्या गोष्टीत गुंतत गेली.
एक दिवस निकेत नावाच्या एका मुलाची फेसबुकला फ्रेंडरिक्वेस्ट आली.
अनोळखी असल्यामुळे तिने स्वीकारली नाही.
मग नंतर मेसेज येणे सुरु झाले.
' तुम्ही खूप छान दिसतात.
सोज्वळ आहात. '
सुरुवातीचे काही दिवस आर्याने सगळे मेसेज इग्नोर केले,
पण समोरून मेसेज येणं सुरूच राहिलं.
' कृपया गैरसमज करू नका पण मी एक साधारण मुलगा आहे ,
त्यामुळे माझ्या मुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही,
पण तुम्हाला पाहुन एक पॉसिटीव्ह फील आला म्हणून तुमच्यासोबत बोलतोय.
खूप मुली पाहिल्या मी पण तुमच्या इतकी सोज्वळ नाही. '
अश्या एका मेसेजने काम केले.
आर्याला निकेत खूप साधा सोज्वळ, चांगला मुलगा वाटला.
तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.
दोघांचेही बोलणं वाढलं.
त्यातून एकमेकांच्या बऱ्याच वयक्तिक माहितीची देवाणघेवाण झाली.
कॉलेज , मित्रमैत्रिणी , कुटुंब या सगळ्या विषयावर दोघांचेही बोलणं वाढलं.
आर्याच्या सगळ्याच गोष्टींचं निकेत खूप कौतुक करू लागला.
आर्याला देखील ते सगळे छान वाटू लागलं.
एकमेकांचे फोन नंबर शेयर झाले.
कधी चाट तर कधीतरी फोनकॉल यातून बोलणं वाढीस लागलं.
एक दिवस निकेतने आर्याला भेटायची इच्छा व्यक्त केली.
आता मात्र आर्या थोडी घाबरली.
तिने हा सगळा प्रकार मला येऊन सांगितला.
आम्ही दोघेही कॉलेजच्या वयातील ...
फारशी अक्कल नव्हती.
अल्लड बुद्धी ...
त्यातल्या त्यात या वयात अशा सगळ्या गोष्टींचे आकर्षण असते.
चूक की बरोबर या कुठल्याच गोष्टीचा विचार न करता.
आम्ही निकेतला भेटायला जायचं ठरवलं.
भेटीचा दिवस , लोकेशन आणि वेळ ठरली.
भेटीचे लोकेशन मात्र अगदी गजबजलेल्या एरियामध्ये असेल याची मात्र आम्ही खबरदारी घेतली.
आमच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते आम्हाला योग्य वाटलं.
ठरलेल्या ठिकाणी आम्ही दोघीही पोहोचलो.
निकेतचा फोन आला.
" थोडाच वेळात कुठे आहात.
मी सीसीडी समोर उभा आहे.
तिकडेच या. "
आम्ही दोघीही सीसीडी कडे जायला निघालो.
समोर निकेत उभा होता.
फेसबुकवर फोटो पाहिला असल्यामुळे ओळख पटवण्यात अडचण आली नाही.
व्हाईट टी-शर्ट,
ब्लॅक जीन्स ,
डोळ्यावर गॉगल,
एका हातात घड्याळ,
पायात स्पोर्ट्स शूज,
केस मस्तपैकी हेअर जेल लावून सेट केलेले.
दुरूनच येणारा परफ्युमचा सुगंध.
कसला हँडसम दिसत होता म्हणून सांगु..
कुठलीही मुलगी अगदीच बघताच प्रेमात पडेल असा ...!
तुझ्या निकेतचे इतकं कौतुक करतेय म्हणूनच राग मानू नको आर्या ..."
स्नेहा आर्याला चिडवत म्हणाली आणि पुढे बोलू लागली.
"आम्ही तिघेही आत टेबलवर जाऊन बसलो.
कॉफी ऑर्डर केली.
हळूच त्याने आर्या कडे पाहिलं.
मस्त नेव्ही ब्लू कलरचा कुर्ता ,
त्यावर त्याच रंगाची प्रिंटेड चुडीदार पॅन्ट ,
साईडने घेतलेली लालकलरची ओढणी ,
डाव्या हातात काळ्या बेल्टचे घड्याळ ,
उजव्या हातात नाजुकसे ब्रेसलेट ,
केस बनाना क्लिपने बांधलेले ,
खूप छान दिसत होती ती.
निकेतने तिला पाहिलं आणि पाहतच राहिला.
माझ्याकडे मात्र त्याने पाहून न पाहिल्यासारखंच केलं.
मी कबाब मे हड्डी पोहोचली होती ना त्या दोघांमध्ये.
त्यामुळेच माझ्यावर त्याचा राग असेल कदाचित.
आमच्या गप्पा सुरु झाल्या.
बोलताना खरंच निकेत खूप चांगला मुलगा आहे याची जाणीव झाली.
दोन तास गप्पा सुरु होत्या.
पण त्यात केव्हाच त्याने मर्यादा ओलांडली नाही.
बराच उशीर झाला म्हणून आम्ही निघालो.
आम्हाला बस मध्ये बसवून तोही निघाला.
आता निकेत आणि आर्याच्या भेटी वाढू लागल्या.
हळूहळू निकेत आणि आर्या दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडू लागला.
आर्याला पण निकेत मनापासून आवडत होता.
फक्त तिच्या मनातील भावना निकेतला सांगण्याची तिच्यात हिम्मत नव्हती.
निकेतच्या मनाची अवस्थाही काही वेगळी नव्हती.
निकेतने आर्याला प्रपोज करायचे ठरवलं.
त्याने आर्याला एका रिसॉर्टवर भेटायला बोलवलं.
फक्त येताना मला म्हणजेच स्नेहाला आणू नकोस असं आवर्जून सांगितलं.
आर्याने होकार दिला.
हे सगळं तिने मला नंतर सांगितलं.
या सगळ्याचा बदला म्हणून मी निकेत कडून पेनल्टी पण वसुल केली.
असो ..त्याबद्दल नंतर कधीतरी सांगेल.
ठरलेल्या वेळेस आर्या रिसॉर्टवर पोहोचली.
रिसॉर्टवर पाहिलं तर आर्याला कोणीच दिसलं नाही.
आर्या चालत अजून पुढे गेली.
थोडं पुढं जाऊन पाहीलं तर एक सुंदर टेन्ट उभा होता.
त्याला खूपच सुंदर सजवलं होतं.
रेडी मेड मिळणाऱ्या बॅटरी ऑपरेटेड लायटिंगने त्याला रोशन केलं होतं.
चहूकडे सुरु असलेली लायटिंग ,
चहूकडे पसरलेले रंगीबेरंगी फुगे ,
मंद आवाजात सुरु असलेले संगीत ,
टेबलवर सजवून ठेवलेला केक ..
त्यावर लिहिलेली अक्षरे ...
आय लव्ह यु... स्वीटहार्ट...
टेबलच्या बाजूला सजवून ठेवलेल्या दोन खुर्च्या.
टेन्टच्या एका कोपऱ्यात एक मोठा आरसा देखील लावलेला होता.
हे सगळे मनमोहक वातावरण पाहून .
आर्या आश्चर्यचकित झाली.
तितक्यात तिच्या मागुन आवाज आला ....
" I Love u , आर्या ...
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर .. !
I Love u so much .....! "
तिने मागे वळून पाहिले तर मागे निकेत उभा होता.
त्याला पाहून आर्याला खूपच आनंद झाला.
तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
ज्या क्षणाची ती मनापासून वाट पाहत होती तो प्रत्यक्षात उतरल्यामुळे तिला आभाळ ठेंगणं झालं होतं.
निकेत आर्याकडे पाहतच राहिला.
व्हाईट कलरचा फ्लोरल डिजाइनचा वनपीस ,
डाव्या हातात नाजुकसे ब्रेसलेट ,
केसांना मेस्सी बन मध्ये बांधून एक लट मोकळी सोडलेली ,
डोळ्यामध्ये काजळ ,
ओठांवर हलकीशी मॅट पीच कलरची लिपस्टिक ,
कानात नाजूक डायमंड इअररिंग्स ,
पायात हील्स,
खूप सुंदर दिसत होती आर्या....
तिला पाहून नकळत निकेत तोंडातल्या तोंडात पुटपुटला ...
Gorgeous ...!
निकेतने गुडघ्यावर बसून आर्याला फुल दिले आणि म्हणाला ..
" माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
माझी साथ देशील ना ..?
I love u आर्या ..."
त्याच्या हातातील गुलाबाचे फुल तिने अलगद पणे स्वतःच्या हातात घेतले .
आणि निकेतला हसून तिने म्हटले ..
" l love u too निकेत ...
फक्त एक प्रॉमिस कर मला ..
काहीही झालं तरी मला सोडून जाणार नाहीस ना ...
u never leave me ..."
त्यावर निकेत तिला म्हणाला ..
" मी तुला कधीच सोडून जाणार नाही.
आयुष्यभर प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी तुझी कायम सोबत करेल.
खरंतर आपल्या नात्याची सुरुवात एका आभासी जगातून झाली.
फेसबुकवर जेव्हा पहिल्यांदा तुझा फोटो पाहिला.
त्याचक्षणी मी फोटोला पाहून म्हणालो होतो..
तूच माझ्या आयुष्याची साथीदार असायला हवी.
खरंतर फेसबुकवर भेटणारी प्रत्येक व्यक्ती चांगलीच असेल याची खात्री देता येत नाही.
तसा कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास देखील ठेऊ नये.
पण तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवला.
तुझ्यासोबत संपर्क करायला मला फेसबुक मेसेंजर शिवाय दुसरा कुठलाच मार्ग नव्हता.
म्हणूनच मी तो मार्ग निवडला.
प्रत्यक्षात आपण एकाच शहरांत राहत असल्यामुळे आपल्याला भेटणं देखील शक्य झालं.
कारण कदाचित आपल्या दोघांची जोडी त्या परमेश्वराने बनवली आहे.
त्यामुळेच हे सगळं शक्य झालं.
खूप दिवसापासून हे सगळं मनातलं बोलायचं होतं तुझ्यासोबत.
पण नेहमीच स्नेहा सोबत असायची.
त्यामुळे थोडं ऑकवर्ड फील व्हायचं."
असे म्हणून खिशातून त्याने एक सुंदर डायमंड रिंग काढून निकेतने आर्याचा हात हातात घेतला.
तो बोलू लागला ...
" आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मला तुझी साथ हवी आहे आर्या.
मला आयुष्यभर तु फक्त माझी म्हणून हवी आहेस ...
Be my happiness forever ...
will u marry me ..?
माझ्याशी लग्न करशील ..?"
त्यावेळी मात्र आर्याने अंगठी घालण्यास नकार दिला.
" निकेत , सॉरी पण ही अंगठी मी नाही घालू शकत.
आपल्या दोघांचेही आईबाबा जेव्हा आपल्या नात्याला स्वीकारतील.
त्यावेळेसच मी ह्या अंगठीचा स्वीकार करेल.
आपल्या दोघांच्याही आईवडिलांचा होकार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.
प्लीज ,माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नकोस."
आर्याचे बोलणं निकेतला पटलं.
त्याने देखील आर्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.
इकडे आर्याच्या बाबांच्या म्हणजेच संजयरावांच्या मनात मात्र वेगळंच काही सुरु होतं.
त्यांच्या ऑफिसमधील विलासरावांचा मुलगा अमित त्यांनी आर्या साठी मनोमन पसंत केला होता.
आर्याचे शिक्षण पूर्ण झालं की लगेच ,
ते आर्या आणि अमितच्या लग्नाचा विषय ते विलासरावांकडे काढणार होते.
आर्याला मात्र याबाबतीत काहीच कल्पना नव्हती."
" यानंतर मात्र आर्या आणि निकेत दोघांच्याही परीक्षेला सुरुवात झाली.
निकेतची सोबत मिळविण्यासाठी आर्याने खूप काही सहन केले आहे ग ..लावण्या ..
आता या पुढचा निकेत आणि आर्याचा प्रवास तू तिच्याकडूनच ऐक.
माझ्यापेक्षा हे सगळं तिच जास्त चांगल्या पद्धतीने सांगु शकेल. "
स्नेहा आर्याला उद्देशून म्हणाली.
आर्याने देखील होकार दिला.
.
.
.
.
.
काय असेल निकेत आणि आर्याच्या नात्याचे भविष्य ..?
संजयरावांचा अमितसोबत आर्याचे लग्न लावून देण्याची इच्छा पूर्ण होईल की नाही ..?
की आर्या आणि निकेतच्या नात्यात एक वेगळाच ट्विस्ट येईल ..?
हे सगळं जाणून घ्यायचं आहे ना ...
मग या कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे.
साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा.
अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & pinterest
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box