आणि पाडवा गोड झाला भाग ३
लेखिका - Velvet Kavisha ✍️
मागील भागात आपण पाहिलं - -
रागावून गेलेली गौरी पाडव्याच्या निमित्ताने का होईना स्वप्नीलच्या ओढीने ठाण्यात आली होती. स्वप्नीलने आपल्या राणीसाठी गुलाबाच्या पायघड्या घातल्या होत्या. रितीच्या विरूद्ध जाऊन पाडव्याच्या दिवशी तिला ओवाळलं होतं. आणि तिने ही खूप प्रेमाने त्याला ओवाळायची तयारी केली होती.
आता पुढे......
स्वप्नीलला कपडे देऊन ती बेडरुममध्ये आली. साडी बदलली. हलकासा मेकअप केला. गॅसवर दूध तापत ठेवलं. थोडं केशर, वेलची आणि साखर घातली. छान उकळलं तसं दोन मगात ओतलं. बाहेर डायनिंग टेबलवर आणून ठेवलं. आंघोळ करून स्वप्नील अगदी छान तयार होऊन आला. मघाशी ऑफिस वेअरमधला आणि आताचा लेंग्या झब्ब्यातला लूक दोन्ही मधला स्वप्नील भारीच दिसत होता.
"स्वप्नील, दूध घे थोडं. छान बनलंय."
"आज प्रेम उतरलंय त्यात म्हणून छान बनलंय ते.." स्वप्नीलने एक घोट पीत म्हटलं.
तिने त्याच्याकडे पाहून मंद स्मित केलं आणि उठून आत गेली. बाहेर येऊन पाट मांडला, त्याभोवती रांगोळी काढली, ओवाळणीचं ताट आणलं.
"ओ हिरो, बसा आता पाटावर. ओवाळू दे.." - - गौरी
रुमालाने तोंड पुसत तो पाटावर येऊन बसला. तिने मनोभावे ओवाळलं त्याला. मिठाईचा एक तुकडा घेवून त्याला भरवणार इतक्यात "हे तुझं पाडव्याचं गिफ्ट" असं म्हणत त्याने ओवाळणीत एक चिठ्ठी ठेवली. तिने पुन्हा मिठाईचा तुकडा चिमटीत पकडला. तेवढ्यात त्याने तिचा हात पकडत मिठाईच्या तुकड्याजवळ स्वतःचं तोंड नेलं. त्याने बाईट घ्यायला तोंड उघडलं आणि तिने तो तुकडा आपल्या ओठांत पकडला. त्याने पटकन तिचा चेहरा तळहाती घेत मिठाईच्या दुसऱ्या बाजूने एक बाईट घेतलाच...
तिला हसू आलं. "किती ती तत्परता!!" तो ही हसला..
"हमसे चालाखी नहीं चलेगी मॅडमजी!" म्हणाला.
"हं..." तिने लाडिकपणे त्याचा कान चिमटीत पकडून हलवला.
"बरं... यावर्षी गिफ्ट काय दिलंस?"
"तूच बघ की! ओवाळणीच्या ताटात आहे." तो मिश्कील हसत म्हणाला.
तिने ताटातून चिठ्ठी घेतली. उघडून पाहिली. त्यावर लिहिलं होतं - - "गिफ्ट गेस्टरुममध्ये आहे."
"किती फिल्मीपणा आहे हा... पण आवडलाय मला." त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली.
"जा गेस्टरूममध्ये.." त्याने मानेनेच सांगितलं.
"तू पण चल" तिने त्याचा हात धरला आणि त्यालाही सोबत घेऊन गेली.
दरवाजा उघडला.
पुन्हा तेच. दरवाजापासून बेडपर्यंत पाकळ्यांनी सजलेली वाट. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याने हाताने तिला पुढे चालण्याचा इशारा केला. आत येताच त्याने सिस्टीमवर मंद आवाजात तिची फेवरीट अलका याज्ञिक लावली. ती चालत पुढे गेली. बेड सुंदर सजवला होता. बाजूचा ड्रेसिंग टेबल छान सेट केला होता. जेणेकरून बेडजवळची ती त्याला त्या आरशात दिसेल.
एसी कधीपासून सुरू ठेवला होता कोण जाणे. रुम चांगलीच गारठली होती. ती बेडजवळ आली. त्यावर टॉवेलपासून बनवलेलं छोटंसं लुसलुशीत टेबल आणि टेबलावर एक बॉक्स.
"अरे, कधी केलंस एवढं सगळं?"
"फक्त वीस पंचवीस मिनिटांत केलंय, पण सगळं मी नाही बरं. फ्लॉवर डेकोरेटर आणला होता सोबत." त्याने हसत म्हटलं.
काय करावं याच्या वेडेपणाला?
तिने पुढे होऊन बॉक्स हातात घेतला आणि विचारलं, "काय आहे हे?"
"उघडून बघ की!" त्याने सांगितलं.
तिने अधिरतेने बॉक्स उघडला. त्यात अजून एक बॉक्स होता. तो उघडला. वरतीच एक कार्ड होतं "To my sweetheart..." लिहिलेलं.
तिने त्या कार्डवर ओठ टेकवले.
"मेरे स्वीटहार्टने दिया हैं ये कार्ड मुझे... इसकी यही जगह है..." म्हणत कार्ड ब्लाऊजमध्ये ठेवलं.
"अग्गंऽ "
"शश् श् श् ऽ" तिने बोट ओठांवर ठेवत त्याला गप्प केलं. आणि बॉक्स उघडला. "कारची चावी" होती त्यात. सोबत कारचा फोटो. त्याने तिच्यासाठी कार बुक करून, खरेदीसुध्दा केली होती.
तिनें कधीतरी दोघंच गप्पा मारत असताना म्हटलेलं. "मला तुझ्यासोबत येण्याजाण्यात उशीर होतो. रिक्षा नको वाटते आणि स्कुटीवर स्कार्पमध्ये जीव गुदमरतो.
कार घ्यायला हवी. मी जेव्हा कार घेईन ना, ती माझ्या आवडत्या रंगाची असेल. त्याचा नंबर पण मी खास घेणार आहे. माझी जन्मतारीख. पण सध्या नाही. एखादी मोठी ऑर्डर आली की, घेऊ!"
तिचं असं समजुतदार असणंच आवडायचं त्याला. कारबद्दल फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या तिच्या.
तिला हवी असणारी कार सहा लाखांपर्यंत आरामात येणार होती. त्यामुळे ह्या नवीन ऑर्डरचा ॲडव्हान्स मिळाल्याबरोबर त्याने तिच्या आवडत्या "ग्रे" रंगाची कार बुक केली विथ तिची बर्थ डेट असलेला व्हीआयपी नंबर.
गौरीला गहिवरून आलं. धावत जाऊन तिने मिठी मारली. चार पाच दिवसांचा राग, अबोला सगळंच निथळून जात होतं त्या अश्रुंमधून. त्याने ही मिठी घट्ट करुन तिला मनसोक्त रडू दिलं.
"ए वेडाबाईऽ " एक हात तिच्या कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताने तिची हनुवटी बोटाने उचलत हळूच आवाज दिला.
"हं..."
"झालं का रडून? जा फ्रेश हो.. मला झेपत नाही असा रडलेला चेहरा पाहणं.. आणि तसंही गाडीची चावी डमी आहे. गाडी फक्त बुक केलीय. डिलिव्हरी घ्यायला तर तुलाच यावं लागेल ना? " त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हटलं. होकारार्थी मान हलवत त्याचं ऐकलं तिने.
जाऊन फ्रेश होऊन आली.
"स्वप्नील चल आवरुया लवकर. चार वाजलेत. निघुया लगेच. श्रीवर्धनला पोचायला उशीर होईल." तिने आरशात पाहत म्हटलं.
"म्हणजे आता लगेचच निघायचं आपण?" स्वप्नील
"हो.."
"नक्की??"
"हे बघ, पाडव्यासाठी मी आले. पण आज तूच मला ओवाळलंस. बरोबर??"
"हां.."
"मग मी तुला ओवाळलं."
"हां..."
"तु मला गिफ्ट दिलंस. माझं तुझ्यासाठीचं गिफ्ट बाकी आहे पण ते मी तुला ठाण्यात आल्यावर देईन." गौरीने केस विंचरून क्लिपमध्ये अडकवत म्हटलं.
"एवढंच ? "
"नाही. एवढंच नाही. तु मला कार गिफ्ट दिलीस खुप आवडलं बघ मला तुझं गिफ्ट. त्यासाठी थॅंक्यु सो मच." गौरी.
"पण ते तू एवढ्या दिवसांनी आलीस आणि लगेच?"
"हो. हो. लगेच निघावं लागेल." तिने कपाळावर टिकली टेकवत गालातल्या गालात खट्याळ हसत म्हटलं. त्याने यावेळी ते पाहिलं.
खल्लास!! तिच्या ह्या खट्याळपणावर तर फिदा हम है....
"बरं.... तू आवरून ये. मी बाहेर आहे. लवकर निघून लवकर पोचू. मुलं पण वाट पाहत असतील." स्वप्नीलने सिरीयस आवाजात म्हटलं आणि रुमबाहेर आला.
ती उडालीच. तिची गुगली बुमरॅंग झाली होती. किती बावळट आहे हा! इतकी तयार त्याच्यासाठीच होतेय ना? बुद्ध कुठला, एवढं ही कळू नये. स्वतःहून पुढे यायला काय झालं.. बायकोचं सगळंच ऐकायचंच असतं याला. तिने रागात हातातला कंगवा जमिनीवर आपटला आणि दरवाजातून बाहेर पडली.
दाराबाहेर लपलेल्या स्वप्नीलने तिच्या हाताला धरून जोरात स्वतःकडे ओढली. भिंतीला टेकलेल्या त्याच्यावर ती जवळजवळ आदळलीच.
"मॅडम, आज तुम्ही ठाण्यातच आहात तरीही आम्हाला गिफ्ट नाही?" दोन्ही हातांनी तिला स्वतःजवळ घट्ट ओढून घेत म्हटलं.
" साहेब, तुम्हीच मागितलं नाहीत. मी कुठे नाही म्हटलं?" तिने त्याच्या कानापाशी ओठ नेत म्हटलं.
"अच्छा??" त्याने गळ्याखालचा पदर थोडा खाली सरकवला. तिथल्या मोकळ्या जागेवर ओठ टेकवून विचारलं.
एक शिरशिरी गेली अंगातून तिच्या. सर्वांगावर शहारा उठला. त्याने तिच्या हातावरून हात फिरवत तो शहारा अनुभवला. इतक्यात तिने त्याच्या सदऱ्याची बटणं खोलून त्याच्या छातीवर आपलं तोंड घुसळलं. वेडावला तो. गात्रं चेतवली गेली तिच्या स्पर्शाने. तिचं डोकं त्याने तसंच दाबून धरलं छातीवर आणि भिंतीला टेकून एक उसासा सोडला.
दुसऱ्याच क्षणी दोन्ही हातात तिचं डोकं पकडून तिच्या ओठांवर ओठ ठेवले. तिनेही आपले ओठ विलग करत स्वागत केलं त्याच्या ओठांचं. श्वासांचा वेग वाढला होता.
"माझं गिफ्ट मिळणार आहे का मला?" त्याने तिला चिडवत म्हटलं. आणि तिने झपकन त्याच्या मानेवर ओठ टेकवून हलकासा चावा घेतला अन् त्यावरून जीभ फिरवली.
त्याने तिला हातावर उचलून घेतलं आणि सजलेल्या बेडवर आणून झोपवलं. " मॅडम, तुम्हांला काय वाटलं? ही सजावट तुमच्या गिफ्टसाठी आहे? नाही हां. ही माझ्या गिफ्टसाठी आहे. " त्याने तिचे दोन्ही गाल चिमटीत पकडत म्हटलं.
"माहिती आहे मला."
"कसं??" त्याने पदराची पीन काढून बाजूला ठेवली आणि हुक मोकळे करत विचारलं.
"स्वतःला सावरायची किती धडपड चाललेली दिसली मला दोन तीन वेळा.." तिने हसत म्हटलं
"यु नॉटी...." म्हणत त्याने हुकाच्या बंधनातून मुक्त झालेल्या जागेवर ओठ टेकवले अन् सक केलं. तिच्या तोंडून हलकासा आवाज निघाला. कुशीवर होतं तिने त्याला मिठी मारली. त्यानेही अतीव प्रेमाने कुरवाळत तिला जवळ घेतलं. हळूहळू प्रेमाला रंग चढला. एवढ्या दिवसांचा कामाचा ताण, टेन्शन्स विसरून दोघे वेगळ्या दुनियेत रममाण झाले. त्याला पाडव्याचं गोड गिफ्ट मिळालं होतं.
ती शांत होऊन त्याच्या दंडावर डोकं ठेवून डोळे मिटून पडून राहीली. तो ही श्रमाने दमला होता.
इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने हात लांब करून साईड टेबलवरचा फोन घेतला. स्पिकरवर ऑन केला.
"अरे स्वप्नील, निघालात का तुम्ही.?" फोनवर अप्पा विचारत होते.
"नाही अजून. अर्ध्या तासात निघू..." स्वप्नील.
"पाडव्याची ओवाळणी झाली का तुमची? नसेल झाली तर करूनच या!!" अप्पा
"झाली अप्पा. आत्ताच झाली. " त्याने तिच्या केसांतून बोटं फिरवत म्हटलं.
"बरं ठेवतो फोन. सावकाश या. गाडी नीट चालवा." अप्पा.
"अप्पा यावेळी ड्रायव्हर घेतो सोबत. तो सोडून येईल आम्हाला. आज फार दमलोय. ठेवतो फोन."
हो म्हणत अप्पांनी फोन ठेवला.
त्याने तिच्याकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकेर उमटली होती. "चला! म्हणजे पाडवा गोड झाला म्हणायचा..!!" तो मनात म्हणाला..
"तुझा पाडवा गोड झाला ना?" तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहत विचारलं.
"तुम्हांला काय वाटतं मॅडम?" त्याने उलट विचारलं.
.
.
.
😜😜😜 कथा वाचली ना?? मग सांगा आता तुम्हीच....
कथा समाप्त....
लेखिका - Velvet Kavisha ✍️
1 Comments
Lay bhari 🥰❤️❤️❤️❤️🥰
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box