अविस्मरणीय ती! - प्रमोद चव्हाण.



अविस्मरणीय ती!

प्रमोद चव्हाण. 

२००९/१० सालची गोष्ट आहे. मी तेव्हा मुंबई मध्ये रिक्षा चालवत होतो. शिक्षण ९वी पर्यंत त्यामुळे पर्यायी रिक्षा चालवणे यातच समाधान मानले. 

माझ्या एका मित्राने माझं gmail अकाउंट ओपन केलं. पुढे फेसबुक च ही अकाउंट ओपन केलं.. जेमतेम इंग्लिश जमायचं त्यामुळं मला ते अकाउंट हाताळायला पण जमू लागले... मग मी अकाउंट वर फोटोज् अपलोड करू लागलो.. अनेक अनोळखी व्यक्तींना रिक्वेस्ट पाठवणे असे उद्योग सुरू झाले.. खूप गम्मत वाटायची आणि नवलही.. एकदा आमच्या ग्रामदैवत असलेल्या गावातील मंदिराचे फोटोज् मी अपलोड केले.. ते अनेकांना आवडले.. त्यावर लाईक्स कॉमेंट्स येऊ लागल्या.. 

अशातच एका कमेंट वरून सरस्वती नामक मुलीशी माझी ओळख झाली. मग फेसबुक वरून आम्ही एकमेकांना मेसेज करू लागलो.  मग एकमेकांचे नंबर ची देवाण - घेवाण झाली...

इथून पुढं आमच्या स्टोरी ची सुरुवात झाली...

ती पुण्यात राहायची. खाजगी कंपनी मध्ये अकाउंट च काम करत होती.. तीच शिक्षण बी कॉम झालेलं. रोज चॅटिंग कॉल्स व्हायचे..  बोलता बोलता आमच्या मध्ये घट्ट मैत्री झाली.. आम्ही एकमेकांना एफबी वर च पाहिलेलं.. हळूहळू बोलणं खूप वाढू लागले.. तासनतास गप्पा होऊ लागल्या.. 

मी माझ्याबद्दल सर्व माहिती तिला सांगितलेली.. 

पुढे काही कारणास्तव मला मुंबईचा निरोप घ्यावा लागला..  गावी काय कामधंदा करायचा अशातच एक कल्पना सुचली.. ड्रायव्हिंग येत असल्या मुळे मी एक ३ चाकी टेम्पो खरेदी केला.. आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळ गाडी फायनान्स वर घेतली.. 

आमचे बोलणं रोज व्हायचं.. एकमेकांना चैनच पडत नसे..

खाजगी आयुष्यात मला एक ही मैत्रीण न्हवती..  आणि मी थोडा लाजाळू टाईप होतो.

त्यामुळं कदाचित मी जास्तीत जास्त तिच्यात इंवोल होत होतो.. 

मी गुंतत गेलो अन् तिला प्रपोज करायचं अस मनात पक्क केलं. 

एका रम्य संध्याकाळी आम्ही एकमेकांशी बोलत होतो. बोलता बोलता मी तिला म्हटल एक बोलू का रागावणार नसशील तर?? 

तिने बोलण्यास होकार दर्शविला..

घाबरत घाबरतच मी तिला माझ्या मनात तिच्या बद्दल जे चाललंय ते सांगू लागलो.

ती आज खूप शांतपणे सगळ ऐकून घेत होती.. मी सगळी हिम्मत एकवटून म्हणालो तिला.. सरस्वती तू खूप आवडतेस मला.,$$$

थोडा वेळ स्मशान शांतता पसरली. मग ती बोलू लागली.. सगळी मुलं सारखीच.. तू पण इतरासारखाच निघालास. मला वाटल न्हवत माझ्याबद्दल असा विचार करशील.. मैत्रीचे ४शब्द काय आपण बोललो तू त्याला प्रेमाचं नाव दिलं?  इथून पुढं मला एक ही कॉल करायचा नाहीस ना मेसेज... अन् तिने फोन कट केला..

खर सांगू माझ्या पायाखालची जमीनच सरकली.. मी हे काय केलं? एकच मैत्रीण होती तिला ही माझ्या मस्तीन गमविल! ना ना प्रकारचे विचार मनी येऊ लागले.. 

तिला कॉल करायचे खूप प्रयत्न केले पण शेवटी मोबाईल ऑफ केला तीन.. 

मला काहीच समजेना. मी घरी आलो. जेवलो सुद्धा नाही. सतत तिचाच विचार मनात येत होता.. मग रात्री झोपताना तिला सॉरी चे  मेसेज केले.  तरी रिप्लाय काहीच नाही.. अपराधी पणाची भावना मनी आली..

दुसऱ्या दिवशी पुन्हा मेसेज मधूनच विनंती  केली अस नाही वागणार म्हणून तेव्हा कुठ तीन माफ केलं.. 

पुन्हा एकमेकांशी बोलणं सुरु झालं.. आता मी ठरवलेलं.. तिला दुःख होईल अस नाही वागायचं.. मैत्रीचं जपायची.. 

टेम्पो लां भाडी भेटत न्हवते.. कारण गावी या धंद्यात माझी ओळख कमी होती..   गाडी तालुक्याच्या ठिकाणी न्हेऊन उभी करू लागलो.. हळू हळू धंदा मिळू लागला. फावल्या वेळात आमचं मेसेज च पर्व सुरूच होत...

अशातच कॉल वर बोलता बोलता ती म्हणाली  आपण भेटुयात का एकदा.. मी लगेच होकार दर्शविला.  भेटीची तारिख ठरली..  

मी साताऱ्याहून  कंधी पेढे घेऊन भेटीसाठी निघालो.. कात्रजच्या सर्प उद्यानात अगदी गेटच्या कठड्यावर माझी वाट पाहत बसलेली ती..मी पोहचलो.. नजरेनेच एकमेकांना ओळखलं आम्ही..

पेड्यांचा बॉक्स तिला देऊ केला. तीन ही हसत घेतला. एक पेढा तीन मला भरवला. तिने ही खाल्ला.. एका झाडाखाली निवांत गप्पा मारत आम्ही बसलो.. 

खूप आनंदी होतो दोघेही.. मला तर दिवस संपूच नये अस वाटत होत.. 

तीन घरून डब्बा आणलेला. दोघेही मिळून डब्बा खाऊ लागलो.. इतका आनंद मी केंव्हाच अनुभवलेला न्हवता.. भारावून गेलेलो पुरता...

बोलता बोलता ती बोलून गेली. तू तुझ्या निर्णयांवर ठाम नस्तोस का रे?? मी एका क्षणात रिप्लाय केला.. मी ठाम च असतो पण तुझी मैत्री गमवायची नाही म्हणून त्या दिवशी माघार घेतली.. तसे तीन माझा हात हातात घेतला. अन् म्हणाली आयुष्यभर साथ देशील का रे?  मी हो म्हणालो.. मग काय आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे...

मी साताऱ्याला परतलो.. आता आम्ही एकमेकांत खूप गुंतत गेलो.  

प्रत्येक रविवारी भेटायला मी पुण्यात जात असे.. खूप छान सुरू होत सगळं.. 

विषय लग्नाचा निघाला.. तिला आईवडील न्हवते. शिवाय तिची अन् माझी cast वेगळी होती.. मी तिला माझी खात्री दिली.. केलं तर तुझ्याशीच लग्न करेन मग यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तर मोजेन..

तिच्या ताईशी एकदा तिच्या सांगण्यावरून भेटलो.. तिची मागणी घातली त्यांचेकडे ..

दिवसामागून दिवस उलटत निघालेले.. प्रेमात रुसवे फुगवे कधी कधी भांडणे पण होत असे.  

आमच्या प्रेमाला आता वर्ष उलटू लागली..

तेव्हा आमच्या घरच्यांचा विरोध होता पण माझ्या हट्टापुढे त्यांनी ही होकार दर्शविला होता.. 

पण जस जसे दिवस जाऊ लागले आमच्या दोघात अगदी शुल्लक कारणांमुळं भांडणे होऊ लागली.. म प्रेमाला कोणाची तरी नजर लागलेली.. 

मला सहन न्हवता होत तिचा दुरावा.. कारण आता ती माझ्या श्वासात होती.. रक्त नावाला होत शरीरात. प्रवाह तर तिच्या नावाचा होत होता..

एकदा तर रजनीश नामक युवकाचा मला फोन आला. तो म्हणे सरस्वती माझ्याशी लग्न करणार आहे.. तू तिचा नाद सोड...

मला कळेना काहीच काय करू काय नाही..

तिला फोन केला तर उचलेना.. खूप राग येत होता तिचा.. मग मनात येईल ते बोलायचो मेसेज मधून.. मनाला आवर घालताच येत न्हवता.. माझा स्वभाव चिडचिडा झालेला.

तिने स्वतःचा फोन नंबर बदलला.. 

माझ्याकडे ताईंचा नंबर होता .. मी त्यांना जाब विचारू लागलो.. तुमचं तुम्ही बघा मला मध्ये अनु नका.. 

मी पुरता संपलेलो .. मी ताईंना पण शिव्या घातल्या.. कोणालाच सोडलं नाही इतकंच काय तिच्या राहत्या घरी जाऊन तिला दमदाटी केली... 

सलग तीन वर्षांनंतर तिच्यात असा अचानक झालेला बदल मला सहन झाला नाही.. आत्महत्या सारखे विचार मनात दरवळू लागले.. पण आईवडील अन् परिस्तिथी बाबद मनात विचार यायचे..

मी तिला विसरू शकत नव्हतो.. खूप रडायचो.. तिला मेल करू लागलो.. गयावया करू लागलो. प्रेमाची भिक मागितली पण आता ती ठाम होती हे तीन सांगितलं.. तिचा इंटरेस्ट संपलेला माझ्यातला..

ती खूप कठोर होती अन् मी खूप हळवा..

माझ्या हाती आता काहीच नव्हत. वेळ निघून गेलेली..  

इकडे दैनंदिन आयुष्याचे बारा वाजले होते.. सगळेच माझा तिरस्कार करत होते.. गाडीचे हप्ते थकलेले.. तिच्यावर झालेला खर्च.. कशाचाच ताळमेळ लागेना.. मित्र प्रेमवेडा म्हणून टिंगल करायचे.. हे सगळं असह्य होत.. पण इलाज न्हवता...

मी तिला विसरण शक्य न्हवत.. दिवस उलटत गेले.. मी कामाकडे लक्ष देऊ लागलो.. काम भलं अन् अपून भलं... अस न्हवत की एक ही दिवस तिची आठवण नाही.. पण झुरत झुरत जगत होतो...

अधून मधून मेल करायचो पण रिप्लाय नाहीच आला कधी... 

वर्ष उलटत गेली..   मी देवाला एकच भेट होऊ देत अस मागत असे.. मग कोणत्या ही देवाकडे जाऊ.. तसा देवावरचा विश्वास ही उडालेला.. पण एकदा गणपतीपुळे chya बाप्पाला गेलो होतो.. तेव्हा उंदिर्मामाच्या कानात आमची भेट घडवून दे हे गारान मागितल... 

अन् चमत्कार झाला...

२०१३  पासून अबोला धरलेल्या सरस्वती ने २०१९  ला मला संपर्क केला.. 

तीच बोलली भेटुयात का आपण एकदा..

मी ही हो म्हटल... 

ती पहिल्यांदाच साताऱ्याला आली..  

घाबरत होती खूप.. एका छोट्या बागेत जाऊन आम्ही बसलो... 

ती माझ्या जवळ येऊ लागली.. तिला म्हटल लांबूनच बोल... ढसा ढसा रडू लागली... आम्हाला ही रडू आल्..  ती आज बोलत होती.. प्रत्येक गोष्टीचा आज उलघडा होत होता..  शेवटी मीच तिचा हात हातात घट्ट दाबून का वागलीस अस माझ्याशी विचारलं... मी खूप रडलो... खूप म्हणजे खूप...  तिथून पोलिसांनी आम्हाला हाकलून लावला.. लोक बघत होती आमच्या कडे... 

तिला हॉटेल मध्ये जेऊ घातलं..  

बऱ्याच गोष्टींचा आज उलघडा झालेला.. 

संध्याकाळी तिला बस मध्ये बसवून मी ही गावाकडे रवाना झालो...

पुन्हा काही दिवसांनी तीन  मला ब्लॉक केलं..  तीन लग्न केलेलं.  तिला कधीच त्रास द्यायचा नाही अस मी वचन देऊन ही पुन्हा तिने तिच्या आयुष्यातून मला ब्लॉक केलं..

मी अजून हि अविवाहित आहे.. लग्नाला कोणी मुलगी देत नाही.. अतातर वयाने ३८शी गाठली... 

तिची आठवण येते पण आता काहीच होऊ शकत नाही ...

 

लेखक : प्रमोद चव्हाण

disclaimer :

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.   

 

 

Post a Comment

3 Comments

  1. Nemk Karan Kay hot te jar lihil ast tr ajun intresteing zali Asti story.

    ReplyDelete
    Replies
    1. पुढच्या पार्ट मध्ये नक्कीच लिहीन... धन्यवाद

      Delete
  2. Are tu kiti chan lihitos.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box