विरह...
©️®️सुजाता घुगे
" टन, टन, टन ,चला बसा लवकर.
बस निघणार आहे पाच मिनिटात."
महिला कंडक्टर बोलत होती.
एक बाई म्हणजे पंचविशीतील मुलगीच कंडक्टर होती.
म्हणून लोक बघत होते.
कोणी आश्चर्य आणि कोणी उपहासाने,
कोणी लालसेने.
त्या चढणाऱ्याप्रवाशांच्या गर्दीत एक पंचविशीतील तरुणही चढला.
बस सुरू झाली.
तिकीट तिकीट म्हणत कंडक्टर मुलगी म्हणजे नीता त्या तरुणाजवळ आली.
" बोला, कुठे जायचे आहे?" नीता
त्या मुलाने तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहिला.
तो एकटकतिच्याकडेच बघत होता.
म्हणून तिने पुन्हा आवाज दिला.
"हो मिस्टर ,कुठलं तिकीट काढू?"
" हो, ते... ते ..."तो तरुण अडखळत बोलला.
" ते ..ते ...काय करताय ?
कुठे जायचे माहिती नाही का?"
"वाडी.
वाडी चे तिकीट द्या".
पैसे देत तो तरुण उत्तरला.
" हा ,हे घ्या तिकीट ". नीता
"काय काळे साहेब ,
विकेट पडली की काय?"
चांदेकर साहेब त्या तरुणाला म्हणत होते.
"तसं काही नाही हो."
काळेसाहेब म्हणजे तो तरुण म्हणाला.
"असू द्या हो.
ओळखपत्र वरचं नाव वाचलं का?
नीतागोरे.
म्हणजे तुमच्या जातीतली वाटते.
बघा जमतय का?"चांदेकर साहेब
"तुमचा आपलं काही पण."हसत काळे म्हणाले.
पण कुठेतरी त्यांच्याही डोक्यात तो विचार घुटमळत होता.
काळेसाहेब म्हणजे दिनेश काळे.
एका महामंडळाचा कंत्राटी लिपिक पदावर कार्यरत होते.
पगार जेमतेमच.
आणि घरची परिस्थिती हलाखीची.
आपल्याला जर नोकरी वाली मुलगी मिळाली तर आपली परिस्थिती सुधारेल.
या विचारातच त्यांचा थांबा आला.
"टिंग ,टिंग, चला वाडी वाली उतरा."नीता
"हो मिस्टर उतरायचं नाही का?"
काळे साहेबांना विचारातच मग्न असलेले पाहून नीताने आवाज दिला.
तसा दिनेश भानावर येत,
"हो ,हो ,मॅडम
म्हणत बस मधून उतरला.
उतरेपर्यंत तो तिच्याकडेच बघत होता.
आणि मनात विचारचक्र चालू होतं.
ही मुलगी पटतेय का बघू.
"काळे, म्हणजे आपल्याच जातीतल्या वाटतोय.
राहणीमान आवरून तरी नोकरीला असावा असंच दिसतं".
नीता स्वतःशच मनात बोलत होते.
चांदेकर यांनी निरोप घेताना,
'येतो काळेसाहेब, असं म्हणताना तिने ऐकलं होतं.
एके दिवशी दिनेश ऑफिस वरून घरी जाण्यासाठी बस स्टॉप वर बस ची वाट पाहत बसला होता.
दहा-पंधरा मिनिटांनंतर बस लागली.
दिनेश बस मध्ये चढला आणि थबकला.
आज बस मध्ये नीताच होती.
बस मध्ये एकही सीट रिकामी नव्हती.
म्हणून दिनेश उभाच होता.
नीता तिकीट काढत होती.
तिकीट काढता काढता दिनेश जवळ आली.
"सर, वाडीचा तिकीट ना?"नीता
"हो, पण तुमच्या कसे लक्षात?"दिनेश
"असंच. तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही इथे माझ्या सीटवर बसू शकता". नीता
"ठीक आहे". दिनेश
दोघेही एका सीटवर बसले आणि गप्पा सुरु झाल्या.
दिनेश का स्वभाव मुळातच बोलक असल्यामुळे बोलायला विषय शोधायची गरजच नाही पडली.
"तुमचं नाव काय मॅडम?"दिनेश
"नीता गोरे.
आणि तुमचं?"नीता
" मी दिनेश काळे.
इथे सरकारी कार्यालयात कंत्राटी लिपिक आहे."
असं बोलता बोलता दोघांनी एकमेकांची माहिती विचारून घेतली.
"मला तुमचा फोन नंबर मिळेल का?
म्हणजे मला बस कधी येणार आहे हे विचारता येईल."दिनेश
नीताने त्याचा बोलण्याचा रोख ओळखला.
"हो का नाही?"म्हणत तिने आपला नंबर दिला.
मग फोनवर बोलणे होऊ लागले.
सुरुवातीला जुजबी बोलणे होत असे.
बस मध्ये आठवड्यातून एक-दोन वेळेस भेटही होत असे.
हळूहळू त्यांचा संपर्क वाढला आणि दोघांमधील जवळीकही वाढली.
"हॅलो ,नीता मला तुला काही सांगायचे आहे".
दिनेश"हो सांगा ना."नीता
"आय लव यू!" दिनेश
"काय?"नीता
"आय लव यु ,निता"दिनेश,
"का तुला आवडलं नाही का?"
"का नाही आवडणार.
मलाही कधीपासून हेच सांगायचं होतं." नीता
"काय सांगायचं होतं". दिनेश
"हेच तुम्ही म्हणाला तेच". नीता
"मी काय म्हणालो?" दिनेश
"आय लव यू..."नीताने लाजतच उत्तर दिले.
मग काय आता दिवस-रात्र फोनवर बोलणं होऊ लागलं.
नीताची शिफ्ट असली की दिनेश साठी डबा घेऊन यायची.
दोघे एकत्र जेवायचे,
फिरायचे,
एकमेकांना गिफ्ट द्यायचे.
असंच काही दिवस त्यांचं चालू होतं.
हळूहळू सगळीकडे म्हणजे बस स्टॉप वर,
दोघांच्याही घरी,
नातेवाईकांमध्ये ही बातमी पसरली.
दिनेशच्या काही नातेवाइकांना कण्डक्टर मुलगी सून म्हणून पसंत नव्हती.
पण त्याच्या आनंदासाठी म्हणून सर्व तयार झाले.
नीताने हि तिच्या घरी दिनेश बद्दलकल्पना दिली.
नीताच्या वडिलांनी दिनेश ला घरी भेटायला बोलावलं.
दिनेश एका मित्रासोबत नीताच्या घरी जाऊन आला.
येताना दोघेही म्हणजेच नीता आणि दिनेश एकाच बस मध्ये आले.
दुसऱ्या दिवशी दिनेश तिला भेटायला तिच्या रूमवर गेला.
आणि रात्रीला तिथेच थांबला.
नीता रूममध्ये आणि दिनेश बाहेर झोपला.
पण त्यांना झोप कुठे येत होती.
सकाळी 3 वाजता उठून दिनेश रूममध्ये गेला.
नीता ही जागीच होती.
ती उठून बसली आणि"काही हवंय का?"
असं तिने दिनेशला अडखळतच विचारलं.
कारण दिनेश ला काय हवंय हे तिला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं.
"हो"दिनेश
"काय हवे?"नीता
"तू."दिनेश तिच्या खूप जवळ जात बोलत होता.
त्याने तिचा हात पकडला आणि जवळ ओढले.
तसं नीताने त्याला दूर ढकलले.
"हे सर्व आताच नको". नीता
"काही होत नाही.
तसेही आपण लग्न करणारच आहोत."
दिनेश तिच्या जवळ जात तिला मिठीत घेत बोलला.
तीसुद्धा नाही नाही म्हणत त्याच्या मिठीत विरघळली आणि त्या रात्री दोघे एक झाले.
"पुढच्या आठवड्यात रविवारी माझे बाबा तुमच्या घरी येणार आहे. लग्नाची बोलणी करायला."
नीता फोनवर दिनेश सोबत बोलत होती. दोघेही खूष होते.
रविवार उजाडला.
दिनेश च्या घरी तयारी चालू होती.
दुपारी एक वाजता नीताचेबाबा आले.
चहा पाणी करत ,गप्पागोष्टी करत, नीता चे बाबा
घर न्याहाळत होते.
दिनेश चे घर म्हणजे दगडा मातीची बांधलेली खोली आणि स्वयंपाक घर म्हणजे एक पडवी.
घराचा दरवाजा तर डोक्यालाच लागायचा.
शेतीभाती काही जास्त नव्हतीच.
नाश्तापाणी करून नीताचे बाबा निघाले.
सर्वजण खास करून नीता आणि दिनेश बाबाच्या उत्तराची वाट पाहत होते.
संध्याकाळी नीताच्या बाबांचा फोन आला आणि त्यांनी नकार दिला.
कारण दिनेश कडे ना मोठ्या पगाराची नोकरी,
न बांधलेले घर, ना शेती.
त्यांनी आपल्या मुलीच्या सुख सुविधेचा विचार केला.
पण इकडे दिनेश आणि नीता च अवस्था खूप खराब झाली.
दोघांचेही रडून-रडून हाल झाले.
दिनेश तर पार वेड्यागत करायला लागला.
म्हणून त्याच्या घरच्यांनी लवकरात लवकर त्याचे लग्न लावायचे ठरवले.
तो ही घरच्यांच्या आग्रहाखातर दुसर्या मुलीशी लग्न करायला तयार झाला
आणि मुलगी पाहायला गेला.
तिकडे ही बातमी नीताला तिच्या मैत्रिणीकडून कळाली.
ती सारखी रडत होती.
नीता ची मैत्रीण दिनेश ला सारखी फोन करत होती.
पण त्यांनी ही काही फोन ला उत्तर दिले नाही.
त्याचं लग्न ठरलं.
दोन महिन्यानंतर लग्नही पार पडलं.
आणि त्याचा संसार सुरू झाला.
नीताने ही आपली बदली दुसऱ्या डेपोला करून घेतली.
दोघांचेही मार्ग आता वेगळे झाले होते.
पुन्हा कधीही न भेटण्यासाठी...
©️®️सुजाता घुगे
विरह .... ही कथा लेखिका सुजाता घुगे यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.
धन्यवाद..
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Velvet Kavisha
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box