श्रीरंग भाग १




श्रीरंग भाग १

© लेखिका मनस्वी ✍️

Love story, Romantic story


त्या अवचित कातरवेळी भेटलास तु असा अचानक.. मंदिऱ्यातल्या पायऱ्या उतरताना तोल गेला अन नकळत तुझा हात हाती आला.. मी हात सोडवून घेताना आधी तुझ्या भरदार छाती कडें लक्ष गेलं.. अन मग मान हनुवटी ओठ सरळ नाक आणि तें दो नैना... आणि तो सावळा रंग... ती मला नजर वर करायला लावणारी उंची.. तें रुंद कपाळ.. त्यावर गोपीचंदनाचा नाम.. तें भरघोस केस..


अडकला जीव माझा.. भान विसरून पाहत राहिले.. अन तु.. तु मात्र एक कटाक्ष टाकलास आणि त्या गर्दीत मिसळून गेलास..


शोधू की नको या विवंचनेत मी बाहेर आले.. प्रसादाच्या रांगेत उभी होते..

सतत मागे वळून तुला शोधत होते..


आणि प्रसाद घ्यायला नकळत हात पुढे गेला.. नजर अजूनही मागेच.. तु अलगद त्या हातावर हात ठेवलास..

तोच झटकन वळून समोर पाहिलं.. तु गालातल्या गालात हसत होतास..


गरम आहे.. सावकाश.. म्हणत प्रसादाचा द्रोण माझ्या हातावर ठेवणार इतक्यात दुसऱ्या हातानी रिकामा द्रोण आधी ठेवलास.. मग त्यावर प्रसाद द्रोण ठेवलास..

मी तिथेच आडोसा पाहून उभी राहिले...

तुला कुणी तरी हाक मारली.. रंगा...

तु ही हात उंचावून... आलो म्हणालास..

तो आवाज तें देखणं रूपं पाहून मी नादावून गेले...

इतक्यात देवळात कुणाची तरी रिंगटोन वाजली... त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे गं..


अन वाटलं जणु गाभाऱ्यातल्या श्रीरंग

मला भेटायला बाहेर आला..

तो तर मित्रांमागे निघून गेला आणि मी त्या सावळ्या मूर्तीमागे धावत बाहेर आले... पण छे.. योग नव्हता भेटीचा... हिरमुसली होऊन पुन्हा चपला स्टॅन्ड पाशी परतले..

आणि घराच्या दिशेने निघाले..

काही अंतर चालून गेले आणि चप्पल तुटली.. आधीच मनात तो रुतलेला आणि इथे चपलेत खिळा..

आता दुडक्या चालीनं तर कधी पाय घासत अशी चालू लागले..

इतक्यात मागून एक हॉर्न ऐकू आला..

काय झालं? पायाला लागलंय का?

आता कोण? म्हणून वैतागून मागे पाहिलं..

परत तोच..


अहा.. त्याला बघून तर असलं बरं वाटलं की विचारूच नका ..

मग मी ही तुटकी चप्पल काढून त्याकडे बोटं दाखवलं..

पठ्ठा गाडी side ला लावून उतरला..


मला वाटलं चला... भारी चान्स आहे... आता नक्की सोडेल हा घराजवळ..

पण त्यानं bike च्या पुढे अडकवलेल्या फडक्यानं उचलली आणि म्हणाला...

तुम्ही बसा.. मी आलोच.. पुढे एक मोची आहे..

असा म्हणून निघून गेला..

आणि मी आ sss वाss सून बघत राहिले...


अरे.. काय माणूस आहे यार...

पण जाताना त्याच्या बुलेट च्या मागे 'लैला ' अशी पाटी लिहिलेली पाहिली.. नंबर ही झकास होता.. 9 2 11

खरंय... या नंबर सारखाच माझं नुकतंच तुटलेलं आणि चप्पल दोन्ही घेऊन फरार झाला ..


आता काय करता राधाबाई... चला .. म्हणून दुसरी चप्पल हातात घेऊन पुन्हा चालू लागले..

आता तर वातावरण ही आपला 'रंग ' बदलू लागलं..


आधीचा उकाडा जाऊन गार गार हवेचे झोत येऊ लागले आणि बघता बघता आभाळ काळवंडून गेलं..

इतका अंधार दाटून आला की जणु हिवाळ्यातली गर्द रात...

आजूबाजूला जमेल तितके दिवे उजळले पण तें ही फार काळ तग धरू शकले नाहीत..

आणि तितक्यात ढगांचा गडगडाट सुरु झाला.. आणि टप्पोरे थेंब कोसळू लागले..


आता कशाला थांबायचं जाऊयात भिजत म्हणत मी ही निघाले..

आणि पुन्हा एक बुलेट माझ्या दिशेनी धग धग आवाज करत आली..

खरंतर अज्जिबात बोलायचं नाहीं असं ठरवलं होतं..


पण आता तो पुन्हा जवळ येऊन थांबला आणि एक बॉक्स माझ्या हातात दिला ... आता तुटकी चप्पल टाचून काय बॉक्स मधे देतात का

मी ही बॉक्स उघडला तर त्यात नवी कोरी चप्पल होती..


मी खुष होऊन पाहिलं आणि इतक्यात जोरात वीज कडाडली...

अश्शी घाबरले आणि डोळे गच्च मिटून त्याचा भरदार खांदाचं धरला...


तो मात्र शांतपणे त्या पर्जन्यधारा आणि त्यात भिजणाऱ्या मला न्याहाळत होता..

मी पुन्हा सावरले आणि त्याला पाहत सॉरी म्हणत दूर झाले..


जाते मी.. म्हणत निघाले सुद्धा (तसही हा काही सोडणार नाहीं उगा भाबडी आशा कशाला लावा मनाला )

इतक्यात तो म्हणाला..

थांबा... पाऊस वाढलाय... मी सोडतो तुम्हाला...

मग काय पडत्या फळाची आज्ञा... मी ही नखरे नं करता बसले मागे...

आता पुन्हा एकदा वीज कडकावी असं काहीबाही मनात येतं होत पण काही अंतर गेलो आणि ही लैला बंद पडली...


बघतोय तर चाक बसलंय.

छे... नशिबातच नाहीं... म्हणून चरफडत उतरले..

त्यानं bike बाजूला घेतली..

आणि आम्ही एका आडोशाला थांबलो... चार दुकानं सोडून चहा वाला होता...

तो सुवास आता मला छळू लागला...


पण मी मात्र मोबाईल काढून रेंज मिळतिये का तें तपासत होते.. बॅटरी ही लो झाली ..

तेव्हा तोच म्हणाला...घरी फोन लावून सांगा... तुम्ही इथे आहात.. मी ही कळवतो मग...


मी ताईला फोन केला आणि मग हळूच त्याच्या नंबर वरून माझ्या नम्बरला मेसेज पाठवून दिला...

Hii..

आणि मगच फोन परत केला ..

आता हे उद्योग करताना तो चहा आणायला गेला होता...

मग कोसळणाऱ्या पावसात त्याला निसटते स्पर्श करत तो चहा enjoy केला...


इतक्यात बाबांची हाक आली...

राधे... इथे काय करतियेस...?

बाबा लोकं पण ना नेमके क्लायमॅक्स ला येतात

मी त्याच्या कडें पाहत डोळ्यांनी निरोप घेतला तेव्हाची त्याची 'नजर '...


कातिल ! किलर !! जानलेवा !!!

पुढे????

आम्ही घरी आलो..

नेहमीप्रमाणे आई बाबा सगळे बोलत होते, विचारत होते...

पण मला ना आख्ख जग जणु 'पुष्पक 'सारखं भासत होतं.

जेवायला बसले आवरूनं तर समोर तु दिसलास ...


अय्या. .

काहीही व्हायला लागलंय ..

बाकी कुणाच्या नसलं तरी माझं हरवून जाणं आत्तू नी बरोबर ओळखलं...


माझी लिली आत्या... वय 65, दिसायला देखणी केतकी रंगाची, त्या सुब्बलक्ष्मी आहेत ना... अगदि तश्शी... नाकात चमकी पण .. पण अतोनात कष्ट अगदी लहानपणापासून अकाली म्हातारी झालेली आणि यजमान गेल्यावर मुलबाळ नसल्याने आमच्याकडेच येऊन राहिली होती ...


.त्या कातिल नजरेनं मला रात्रभर छळलं... डोळे मिटले की तोच चेहरा... तें डोळे... अर्रे... काय ताप आहे...

मग अचानक आठवलं . आपल्याकडे नंबर आहे की


मीच मेसेज केला...

Hii...

बराच वेळ गेला रिप्लाय नाही

मग ट्यूब पेटली .. आपण एकमेकांना नंबर नाही दिलाय ... तो कसा ओळखेल??


पुन्हा मेसेज केला... hii मी राधा... आज तुम्ही मला मदत केलीत त्या बद्दल thank u..

पुन्हा काही वेळ गेला . तरी रिप्लाय नाही...

मग मात्र मला जरा रागच आला...

काय हे वागणं?


निदान welcome ओके काहीतरी रिप्लाय दयावा..

रात्रीचे 11 वाजून गेले होते...

सगळीकडे सामसूम...

आणि त्या सोशल अँप वर.. माझं बोट नेमकं रेकॉर्डिंग वर आणि माझं स्वगत चालूच ..


"कित्ती छळावं माणसानं... आधीच हा डोळ्यासमोरून हलत नाहीये.. आणि आता मेसेज पाठवले तर रिप्लाय पण नाही...

अरे.. काय माणूस आहे हा... दुष्ट कुठला..."

आणि नकळत तो मेसेज पाठवला सुद्धा गेला...

मी हीं निजून गेले... त्याच्या स्वप्नात ...

....

सकाळी उशीरा उठले ..

मग निवांत आवरलं... तेवढ्यात माझी घट्ट मैत्रिण निशा आली...

चल आवर .. जायचंय...

आँ... कुठे??

तिनं आजूबाजूला पाहिलं...

आणि माझ्या जवळ आली...


गधडे... काल जों घोळ घातला आहेस ना तोच निस्तरायचाय...


मी ...

मी कधी घातला घोळ...???

तरी पटकन आवरून आले आणि मग आम्ही बाहेर पडलो..

आता तरी बोल .. मी वैतागून विचारलं .


कालचा त्याच्यावरचा राग धुमसत होताच

तिनं पुन्हा देवळापाशी आणलं ...

आणि मला जरा आवाज चढवून विचारलं...

काल काय घडलं?

मी सगळं सांगितलं....

अगदी नंबर कसा घेतला तें पण .

आणि रात्री मेसेज केला तें पण...

पुढे?. तिनं पुन्हा विचारलं

पुढे काही नाही ...झोपले....

इतक्यात मागून आवाज आला...

सॉरी....

या दुष्ट माणसाकडून...


काल पावसात मी हीं नंतर बराच वेळ अडकलो...

घरी उशीरा आलो..

आणि फोन चार्जिंग ला लावून निजलो...

त्यामुळे रिप्लाय नाही केला ...

आता राग गेला असेल तरच येतो समोर ...


मी शॉक....

ह्याला कसं कळलं?

आणि तो समोर आला ...

माझंच रेकॉर्डिंग मला ऐकवलं....

अर्थात तो पर्यंत निशा तिथून लांब गेली होती

मग जवळ येतं म्हणाला...


पुन्हा एक बॉक्स ..

त्यात कालची जुनी तुटकी चप्पल दुरुस्त करून आणलेली...

मी हीं हसून thank u म्हणाले ..

तर गाडीवर बसत म्हणाला कसा...

ऐका ना 5 रुपये द्याना...

त्या मोचीला द्यायचेत ....

ई... दुष्ट कुठला...

आणि त्यानं मुद्दाम गाणं पाठवलं मेसेज वर

पाच रुपैय्या... बारा आना ssssss

मारेगा भैय्या sssss ना ना ना ना sss...

आता तुम्हीच सांगा कसं रुसायचं या वेडू वर.....🙆‍♀️


क्रमश:

© मनस्वी ✍️

भाग २ वाचा 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/09/blog-post_25.html

© मनस्वी ✍️


"श्रीरंग" ही प्रेमकथा लेखिका मानसी (मनस्वी) यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.


धन्यवाद..

✍️ Partners

 Velvet Kavisha


Post a Comment

0 Comments