"आणि सागर रीताच राहिला"
अशोक गोवंडे
बॅंकाक मधल्या इंद्रा मार्केट या भव्य आणि प्रचंड मोठ्या मॉल मधे मी उगीचच इकडून तिकडे चकरा मारत फिरत होतो. खरंतर मला तसं खास काहीच घ्यायचं नव्हतं पण पुढच्या महीन्यात कोकणात गावी जायचं आहे तर आई आणि दादासाठी काहीतरी बघावं म्हणून मी सगळी शॉप्स पालथी घालत होतो. पण कोकणात राहणार्या माझ्या आईला आणि मोठ्या भावाला त्या झगमगीत शॉप्स मधे विकायला असलेलं कांहीच चालणार नव्हतं . शेवटी माझ्या मोठ्या भावासाठी एक छानसा सेलफोन आणि आईसाठी, तिचे सांधे दुखत असतात म्हणून मसाजर घेतला. माझ्या बरोबर बरोबर आलेले माझे सहकारी कुठे तरी गुप्त झाले होते कारण त्यांना बरच काही घ्यायचं असल्याने ते विखुरलेलं होते आणि त्यांना त्या टोलेजंग मॉल मधे हुडकणं अशक्य असल्याने आम्ही सगळ्यांनी एका ठरविलेल्या पॉईंट जवळ भेटायचं असं ठरलं होतं. माझी खरेदी आटोपली होती व आता मी त्या ठरलेल्या पॉईंट जवळ हातातल्या पिशव्या घेउन उभा होतो, इतक्यात 'वुईल यु प्लीज होल्ड ऑन धीस फॉर अ मुमेंट'? असं म्हणत एक मुलगी मला जवळपास येवुन थडकलीच. दोन्ही हातात शॉपिंग बॅग्ज , एका खांद्याला अडकवलेली आणखीन एक बॅग आणि दुसर्या खांद्या खाली काखेमधे कसाबसा धरुन ठेवलेला एक बॉक्स जो खाली पडायच्या बेतात होता, अशा अवस्थेत ती कशीबशी उभी होती.
'ओ शुअर' असं म्हणत मी तो पडणारा बॉक्स हातात घेतला. 'थॅंक्स' असं म्हणत तिनं दोन्ही हातातल्या पिशव्या खाली ठेवल्या. ति खुप दमलेली दिसत होती. अगदी त्या एअर कंडीशन्ड मॉल मधे सुद्धा ती घामाने थपथपलेली होती. शेवाळी हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यांवर गर्द पिवळ्या रंगाचा टॉप आणि ओढणी , गोल चेहरा, बॉब केलेले केस, डोळ्यावर चेहऱ्याला शोभेल असा गॉगल. त्याही अवस्थेत खुप छान दिसत होती ती. मला क्षणभर पुढं काय बोलावं, काय करावं तेच कळेना. 'रिलॅक्स' किती दमल्या आहात तुम्ही? काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो. "हो नं, किती आणि काय काय घ्यावं असं झालंय मला. " हं त्यात वेगळं ते काय? अहो तुमच्या सारख्यांमुळच तर जगभर चाललेत असले मॉल" मी असं बोललो खरं पण नंतर मला वाटलं कांही ओळख पाळख नसताना मी उगाचच हे बोललो. त्यावर डोळे मोठ्ठे करुन ती नुसतीच हसली. "बाय द वे आय ॲम सागर, सागर पोंक्षे, असं म्हणत मी हात पुढं केला. "मी सरीता, सरीता जोशी, माझा पुढं केलेला हात हातात ती म्हणाली. "शुड वुई हॅव कॉफी?" बोलणं वाढवण्याच्या उद्देशाने मी विचारलं . "ओह सर्टनली, तिलाही बहुतेक त्याची गरज असावी. आम्ही दोघं मग समोरच असलेल्या स्टारबक्स मधे शिरलो. "यु आर फ्रॉम पुणे? राईट?" मी सहज खडा टाकला.
"येस, पण तुम्ही कस ओळखलत?" तिनं आश्चर्यानं विचारलं
"जस्ट अ गेसवर्क, पुण्याच्या मुली नं कुठही ओळखता येतात, त्यांची अशी एक स्वतंत्र आयडेंटीटी असते. ए टिपिकल पर्सनॅलीटी यु नो? ॲंड यु आर वन ऑफ देम."मी मिश्कीलपणे उत्तर दिलं.
"वा! खुप रीसर्च केलेला दिसतोय हो तुम्ही पुण्याच्या मुलींवर? तुम्हीही पुण्याचेच वाटतं?" तिनं खोचून विचारलं. "तसा मी कोकणातला पण सध्या वास्तव्य पुणे." पण तुम्ही इकडं कसे काय? फीरायला? मी विचारलं.
"येस, जस्ट फॉर ए चेंज ॲंड ऑफकोर्स, शॉपिंग. टुडे इज द लास्ट डे ऑफ अवर आयटीनरी इन थायलंड, रादर लास्ट फ्यु अवर्स इन बॅंकॉक , माझी फ्लाईट आहे रात्री ९ ची, बॅक टु पुणे व्हाया मुंबई ॲंड आय नीड टु रिपोर्ट टु एअरपोर्ट बाय ६.३० पीएम." ती भराभरा बोलतच होती.
"डोन्ट वरी आय वुईल बी इन द सेम फ्लाईट."मी उत्तर दिलं .
"ओह दॅट्स नाईस."
दोघांनी कॉफी संपवली , बिल देण्यासाठी मी वॅालेट काढु लागलो. "नो ,नो इट ईज माय प्लेझर, पुण्याची असले तरी बिल देउ शकते मी , डोळे मिचकावत ती म्हणाली.
"व्हॉट नेक्स्ट?" माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ती म्हणाली, "आय नीड टु लोकेट माय रुम मेट्स व्हु शुल्ड बी रोमिंग हीअर अॅंन्ड देअर, सी यु ॲट दी एयरपोर्ट, थॅंक्स वन्स अगेन,"असं म्हणत हातातल्या पिशव्या सांभाळत ती कुठतरी गुप्त झाली. साडेचार वाजले होते. मलाही माझ्या सहकार्यानां हुडकायचं होतं. सुदैवाने ते सापडायला मला फार वेळ लागला नाही.पाच वाजता आम्हाला एयरपोर्टला ड्रॉप करणारी बस यायची होती. मी आणि माझे सहकारी कसेबसे पिकअप पॉईंट जवळ येऊन थडकलो. बस तयारच होती. मला वाटलं ती बहुतेक याच बसमधून एयरपोर्टला येणार असेल म्हणून मी उगाचच बसच्या खिडकीतून बाहेर डोकावून बघत होतो. माझ्या सहकाऱ्यांना मी कुणाची वाट बघतोय याचच कोडं पडलं होतं.
अर्ध्यातासाच्या एका लांबलचक फ्लायओव्हरवरुन केलेल्या प्रवासानंतर आमची बस बॅंकाकच्या स्वर्णभुमि एअरपोर्टवर पोहोचली. बॅगेज चेकींग इन,इमिग्रेशन, सिक्युरीटी चेक वगैरे सोपस्कार आटोपून मी आणि माझे सहकारी ड्युटी फ्री मधे टाईमपास करत फिरत होतो . इतक्यात मला 'हाय' अशी हाक ऐकु आली. मी ओळखलं , सरिताच होती ती, आपल्या बरोबर आलेल्या तिच्या सहकाऱ्यांच्या बरोबर ती पण ड्युटीफ्री मधे फिरत होती. तिनं बहुतेक चेंज केलं असावं. जीनची काळी पॅंट आणि वर चेरी रेड कलरचा टी शर्ट, खुप छान आणि वेगळीच दीसत होती ती. 'हाय' मी ही तिला "हाय" केले . "काय लिकर घेताय वाटतं ? तिनं मिश्कीलपणे विचारलं . नो नो , मी कांहीच घेत नाहीय, माय फ्रेंड्स , मी आपल्या मित्रांच्याकडे बोट दाखवत म्हणालो .
ड्युटीफ्री मधे टाईमपास करून झाल्यावर मी आणि माझे सहकारी वेटिंग लाउंज मधे येऊन बसलो . इतक्यात त्यांचा घोळकाही तिथे आला. ती माझ्या जवळच्याच चेअरवर बसली. तिच्या बरोबरच्या दोघीनी दुसरी रो पकडली. माझ्या प्रश्नार्थक चेहरयावरुन मला त्याचं आश्चर्य वाटल्याचं तिनं ओळखलं. 'दे आर जस्ट माय रुम मेट्स ओन्ली, दॅट्स ऑल"
"तुमचा रो आणि सीट नंबर काय आहे? मी संभाषण वाढवण्याच्या उद्देशानं उगाचच विचारलं. "माझ्याजवळ बसायचं आहे का? तिनं मिश्किलपणे विचारलं आणि लगेच 'आय डोन्ट माईंड' असं सांगूनही टाकलं. बोर्डींग गेट्स ओपन झाली आणि सगळ्यांची गडबड सुरु झाली. आम्ही आमच्या सीट पर्यंत पोहोचलो. माझी सीट तिच्याच रो मधे पण मिडलला होती. तिच्या बरोबर आलेल्या तिच्या मैत्रिणींच्या सीट्स, फॉर्च्युनेटली फॉर मी, आमच्या मागच्या रो मधे होत्या.पण तिच्या शेजारी कुणी दुसरीच व्यक्ती असणार होती. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्या कडं बघत म्हणालो.
वुई नीड टु रीक्वेस्ट धिस जंटलमन ॲार अ लेडी टु ऑक्युपाय युवर सीट. तिनं त्या सीट जवळ येणार्या व्यक्तीकडं बघत म्हंटलं.
'नो प्रॉब्लेम' 'त्या व्यक्तीनं गालातल्या गालात हसत आमची रीक्वेस्ट मान्य करत मला विचारलं 'विच इज युवर सीट? मी अंगुली निर्देश करताच तो माझ्या सीटवर स्थानापन्न झाला. ती लगेचच म्हणाली 'नाउ कम ऑन, लेट अस एन्जॉय अवर फ्लाइट'.
थोड्याच वेळात विमानाने टेक ऑफ केलं. सरिता खिडकीतुन बँकॉकची स्कायलाइन बघत होती. थोड्याच वेळात स्कायलाइन दिसेनाशी झाली. "तुमचं नाव सरिता न? तिचं लक्ष माझ्या कडे वेधण्या साठी मी विचारलं.
"येस, बट यु कॅन कॉल मी जस्ट रिता", आपले डोळ्यावर येणारे केस बाजूला करत ती म्हणाली. मला तिची ती लकब खूप आवडली.
"का? सरिता नाव खुप छान आहे की आणि तुमच्या स्वभावाला साजेसही, मी मिश्किल पणे हसत म्हणालो.
ओ रीअली? तिनं लाडीकपणे डोळे मोठ्ठे करत विचारलं. येस आय मीन इट, मी म्हणालो, मी आपली भेट झाल्यापासून बघतोय यु आर जस्ट फ्लोइंग लाइक अ रीव्हर."
आय थिंक आय हॅव बोअर्ड यु इनफ, ती लाडाने म्हणाली .तेवढ्यात एअरहोस्टेस ड्रींक्सची ट्रॉली घेउन येत असल्याचं बघत ती म्हणाली ' ए आपण काहीतरी ड्रींक घेउया का?
"ए सॉफ्ट ड्रींक? ऑर ए वाईन?" मी विचारल. "व्हॉट अबाउट यु?" तिचा प्रश्न. "आय वुड प्रिफर व्हाईट वाईन" मी क्षणार्धात उत्तर दिलं. "ओके,देन आय वुड आलसो टेक व्हाईट वाईन. "तुम्ही वाईन घेता?" मला आश्चर्य वाटल्या सारखं दाखवत मी विचारल. "येस सम टाईम' नॉर्मली डुरींग फ्लाईट्स. मी खुप ट्रॅव्हल करते नं. जेट लॅग चा त्रास जाणवत नाही त्यामुळे, चिअर्स, एअरहोस्टेस कडुन वाईनचा ग्लास हातात घेत ती म्हणाली".
आम्ही दोघानी आपापले ग्लास संपवले. "वुड यु लाइक टु रीपिट? मला हवी होती,मी विचारलं. "नो थॅंक्स, पण तु घे ना. वाईन इज फाइन विथ वन ग्लास फॉर मी." तिच्या नकळत ती एकेरीवर आली.
मी ग्लास रीपिट केला. हळुच तिच्या कडं बघत सिप घेतला. वाइनचा ग्लास संपवून ती मागं रेलुन बसली होती. डोळ्यावर नकळत वाइनचा अम्मल दीसतं होता. डोळ्यावर आलेले केस मागे घ्यायचं भान ही नव्हतं तिला. खुप छान दीसत होती ती त्या अवस्थेत. 'रिता, यु आर लुकींग गॉर्जस", आता माझ्यावरही वाइनचा अम्मल झाला असावा.
तिनं हळुच डोळे उघडले, थॅंक्स, पिपल नॉर्मली टेल द ट्रुथ ओन्ली आफ्टर ड्रिंक्स," माझ्याकडे एक कटाक्ष टाकत ती म्हणाली. तेवढ्यात डिनर सर्व्ह होउ लागलं होतं. नाऊ वुई मस्ट ईट. पोटात गेलेल्या वाइननं तिला भूक लागली असावी. आम्ही डिनर संपवलं. डोळ्यावर झापडं आली होती. मुंबईला पोहोचायला अजुन दिड तास तरी बाकी होता. छान थंडी वाजु लागली होती.तिला पटकन डोळा लागला. अंगावर शाल लपेटुन ती झोपली होती. मानेखाली घेतलेली उशी बाजूला पडल्यामुळं तिचं डोकं नकळत माझ्या खांद्यावर झुकलं होतं. मलाही त्याच अवस्थेत डोळा लागला. मुंबई लॅंडींगच्या अनाउंसमेंटनं आम्ही जागे झालो. आम्ही दोघंही फ्रेश होऊन परत सीटवर आलो. तुम्ही पुण्याला कशा जाणार आहात? मी विचारलं. "वुइ हॅव बुक्ड ए कॅब, हाउ अबाउट यु" तिनं प्रतिप्रश्न केला. "डोन्ट वरी, आय थिंक आय विल बी फॉलोईंग यु राइट अप टु युवर रेसिड्न्स, माझा ड्रायव्हर आला असेल मला पिक करायला माझी गाडी घेऊन".
"ओह!म्हणजे आमचा पिछ्छा अजुन सोडणार नाही तर? तिनं लाडीकपणे विचारलं. नो, नो चान्स, काय करु नाइलाज आहे. मी ही तिथच राहतो ना? असं म्हणत मी माझी आवराआवर करु लागलो. प्लेन लॅंड झालं. इमिग्रेशनचे सोपस्कार आटपून, लगेज कलेक्ट करुन आम्ही बाहेर आलो. माझा ड्रायव्हर मला शोधतच होता. आता निरोप घ्यायची वेळ जवळ आली होती.
इतक्यात त्यांची कॅबही आली. "ओके, गुडबाय, परत कधी भेट? सरितानं कॅबचा दरवाजा उघडत मला विचारलं . "एनी टाईम इफ यु सो विश, तुझा नंबर देना, मी म्हणालो. नो, यु गिव्ह मी युवर नंबर. आय विल कॉंटॅक्ट यु, तिनं का कुणास ठाउक मला नंबर द्यायचं अव्हॉइड केलं. कदाचित फ़्लाइट मधली ओळख तिला वाढवायची नसावी. ओके देन,सी यु म्हणत मी निघालो.
पुण्यात परतल्यावर माझं नेहमीचं रूटीन सुरु झालं. मिटींग्ज, रीपोर्टींग वगैरे. बॅंकॉकहुन परत येउन आठवडा झाला होता. कामाच्या रगाड्यात मी सरिताला जवळपास विसरुनच गेलो होतों. एक दोनदा आठवण झाली होती पण काय उपयोग? माझ्याकडे नंबर कुठं होता तिचा? आणि अचानक एक दिवस, मी ऑफीसचं काम आटपुन संध्याकाळी रुमवर परतायची तयारी करत असताना माझ्या सेलफ़ोनचा रिंगटोन वाजला. मी बघितल, अननोन नंबर होता. हॅलो कोण बोलतोय? मी विचारलं. “हाय सागर हाउ आर यु? मी रिता,”पलीकडुन आवाज आला. ओह! या! हाउ आर यु? आश्चर्य दाखवत मी विचारलं. आय अॅम फाइन. माझा फोन एक्सपेक्ट करत नव्हतास न? पण काय करणार आज खुप बोअर झाले होते एवढ्यात तुझी आठवण आली, मला नं वीकएन्डला खुप बोअर होतं. ए आपण भेटायचं का? आणि मला कॉन्टॅक्ट का केलं नाहीस? ती कंटीन्युअस बोलतच होती. मी थोड बोलु का? मी विचारलं. ओह आय अॅम सॉरी, बोल नं. कसा करणार होतो कॉन्टॅक्ट तुला मी? तु तुझा नंबर ही दिला नाहीस मी वैतागुन म्हणालो. येस,आय नो ,आय अॅम सॉरी पण आता नुसताच मला शिव्या घालणार आहेस की कुठ भेटायचं ते ठरवणार आहेस? ओके, नाउ आय हॅव सेव्ह्ड युवर नंबर, आय विल कॉल यु बॅक, मी ज़रा रागावुनच बोललो. ओके आय विल वेट फ़ॉर युवर कॉल, ती हसत म्हणाली व तिने फोन कट केला. मला वाटलं मी उगाचच रूड बोललो. रुमवर पोहोचल्यावर मी फ्रेश झालो आणि तिला फोन केला.
आय वॉज एक्स्पेक्टींग युवर फोन, असं म्हणत तिनं हसून स्वागत केलं. आय अॅम सॉरी आय वॉज बिट रूड टु यु. छोड रे, चलता है. कुठं भेटायचं ते सांग. 'मासेमारी'?डिनर? मी विचारलं. नो प्रॉब्लेम, अरे मी अजुन ऑफिस मधेच आहे, आय विल जॉइन यु देअर अॅट ८ शार्प असं म्हणत तिने फोन बंद केला.
मासेमारी जवळ मी पोहोचलो तेंव्हा ती तिची स्कुटर पार्क करत होती. हाय, व्हेरी पंक्च्युअल,मला वाटतं होतं मला लॉंग वेट करायची शिक्षा देतोयस की काय, रागावलायस ना तू? एनी वे, 'चल' माझ्याकडे बघत ती म्हणाली. आधीच रीझर्व केलेल्या टेबलवर आम्ही स्थानापन्न झालों. बोल, कशी आहेस ? बॅंकॉक फीवर गेला की नाही अजुन ?
कसला आलाय बॅंकॉक फीवर? खरतर बायकानी एकटं थायलंडला जाउच नये. धिस कंट्री इज मेंट फ़ॉर मेन्स एनजॉयमेंट ओन्ली. बायका जातात नि शॉपिंगवर ढीगभर पैसे उडवुन येतात. मी फक्त माझ्या रूममेट्स साठी गेले होते.ती तावातावाने म्हणाली. म्हणजे? मी विचारलं. वो एक लंबी कहानी आहे, सांगते पण आधी जेवणाची ऑर्डर तरी दे. मी जेवणाची ऑर्डर दीली. एक कारवारी चिली प्रॉन्स, एक मंगलोरी फीश करी अॅंड राइस. बरं सांग तुझी कहानी. अरे आम्ही चौघी एक टु बीएचके शेयर करतों. त्यातल्या तिघी इन्क्लुडींग मी अनमॅरीड आहोत. एक बिचारी मॅरीड आहे. तिचा नवरा कुठतरी सातारा जिल्ह्यात सर्व्हीसला आहे. ही बिचारी पुण्यात जॉब करते. त्यांचं स्वत़ःच घर नाही. तो बिचारा दर शनिवारी दुपारी आमच्या फ्लॅटवर येतो तिला भेटायला आणि त्याना प्रायव्हसी मिळावी म्हणुन आम्ही तिघी शनिवारी दुपारपासून बाहेर जातो. आणि परवाच्या दिवाळीला तर तो चक्क तीन दिवस आमच्या फ्लॅटवरच राहणार होता. तेंव्हा आम्हा तिघीना चक्क तीन चार दिवस बाहेर घालवणं भाग होतं. म्हणुन थायलंड टूरची टूम निघाली. ओह!असं आहे तर' असं म्हणत "लेट अस एनजॉय अवर फ़ुड. एवढ्यात जेवण आलेल बघुन मी म्हणालो.
पण काय रे? व्हाय वेअर यु देअर इन बॅंकॉक? तिनं प्रश्न केला.
अगं आमच्या सेल्सटीमची कॉन्फरंन्स होती पटायाला. "ओह! पटायाला? तुम्हा पुरुषाना दुसरं ठिकाण मिळत नाही का रे कॉन्फरंन्स साठी? उठसूट पटायालाच पळता ते?" डोळे मिचकावत ती म्हणाली.
"रिता, पण तू कोल्हापुरला जाउ शकली असतीस कि दिवाळीला?" मी सहज विचारलं. "कोण आहे माझं तिथं आता? आई दोन वर्षापुर्वी गेली. भाऊ आणि वैनी असतात तिथे. त्याना मी नकोच असते आणि आईच्या माघारी मलाही तिथं जावसं वाटतं नाही. माझी छान नोकरी आहे, भरपूर पगार आहे, आय अॅम एनजॉयिंग माय लाईफ़ हीअर". "बट हाउ कॅन यु स्टे लाइक धिस? यु नीड टु फाइंड ए सुटेबल लाइफ़ पार्टनर अॅंड सेटल सम डे." मी बोलणं वाढवायच्या उद्देशानं विचारलं.
"का रे? मी एकटी सुखात राहतें आहे हे बघवत नाही का तुला? पण आय डीड फाइंड ए पार्टनर सम टाइम बँक , बट लेटर ऑन आय रिअलाइज्ड दॅट ही इज नॉट सुटेबल फ़ॉर मी अॅंड ही कुड नॉट बिकम माय लाईफ़ पार्टनर. ईंट वॉज ओन्ली लिव्हींग रीलेशनशीप फ़ॉर ए शॉर्ट टाइम दॅट्स ऑल"
आमचं जेवण संपलं होतं. मला आणखीही बरच कांही बोलायचं होतं. तिच्याशी बोलणं संपुच नये अस वाटतं होतं. "एनी डेझर्ट?" मी विचारलं. "ओह येस, पण काय रे? तु तुझ्याबद्दल कांहीच सांगितलं नाहीस?" "माझ्याबद्दल काय सांगू? आय अॅम अलोन हीअर. कोकणात आमचं घर आहे देवरुख जवळ. थोड़ी शेती आहे, दोन चार आंब्याची कलमं आहेत. मोठ्ठा भाऊ बघतो ती. त्याचं अजुन लग्न व्हायचय. पण कोकणात कुणी मुली यायला तयार नाहीत. घरी म्हातारी आई आहे. आता तर मोठ्ठा भाऊ लग्नच करायचं नाही म्हणतोय.
हाऊ सॅड नं ? ती काहीतरी बोलायचं म्हणुन बोलली.
ए पण आमची कोकणातली वाडी किती छान आहे म्हणून सांगू! आमच्या घराच्या मागून नदी वाहते. पावसाळ्या तर दुथडी भरून वाहात असते अगदी तुझ्यासारखी मुक्त, खळाळून वाहणारी. म्हणुन तर तुझ नांव आवडलं मला, 'सरिता' कीती छान नांव तुझं ! मी बोलता असताना सरिता माझ्याकडे टक लावून ऐकत होती. एंव्हाना आमचं डेझर्टही खाउन संपलं होतं. "नाऊ वुई मस्ट लीव्ह, इट इज इलेव्हन". तिनं घड्याळात बघुन म्हंटलं.
"परत कधी? माझा प्रश्न. “काय? डीनर की आपली भेंट?
दोन्ही, पण नेक्स्ट टाईम इट विल बी माय टर्न टु सेटल दी बिल असं म्हणत मी गाडी स्टार्ट केली. बघु, असं म्हणत तिनही आपली स्कुटर स्टार्ट केली.
त्यानंतर आमच्या दर आठवड्याला भेटी गाठी होउ लागल्या. फोन वरुन बोलणं तर रोजच चालु होतं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की आमच्या गाठी भेटी एका मर्यादे पलीकडे जात नव्हत्या. का कुणास ठाउक पण मला वाटतं होतं की रीता क़ायम थोड अंतर ठेवुनच वागत होती. इकडे माझ्या मोठ्ठ्या भावाने त्याच्या लग्नाचा विचार कायमचा सोडुन दिला होता आणि आता तो व आई माझ्या मागं लग्न कर म्हणुन लागले होते. पण मला तिला विचारायचं धाडस होत नव्हते कारण तिचा लग्न या संस्थेवर विश्वासच नव्हता. आयुष्य मस्त एन्जॉय करायचं, लग्न म्हणजे एन्जॉयमेंट मधलं हर्डल आहे असच तिला वाटायचं. हे लोक लग्न कशासाठी करतात रे? एन्जॉयमेंटसाठीच नं ? मग त्यासाठी लग्नच कशाला करायला हवं? अँड बिलीव्ह मी, आफ्टर मॅरेज दे डु एव्हरीथिंग एक्सेप्ट एन्जॉयमेंट." इतकी रोखठोक मतं होती तिची लग्न या विषयाबद्दल. पण का कुणास ठाउक माझ्या मनात मात्र फक्त तिचाच विचार यायचा. तो काढुन टाकावा असं सारख वाटायचं पण ते घडत मात्र नव्हतं. पण मी तिला आवडायचो हे खुपवेळा तिनं मला ऐकवलं होतं.
एकदा तर 'जॉबच्या निमित्तानं मी खुप तरुण बघितलेत रे पण खरं सांगू यु इंप्रेस्ड मी द मोस्ट. ' असं ही तिनं मला सांगितलं होतं. एकदा मी तिला गमतीनं विचारलं होतं 'रिता, ही नदी शेवटी कुठल्या सागराला जाउन मिळणार आहे गं ? डोळे मोठ्ठे करुन माझ्या कडं बघत ती म्हणाली होती "बघु , पण प्रत्येक नदीनं सागराला मिळायलाच हवं का ? नॉट नेसेसरी, कुणी सांगावं धिस रीव्हर मे ड्राय आउट इव्हन बिफोर मीटिंग दॅट ओशन.
एकदा अचानक ती मला म्हणाली 'ए तु मला एकदा तुझ्या कोकणातल्या गावी घेउन जाशील का रे?
"हो कधीही, मी पण खुप दिवस झाले गेलो नाहीय. मलाही जायचच आहे. जाऊया या वीकएन्डला?"मी विचारलं. "येस , डन, वुई आर गोइंग टु कोंकण धिस वीकएन्ड. ति खुप एक्साइट झाली होती.
ठरल्याप्रमाणे पुढच्याच शनिवारी आम्ही निघालो. "ए कीती वेळ लागेल रे?" तिनं विचारलं. लागतील सात आठ तास, वुई नीड टु स्टॉप फ़ॉर लंच अॅट चिपळुण मी म्हणालो. आम्ही कात्रज घाट पार केला. तु कीती सफाइदार गाड़ी चालवतोस रे. आय लाइक लॉंग ड्राइविंग. ती ख़ुश दिसत होती. मलाही खुप बरं वाटतं होतं. पण आईला आणि दादाला हीच्याबद्दल काय सांगायचं हा प्रश्नच पडला होता. त्याना ही आवडेल का? हा प्रश्न सारखा सतावत होता. मी फक्त आज येतोय एवढच सांगितलं होतं. बाकी कशाचीच कल्पना दिली नव्हती. मला तरी कुठं माहीत होतं ति कशाला येतीय माझ्या बरोबर. काय मनात आहे तिच्या.
सात आठ तासांचा प्रवास केल्यावर आम्ही फायनली घरी पोहोचलो. आम्हा दोघाना बघुन दादानं प्रश्नार्थक मुद्रेनच आमचं स्वागत केलं. आईला थोडं कमी दिसत होतं म्हणुन बरं. या बसा, कधी निघाला होतात रे? दादानं विचारलं. हातपाय धुउन आम्ही सोप्यातल्या झोपाळ्यावर बसलो. सरिता ख़ुश दिसत होती. तेवढ्यात आई चहा घेउन आली. नेहमी प्रमाणे कोकणातल्या परंपरे प्रमाणे चहा खुपच गोड़ होता.
"ए, इतका गोड़ चहा पिउनच तु इतका स्वीट झाला आहेस का रे? सरितानं गमतीनं विचारलं. चहानंतर खास कोकणी पद्धतिच आईच्या हातचं जेवण झालं. खास वालाची उसळ ,कोवळ्या फणसाची भाजी आणि तांदळाची गरमागरम भाकरी. व्हाव! माय डिअर ओशन,धिस इज अ रीअल ट्रीट, आय नेव्हर हॅड सच अ वंडरफूल फूड इन माय लाईफ." सरिता ख़ुश होउन म्हणाली. जेवण करुन सरिता छान झोपली होती. मला मात्र झोप लागलीच नाही. आई आणि दादा दोघही मला कांहीतरी विचारायला उत्सुक होते. मी त्यांच्याजवळ गेलो. कोण आहे रे ती? आईनं विचारलं. आई माझी मैत्रीण आहे ती. लग्न करणार आहेस का तिच्याशी? दादानं विचारलं. "माहीत नाही". माझ्या उत्तरानं दोघेही खुप गोंधळलेले दिसले. "बघु, सांगीन लवकरच."असं सांगुन मी तात्पुरती सुटका करुन घेतली. संध्याकाळी चहा घेउन आम्ही घराच्या मागून वाहणारी नदी बघायला निघालो. नदीकडे जाताना आमची सगळी वाडी ओलांडून जावं लागतं. काट्याकुट्यातुन, वेलीतुन पायवाटेवरुन जाताना तिला खुप गंम्मत वाटत होती. शेवटी एकदा नदीचं पात्र दिसु लागलं तेंव्हा तर ती आनंदानं नाचु लागली. व्हाव! हाउ ब्युटीफुल इट इज! सिंपली वंडरफूल! हे सर्व सोडुन कशाला तु पुण्यात त्या कॉंक्रीट जंगलात राहीलायस? माझ्या नशिबात हे सगळं असतं ना तर मी हा स्वर्ग सोडुन कधीच दुसरीकडे कुठे गेले नसते. "आणि समज, इथुन पुढे खरच तुला हे सगळं मिळाल तर राहशील इथ कायमची?" मी सहज खड़ा टाकला. तीनं मागे वळुन डोळे मोठ्ठे करुन माझ्या कडे पाहीलं आणि नुसतीच मिश्कीलपणे हसली.
दुसरे दिवशी सकाळी आईनं तांदळाची घावने आणि छान खोबऱ्याची चटणी असा नाष्ट्याला बेत केला होता. "वॉव! पॅनकेक?" गरमागरम घावने आईनं रिटाच्या ताटात वाढल्यावर त्याकडे बघत ती म्हणाली. "अगं याला घावने म्हणतात , खास कोकणचा पदार्थ आहे हा. तुझ्या पुण्यात कॅफेत मिळणाऱ्या पॅनकेकला याची सर नाही, बघ, यु विल लाईक इट.
दोन दिवसाच्या कोंकण भेटीचा क्लायमॅक्स जवळ आला. आमचं पॅकींग झालं होतं. आई डोळ्यात पाणी आणुन म्हणाली 'बंड्या आता तूच मनावर घेरे बाबा. अनंताचं काय लग्न होइल असं वाटत नाही, निदान तू तरी या म्हातारीचे डोळे मिटायच्या आधी तिला सूनमुख दाखव. ही पोरगी चांगली आहे बर कां. आता उगाच लांबवु नका. मी रिताच्या चेहर्यावरचे भाव टीपत होतो. ती एकदम गंभीर झाली. लेट अस मुव्ह असं म्हणत बाहेर आली आणि कार मधे बसली. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. बराच वेळ ती कांही बोलतच नव्हती. पण तिच्या स्वभावाशी ते सुसंगत नव्हतं. थोड्याच वेळात एकदम कांहीतरी आठवल्या सारखं म्हणाली ' ए तुझं घर किती छान आहे रे! आणि तुझी आई पण किती प्रेमळ! "हो ना, पण तिला बिचारीला सूनमुख बघायचय लवकरात लवकर, कुठुन आणुन देउ? “का? मिळेल की, का नाही मिळणार?” कांही तरी बोलायचं म्हणुन ती बोलली. तु होशील तिची सून? तुला ते घर खुप आवडलय न? मी सरळ विचारलंच. "सागर, यु नो माय थिंकिंग. तुला खरं सांगु? मला कुठल्या पाशा मधे अडकायचं नाही आहे रे. माझ्या या लाईफ़ मधे इमोशन्स, अॅटॅचमेन्ट्स, रिस्पॉन्सिबिलिटीज या शब्दाना मुळीच जागा नाहीय.हे सगळं खुप त्रासदायक असतं सागर , मग हे माहीत असुनही त्या नात्याना का जवळ करायच? सागर, तुझी आई, तुझा भाऊ आणि तु सुद्धा खुप चांगले आहात, पण नको, मला त्या मोहात नको पाडुस. तिच्या उत्तरावर मी कांहीच बोलु शकलो नाही. त्यानंतर जणू संवादच थांबला. तिला तिच्या कॉलनीच्या गेटपाशी ड्रॉप करण्यासाठी मी गाडी थांबवली.
तिचा निरोप घेताना मी काहीतरी बोलेन असं तिला वाटलं. क्षणभर ती गेटवरच रेंगाळली पण मी कांही न बोलताच गाडी स्टार्ट केली व रुमवर परत आलो.
दुसरे दिवशी ऑफिसला निघायची मी तयारी करत होतो. तेवढ्यात माझ्या सेलफोनची रींग वाजली. रिताचाच फोन होता. इच्छा नव्हती तरी फोन घेतला. "रागावलायस?" पलीकडून आवाज आला. "नाही, नो, नॉट अॅट ऑल , व्हाय शुड आय? मी विचारलं. "खोटं कशाला बोलतोयस? मला माहीत आहे तु रागावलायस माझ्यावर, अॅंन्ड इट इज क्वाईट ऑब्व्हियस आल्सो." यावर मी काहीच बोललो नाही. "ऑफिसला चाललायस? आज रजा टाक नं, मी पण जाणार नाही आहे आज, आय अॅम नॉट वेल." मग मी काय करु रजा टाकुन? तुझं डोकं दाबून देउ का?” मी वैतागून विचारलं. ' हो’ आय डोन्ट माईंड , येतोस माझ्या रुमवर?" ती खळाळुन हसत म्हणाली
"का कुणी नाही आहे का तुझ्या रुमवर?" मी विचारल.
"नो नो कुणीच नाही रुममधे, सगळ्या माझ्या रुममेट्स त्यांच्या त्यांच्या त्यांच्या जॉबवर गेल्यात अॅन्ड दे विल बी बॅक ओन्ली आफ्टर सिक्स. सो आय विल बी अॅबसोल्युटली अलोन फॉर ऍटलीस्ट अबाऊट ६ टु ७ अवर्स, अॅन्ड यु कॅन जस्ट थिंक ऑफ हाउ यु कॅन युटीलाइझ धिस पीरियड, जोक अपार्ट, पण तू खरच ये, मला बरं वाटेल आणि मला खुप बोलायचंही आहे तुझ्याशी, मी वाट बघतेय, असं म्हणून तिनं फोन बंद केला.
मी माझ्या सेक्रटरी ला फोन करुन मी आज ऑफिसला येत नसल्याचं कळवलं नि तडक तिच्या रुमवर पोहोचलो.
मी बेल वाजवताच तिनं पटकन दार उघडलं. तिला खरच बरं नसावं, ति गाउन मधेच होती. आय वॉज एक्स्पेक्टींग यु, ती मला आत घेत म्हणाली. तुला खरच बरं वाटत नाहीय असं दिसतय, तिला न्याहाळत मी म्हणालो. हो रे, काल रात्रभर झोप नाही आणि डोकही खूप दुखतय बघ अॅन्ड इट वुड हॅव् बीन वर्स्ट इफ यु वुड नॉट हॅव कम. ओह, आय अॅम सॉरी , आय थिंक, काल जे कांही झालं त्यामुळं तु डिस्टर्ब्ड झाली आहेस, खरं न? मी उगाचच तुला नको असलेला विषय काढला, आय अॅम रिअली सॉरी, मी म्हणालो. "नो नो सागर, तसं कांही नाहीय , माझे हात हातात घेत ति म्हणाली. बसं इथ, तिनं मला सोफ्यावर बसवलं. आय वॉन्ट टु टेल यु समथिंग.
"सागर, मला माहीत आहे मी तुला आवडते, अॅन्ड बिलीव्ह मी, मलाही तु खूप आवडतोस, आणि तुझं घर आणि तुझ्या घरातील माणसंही मला खूप आवडली. पण सागर , आय डोन्ट डिझर्व ऑल धिस. तुला आयटी च्या फील्ड मधे काय काय चालतं ते माहीत असेलच. आम्ही तिथं काम करणारे बहुतेक सगळे फ्रीबर्ड असतो. बक्कळ पगार मिळतो आम्हाला त्यामुळं ना कुणाची फिकीर ना कुणाची बंधनं. खूप स्वैर वागत असतो आम्ही. चांगलं काय वाईट काय हे कांही कळतच नाही आम्हाला. लाईफ म्हणजे एन्जॉयमेंट, आणि फक्त एन्जॉयमेंट, सर्व भल्याबुर्या मार्गाने मिळवलेली. आम्हाला वेळेचं बंधन नसतं. रात्री अपरात्री कधीही यावं. विचारणारं कुणीच नसतं. सागर, यु नो? वंन्स आय वॉज रेप्ड बाय माय ओन कलिग्ज. अॅंन्ड देन आय गॉट युज्ड टु इट. सागर, तुला माझं नांव आणि माझा वाहत्या नदी सारखा स्वभाव आवडतो न? पण सागर, मी माझ्या आयुष्यात खुपच वाहवले आहे रे. धिस रीव्हर इज पोल्युटेड. नो नो, सागर, आय अॅम मिसफीट इन युवर लाईफ अॅंन्ड हाऊस. प्लीज ट्राय टु अंडरस्टॅन्ड मी. ति बोलतच होती. आय अॅम शुअर, हे सगळं ऐकल्यावर तुला माझी कीळस येईल. यु विल हेट मी. ति खुपच भावनाविवश झाली होती. हमसून हमसून रडत होती.
मला हे सगळं अनपेक्षित होतं, मी सुन्न होउन सगळं ऐकत होतो.
मला या वर कसं रिअॅक्ट व्हाव हेच कळत नव्हतं. मी तिचा हात हातात घेउन म्हणालो, रिता काम डाउन. हे बघ तुला खरच बरं नाहीय. तु आराम कर, आपण नंतर बोलु. तु कांही खाल्लयस का? तुझ्या साठी ब्रेकफास्ट आणु का? मी कांहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. नको सागर , मला कांही खायची इच्छाच नाहीय. बरं तर मग तु आराम कर आपण परत या विषयावर बोलु ,आत्ता मी इथून जातो असं म्हणत मी तिथून तडक निघालो.
मीही त्या रात्री झोपु शकलो नाही. असं वाटलं, लेट अस फरगेट हर. पण का कुणास ठाऊक प्रयत्न करुनही मला ते जमेना. तिचा गोड चेहरा आणि ते तिचं नदीच्या प्रवाहा सारखं सतत बोलत राहणं डोळ्या समोरुन जाईनाच. मी मनोमन निश्चय केला, नाही, मला सरिता हवी आहे इर्रेस्पेक्टीव्ह ऑफ हर पास्ट. आत्ताच तिला सांगुन टाकावं असं वाटून मी तिला फोन लावला. "रिता कशी आहेस? मी विचारलं. मी ठीक आहे पण तू झोपला नाहीस? तुला मी दिलेला शॉक सहन झाला नाही नं? मला हे असं होणार हे माहीतच होतं सागर , बट आय हॅड टु टेल यु
ऑल धिस बिकॉज आय डु नॉट वॉन्ट यु टु रीग्रेट इन फ्युचर. तिनं एका दमात सगळं बोलुन टाकलं. " नो, नो, रिता आय स्टिल लव्ह यु, आय वॉन्ट यु , इर्रेस्पेक्टीव्ह ऑफ़ युवर पास्ट, आय वॉन्ट टु मॅरी यु. तिनं तिकडून फोन बंद केला होता.
दुसरे दिवशी मला वाटलं होतं येईल तिचा फोन. खूप वेळ वाट बघून शेवटी मीच फोन लावला. पण तिनं फोन स्विच ऑफ़ करुन ठेवला असावा. नंतर तिचा मेसेज आला' सागर, आय अॅम सॉरी , मी तुझ्याशी नसते रे बोलु शकले फोनवर. आपण आज भेटुया, आय विल गिव्ह यु कॉल , ओके? ओके, मी म्हंटलं.
दुसरे दिवशी तिचा फोन आला ' सागर, भेटुया आज संध्याकाळी? कुठ? मी विचारलं. पोर्टिको? ओके डन.
मी पोर्टीको मधे पोहोचलो. ती एका कोपरयातल्या टेबलवर माझी वाट बघत बसली होती. मी चेअर ओढत म्हणालो,सॉरी आय अॅम लिटल लेट. बेटर लेट दॅन नेव्हर ती हसून म्हणाली, बिलीव्ह मी आय वॉज नॉट शुअर दॅट यु विल टर्न अप.
का? असं का वाटलं तुला? मी विचारलं. कांही नाही असच. तीचा मूड छान दिसत होता ते बघुन मी विचारलं, हे काय? आज एकदम अचानक का सुचलं तुला डिनरला जायचं? मग ती एकदम गप्प झाली. का गं? काय झालं? मी वाट बघुन विचारलं. मग एकदम माझा हात हातात घेउन म्हणाली 'सागर ऐक नं, लेट मी कन्फेस समथिंग, काल तुझा फोन आला आणि तु जे बोलत होतास त्यावर कसं रीअॅक्ट व्हाव हेच मला कळत नव्हतं.
आय वॉज फ़र्स्ट टाईम एक्स्पीरीयंसींग ऑल धिस. तुझ्या बोलण्यातला सच्चेपणा मला खूप भावला रे. प्रेम हे माझ्या साठी आज पर्यंत फक्त एक डील असायचं. ईट वॉज ओन्ली गिव्ह अॅन्ड टेक, दॅट्स ऑल .
पण सागर, यु आर ॲन एक्सेप्शन, यु मेड मी रिकन्सीडर माय व्ह्युज. म्हणजे,म्हणजे रिता तु? मी एक्साइट होउन म्हणालो. 'अरे थांब थांब सागर, रिलॅक्स, मला थोडा वेळ देशील? मला थोडा विचार करु दे. मधेच थांबवून मला ती म्हणाली.
मी हलकेच तिचा हात हातात घेउन म्हणालो, ओके डिअर टेक युवर ओन टाईम. बरं चल ऑर्डर दे बघु लवकर, आय अॅम रिअली हंग्री. आणि हे बघ, टेन्शन नको घेउस, लेट अस एन्जॉय अवर डिनर , देन गो बॅक टु युवर रूम अॅन्ड थिंक ओव्हर नाइट इन गुड स्लीप. "ओके आशू थॅंक्स, आय वुइल,
जेवण संपवुन मी तिला तिच्या रुमवर सोडलं. जाताना मी तिचा हात हातात घेउन म्हणालो ' रीता ‘आय विल वेट फ़ॉर युवर डिसिजन, आय ॲम शुअर यु विल बी हॅपी वुइथ मी.
त्यानंतर तीन चार दिवस मी फोनच केला नाही म्हंटलं बघावं तीचा फोन येतोय का? तस मलाही कामानिमित्य पुण्याबाहेर चेन्नई ला जायचच होतं.
मी चार दिवसानी चेन्नई हून परत आलो तरीही तिचा फोन कांही आला नाही आणि माझा हात सारखा फोन चाळवत असला तरी माझा पुरुषी अहंकार मला तिला फोन करु देत नव्हता. पण मग मात्र मला धीर धरवेना. फोन केलाच. पण पलीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. असं खुप वेळा झालं, पण तिचा फोनच स्विच्ड ऑफ होता. शेवटी मी तिच्या फ्लॅट वर जायचं ठरवलं.
मी तिच्या फ्लॅटवर पोहोचलो, बर्याचदा डोअरबेल वाजवल्यावर दार उघडलं. दारात तिची रुम पार्टनर उभी होती.
'रीता’ कुठाय? मी आत डोकावत प्रश्न केला. आत या नं, तिची रुम पार्टनर म्हणाली. रीता नाही आहे का घरात? मी आत शिरत विचारल. तिची रुम पार्टनर कांही बोललीच नाही, मग जरा वेळाने म्हणाली 'तुम्हाला कांहीच माहीत नाही का? ती ससून मधे आहे. ससून मधे, का? कधी पासून? काय झालंय तिला? मला धीर धरवत नव्हता. तुम्हाला खरच काहीच माहीत नाही? अहो तिला चार दिवस झाले ससूनला ॲडमिट केलय, एक भयंकर घटना घडलीय तिच्या बाबतीत. तिला ऑफिसला घेउन जाणार्या कॅब च्या ड्रायव्हर नं आणि त्याच्या सहकार्यानं तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारायचा प्रयत्न केलाय. शी इज सिरीयसली इनज्युर्ड ॲंड अनकॉन्शस. मी सुन्न होऊन सगळं ऐकत होतो. माझ्या हातापायातली ताकदच गेली होती. मी तसच तडक ससून गाठलं. पोलिस केस झाल्यामुळे तिला जिथ ठेवलं होतं तिथं पोलिस होते. मी तिच्याबद्दल चौकशी केली. तुम्ही कोण त्यांचे? मला एका पोलिस कॉन्स्टेबलनं विचारलं? मी, मी तिचा मित्र, सागर पोंक्षे, कशी आहे ती आता?
अजून शुद्धीवर आलेल्या नाहीत त्या, कॉन्स्टेबलनं उत्तर दिलं. मी डॉक्टरना ना भेटलो. "डॉक्टर कशी आहे ती आता? कधी येईल शुद्धीवर?
कांहीच सांगतां येत नाही, खुप खोलवर जखम झालीय, खुप ब्लीडींग झालंय , वुई आर ट्राइंग अवर बेस्ट. बाय द वे, इफ यु आर हीज रीलेटीव्ह ऑर एनीबडी क्लोज टु हर, प्लीज इन्फॉर्म दी पुलीस ॲकॉर्डीन्गली. सो फार नो बडी हॅज कम फॉरवर्ड ॲज हर रिलेटीव्ह, डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांच्या या प्रश्नाला काय उत्तर देणार होतो मी? कोण होतो मी तिचा? काय संबंध माझा? काय करावं मला काही सुचतच नव्हत. शेवटी मनाशी निश्चय केला आणि डॉक्टरना म्हणालो, येस डॉक्टर , आय ॲम व्हेरी क्लोज टु हर. आम्ही लग्न करणार आहोत.
मग रोज माझ्या ससून च्या व्हीजीट्स सुरु झाल्या. आणि एक दिवस रिता शुद्धीवर आली. तिच्या कडे बघवत नव्हतं. खोल गेलेले डोळे, पांढरा फटक पडलेला चेहरा, अस्ताव्यस्त विस्कटलेले केस, खुप अशक्त झाली होती ती. मला बघुन तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सागर, तु? कळलं तुला? एवढ बोलताना सुद्धा तिला केवढा दम लागला होता. रिता, प्लीज बोलु नकोस, तुला त्रास होतोय. आपण सगळं नंतर बोलु, गेट वेल सून. मी तिला गप्प करायचा प्रयत्न केला. नाही नाही सागर बोलु दे मला, कदाचित नंतर बोलायला वेळ मिळणार नाही, एवढ कसबसं ती बोलली आणि परत तिची शुद्ध गेली.
एक दिवस ससून मधल्या डॉक्टरांचा फोन आला. मि.सागर, आय थिंक वुई वुईल हॅव टु गीव्ह डिसचार्ज टु मिस रिता नाउ, यु वुईल हॅव टु कम हीअर टु कंप्लीट द फॉर्मॅलिटीज. "ईज शी ओके अॅन्ड नॉर्मल अँड फुल्ली क्युअर्ड डॉक्टर? मी उत्साहानं विचारलं.
यु कम हीअर, वुई वुईल डीस्कस असं म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला. मी तडक ससून गाठलं. रिताचे रुम मेट्स ही तिथे आल्या होत्या. मी डॉक्टरांच्या केबिन मधे शिरलो, ते माझी वाटच पहात होते. लुक मि.सागर, अवर ट्रीटमेंट ईज ओव्हर, शी वुईल बी डिसचार्ज्ड टुडे. "बट ईज शी ऑलराइट डॉक्टर ? मी विचारलं. येस, शी ईज फुल्ली क्युअर्ड, शी कॅन गो टु हर हाऊस. त्यांचे जवळचे कुणी नातेवाईक नाहीत का? कांही फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील. "डॉक्टर मला त्यांची कांहीच माहिती नाही, तिचा भाऊ असतो कोल्हापुरला असं तिच्या बोलण्यात आलं होतं एकदा पण मला त्यांच्याबद्दल कांहीच माहिती नाही. पण तिच्या ऑफिसमधे माहीत असेल कुणालातरी , शिवाय तिचे रुम मेट्स ही आलेले आहेत इथे त्यांना आपण विचारु शकतो. ओके, मी त्यांच्याशी बोलतो. पण मि.sagar , मला तुमच्याशी थोडं बोलायचंय, पण मला आत्ता राउंडला जायचंय आपण नंतर बोलु, असं म्हणत डॉक्टर केबिनच्या बाहेर पडले. त्याच दिवशी रिताला डिसचार्ज दिला. मी तीला तिच्या रुम मेट्स सोबत तिच्या फ्लॅटवर सोडलं. जातानाही ती कांही बोलायच्या अवस्थेत नव्हती. मला बघून कसबसं तिनं चेहर्यावर हसू आणलं. कांहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण ते ही तिला जड जात होतं. रिता, रिलॅक्स , यु नीड रेस्ट नाऊ. डोन्ट वरी, यु वुईल बी परफेक्टली ऑलराइट सुन, असं तिला समजावत मी खाली आलो.
त्यानंतर दोन दिवसानी मी डॉक्टरना भेटलो. "सॉरी डॉक्टर , आय वॉज नॉट इन टाउन म्हणून लगेच येतां नाही आलं. नो नो यंग मॅन, ईट्स ऑलराइट , मी तुम्हाला एवढ्यासाठी परत बोलावले कारण तुम्ही आणि मिस रिता लग्न करणार आहात असं मला सांगितलं होतत. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ' कोणती गोष्ट डॉक्टर? माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मि.सागर, रिता बरी झालीय खरी पण, आय अॅम आफ्रेड, शी वुईल नॉट बी दी सेम. "म्हणजे? ईज शी नॉट यट नॉर्मल डॉक्टर ? नीड एनी फर्दर ट्रीटमेंट? एका दमात मी सगळं बोलून गेलो. नो नो, शी ईज टोटली क्युअर्ड बट, कसं सांगु तुम्हाला, तुम्ही तिच्याशी लग्न करणार आहात म्हणून सांगतो, ती तुम्हाला कसलच सुख देऊ शकणार नाही, ती तुमच्या मुलाची आईही होणे शकणार नाही. आय थिंक ईट वॉज माय ड्यूटी टु टेल यु ऑल धीस.
मी सुन्न होउन सगळं ऐकत होतो. काय बोलावे कांहीच सुचत नव्हतं. मी पुढं कांही न बोलताच डॉक्टरांचा निरोप घेतला. मला त्यानंतर दोन महीन्यांसाठी कंपनीच्या कामासाठी जर्मनीला जायचं होतं . जाण्यापुर्वि रिताला भेटायला जावं असं सारखं वाटत होतं पण का कुणास ठाउक मी ते टाळलं. पण जर्मनीत गेल्यावरही रिताची आठवण माझी पाठ सोडत नव्हती. मी तिला विसरायचा प्रयत्न करत होतो. का कुणास ठाउक पण तिचा गोल मोहक चेहरा आणि त्यावरचं ते खट्याळ हास्य नजरेसमोरून हालत नव्हतं खरं.
दोन महीन्यानी मी जर्मनीहून परत आलो. ऑफिसमधे माझ्या केबिन मधे अस्वस्थपणे बसलो होतो. डोक्यात विचारांच काहूर माजलं होतं. काय करावं? जावं का तिला भेटायला? कांहीच कळत नव्हतं. इतक्यात माझा सेलची रींग वाजली. अननोन नंबर होता. हॅलो कोण मि. सागर बोलताय का? पलीकडून कुणीतरी विचारत होतं. हो बोला, मी सागरच बोलतोय, आपण कोण? मी विचारलं. मी मिसेस पाटील बोलतीय, रिताची रुम पार्टनर, ' अहो कीती दीवसांपासुन तुम्हाला ट्राय करतीय पण तुमचा फोनच स्विच्ड ऑफ लागत होता'. हो मी, मी आउट. ऑफ इंडीया होतो, आज पहाटेच परत आलोय, बोला, कशी आहे रिता आता, आज संध्याकाळी येणारच आहे भेटायला तीला.
'हो याच तुम्ही, पण रिता आता तुम्हाला भेटण्यार नाही, पण तिनं तुमच्यासाठी एक पत्र दीलय ते तुम्हाला द्यायचय'. त्याचसाठी मी गेला आठवडाभर मी तुम्हाला फोन ट्राय करत होते' अहो पण, मी पुढं कांही बोलायच्या आधीच त्या बाईनं फोन ठेवला.
डोक्यात असंख्य विचारांचे ओझे घेत मी संध्याकाळी तिच्या घरी पोहोचलो. मी दारावरची बेल वाजवताच लगेचच दार उघडलं गेलं.मिसेस पाटील माझी वाटच पहात असाव्यात. माझा प्रश्नार्थक चेहरा बघून त्यांनी कांही न बोलताच माझ्या हातात एक एन्व्हलप ठेवलं. जाण्यापुर्वि सरीतानं मला हे तुम्हाला द्यायला सांगितलं होतं.
जाण्यापुर्वि म्हणजे? कुठ गेलीय ती? परगावी गेलीय का?
एका दमात मी इतकं सगळं विचारलं. नाही , ति आता या जगात नाही. तिनं आत्महत्या केली. झोपेच्या गोळ्या घेउन आपलं आयुष्य संपवलं तिनं. काय? मी जवळ जवळ ओरडलोच. अहो पण ती पुर्णपणे बरी झाली होती नं? डॉक्टरनी तसच सांगितलं होतं मला. .
हो, पण ती इथे परत आल्यापासून कुणाशीच फारसं बोलत नव्हती. कुठं बाहेर जातही नव्हती. आम्ही तिला बोलतं करायचा खुप प्रयत्न केला पण..
एक दिवस अचानक तिनं मला खुणेनच जवळ बोलावलं. कदाचित बोलताना तिला त्रास होत असावा. विमल जरा बस माझ्याजवळ असं म्हणत माझा हात हातात घेत ति मला म्हणाली ‘माझे एक काम करशील? हो पण तुला काय होतय? मी जरा काळजीनच तिला विचारलं .
हे बघ विमल , मी कांही आता बरी होत नाही. सागर सध्या इथे नाही आहे. कदाचित तो परत येईल तेंव्हा मी नसेन. तो परत आल्यावर माझी चौकशी करायला इथे नक्की येईल, त्यावेळेस त्याला हे माझे पत्र देशील? का गं? असं का बोलतीयस, तु नक्की बरी होशील आणि तो जेंव्हा इथे येईल तुच त्याला हे पत्र दे आणि तु प्रत्यक्ष भेटणार असतानां पत्र कशाला द्यायला हवं? मी तिला धीर द्यायचा प्रयत्न करत म्हणाले. त्यांवर तीनं नुसतंच हसून उसासा टाकला. बरं बघु असं म्हणत मी ते पत्र ठेवून घेतलं. आणि त्यानंतर तो भयंकर दिवस उजाडला. रात्री झोपलेली सरीता सकाळी उठलीच नाही.झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोसनं तिनं तिचं आयुष्य संपवलं होतं.
मी सुन्न होऊन सगळं ऐकत होतो. मी हातातलं ते इन्व्हलप फोडून त्यातलं पत्र डोळ्यांसमोर धरलं.
“ प्रिय सागर,
मला माफ कर. हे पत्र तुला मिळेल तेंव्हा मी या जगात नसेन. तुझ्या अल्पकालीन सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी निखळ आनंदाचा होता. त्या सुखद क्षणांचा अनमोल ठेवा बरोबर घेऊनच मी जाते आहे. प्रत्येक नदीच्या नशीबात सागराला जाऊन मिळायचं भाग्य नसतं रे. कांहीच्या नशिबात मधेच लुप्त होण्याचं असतं माझ्या सारखं. मी तुझी बायको होण्याच्या योग्यतेची नव्हतेच. मी ज्या जगात वावरत होते तिथे लग्न, पति, पत्नी, संसार, संस्कार, जबाबदार्या वगैरे गोष्टीना अजिबात थारा नव्हता. होता तो फक्त मुक्त स्वैराचार आणि व्यवहार . पण जेंव्हा तु माझ्या सहवासात आलास, विशेषत: तुझ्या बरोबर मी तुझ्या कोकणातल्या घरी आले होते तेंव्हा पासून का कुणास ठाऊक पण मला असं वाटायला लागलं होतं की खरच, घर, लग्न, संसार यातही थ्रील आहे, खुप मजा आहे, सुखही आहे आणि मला खरच ते सगळं हवं हवसं वाटायला लागलं होतं. पण! पण , ते सगळं मिळायला पात्रता लागते आणि नशीबही . ते दोन्हीही माझ्याकडे नव्हतं. तू हुशार आहेस, देखणा आहेस आणि मुख्य म्हणजे खूप विचारी आहेस. तू एखादी गोड , छानशी आणि तुला शोभेल अशी मुलगी बघून लग्न कर. ॲज ए वाइफ यु डेफिनेटली डिझर्व बेटर ऑप्शन दॅन मी .
बाय सागर, विश यु ऑल दी बेस्ट.
सरिता."
हातात ते पत्र तसच धरून मी सुन्न होऊन उभा होतो. त्याच अवस्थेनं मी तिथून बाहेर पडलो.
दोनच दिवसांनी भावाचा फोन आला, म्हणाला आईला तुझ्याशी बोलायचंय. "बंड्या, रीताला विचारलंस का लग्नाबद्दल ? आहे नं तयार ती तुझ्याशी लग्न करायला? ती तयार असेल तर लवकर लग्न कर बाबा, मी हयात आहे तोपर्यंत सुनेचं , नातवंडांचं सुख दे या म्हातारीला.
मला आईला काय सांगावं हेच कळत नव्हतं . मी आईला एवढेच म्हणालो "आई तुझ्या सागरचा प्याला "रीताच" राहिला बघ.
अशोक गोवंडे

2 Comments
खूप खूप छान.
ReplyDeleteखूप छान कथा
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box